शेपु भात
माझे बाबा नेहमी सांगतात आम्हाला की जे पोटासाठी चांगलं ते चवीला वाईट आणि जे चवीला चांगलं ते पोटाला वाईट.
काही चवीला उग्र अश्या भाज्या आपल्याला आवडत नाहीत जसा शेपु.
शेपू ही भाजी चवीला उग्र असली तरी ती पोटाच्या आरोग्यासठी उत्तम अशी भाजी आहे.
शेपू भात.
२ वाटी तांदूळ
२कांदे उभे चिरुन
१+१/२ वाटी बारीक चिरलेला शेपू
५/६ लसणीच्या पाकळ्या बारिक वाटुन
२/३ मोठे चमचे लोणी
२ चमचे तिखट
मीठ चवीनुसार
४-४ प्रत्येकी लवंग , मिरीचे दाणे
४ वाट्या आधणाचे पाणी
तूप
प्रथम २ वाटी तांदूळ धुवून कोरडे करुन घ्यावेत.
नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात लोणी घाला.मग ते वितळू लागल्यावर त्यात लवंग , मिरीचे दाणे घाला. त्याचा वास येवू लागल्यावर त्यात लसूण वाटून घाला आणि परता. लसूण खाली लागणार नाही याची काळजी घ्या.मग त्यात चिरुन घेतलेले कांदे व बारीक चिरलेला शेपू घाला व २ मिनीटे परता. मग त्यात २ वाटी तांदूळ घालुन. तांदूळ सुट्टा होईपर्यंत परता.तांदूळ गुलाबीसर झाल्यावर त्यात तिखट व मीठ घाला. आता त्यावर ४ वाट्या आधणाचे पाणी घालुन भात शिजवून घ्या. नंतर बाजूने लोणकढे तूप सोडा व हा झाला आपला शेपू भात तय्यार.
ह्याबरोबर दह्यातले कांदा, काकडीचे रायतेही छान लागते.
अवांतरः
जर कोणाला हा भात कसा दिसत आहे ते बघायचे असल्यास क्रुपया १.३० वाजे पर्यंत माझ्या ऑफीसमध्ये या. भात आणि त्याची चव दोन्ही बघायला मिळेल नक्की. :))
वाचन
6555
प्रतिक्रिया
0