हिंदू असणे म्हणजे काय?

स्वधर्म's picture
स्वधर्म in काथ्याकूट
8 Sep 2023 - 2:35 pm
गाभा: 

मित्र 1 व मित्र 2 हे उच्चशिक्षित असून कार्पोरेट कंपनीत काम करतात व गेली 20-25 वर्षे त्यांची मैत्री सुखाने चालू आहे. ते सतत खाली दिलेल्या विषयावर बोलत असतात. पडदा उघडतो म्हणण्यापेक्षा मोबाईलचा स्क्रीन उघडतो तेंव्हा...
मित्र 1: युनाइटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी मुरारी बापू यांच्या कार्यक्रमात केलेले भाषण ऐक:
https://www.youtube.com/watch?v=z3h-PLbQuF4
मित्र 2: आश्चर्यकारक! रामायण हा आपला हिंदूंचा श्रद्धाविषय आहे. आणि श्रद्धेच्या ठिकाणी प्रश्न विचारता येत नाहीत. राजकारणी लोकमताचा आदर करतात आणि ते वापरुन आपले स्थान व ईप्सित साध्य करतात. यांचाही अपवाद नाही.
मित्र 1: एक अवांतर प्रश्न - तू स्वतःला हिंदू मानतोस का? उत्तर जर हो असेल तर, त्याचा अर्थ काय? जर नाही असेल तर त्याच कारण काय. उत्तर न देण्याचा तुझा अधिकार सुद्धां अर्थातच मान्य आहे
मित्र 2: हे आवडलं खूप. कारण...धर्म ही अत्यंत व्यक्तिगत गोष्ट आहे आणि मला धार्मिक होणे महत्त्वाचे आणि आवश्यक वाटते. मला कोणत्याच संघटीत धर्माची (हिंदू, ख्रिश्चन इ.) आवश्यकता वाटत नाही.
मित्र 1: म्हणजे तू हिंदू धर्माला organized religion मानतोस आणि म्हणून स्वतः ला हिंदू मानत नाहीस. हे बरोबर आहे का?
मित्र 2: Organised religion न मानणारा हिंदू नसतो का? मला वाटते मूळ प्रश्न विचारताना हिंदू धर्माची तुझी व्याख्या समजली तर नीट उत्तर देता येईल.
मित्र 1: मी कुठे असं म्हणालो? तू म्हणालास मला कोणत्याही संघटित धर्माची आवश्यकता वाटत नाही उदाहरणार्थ हिंदू, ख्रिश्चन वैगेरे...
हिंदू धर्म organized religion नाहीच आहे मुळी. तू म्हणतोयस तस. माझी व्याख्या फुरसतीने सांगावी लागेल. तुझी व्याख्या सुद्धा ऐकायला आवडेल
मित्र २: स्वतः काही व्याख्या करावी एवढं ज्ञान मला नाही. खाली आवडलेला एक उतारा देत आहे.
धर्मात असणे म्हणजे मनातील जळमटे निघून जाऊन ते शुद्ध असणे. निसर्गनियमाप्रमाणे जेव्हा मन शुद्ध असते तेव्हा ते प्रेम, करूणा, सहानुभूती, आनंद आणि समतेत असते. ही शुद्ध मनाची लक्षणे आहेत. असे शुद्ध मन हिंदूचे असेल नाहीतर ख्रिश्चयनाचे, भारतीयाचे असेल नाही तर पाकिस्तान्याचे, त्याने काहीही फरक पडत नाही. ज्यामुळे मन असे शुद्ध होते, त्यालाच मी धर्म मानतो. मनाचे हेच मूळ रूप आहे, आणि या गुणांना आपला धर्म असतो. जो कितीतरी शांती, समाधान देतो. असे मन असेल तर माणूस स्वत:ला काही का म्हणवून घेईना. तो कोणतेही कर्मकांड करो, की न करो. ह्या ह हो संप्रदायाचा उत्सव करो की त्या. त्याचा पोषाख कसाही असो. तो या तत्वज्ञानाला मानत असो की त्या. त्याने काहीही फरक पडत नाही. त्याला त्याचा धर्म सापडला, कळला असे मी मानतो.
मित्र 1: तू म्हणतोस त्यानुसार मला कळलेलं असं की तू स्वत:ला हिंदू समजत नाहीस पण तू चित्त शुद्धी करण्याचा प्रयत्न करतोस .
मित्र 2: तू कशाला हिंदू मानतोस ते समजल्याशिवाय मी काहीच म्हणू शकत नाही. तू त्याची व्याख्या दे. अधिक महत्वाचे हे की तुझा माझ्याबद्दलचा दृष्टीकोन व वागणूक या लेबल नुसार बदलणार आहे का?
मित्र 1: तू प्रश्नाला बगल देत आहेस. माझा प्रश्न सोपा आहे: तुझ्या जी काही असेल त्या व्याख्ये नुसार तू स्वत:ला हिंदू मानतोस का? माझा दृष्टीकोन बदलणार नाहीच.
मित्र 2: हिंदू हे एक मोठ्ठ गाठोडं आहे. म्हणजे काय ते स्पष्ट नाही. व्याख्याच स्पष्ट नसल्यामुळे नेमके उत्तर देता येत नाही. सरकारच्या आणि घटनेतल्या व्याख्येनुसार मी स्वत:ला हिंदुच मानतो. आता तुझी व्याख्या इथे दे.
मित्र 1: तांत्रिक पद्धतीने सांगायचं झालं तर जो पुढील सहा ज्ञान परंपरांचे अनुसरण करतो तो हिंदू होय. त्या परंपरा अशा - सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा (अद्वैत वेदांत). अद्वैत वेदांत हे त्या सर्वाना पचवून शिखरस्थानी विराजमान आहे. जरी हे सर्व मार्ग वेगवेगळया प्रकारे सत्याचा ठाव घेत असले, तरी मानवी जीवनाचे अंतीम ध्येय जे की सर्व क्लेशांपासून सुटका आणि संपूर्ण मुक्ती याबाबत ते एकसारखेच आहेत. खरे तर आस्तिक शब्दाची तांत्रिक व्याख्या म्हणजे वरीलपैकी एका मार्गात (सर्व मार्ग ईश्वरावर विश्वास ठेवणारेच आहेत) असणारा माणूस. ईतर मूळ परंपरा म्हणजे जैन, बौद्ध व चार्वाक. या नास्तिक होत. या नास्तिक परंपरा या तांत्रिक दृष्ट्या हिंदू परंपरा नाहीत, तर वैदिक संस्कृतीपासूनच उगम पावलेल्या व काही मूलभूत बदल घडवून निर्माण झालेल्या परंपरा आहेत.
बाहेरून आलेल्या धर्माच्या आधी हिंदू ही संज्ञाच नव्हती. तेव्हा फक्त वैदिक संस्कृतीच होती. इस्लाम, ख्रिश्चन आणि झोराष्ट्रीयन इ. परंपरांनी मूळ संस्कृतीला हिंदू हे नाव दिले. त्या वेळी हिंदू हा रूढ अर्थाने धर्म झाला.
हिंदू हा सनातन धर्म आहे. त्यात कोणी प्रेषित नाही येशू किंवा महांमदासारखा आणि नियंत्रक आणि नियंत्रित केले जाणारे असा संबंधही नाही. जसे की चर्च हे व्हटिकनद्वारे नियंत्रित केले जाते. वैदिक संस्कृति ही अत्यंत लवचिक आणि समावेशक आहे. ती माणसाला तो जिथे कुठे असेल तिथून, त्याच्या ज्या काही श्रद्धा असतील, जेवढी समज असेल तिथून पुढे उन्नत होण्यासाठी मदत करते. आता माझी व्याख्या अशी की, गीता, उपनिषदे आणि ब्रम्हसूत्रे ही प्रस्थानत्रयी जो अनुसरतो, तो हिंदू. ही थोडी सोपी केलेली व्याख्या झाली.
मित्र 2: वरील विवेचनावर भरपूर चर्चा करता येईल पण, ते फार महत्त्वाचे नाही. मूळ प्रश्न असा की स्वतःला हिंदू माणणे म्हणजे काय? हिंदू म्हणवून घेण्याचे निकष काय?
आता ते जर गीता, उपनिषदे आणि ब्रम्हसूत्रे या प्रस्थानत्रयींचे अनुसरण (follows) करणारी व्यक्ती असे असेल तर...
जर मी आपल्या मुलांना हा निकष लावला तर ते हिंदू ठरतील का? त्यांना विचारुया का की ते प्रस्थानत्रयी अनुसरतात का?
बाकी हिंदू असा काही धर्म नव्हताच आणि नाही, जो होता तो फक्त वैदिक धर्मच होता हे तुझे मत असेल तर मला पटलेलेच आहे. हिंदू ही एक सर्वसमावेशक ढोबळ संज्ञा आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या अर्थाने मी हिंदू आहे. पण मी वैदिक नाही.
मित्र 1: माझ्या प्रश्नात मला कागदोपत्री तुझा धर्म काय ते अभिप्रेत नव्हत, त्याचं उत्तर हिंदू च असणार ते मला माहिती आहे. पण विचारसरणीने तू स्वतः ला हिंदू मानतोस का ? अस मला विचारायचं होत.
तू वैदिक धर्म मानत नाहीस त्यार्थी विचाराने तू हिंदू नाहीस असा मी घेतो. (माझी त्याला काही हरकत असण्याच ही कारण नाही)
आजच्या काळात प्रस्थान त्रयी वाचणारे कमीच असणार. आपली मुलं जाऊ देत पण आपल्या पिढीत सुद्धा कोणी त्या फंदात पडत नाही. पण त्यातील विचार कमी अधिक फरकाने, ढोबळ मानाने त्यांना माहीत आणि पटत असतात. ईश्र्वरावर विश्वास, कर्म सिद्धांतावर, मोक्ष संकल्पनेवर विश्वास, नित्य नैमित्तिक कर्म करणे (रोज प्रार्थना, एखाद्या वेळीं पूजा पाठ), चार आश्रमावर विश्वास, सणासुदीला धार्मिक कर्म इत्यादी...
निदान माझ्या मुलांच्या बाबतीत मी हे म्हणू शकतो...
चांगली चर्चा झाली, त्यामुळे मला वाटत हा विषय इथेच थांबवू...
मित्र 2: हिंदू हे वैदिकांपासून वेगळे आहेत हे आपण दोघांनीही प्रस्थापित आणि मान्य केले आहे. तेंव्हा आता वैदिकांनी वैदिक असण्याचे निकष ठरवायला काहीच हरकत नाही, पण त्यांनी हिंदू असण्याचे निकष का ठरवावेत, असं नम्रपणे विचारावं वाटतं. ते स्वतःला हिंदू माणणाऱ्यांवर सोडून देणंच न्याय्य नाही का? एकूणच वैदिकांकडे हा अधिकार कोणी कधी दिला?
