वय निघून गेले

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
5 May 2024 - 10:10 pm

परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे.
भाऊसाहेब मला म्हणाले
“माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल”
असं म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगितल्या.त्या मी खलील कवितेत लिहिल्या. वाचून दाखवल्यावर त्यांना बरं वाटलं.

ते दिवस निघून गेले

मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्षमा याचनांचे
ते दिवस निघून गेले

गृहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्गृहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्मृतिना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचा
नसे कसला खंत

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

6 May 2024 - 2:09 am | चित्रगुप्त

छान कविता आहे. प्रा. देसाईंना शुभेच्छा. सत्तरीपासूनच्या पुढील काळात जुने मित्र आपल्या नित्य संपर्कात असणे, त्यांचेशी काव्यशास्त्रविनोद करण्यात वेळ घालवता येणे, आपली सृजनशीलता जपत काहीतरी उद्योग करत रहाणे हे फार मोठे भाग्यच म्हणायला हवे. तुम्हा दोघांची मैत्री अशीच वर्षानुवर्षे चालत राहो.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 May 2024 - 3:33 am | श्रीकृष्ण सामंत

तुमच्या शुभेच्छा फलदायी होवो

प्रसाद गोडबोले's picture

6 May 2024 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले

आजोबा,

एक लिटर पाण्यामध्ये एक पाकिट इलेक्त्रोल मिक्स करून थोडे थोडे अधून मधून पित रहा. इलेक्ट्रॉल मध्ये ओरल री हायद्रेशन सॉल्ट असल्याने त्याने जीव वाचतो, नाहीतर शरीरातील पाणी आणि मिनिरल कमी झाल्याने जीवावर बेतू शकते.

त्यानं काय बी व्हणांर नाय बघा!
अशे भयंकर जुलाब लागल्यावर पेसनला उल्टा टांगुन खालनं मिर्च्यांची धुरी दिली तर लवकर आराम पडतो असं आमची आजी म्हणायची!