परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो.
सोबत काही बिस्किटे ही खाल्ली. चहा चांगला होता म्हणून पुन्हा अर्धा अर्धा कप चहा सांगितला.
चहा पिताना आणि नंतरही आमच्या गप्पा चालूच होत्या
गप्पांच्या नादात बिल न देता तसेच पुढे निघालो.
थोडे पुढे गेल्यावर चहावाल्याचे बिल द्यायचे लक्षात आले म्हणून परत गेलो.
दुकानदाराला चहाचे बिल किती झाले ते विचारले तर त्यानेच उलट आम्हाला काय काय घेतले ते विचारले.
बिल देऊन झाल्यावर दुकानदाराला विचारले की तु असा कसा रे एखादा बिल न देता निघून गेला तर किंवा खोटे सांगून कमी पैसे दिले तर?
तो दुकानदार म्हणाला साहेब हे पार्ला आहे. इथे गेली आठ वर्षे धंदा करतो आहे. लोक स्वतः होऊन पैसे किती झाले हे सांगतात.
इथले लोक लबाड नाहीत. चांगले आहेत.
ऐकून खूप बरे वाटले.
प्रतिक्रिया
19 Sep 2025 - 10:39 pm | कंजूस
विश्वास
19 Sep 2025 - 11:55 pm | अमरेंद्र बाहुबली
असे प्रत्येक गाववाला सांगतो त्यात विशेष काय?
25 Sep 2025 - 12:05 am | सौन्दर्य
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत .
हीच कथा मध्यप्रदेशची.
राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.