दुसरे, वैदिक धर्म न माणणारा विचाराने हिंदू असतो की नसतो हे स्वत:ला हिंदू माणणाऱ्याला ठरवू द्यावे, ही अपेक्षा अवास्तव नसावी. काही मान्यता मानणे आणि काही उपासना पध्दती अवलंबणे ही माझी धार्मिक असण्याची व्याख्या नाही असे मी मला पटलेल्या तुला पाठवलेल्या उताऱ्यात म्हटलेच आहे.
चर्चा चांगली झाली, तू म्हणत असलास तर थांबवू. तूच म्हटल्याप्रमाणे माझा धर्म तुझ्या निकषांनी निश्चित केलास तरी तुझा माझ्याप्रती दृष्टिकोन, वागणूक बदलणार नाही हा मला मोठाच दिलासा आहे. त्यामुळे ही चर्चा हा केवळ बौद्धिक विरंगुळाच होता, नाही का?
मित्र 1: हिंदू हे वैदिकांपासून वेगळे आहेत असं मी कधी म्हटल? वैदिक धर्माला हिंदू असं नाव पडल अस मी म्हणालो. तू तुझ्या व्याख्या काय नाहीत हे सांगताना त्या काय आहेत हे मात्र सांगत नाहीयेस
प्रश्न विचारण्याचा उद्देश, तुझ्या विचारांची उत्सुकता, असा होता... बौद्धिक विरंगुळा नाही
मित्र 2: मूळ संस्कृतीला हिंदू हे नांव पडलें, असे लिहिले होते. वैदिकांना ते नांव पडलें नव्हते. That is different than Vedic dharma. As you said, many Hindus (aboriginal culture people) have no clue about प्रस्थान त्रयी. त्यांना फक्त मान्यता, रुढी परंपरा आणि उपासना पध्दती आहेत.
शिवाय माझी व्याख्या उताऱ्यात आहेच की. धर्म हा व्यक्तीगत असतो, आपला आपण सतत शोधावा लागतो, असे माझे मत आहे.
मित्र 1: मूळ संस्कृती वैदिक होती .... ईतर प्रवाह हे त्यापासून निघालेले आहेत. असो. तर मग आत्ता पर्यंतच्या तुझ्या शोधात काय सापडलंय ?
मित्र 2: आपण योग्य मार्गावर आहोत असे आश्वासक वाटणे. पण मी त्याला theorise करु शकणार नाही. माझ्या वडिलांना किंवा आज्जीला उपनिषदे किंवा ब्रम्हसूत्रे माहिती नव्हती, असे खात्रीपूर्वक म्हणू शकतो. त्यांच्या काही देवतांवर श्रध्दा होत्या, काही उपासना पध्दती आणि मान्यता होत्या, इतकेच. त्यामुळे ते आपल्या धर्माला हिंदूच मानत होते, वैदिक संकल्पना माहिती नव्हत्या. अशीच पूर्वी बहुसंख्य लोकांची परिस्थिती होती व आपल्या मुलांची पण आहे.
मित्र 1: त्यात काहीच अयोग्य नाही. उपासना आणि कर्म कांड ह्या ज्ञान कांडाकडे नेणाऱ्या पायऱ्या आहेत... कुठल्याही वेळी समाजात, ज्ञानाच आकर्षण आणि तयारी असणारी माणस अगदीच थोडी असतात... पण भारतातला अगदी गरीब अडाणी शेतकरी सुद्धा म्हणतो सब भूमी गोपालकी... ही खूप मोठी समज आहे.. भले त्याने ग्रंथ वाचले नसतील
मी जेंव्हा म्हणतो गीता, उपनिषदे तेंव्हा त्यातील ज्ञानाच्या / तत्वांच्या पायावर उभी असणारी जीवन पद्धती अस मला अभिप्रेत आहे... आमच्या घरात कोणी कुठलाही ग्रंथ वाचलेला मी पाहिला नाही, पण समज तीच होती.. जी परंपरागत पुढे चालत होती
मित्र 2: सब भूमी गोपालकी हे प्रथम कोण म्हणाले? आपला समाज तसे तोंडाने म्हणत असेलही, पण वास्तवात तो तसे वागत नव्हता. नाहीतर समाजात इतकी सरंजामशाही, उतरंड दिसली नसती. भूदान चळवळ करावी लागली नसती. जमीनीची, संसाधनांची मालकी मूठभर लोकांच्याच हातात राहिली नसती. अध्यात्मिक धार्मिक ग्रंथ काहीही सांगोत, आपल्या समाजाचा अगदी राम कृष्णांपासूनचा ते सध्यापर्यंतचा इतिहास जे ढळढळीत शोषणाचे सत्य सांगतो, त्यातला बोध मला महत्त्वाचा वाटतो. म्हणून ती जोखडं झुगारून देऊन आपण सत्याला डोळे उघडून पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आणि म्हणूनच मला हिंदू, वैदिक, बौद्ध ही लेबलं महत्वाची वाटतं नाहीत.
मित्र 1: शोषण हा मानवी दोष सदा सर्वकाळ सर्वांदेशांमध्ये दिसतो आणि दिसत राहील.. त्याचा ग्रंथांशी काहीही संबंध नाही. आपली परंपरा शोषण करायला लावते असा propoganda काही जणांनी कळत/नकळत पसरवला आहे.. त्याला तुझ्या सारखे अनेक विचारी लोक बळी पडतात याच वैषम्य वाटत. असो.. आपलं चर्चेचे वर्तुळ आता मात्र नक्कीच पूर्ण झाले कारण तू तुझ्या आवडत्या ट्रॅक वर आलास....
मित्र 2: माझ्या आवडत्या ट्रॅकवर इ. व्यक्तिगत बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोलला असतास तर बरं वाटलं असतं. पण आता समाजातल्या शोषणाशी ग्रंथांचा काही संबंध नाही, असे विधान केलेस, ते आणखी बरे झाले. जर ग्रंथ समाजातले दोष, शोषण यावर काहीच सकारात्मक परिणाम करत नसतील तर त्यांचे अध्ययन का करायचे? (यावर काही मत आहे, पण अवांतर होईल)
टिळक प्रकांड पंडीत होते, त्यांनी गीतारहस्य लिहून महान बौद्धिक काम केलं आहे. पण ते बालविवाह रोखणाऱ्या आणि संमती वयाच्या कायद्याला प्रखर विरोध करत होते, म्हणून आगरकरांनी केसरी सोडला. ग्रंथ वाचणारे ज्यावेळी प्रवचने देत, गहन चिंतन करत होते, त्याच्याही आधी महात्मा फुले मुलींची शाळा काढत होते. एवढंच नव्हे, तर टिळक यांच्या जामिनासाठी फुले यांनी त्याकाळी १० हजार रुपये भरले होते. गीतारहस्य लिहिणाऱ्या टिळकांनी मात्र महात्मा फुले गेल्याची बातमीही केसरीत छापली नाही. आज आपल्या मुली शिकल्या, त्यांच्या जीवनातलं शोषण कमी झालं याला गीतारहस्य लिहिणाऱ्या टिळकांपेक्षा फुले यांचे उपकारच कारणीभूत आहेत. ग्रंथ वाचणाऱ्या महाविद्वानांकडून समाजाला काय मिळालं याचा तूच विचार कर. म्हणून श्रध्देपेक्षा प्रत्यक्ष कृती आणि धार्मिक ग्रंथ वाचण्यापेक्षा खऱ्या घटनांचा इतिहास वाचणं महत्त्वाचं आहे.
मित्र 1: ज्या देशात तू कुटुंबाला प्रगती दाखवायला घेऊन गेला आहेस त्या देशाच्या तिजोऱ्या भारतासारख्या अनेक देशांच्या शोषणातून भरल्या गेल्या आहेत. त्यांच्या दृष्टीने तू आज सुद्धा बाहेरून आलेला immigrant आहेस. ज्या अमेरिकेत तू सेमिनार ला गेला होतास, त्या देशाने लाखो आफ्रिकन मजूर आयात केले, ते अजूनही डाउनटाउन मध्ये काळे म्हणून राहतात... त्यामुळे तूच डोळे उघडायला हवेत...
मित्र 2: Excellent example of whataboutary! आत्ता मात्र हे देश भारतापेक्षा अधिक उदारमतवादी स्थलांतरिताप्रती अधिक मानवतावादी धोरणं राबवत आहेत. मला मतदार नोंदणी करण्यासाठी पत्र आलंय. आपण भारतात आपल्याच लोकांत आपलं-परकं करण्यात, समाजात दुही माजवण्यात (पुन्हा संघटीत धर्माच्या आधारावर) व्यस्त आहोत.
मित्र 1: थांबतो...
मित्र 2: का रे? नवीन सत्य माहिती कळली तर मी माझा दृष्टिकोन बदलायला तयार आहे. तुझ्याकडून तट्कन थांबण्यापेक्षा तशाच खुल्या दृष्टिकोनाची अपेक्षा आहे.
मित्र 1: There is a more fundamental problem of human life that Gita etc. deals with... It is much beyond समाजसुधारणा... पण तू समाज सुधारणेच्या पलीकडे बघूच शकत नाहीस... त्यात डोळ्यावर काळा चष्मा असल्यामुळे तुला सगळंच काळं च दिसत.... चष्मा काढून तू बघूच शकत नाहीस.. मी 22 वर्ष वाट बघतोय.. त्यामुळे मला थांबण्या शिवाय पर्याय नाही
मित्र 2: पुन्हा आरोप. माझा चष्माच काळा, तुझा मात्र स्वच्छ. तुझी मते २२ वर्षांपूर्वीपण हीच होती? काहीच नवी माहिती घेतली नाहीस? मी पण तुझ्याबरोबरच गीता वाचली, प्रश्न विचारले, नवा दृष्टिकोन समजून घेऊन आवश्यक तेथे मतात सुधारणा केली. खरं तर कोणी घट्ट चष्मा घातलाय यावर ईतरांचे मत ऐकायला आवडेल.
****** ******
मित्र 1 नंतर मुलाने काढलेला पक्षाचा व्हिडिओ पाठवतो, मित्र 2 त्याचे कौतुक करतो व चर्चा थांबते, पण मैत्री मात्र चालूच राहते.

