पेय निघून गेले (विडंबन)

कांदा लिंबू's picture
कांदा लिंबू in जे न देखे रवी...
6 May 2024 - 3:12 pm

प्रेरणा: ते दिवस निघून गेले

टेबलावर प्याले आपटून
आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून
धुंद धुंद होत रिचविण्याचे
ते दिवस निघून गेले.

मित्रांमध्ये पिऊन-पाजवून
विकांताला पार्ट्या करून
तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे
ते दिवस निघून गेले.

थोडीशीच वोडका पिऊनसुद्धा
आपल्या घरी जाऊन
बायकोचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले.

पुरेसे खंबे आधीच आणून
बॅकअप बाटली तयार ठेऊन
तरीही एक क्वार्टर कमी पडण्याचे
ते दिवस निघून गेले.

गार बर्फाच्या दोन खड्यांवर
सोनेरी स्कॉच मापात ओतून
हळुवार सिप करत राहण्याचे
ते दिवस निघून गेले.

एकच प्यालाचा आग्रह करून
पण शेवटी सगळ्याच बाटल्या संपवून
स्वतःचे-इतरांचे भान न उरण्याचे
ते दिवस निघून गेले.

बिअर पासून सुरु करून
हळूहळू हार्ड घेत राहून
शेवटी अट्टल सोशल ड्रिंकर होण्याचे
ते दिवस निघून गेले.

होळी, गटारी आणि थर्टी फर्स्ट
काही न काही निमित्त काढून
मधुशालेची वारी करण्याचे
ते दिवस निघून गेले.

पिण्याच्या यादीतील ब्रॅण्ड्सना
कधीच नव्हता-नसेल अंत
"कम्बख्त, तुने पी ही नही"
नसे असला खेद-खंत.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

तुम्ही डोकं लावलंत की एआयचा वापर केला?

एआय नसेल तर धागा बाद !

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2024 - 8:34 pm | अमरेंद्र बाहुबली

हीही.