दोन ओळींची कविता,......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
20 Sep 2023 - 10:08 am

इच्छापत्र लिहून, संपत्तीची वाटणी केली
वाचून बघ म्हंटल तर,

दोन टिपे गाळून, तीने पावती दिली

बघता बघता ढग भरून आले

मधेच विज कडाडून गेली

काय कमावले,किती कमावले,

"ती", दोन टिपे खुप काही सांगून गेली

तुमचं आपलं काहीतरीच बाबा,......

कागदावरची अक्षरे धुसर झाली

दोन ओळीची कविता,

बरेच काही सांगून गेली

तीची दोन टिपे ,माझी दोन टिपे,
जेव्हां एकत्र झाली....

वाटले, हरिद्वारची गंगाच दारी आली

जाणिवजीवनगुंतवणूक

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2023 - 10:58 am | कर्नलतपस्वी

म्हणजे आपोआप अश्रू ओघळणे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Sep 2023 - 12:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

म्हटले तर प्रॅक्टीकल, म्हटले तर ईमोशनल . वाचक कुठल्या नजरेने वाचतोय त्यावर ठरेल.

बाकी लिहिलेले खरेच असेल तर, ईच्छापत्र करणे ही काळाची गरज आहे असेच म्हणेन. त्यात भावना आणू नयेत. (कधीकाळी विमा काढा म्हटले तरी लोक म्हणायचे"का माझ्या मरणावर टपलायस?)

मृत्युपत्र म्हणले की नकळत डोळ्यात पाणी येतेच.

मी कायमच माताहतांना विल बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

वरिष्ठांनी इच्छापत्र करून आपले मनोगत जाहीर करून उर्वरित आयुष्य सुखात जगावे व नंतर प्रियजनांना होणारा कायद्याचा त्रास वाचवावा.

पाषाणभेद's picture

24 Sep 2023 - 10:12 pm | पाषाणभेद

छान कल्पना आहे.

पाषाणभेद's picture

24 Sep 2023 - 10:13 pm | पाषाणभेद

छान कल्पना आहे.

चित्रगुप्त's picture

24 Sep 2023 - 10:42 pm | चित्रगुप्त

आवडली चौदा ओळींची कविता. पण तिला 'दोन ओळींची' का म्हटले ते समजले नाही.
समजा कुणा एकाची दोन - चार घरे/प्लॉट/शेतजमिनी वगैरे आहेत. त्या प्रत्येकाबद्दल वेगवेगळे इच्छापत्र करून ते त्या त्या कागदपत्रांबरोबर फायलीत ठेवावे असा सल्ला मला एका चांगल्या वकिलाने दिला आहे. म्हणजे ती ती प्रॉपर्टी विकताना त्रास होत नाही. याबद्दल जाणकारांचे काय मत आहे ?