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

8 Sep 2023 - 5:11 pm | अहिरावण

चर्चा थांबते, पण मैत्री मात्र चालूच राहते.

हेच असतं हिंदू असणं! इतर असते तर डोकी फुटली असती.

कट्टर हिंदू हाच एकमेव उदारमतवादी आहे, बाकी नुसते नावाचे शुंभ

पण लक्षात घेतो कोण?

चालु द्या !

आपली पुढची पिढी धर्म, देव-देवता, कर्मकांड, रीतिरिवाज ह्या विषयी प्रश्न विचारते आहे व दुर्दैवाने त्यांना पटेल अशी उत्तरे निदान माझ्यापाशी तरी नाहीत. तरी देखील इथे तिथे वाचून, काही तर्कशुद्ध सापडले तर ते मुलांना सांगण्याचे काम करतो.

आपला धर्म, संस्कृती, कर्मकांडे, रीतिरिवाज वगैरे टिकवायची असतील तर त्यांचे तर्कशुद्ध उत्तर दिलेच पाहीजे, अन्यथा .....................................

वरील सर्व विवेचनावरून मला तरी फारसे काही कळले नाही, म्हणून क्षमस्व.

स्वधर्म's picture

12 Sep 2023 - 2:28 pm | स्वधर्म

वरच्या चर्चेत दोन दृष्टिकोन समोर येत आहेत. एक वैदिक विचार (ग्रंथप्रामाण्य, कर्मकांडे, परंपरा मानणारा) तर दुसरा खरा धर्म यापलिकडे आहे, केवळ पूर्वसूरींनी काही मानले म्हणजे ते सत्य असेलच असे न मानणारा.

अहिरावण's picture

12 Sep 2023 - 7:33 pm | अहिरावण

>>> एक वैदिक विचार (ग्रंथप्रामाण्य, कर्मकांडे, परंपरा मानणारा)

वैदिक विचारांमधेच नास्तिकांपासुन आस्तिकांपर्यंत सर्व प्रकार आहेत. मुदलात आस्तिक म्हणजे काय यात सुद्धा वैदिकांचे विचार प्रचंड भिन्न आहेत.
तीच विचारांची भिन्नता नंतरच्या काळापासून आजपावेतो चालू आहे आणि जोवर मानव वंश आहे तोवर चालेल.

आपण फार वेगळा विचार वैग्रे करतो कारण आपण युरोपिया भाशा शिकलो. तिकडचे विचार वाचले. तिकडे राह्यलो असा भ्रम अनेकांचा होतो. डोळसपणे अभ्यास केला की कळते हे सर्व पुर्वसुरींनी कधी ना कधी विचारांच्या गाभ्यात मंथन केले होते.

