त्या पडद्याच्या पल्याड वसते

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
25 Apr 2025 - 5:35 pm

त्या पडद्याच्या पल्याड वसते
गूढ असे "ते "काही
(अंतर "त्या"च्या-माझ्या मधले
घटते, कळतही नाही)

भेट अटळ आहेच "त्या"ची मग
वाट कशाला पाहू?
(अस्तित्वाचा सूर्य ग्रासण्या
अविरत टपला राहू)

"अस्तित्वाच्या पूर्णविरामा-
-नंतर काहीच नसते"-
(माहित असले - तरी मानसी
उत्कंठा का वसते?)

त्या पडद्याचे धूसर दर्शन
अधुनी मधुनी घडते
("जाऊनी वरती, परतुनी आले"
ऐसी कुजबुज होते )
:)

मुक्तक