रे!!
रे तसा रोजच असतो सभोवताली
पण कधीतरी अचानक गवसतो.
आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो.
रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच.
म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा.
भूत भविष्याचं ओझं न वाहणारा,
मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे!
कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा ,
कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे!
पण रे ला पहायचं ते गं सोबत!
एका रे ची तिथं किती ती रुपं!
गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे!
गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!
गं ला जपणारा तितकाच कोमल हळवा ऋजु रे!
वेड्या गं ची समजुत घालणारा रहनुमासा रे!
सर्व काही देऊनही रिता न होणारा संयमी अभोगी रतजगासा रे!
...
पण, पण, पण..
गोंधळलेल्या, अघळपघळ, आणि पट्कन गुंतणा-या बिचा-या गं चं या रोखठोक, रमूनही फार वेळ न रेंगाळणाऱ्या रे सोबत कसं बरं व्हायचं???
???
(रुहानी- रुह किंवा आत्म्याशी नातं असलेला
रुमानी- प्रणयी
रहनुमा- रस्ता दाखवणारा, मार्गदर्शक
रतजगा- रात्रीचं जागरण)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2609
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सा रे कि सा रे ग म को लेकर
:)
In reply to सा रे कि सा रे ग म को लेकर by भागो
मस्त चालूय...
धन्यवाद सर!:)
In reply to मस्त चालूय... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'ग' आणी'रे' मधला 'सा',
:):)
In reply to 'ग' आणी'रे' मधला 'सा', by कर्नलतपस्वी
आमचा सा ....
In reply to :):) by प्राची अश्विनी
मस्त!
वाह! तुझी आधीची अ"रे"रावी पण
In reply to मस्त! by Bhakti