पण लक्षात घेतो कोण?

चालु द्या.... आम्ही आपले मनाचिया गुंती शेले गुंतून अर्पण करून आमच्या पूजेचे व्रत पूर्ण करतो. हाका नाका

कर्नलतपस्वी's picture

12 Sep 2023 - 8:46 pm | कर्नलतपस्वी

डोळसपणे अभ्यास केला की कळते हे सर्व पुर्वसुरींनी कधी ना कधी विचारांच्या गाभ्यात मंथन केले होते.पण लक्षात घेतो कोण?

काही कर्मकांडे समाज बांधणी साठी,काहीं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, काही उपकृत म्हणून.

जी कालबाह्य,परिस्थीतीवश जमत नसलेली, न पटणारी, ती सोडून द्यावीत.

उत्सव आणी कर्मकांड या दोन वेगळ्या गोष्टी. वाढदिवस, वर्षाअखेर हे उत्सव.

बदलत्या काळात कर्मकांड रिलव्हंट आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे.

जिंदा बाप कोई न पुजे मरे बाद पुजवाय
मुठ्ठीभर चावल दे के कौवे को बाप बनाय

ही कबीरवाणी आपल्या जागी ठिक वाटत असली तरी जिवंत पाणी वाडवडिलांनी केलेल्या पालनपोषण चे उपकार मानून त्यांचे स्मरण केले ,त्यांच्या नावाने काही कर्मकांड किवां समाज उपयोगी कार्य करण्यास काहीच हरकत नाही.

हाच विचार इतर धर्मात सुद्धा आहेच की.

कर्मकांड केले म्हणजेच हिन्दू असे काही नाही.

चौकस२१२'s picture

13 Sep 2023 - 9:53 am | चौकस२१२

काही कर्मकांडे समाज बांधणी साठी,काहीं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, काही उपकृत म्हणून.

जी कालबाह्य,परिस्थीतीवश जमत नसलेली, न पटणारी, ती सोडून द्यावीत.

अगदी सहमत
हा वैचाहरीक वयवहारी पणा हिंदूंच्यात आहे पण त एलक्षात घेतो कोण !

चौकस२१२'s picture

13 Sep 2023 - 10:00 am | चौकस२१२

सत्यनारायण किंवा भूमिपुज "न केल्याने" एखाद्या कार्याचे काह्ही वाकडे होत नाही हे जरी खरे असले तरी जर त्या समाजाला अशी एखादी पूजा करून मनोबल मिळत असेल, मंगल ता प्रसन्नता आणि सकारत्मक भावना निर्माण होत असेल तर काहीच हरकत नसते पण अश्या हरकती स्वतःला पुरोगामी म्हणवणारे घेतात आणि मुद्दामून हिंदू समाजाला दुखवतात , बर अशी हरकत इतर प्रेमळ धर्माबद्दल घेण्याची यांची हिंमत नसते तिथे त्या प्रेमळ धर्माचा "फोबिया" नको व्हायला अशी सोयीस्कर भूमिका घेतली जाते

जसे या अश्या प्रथेचे / कर्मकांडाचे अवडंबर माजवू नये तसेच त्याला आंधळा विरोध हि करू नये

मंध्यंतरी इसरो चा मुख्य चांद्रयान उड्डणांच्या आधी मंदिरात गेला म्हणून टीका झाली ,,, अपोलो मिशन वरील माहिती पटात अधिकृत रित्या गॉड चा उल्लेख केलं होता .. ते मटार पूर्गम्यानं चालते !

कर्नलतपस्वी's picture

13 Sep 2023 - 10:43 am | कर्नलतपस्वी

पिंड दान नाही केले म्हणून मृतात्मा दाराशी बसून रहात नाही. पुढील प्रवासासाठी निघून जातोच.
हे आपल्या समाधानासाठी. करा किवां करू नका.

असले लेख टाकून वाचकांना डिवचण्यात उगाच आनंद घेऊ नका.

आपण हिन्दू आहात, इतके वर्ष आई वडील, समाज, गुरूजी,पुस्तके बघून, वाचून काही कळले नसेल तर मिपावर लेखून काही शंका समाधान होईल असे वाटत नाही.

खरेच आपल्याला समजावून घ्यायचे असेल तर शांग्रिला चा शोध घ्या शंका समाधान होण्याची शक्यता वाटते.

मूकवाचक's picture

13 Sep 2023 - 11:33 am | मूकवाचक

कर्मकांड हा शब्द नेहेमी नकारात्मक अर्थाने वापरला जातो.

मला वाटते स्वयंप्रेरणेने, मनोभावे, आनंदाने केलेले कोणतेही कृत्य कर्मकांड ठरत नाही. सामाजीक किंवा कौटुंबिक रीतभात पाळण्यासाठी, वरवर देखावा करण्यासाठी केलेले कृत्य नकारात्मक अर्थाने कर्मकांड ठरते.

आनंदाने नित्यपूजा, स्नान संध्या, जपजाप्य करणारा माणूस कर्मकांड करत नाही. उलट कंपनीच्या पार्टीमधे जोरदार डीजे वाजत असताना, बीभत्स नृत्य सुरू असताना, सगळे ओंगळवाणे वाटत असताना त्यात नाईलाजाने सामील होणारा अंतर्मुख, शास्त्रीय संगीताचा भोक्ता कर्मकांड करत असतो. परवडत नसताना, आवड नसताना खर्चिक फोटोशूट करणे, जंगी मेजवान्या देणे, उकाड्याने हैराण होत असताना टाय परिधान करून वावरणे ही आधुनिक कर्मकांडेच आहेत. असो.

Bhakti's picture

13 Sep 2023 - 11:39 am | Bhakti

+१
काहींना कर्मकांडात धर्म सापडतो,काहींना ध्यानात ,काहींना कर्मात धर्म सापडतो.

राघव's picture

13 Sep 2023 - 3:58 pm | राघव

करेक्ट.

स्वधर्म's picture

13 Sep 2023 - 4:01 pm | स्वधर्म

उद्देश नीट न समजता केलेले कर्मकांड निरर्थक होय, असे वाटते. पण कर्मकांडे जाणार नाहीत कारण ती मानवी स्वभावाची गरज आहे असेही वाटते.

राघव's picture

12 Sep 2023 - 6:54 pm | राघव

बाकी जाऊं देत.
आपण गाणं न शिकता गाणं गातो (वा प्रयत्न करतो) ते गायन म्हणता येईल काय?
तद्वतच, आपण घरी दररोज पूजा करतो. त्या मंत्रोक्त करोत वा मंत्र न म्हणता.. त्याला कर्मकांडं म्हणायचं काय?

मुख्य म्हणजे पूजा का करायची असा सूर असतो.
एखादी गोष्ट आपले आई-वडील करत होते ती आपण का करावी अशा प्रश्नासोबतच ती का न करावी असाही प्रश्न पडायला हवा.
आणि त्याचं उत्तर ज्याचं त्याचं स्वतःच द्यायला हवं, नाही का?

सोत्रि's picture

12 Sep 2023 - 8:07 am | सोत्रि

आपला धर्म, संस्कृती, कर्मकांडे, रीतिरिवाज वगैरे टिकवायची असतील तर

का टिकवायचे? आणि टिकवायचे म्हणजे काय करायचं नेमकं?

- (धार्मिक) सोकाजी

अहिरावण's picture

13 Sep 2023 - 8:17 pm | अहिरावण

>>>का टिकवायचे?

चर्चा करायला बरे पडते

>> आणि टिकवायचे म्हणजे काय करायचं नेमकं?

सध्या जे करत आहोत तेच...

स्वधर्म's picture

12 Sep 2023 - 2:23 pm | स्वधर्म

जुनी जरी त्यागली तरी नवीन कर्मकांडे येतच राहतात. देवपूजा न करणारेही वाढदिवसाला केक कापतात. ३१ डिसेंबरच्या रात्रीच (इतर कोणत्या तारखेला नव्हे) जल्लोश करतात. बहुधा माणसाची ती गरज असावी.

