क्षितीज

शाल्मलि's picture
शाल्मलि in जे न देखे रवी...
4 Jan 2009 - 8:33 pm

अदम्य इच्छा ही मनत क्षितीज होण्याची,
असते जेथे ओढ वेडया धरतील नभाला भेटण्याची;
मात्र तो असतो फक्त एक अभास
तरी आहे वेडया मनला अजुनही कोणाची आस?

कविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jan 2009 - 8:41 pm | परिकथेतील राजकुमार

कवितेतले आम्हाला काय विशेष कळत नाहि , आम्हाला या कवितेत फक्त 'मनत' आणी 'मनला' हे जे शब्द आले आहेत त्या जागी 'मनात' आणी 'मनाला' असे शब्द हवे होते येव्हडेच कळाले !!

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

शाल्मलि's picture

4 Jan 2009 - 9:05 pm | शाल्मलि

कळ्ल!
व्याकरण फार चा॑गलय ते.....
पहीलाच प्रयत्न तो आमचा....
=))

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:33 am | विसोबा खेचर

कविता अंमळ डोक्यावरूनच गेली..!

शाल्मली, कविता वगैरे तुझा प्रान्त नव्हे. तू आपली मिपावर छान छान पाकृच देत जा.. :)

तात्या.

झुमाक्ष's picture

7 Jan 2009 - 12:35 am | झुमाक्ष (not verified)

शाल्मलि आणि शाल्मली वेगळ्या आहेत वाटते.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

प्राजु's picture

7 Jan 2009 - 12:36 am | प्राजु

ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:41 am | विसोबा खेचर

ती सौ शाल्मली लिखाळ.. वेगळी. आणि ही शाल्मलि वेगळी आहे.. बहुतेक.

येस्स..! घोटाळा झाला खरा.. तरीच म्हटलं भरली भेंडी करणारी शाल्मली कविता केव्हापासून करायला लागली?! :)

आता उलगडा झाला..

आपला,
(र्‍हस्व-दीर्घात फसलेला) तात्या.

प्रियाली's picture

7 Jan 2009 - 12:46 am | प्रियाली

शुद्धलेखनाला फाट्यावर मारलं की असं होतं बॉ! शाल्मलि आणि शाल्मली सारख्याच दिसू लागतात. ;) ह. घ्या.

विसोबा खेचर's picture

7 Jan 2009 - 12:51 am | विसोबा खेचर

:)

असो..!

आपला,
तात्या वाळींबे.

शाल्मली's picture

7 Jan 2009 - 1:08 am | शाल्मली

झुमाक्ष, प्राजु आणि प्रियालीताई,
खुलाश्याबद्दल आभार. ही शाल्मलि मी नाही.

नावाच्या र्‍हस्व दीर्घातला हा लहानसा फरक पटकन कळत नाही हे खरेच आहे. पुढे सुद्धा असा गोंधळ होउ शकतो.
--शाल्मली.