स्पर्शरेषा जोखते जणु
वर्तुळाची वक्रता
परीघ अंशी / व्यास छेदी
(π) उरवी तत्त्वता
वर्तुळाचे केन्द्र जीवा #
ना कधीही स्पर्शिते
केंद्र गिळता तीच जीवा
व्यास बनुनी राहते
(π) द्विगुणित होऊनी
परिघास जेव्हा भागतो
हाती ये त्रिज्या-जिला
व्यासार्ध कुणी संबोधितो
वर्तुळाच्या गारुडाने
भूल गणिती टाकली
जटिल विद्यांची कवाडे
(π) करितो किलकिली
परीघ, त्रिज्या दोन्हीही
परिमेय असती पण तरी
(π ) का मज वेड लावी
अपरिमेयाचे परी
~~~~~~~~~~~~~
# जीवा = chord of a circle
(π) = 3.14.....
अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational
प्रतिक्रिया
6 Sep 2025 - 6:51 am | चित्रगुप्त
π लागू महात्मन.
6 Sep 2025 - 2:42 pm | कर्नलतपस्वी
वर्तुळाकार माणसे त्यांची त्रिकोणी नाती
अधिक उणे नात्यांमधे शुन्य लागे हाती
सरळ रेषेत चालता, चौकोनी जग अडवते,
प्रत्येक कोनावर मग, नवे गणित मांडते.
भावनेचा गुणाकार, अपेक्षांचा भागाकार,
बाकी उरतो शेवटी, फक्त पोकळ पसारा.
हे जीवनाचे गणित, कधीच नाही सुटणार,
उत्तराच्या आधीच इथे, आयुष्य संपून जाणार
6 Sep 2025 - 5:18 pm | विवेकपटाईत
6 Sep 2025 - 7:00 pm | कर्नलतपस्वी
मुक्तछंदी म्हणजे इयत्ता दहावी मधे गणित सोडून बायोलाॅजी घेतलेला कवी
AI विचारले,उत्तर मिळाले.....
कवितेचे गणित (अभंग छंदात)
शब्दांचे अंक घेउनी,
कवी रचतो मांडणी।
भावांच्या गणितातुनी,
फुले कविता।। १।।
लघु म्हणजे एक मानावा,
गुरू अक्षरास दोन।
मात्रांचा मेळ साधावा,
ठेवुनी भान।। २।।
'य-र-त-भ' आदी गण,
सूत्रांची सुंदर माळ।
बांधून ठेविती मन,
आणि गान।। ३।।
गणिताची अचूकता,
अन् कवितेची लयबद्धता।
दोहोंच्या मिलनातुनी,
झरे सुंदरता।। ४।।
6 Sep 2025 - 3:16 pm | स्वधर्म
गणितावर कविता करता येते, पण कवितेचे गणित करता येईल का?
6 Sep 2025 - 4:48 pm | कर्नलतपस्वी
मस्त कल्पना आहे.
बघु शब्दच्छल तर आहे.
6 Sep 2025 - 6:20 pm | श्वेता२४
दोघांच्याही कविता आवडल्या.
6 Sep 2025 - 6:23 pm | राजेंद्र मेहेंदळे
कविता यमकावर, अर्थावर, प्रमेयावर,गेयतेवर सगळ्याच कसोट्यांवर उतरली आहे. π या पडतो.
12 Sep 2025 - 10:18 am | अनन्त्_यात्री
https://search.app/rb2W1