चौकस२१२'s picture

13 Sep 2023 - 10:15 am | चौकस२१२

हिंदूंना नेहमी हा प्रश्न विचारला जातो ( प्रत्यक्ष / लेख वैगरे यातून) कि हिंदू म्हणजे काय ? आणि मग त्याभोवती वेळकाढू चर्चा होत राहते

हिंदू हा इस्लाम किंवा रोमन कॅथॉलिक किंवा प्रोटेस्टंट ख्रिश्ननएवढा organized religion बांधेसूद ? धर्म नाही हे मान्य आहे ...
आणि त्यामुळेच हि व्याख्या करणे अवगढ आहे , पण या व्याख्येभोवती का फिरत राहायचे?

हिंदू म्हणून जो काही समाज आज जगात प्रामुख्याने भारतात राहतो त्याचे काही धर्माचं आणि देशाचं भावनेशी निगडित प्रश्न आहेत त्याकडे लक्सचं द्यायचे नाही का?
व्याख्येत वैगरे अडकुण पडायचे याचयामागे हा डाव दिसतो कि "बघा तुम्हाला आधी हेच माहित नाही कि तुमचा धर्म काय तर मग हिंदुत्व वैगरे का बोलताय "

आरे खड्यात गेली व्याख्या .. समाज म्हणून काही एकत्रित विचार - त्यांचा वयहाराशी येणार संबंध हे आहे कि नाही
उदाहरण : नाही आम्हाला माहिती हिंदू धर्म कशाही खातात ते ... पण म्हणून आमच्या सणांच्या वेळेस , त्याचा भाग असलेल्या मिरवणुकी वर जर हल्ला होत असेल तर काय त्या वेळेस काय "हिंदू व्याख्येचा शोध घेत बसू का?"

व्याख्या खड्ड्यात गेली तर उगाच धाग्यावर पचकायचे काय कारण आहे ? अवघड आहे. सगळीकडे हिंदू, मुस्लिम ,राजकारणच पाहिजे. आपले स्वतःचे धागे ढिगाने आहेत. ते पुरेसे नाहीत. दुसऱ्यांनी इतर उद्देश्याने वेगळ्या विषयांवर धागे काढले तर तिथेही तीच बडबड.

चौकस२१२'s picture

13 Sep 2023 - 7:37 pm | चौकस२१२

मित्र 2: Organised religion न मानणारा हिंदू नसतो का? मला वाटते मूळ प्रश्न विचारताना हिंदू धर्माची तुझी व्याख्या समजली तर नीट उत्तर देता येईल.

कॉमी ...मूळ लेखात हे जर लिहिले तर हिंदुत्वाची व्याख्या यावर बोलले तर ते पंचकणे ?

कर्नलतपस्वी's picture

13 Sep 2023 - 12:17 pm | कर्नलतपस्वी

इतर धर्मा बद्दल यांना शंका नाही. इथे वेगळा उद्देश्य नाही काहीतरी कुचाळक्या करून इतरांना डिवचायचे.

नाव स्वधर्म आणी आपलाच धर्म माहीत नाही.

वा भाई वा......

स्वधर्म's picture

13 Sep 2023 - 3:26 pm | स्वधर्म

मी दोन मित्रांची एक चर्चा जशी झाली तशी दिली. खरे तर माझी काही भर घातली नाही. मला जे वाटले, ते प्रतिसादात दिले आहे. असे असताना व्यक्तिगत टिका करायची काय गरज आहे? पण काही प्रश्न उपस्थित होतात असं वाटलं की अंगावर यायचं… असो.

नठ्यारा's picture

20 Sep 2023 - 11:17 pm | नठ्यारा

एको सत् विप्रा: बहुधा वदन्ति = सत्य एकंच असून विप्र त्याचं विविध प्रकारे वर्णन करतात

या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो तो माझ्या मते हिंदू. मग त्याचं उपास्य दैवत काहीही असेना वा नसेना.

- नाठाळ नठ्या

हिंदू आणि सनातन हे वेगळे धर्म आहेत. वरती अनेकजण व्याख्या हवीच कशाला? तसेच चर्चाही हिंदू हे वैदिक असतात की नसतात यावर होती, म्हणून…
दै. लोकसत्ताचे एक अनुषंगिक संपादकीय

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/editorial-sanatani-religio...

... पण मग सनातन धर्म तरी आपल्याला हवा आहे का? याचेही उत्तर देता येत नाही कारण त्यासाठी सनातन धर्म म्हणजे काय हे तरी आपल्याला कोठे माहीत! हिंदू धर्मात येऊ इच्छिणाऱ्या एखाद्याला या धर्मात यायचे म्हणजे नेमके काय करायचे हे जसे समजू शकत नाही, तसेच हे. हा सनातन धर्म नक्की कोणती तत्त्वे सांगतो आणि त्याचे पालन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तो हिंदू धर्माचाच भाग आहे की त्यापेक्षा वेगळा हे शोधण्याचा हा पामर प्रयत्न.

सनातन या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून चालत आलेला, चिरंतन, अविनाशी असा आहे. आत्मा, पुनर्जन्म या संकल्पना मानत असलेल्या हिंदू धर्माला सनातन धर्म असेही म्हटले जाते. वेदांमध्ये सनातन धर्माचा उल्लेख नसला तरी महाभारतात तो दोन ठिकाणी असल्याचे सांगितले जाते. हिंदू धर्मात सनातन ही संकल्पना पूर्वापार माहीत असली तरी तिची प्रामुख्याने चर्चा सुरू झाली ती १९व्या शतकात. ब्रिटिश राजवटीत आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले, आधुनिक जगाचा परिचय होऊ लागला, कालबाह्य रूढी परंपरांना प्रश्न विचारले जाऊ लागले, तसे हजारो वर्षे घट्ट रुतलेल्या मुळांना हादरे बसू लागले. आपल्या धर्माचा अभिमान बाळगणारे कट्टरवादी आणि आधुनिकतेचे पुरस्कर्ते यांच्यात संघर्ष होऊ लागला. हे कट्टरवादी म्हणजेच सनातनी. तेव्हापासून सनातनी या शब्दाला सामाजिक-धार्मिक रूढी परंपरांमधील बदलांना विरोध करणारे हा अर्थ चिकटला, तो चिकटलाच. मुख्य म्हणजे तत्कालीन कट्टरवाद्यांनी तो सार्थही ठरवला. कारण स्त्रीशिक्षण, विधवाविवाह यासारख्या अनेक सामाजिक सुधारणांना त्यांचा प्रखर विरोध होता. स्त्रिया शिकल्या तर धर्म बुडेल या विचारांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण फेकले गेले, त्यांना दगड मारले गेले ते याच विचारांमधून. विद्यासाधनेसाठी परदेश-गमन केले म्हणून आनंदीबाई जोशी आणि पती गोपाळराव यांना प्रायश्चित्त घ्यावे लागले ते याच सनातनी विचारांच्या टोकाग्रहातून. पण मग हे सगळे फक्त १९व्या शतकातच कुठे घडले? त्याही आधी हिंदू धर्मामधल्या कर्मकांडांचा आग्रह धरणाऱ्या नाठाळांच्या माथी काठी हाणू पाहणाऱ्या तुकोबांना त्यांच्या काळामधल्या सनातन्यांचाच विरोध होता. संन्यास घेतलेल्या जोडप्याची मुले म्हणून ज्ञानदेवादी भावंडांना विरोध करणारे सनातनीच होते. आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेही सनातनी धर्माचे पुरस्कर्तेच होते.
...

चौकस२१२'s picture

21 Sep 2023 - 5:53 am | चौकस२१२

वरती अनेकजण व्याख्या हवीच कशाला?

