शेपु भात

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in पाककृती
20 Dec 2008 - 12:23 pm

माझे बाबा नेहमी सांगतात आम्हाला की जे पोटासाठी चांगलं ते चवीला वाईट आणि जे चवीला चांगलं ते पोटाला वाईट.
काही चवीला उग्र अश्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत जसा शेपु.
शेपू ही भाजी चवीला उग्र असली तरी ती पोटाच्या आरोग्यासठी उत्तम अशी भाजी आहे.

शेपू भात.
२ वाटी तांदूळ
२कांदे उभे चिरुन
१+१/२ वाटी बारीक चिरलेला शेपू
५/६ लसणीच्या पाकळ्या बारिक वाटुन
२/३ मोठे चमचे लोणी
२ चमचे तिखट
मीठ चवीनुसार
४-४ प्रत्येकी लवंग , मिरीचे दाणे
४ वाट्या आधणाचे पाणी
तूप

प्रथम २ वाटी तांदूळ धुवून कोरडे करुन घ्यावेत.
नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घाला.मग ते वितळू लागल्यावर त्यात लवंग , मिरीचे दाणे घाला. त्याचा वास येवू लागल्यावर त्यात लसूण वाटून घाला आणि परता. लसूण खाली लागणार नाही याची काळजी घ्या.मग त्यात चिरुन घेतलेले कांदे व बारीक चिरलेला शेपू घाला व २ मिनीटे परता. मग त्यात २ वाटी तांदूळ घालुन. तांदूळ सुट्टा होईपर्यंत परता.तांदूळ गुलाबीसर झाल्यावर त्यात तिखट व मीठ घाला. आता त्यावर ४ वाट्या आधणाचे पाणी घालुन भात शिजवून घ्या. नंतर बाजूने लोणकढे तूप सोडा व हा झाला आपला शेपू भात तय्यार.
ह्याबरोबर दह्यातले कांदा, काकडीचे रायतेही छान लागते.

अवांतरः
जर कोणाला हा भात कसा दिसत आहे ते बघायचे असल्यास क्रुपया १.३० वाजे पर्यंत माझ्या ऑफीसमध्ये या. भात आणि त्याची चव दोन्ही बघायला मिळेल नक्की. :))

प्रतिक्रिया

साखरांबा's picture

20 Dec 2008 - 7:10 pm | साखरांबा

माझे बाबा नेहमी सांगतात आम्हाला की जे पोटासाठी चांगलं ते चवीला वाईट आणि जे चवीला चांगलं ते पोटाला वाईट.

आपण तर जीभेचे चोचले पुरवतो. जिभलीबाई छान म्हणत असेल तर शेपुच का डुकराचे शेपुटपण खाऊ. >:)

कवटी's picture

20 Dec 2008 - 8:06 pm | कवटी

वा वा वा स्नेहश्रीताई , शेपूची भाजी म्हणजे आमचा जीव की प्राण. पण हा प्रकार कधि खाल्ला नव्हता...
आता करुन बघतोच. आणि जमले तर फोटू पण टाकतो.

कवटी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता करुन बघतोच. आणि जमले तर फोटू पण टाकतो.
कवटीभय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है।

प्राजु's picture

20 Dec 2008 - 11:12 pm | प्राजु

कवटीभय्या आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
कधी कुठे येऊ सांगा फक्त..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कवटी's picture

23 Dec 2008 - 5:02 pm | कवटी

बोलल्याप्रमाणे फोटू येथे टाकले आहेत.

कवटी

मन्जिरि's picture

22 Dec 2008 - 2:26 pm | मन्जिरि

तुला दुसर काहि मिळाल नाहि का?

विसोबा खेचर's picture

22 Dec 2008 - 5:24 pm | विसोबा खेचर

मॅडम, आम्हाला शेपू आवडत नाही, माफ करा प्लीज... :)

स्नेहश्री's picture

23 Dec 2008 - 9:22 am | स्नेहश्री

अर्थात ही वैयक्तिक गोष्ट आहे.
ठीक आहे हरकत नाही.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

चकली's picture

23 Dec 2008 - 12:28 am | चकली

शेपू कधी खाल्ला होता ते आठवतही नाही. एका विसरलेल्या भाजीची आठवण केल्याबद्द्ल धन्यवाद.

चकली
http://chakali.blogspot.com

स्नेहश्री's picture

23 Dec 2008 - 9:24 am | स्नेहश्री

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

वेताळ's picture

23 Dec 2008 - 9:48 am | वेताळ

शेपु चा उग्रवास मल अजिबात आवडत नाही. त्यात कुणी शेपु आंबे खाल्ले आहेत का? ते चवीला गोड असतात पण साला त्याचा वास सहन होत नाही. आमच्या इकडे त्यामुळेच शेपु आंबे स्वस्त मिळतात.
वेताळ