हो हे म्हणले होते याचे कारण असे कि .. त्यामुळे मूळ प्रशांन पासून दूर जाणे होणे होते असे वाटते .. मूळ प्रश्न "धर्म एक समूह" या अर्थाने बघितले तर मग तो वैदिक/ सनातन हिंदू हि डोकेफोड कशाला ?

आज "सर्वधर्म समभाव" या कल्पनेला बांधील असलेल्या भारतासारख्या ( सिन्गपोरे सार्ख्यअ ) देशात हिंदू मुस्लिम आणि इतर असे "समाज " आहेत असे मानले तर त्यांच्यातील "एका देशाचे नागरिक" म्हणून वागणे, तणाव तंटे इत्यादी चे प्रश्न सोडवणे हे जास्त महत्वाचे नाही का?
हिंदू समूह म्हणून जे कोण आहेत त्यात सुद्धा प्रचंड धार्मिक ते कर्मकांड ना पाळणारे पण तरीही स्वतःला हिंदू समाजाचे भाग म्हणवणारे एवढी विविधता आहे.

"सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करणे"
हा एक मुद्दा घेतला तर मग त्यात हिंदू काय करतात मुसलमान काय करतात हे बघणे प्रश्नासनाच्या दृष्टिने महत्वाचे नाही का ? हिंदू कोण याची व्याख्या हे बघत बसणे हे महत्वाचे ठरते का ? किंवा अगदी सुन्नी कोण / शिया कोण?
किंवा एकदा अभ्यासक जर :भारतातील धार्मिक तणाव" यावर शोध घेत असेल तर , एक समाज म्हणून म्हणून ८० कि काय ते % हिंदू असा सरळ हिशोब केला जातो

गागा भट्ट त्याचे नाव. शिवाजी महाराजांना अधिकृत रित्या क्षत्रीय राजा ठरवुन संपूर्ण भारतात, विशेषतः उत्तर हिंदुस्थानात, हिंदुंचा तारणहार म्हणुन मान्यता द्यायचं काम या राज्याभिषेकाने केले. विषय संपला.

चौकस२१२'s picture

21 Sep 2023 - 5:58 am | चौकस२१२

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारेही सनातनी धर्माचे पुरस्कर्तेच होते.

हे घडले हे नाकारत नाही शकत...पण हे आता पुढील १०,००० वर्षे उगाळले जाईल .... लोकसत्तेचा अजेंडा काय आहे ते दिसतंय

नठ्यारा's picture

21 Sep 2023 - 1:30 pm | नठ्यारा

शिवाजीमहाराजांच्या राज्यारोहणास सनातनी लोकांनी विरोध केला होता याचे काही पुरावे आहेत का? की दिली आपली एक लोणकढी ठोकून? आणि सनातनी म्हणजे नेमके कोण? जर त्यांनी विरोध केला असेल तर ते आचरीत असलेल्या सनातन धर्माचा त्या लोकांनी केलेल्या युक्तीवादाशी नेमका काय संबंध आहे? चर्चा व्हावी.

- नाठाळ नठ्या

उन्मेष दिक्षीत's picture

23 Sep 2023 - 1:25 am | उन्मेष दिक्षीत

प्रतीसाद फार आवडलेला आहे !

सनातन धर्म म्हणजे काय रसिकहो ?

उपयोजक's picture

27 Sep 2023 - 11:51 am | उपयोजक

*एका 'सो कॉल्ड हिंदुत्ववाद्याशी' संवाद*

*तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता. तुमच्या दृष्टीने हिंदुत्ववादी असणे म्हणजे काय?*

ऍक्च्युली हिंदुत्ववादी वगैरे भानगडीत मला पडायचंच नाहीये! फक्त काय आहे की काँग्रेसच्या तुलनेत भाजप थोडं चांगलं काम करतोय आणि भाजपची आयडियालॉजी ही हिंदू धर्माशी निगडित आहे म्हणून मी आपला स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणत होतो. बाकी वैयक्तिक मला चांगली डेव्हलपमेंट , चांगले रस्ते , सुशिक्षित लोकांना रोजगाराच्या चांगल्या आणि पुरेशा संधी , रस्त्यांवर वेल मॅनेज्ड ट्राफिक हे अपेक्षित आहे.

*म्हणजे हिंदुत्ववादी असणे याचा चौकटीत जर काही नियम वगैरे असतील तर ते तुम्हाला चालतील का?*

नियम कशाला हवेत? तुम्ही अमेरिकेतल्या ख्रिश्चनांकडे बघा ना. ते लोक मुक्त विचारांचे आहेत. उगाचच ते कुठेतरी फालतू नियम लावत बसत नाहीयेत. योग्य तेवढेच नियम लावतात. बाकी लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देतात , वागू देतात. याचा परिणाम म्हणजे तिथे दर्जेदार चित्रपट निर्माण होतात , तिथे विज्ञान संशोधन होतं , तिथे मॅनेजमेंट क्षेत्रात संशोधन होतं , असं एकही काही क्षेत्र नाही जिथे त्यांची प्रगती होत नाहीये.
ही जी त्यांनी केलेली प्रगती आहे ती या मुक्ततेमुळे , त्या स्वातंत्र्यामुळे. शिक्षणाचा चांगला दर्जा , कमी लोकसंख्या या गोष्टी त्यांनी मेंटेन केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे आणि हे असंच भारतातही व्हावं हे जर अपेक्षा केली तर चुकलं कुठे ?

*म्हणजे तुमचा हिंदुत्ववाद जो आहे त्याला तसं काही अर्थ नाही असं म्हणूया?*

कुठलातरी धर्म वगैरे हे काही पाहिजेच असं काही नाहीये. भारतात हिंदुत्ववादी हे मुस्लिम किंवा ख्रिश्चन विरोधात आहेत आणि मी त्यांना सपोर्ट करतोय. मी त्यांना सपोर्ट का करतोय तर बरेचसे मुस्लिम हे रॅडिकल विचारांचे आहेत , मूलतत्त्ववादी आहेत. त्यांच्या त्या विचारसरणीमुळे देशाची प्रगती मागे पडते आणि पर्यायाने ते हिंदूंना सोसावं लागतं ; म्हणून मी भाजपला सपोर्ट करतो. ख्रिश्चनांना इथे सहज धर्मांतर करता येतं आणि तसं धर्मांतर केल्यामुळे ख्रिश्चन संख्या वाढते आणि ती ख्रिश्चन संख्या वाढल्यामुळे या ख्रिश्चनांचा देशाच्या डेमोग्राफीवर परिणाम होतो. युरोप किंवा अमेरिकेतले लोक हे या ख्रिश्चनांना ब्रेनवॉश करून त्यांना हवं तसं वळवू शकतात. भारतविरोधात वापरु शकतात. म्हणून आम्ही या ख्रिश्चनांच्या धर्मांतराला आणि मुस्लिम यांना विरोध करत आहोत. बाकी ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये किंवा कोणी एखाद्या हिंदूने धर्म बदलून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाला तरी आम्हाला काय फरक पडत नाही अगदी या देशाची 70 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन जरी झाली किंवा मुस्लिम जरी झाली तरी आम्हाला काही फरक पडणार नाहीये. फक्त त्याच्यामुळे या देशाला त्रास होऊ नये एवढेच फक्त अपेक्षित आहे. अफ्रिकेत तिथले लोक त्यांचे मूळचे धर्म कुठे पाळतात? त्यातली किती तरी देश हे ख्रिश्चन किंवा मुस्लिम आहेत. पण ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम असल्यामुळे त्या धर्माचे जे मूळ देश म्हणजे मुस्लिम कंट्रीज किंवा ख्रिश्चनांच्या बाबतीत युरोपियन देश यांचे हे अफ्रिकन देश बटीक बनतात. या मुस्लिम राष्ट्रांच्या मताप्रमाणे किंवा युरोपातल्या ख्रिश्चन राष्ट्रांच्या मतांप्रमाणे या आफ्रिकन देशांना वागावं लागतं. भारताचं तसं होऊ नये म्हणून केवळ आम्ही या ख्रिश्चनांच्या आणि मुस्लिमांच्या विरोधात आहोत बाकी आम्हाला या लोकांनी कोणताही धर्म स्वीकारला तरी काही फरक पडत नाही. आम्हाला हा देश युरोप किंवा मुस्लिम राष्ट्रांच्या तालावर नाचणारा नकोय. या देशात शांतता , सुव्यवस्था , भ्रष्टाचार मुक्त , आरक्षण मुक्त असा असावा असं वाटतं. बाकी धर्म या गोष्टीत फारसे इंटरेस्ट नाही.

@उपयोजकः अगदी चपखल, यथायोग्य प्रतिसाद. मलासे वाटते इथे बहुतांश मिपाकरांनाही असेच वाटत असेल.

स्वधर्म's picture

27 Sep 2023 - 4:53 pm | स्वधर्म

उपयोजक, तुमचा प्रतिसाद अत्यंत सम्यक आहे आणि खूप आवडला. धन्यवाद.

>> कुठलातरी धर्म वगैरे हे काही पाहिजेच असं काही नाहीये. 
अगदी अगदी. पूर्वी नैतिकतेचा स्त्रोत म्हणून धर्माची आवश्यकता होती. लोकांचे ज्ञान, माहिती कुंठीत झाल्यासारखी होती, तेंव्हा ते बरोबरच होते. पण आता आपल्याला बरीच माहिती आणि विज्ञानाचे डोळे उपलब्ध झाले असल्यामुळे नैतिक प्रश्नांना उत्तरे मिळवण्यासाठी ग्रंथिक किंवा कर्मकांडी धर्माची आवश्यकता उरली नाही असे वाटते.

>> पण ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम असल्यामुळे त्या धर्माचे जे मूळ देश म्हणजे मुस्लिम कंट्रीज किंवा ख्रिश्चनांच्या बाबतीत युरोपियन देश यांचे हे अफ्रिकन देश बटीक बनतात. या मुस्लिम राष्ट्रांच्या मताप्रमाणे किंवा युरोपातल्या ख्रिश्चन राष्ट्रांच्या मतांप्रमाणे या आफ्रिकन देशांना वागावं लागतं. भारताचं तसं होऊ नये म्हणून …
अगदीच व्हायला नको. तो प्रभाव वाईटच आहे, हे यातून सुचित होतंय. पण तो वाईटच का आहे, तर त्या मूळ देशात धर्माचा पगडा आहे. तो नसेल, तर प्रभावाखाली येण्यात फार काही वाईट असायचं कारण नाही. हा फ़ार महत्वाचा मुद्दा आहे.
मुळात देश ही एक मानवनिर्मित आणि कृत्रिम गोष्ट आहे. जगाचा व्यवहार चालण्यासाठी सध्या त्याची आवश्यकता आहें हे मान्य. तेंव्हा थोड़ा वेळ याला आपण एक सलग व एकमेकांबरोबर राहणारा समूह म्हणून बघूया. तर आता आपण असंही बघू शकतो की हिंदू धर्माचा पगडा एक दबावगट म्हणून त्यासाठी वाढवायला हवाय का? त्यामुळे भारतातील लोक भलेही इतर धर्मप्राबल्य असलेल्या देशांच्या प्रभावाखाली येणार नाहीत, पण ते हिंदू धर्माच्या मूलतत्ववादी प्रभावाखाली आलेले एक लोकसमूह म्हणून आपल्याला फायद्याचे ठरेल का? तुंम्ही म्हणता तसे, चांगली न्यायव्यवस्था, प्रशासन, संशोधन, विज्ञान इ. क्षेत्रात त्यामुळे आपली भरभराट होऊन आपण सुखी होऊ का? याचे उत्तर हो असेल असे वाटत नाही. अन्यथा वीषबाधा होऊ नये म्हणून दुसे वीषच भिनवून घेतल्यासारखे होईल.

मी या विषयावर विचार करत असता खालील लेख वाचनात आला. अवश्य वाचण्यासारखा आहे:
https://www.aksharnama.com/client/article_detail/6898

झलक:
वर्तन नियम आणि कर्मकांड हे प्रामुख्याने वेदानुसारी स्मृतिग्रंथांचे विषय आहेत. त्यामुळे हे स्मृतिग्रंथच खऱ्या अर्थाने सनातन धर्माचे स्त्रोत मानले जातात. जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठत्वावर आधारित चातुर्वर्ण्य आणि त्यातही ब्राह्मणश्रेष्ठत्व हा स्मृतिग्रंथाचा प्राण आहे. या ग्रंथांनी व्यक्ती व्यक्तींमधील सबंध, त्यांच्यातील आंतरक्रिया आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, तसेच अधिकार निश्चित करण्यासाठी वरील तत्त्वांचाच आधार घेतल्याचे स्पष्ट होते.
याचाच अर्थ स्मृतिग्रंथातील वर्तन नियमांचा आधार मानवतावाद, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नसून विषमता हाच आहे, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. म्हणूनच स्मार्त धर्मानुसार सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे समाजघटकांतील वितरण हे जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठत्वावर आधारित असल्याचे स्पष्ट होते.
स्मृतिग्रंथप्रणित धर्माचा सामाजिक न्याय किंवा मानवतावादी मूल्यांशी कधीही सबंध आलेला नाही. त्यामुळे स्मृतिग्रंथांवर आधारित सनातन धर्म मानवतेच्या विकासाला केव्हाच उपयुक्त ठरलेला नाही. आधुनिक काळाने आणि मूल्यांनी या धर्माला केव्हाच इतिहासात ढकलून दिलेले आहे.

अहिरावण's picture

27 Sep 2023 - 7:15 pm | अहिरावण

सहमत आहे. झलक तर लै भारी. आणि तुम्ही म्हणता तसे आधुनिक काळाने आणि मूल्यांनी या धर्माला केव्हाच इतिहासात ढकलून दिलेले आहे तेव्हा सनातन धर्म आणि त्यांचे जे काही दोन चार फुटकळ अनुयायी असतील त्यांची काळजी करायची गरजच नसावी. त्यांच्यावर उगा वेळ घालवू नका आणि आपले बुद्धीकौशल्य त्यांना नामोहरम करण्यात घालवू नका. अहो मेलेल्याला काय मारता? मरु द्या त्यांना त्यांच्या कर्माने. तुम्ही आपले समानता असलेल्या जगात आनंदाने जगा

कसे !

स्मृतिग्रंथांवर आधारित सनातन धर्म मानवतेच्या विकासाला केव्हाच उपयुक्त ठरलेला नाही.

-- मग ज्यांना एकच देव, एकच प्रेषित, एकच ग्रंथ हे मान्य नाही, त्यांना जगण्याचा काही अधिकार नसून ते वध्य होत, आणि त्यांची हत्या करण्याने स्वर्गलाभ होतो वगैरे वाला धर्म 'मानवतेच्या विकासाला उपयुक्त' ठरलेला आहे किंवा कसे ? आणि तो धर्म 'केंव्हाच इतिहासात ढकलून' दिला जाण्याऐवजी अधिकाधिक बलवान होत आहे, तेही समर्थनीय आहे किंवा कसे?
तुम्ही दिलेल्या 'अक्षरनामा' मधील लेख उदयनिधी यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहे याचा उल्लेख 'झलक' मधे नाही.

>>तुम्ही दिलेल्या 'अक्षरनामा' मधील लेख उदयनिधी यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहे याचा उल्लेख 'झलक' मधे नाही.

कसा असणार? मुळात हे सगळं येतं कोठून ? हां ! तेच आणि तसेच !

माझा फ़ोकस उदयनिधी काय म्हणाले यावर नव्हताच मुळी. वर दिलेली मूळ चर्चा उदयनिधी यांच्या वक्तव्याच्या आधीच मी इथे टाकली आहे. वरील लेख धर्माबाबतच लेखकाचे विचार मांडण्यासाठी लिहिला आहे असे मला वाटले. उदयनिधी यांचे वक्तव्य हे केवळ निमित्त आहे. त्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही.
शिवाय लगेच हे आवडत नाही, म्हणजे ‘ते’ (पक्षी एकेश्वरवादी धर्म) मला आवडतातच असा निष्कर्ष कसा काय काढलात बरे? इथे तुम्हीं व अहिरावण ऑब्जेक्टीव्हली चर्चा न करता व्यक्तीगत शेरेबाजीवर का उतरत आहात ते समजले नाही.

स्वधर्म's picture

2 Oct 2023 - 10:25 pm | स्वधर्म

वरती तुम्हीं विचारता, की
>>— मग ज्यांना एकच देव, एकच प्रेषित, एकच ग्रंथ हे मान्य नाही, त्यांना जगण्याचा काही अधिकार नसून ते वध्य होत, आणि त्यांची हत्या करण्याने स्वर्गलाभ होतो वगैरे वाला धर्म 'मानवतेच्या विकासाला उपयुक्त' ठरलेला आहे किंवा कसे ?

आणि दुसर्या धाग्यावर तुम्हीं लिहिता की:
>> गंमत म्हणजे जे काही थोडेसे भारतीय वस्तू घ्यायला येतात त्यापैकी काहीजण आणखी घासाघीस करतात किंवा सामान घरी घेऊन गेल्यावर त्यात अमुक खोट आहे, सबब सामान परत घेऊन जा आणि पैसे परत करा, नाहीतर वाईट रिव्हू देऊ अशी धमकी देतात. अशा अनुभवांमुळे भारतीय व्यक्तीने फोनवर पृच्छा केली तर वस्तू विकली गेली असे सांगायला सुरुवात केली होती. त्यामानाने अमेरिकन लोक खूप समजदार असल्याचे दिसून येते. 
दुवा: http://misalpav.com/comment/1170567#comment-1170567

तर सो कॉल्ड सनातन धर्म भारतीयांमध्ये पिढ्यानपिढ्या रूजूनदेखील ते तुमच्यासारख्या भारतीयालाच ते का प्रामाणिक वाटत नसावेत? आणि एकेश्वरवादी धर्मवाले अमेरिकन मात्र तुंम्हाला समजूतदार वाटतात. तुम्हीं म्हणता त्याच्याशी सहमत आहें. हा अप्रामाणिकपण कुठून येत असावा? यात धर्म संस्कार यांचा काही संबंध नसेल?

तर सो कॉल्ड सनातन धर्म भारतीयांमध्ये पिढ्यानपिढ्या रूजूनदेखील ते तुमच्यासारख्या भारतीयालाच ते का प्रामाणिक वाटत नसावेत? आणि एकेश्वरवादी धर्मवाले अमेरिकन मात्र तुंम्हाला समजूतदार वाटतात. तुम्हीं म्हणता त्याच्याशी सहमत आहें. हा अप्रामाणिकपण कुठून येत असावा? यात धर्म संस्कार यांचा काही संबंध नसेल?

-- माझ्या निरिक्षणाप्रमाणे हल्लीचे बहुतांश पाश्चात्य लोक मुळात कोणताच धर्म न पाळणारे आहेत. मी जिथे जिथे जातो तिथल्या सगळ्या प्राचीन इमारती अवश्य बघतो. सगळी जुनी चर्चेस, ख्रिस्ती सेमेटरीज सांगोपांग बघतो (तिथली मृत्युशिल्पे, मृत्युलेख वगैरे वाचतो). सगळ्या चर्चेसमधे शुकशुकाट असतो. माझ्यासारखा एकादा जिज्ञासू तिथली चित्रे वगैरे बघायला आलेला असतो. रविवारच्या प्रार्थनेसाठी अगदी मोजकेच वृद्ध- तेही बहुतांशी कृष्णवर्णीय- आलेले असतात. तरूण पिढीचे तर कोणीच नसतात. याउलट मुस्लिमांचे आहे हे सर्वविदित आहेच. त्यामुळे 'एकेश्वरवादी' यात मला युरोपियन्/अमेरिकन लोक अभिप्रेत नाहीत.
-- हल्लीच्या बहुतांश भारतीय लोकांची मनोवृत्ती जशी हल्ली दिसून येते, तशीच पूर्वीपासून होती का ? तिच्यात जे काही बदल कालौघात घडून आले असतील त्याची कारणे कोणती, वगैरेवर अभ्यासपूर्ण, विश्वसनीय लेख मलाही वाचायला खूप आवडेल.
-- खरेदी केलेली वस्तू घरी नेल्यावर त्यात खोट काढून ती परत करणे यात 'घरी बायकोला ती न आवडणे' हेही एक कारण असू शकेल. त्यात प्रामाणिकपणा वगैरेंचा संबंध नसावा.
-- माझ्या याआधीच्या एका प्रतिसादात लिहीलेले व्यक्तिगत वगैरे वाटले असल्यास क्षमस्व. माझा तसा हेतु कधीही नसतो आणि नसेल.

सर टोबी's picture

3 Oct 2023 - 6:52 am | सर टोबी

लोकरीच्या गुंडाळीबरोबर खेळणारं मांजर त्या लोकरीतच अडकतं तसं काहिसं चित्रगुप्त यांचं झालेलं दिसतंय. चला सध्या देव न मानणारे ख्रिश्चन चांगले असतात असं म्हणुया. पण मग आपल्याला ज्ञात असलेल्या काळापासून सज्जन असणारे हिंदुंच्या चिंधीगिरीचे काय कारण द्याल?

कुठेतरी आपण सर्वजण चांगले आणि वाईट असतोच आणि त्याचा धर्माशी काहीएक संबंध नसतो.

कुठेतरी आपण सर्वजण चांगले आणि वाईट असतोच आणि त्याचा धर्माशी काहीएक संबंध नसतो.

--
अगदी मान्य. 'धर्म' या गोष्टीचा कितीही उदोउदो केला तरी प्रत्यक्षात समग्र मानवी अस्तित्वाचा विचार करता धर्म हा केवळ वरवरचा तकलुपी पापुद्रा असून मानवी व्यवहार हे त्यापेक्षा फार सखोल आणि गुंतागुंतीच्या गोष्टींचे परिणाम असतात.
-- मनुष्यप्राण्याच्या सगळ्याच गोष्टी लोकरीच्या गुंडाळीबरोबर खेळणारे मांजर त्या लोकरीतच अडकते, तशा असतात असेही म्हणता येईल. जेवढे खेळावे तेवढा गुंताच जास्त, आणि मग तो सोडवत बसण्याचे प्रयत्न.

चित्रगुप्त's picture

3 Oct 2023 - 5:55 am | चित्रगुप्त

मी वरती युरोपमधील चर्चेस विषयी लिहीले आहे, त्यातील सर्वांमधे शेकडो वर्षांपूर्वीचे प्रचंड 'ऑर्गन' असतात, त्यांची दुरुस्ती आणि रखरखाव यांचा खर्च खूप जास्त असतो. त्यासाठी जे लोक स्वतःहून पैसे देतात, ते 'धार्मिक' नसून 'संगीतप्रेमी' असतात, आणि रविवारी उत्तम ऑर्गन वादक ते वाजवत असतात, ते ऐकणे हा स्वर्गीय अनुभव असतो. त्यासाठी बरेच लोक येतात (त्यात भारतीय एकही नसतो) थोडक्यात म्हणजे हल्ली चर्चमधे जाणारे लोक धार्मिक कारणासाठी नसून कलेसाठी जाणारे असल्याचे माझ्यातरी बघण्यात आलेले आहे.

दोनशे वर्षांच्या बाधकामानंतर इ.स. १३४५ साली पूर्ण झालेल्या पॅरिसच्या विख्यात 'नोत्र दाम' चर्चमधील २००० पाईप्सचा इ.स. १४०३ मधील पाईप ऑर्गन वाजवतानाचा २००७ चा व्हिडियो:

https://www.youtube.com/watch?v=qSxVO3EoCRM

.