A1 जहाज, कार्यालयीन कुजबूज आणि बेहिशोबी पैसा !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
27 Aug 2023 - 5:45 pm

प्रवास करण्याचा सर्वात सोपा आणि अगदी नैसर्गिक मार्ग म्हणजे चालत जाणे. परंतु लाखो वर्षांपूर्वी मानवाला जशी दूरवरच्या प्रवासाची ओढ लागली तसा त्याने प्रवासासाठी काही मदत-साधनांचा विचार केला. त्यांच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी जलप्रवास हा अगदी प्राचीन म्हणता येईल. नदीच्या एका तीरावरुन दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी ओंडक्यावर बसून जाणे हा त्यातला अगदी मूलभूत प्रकार. या संकल्पनेचा पुढे विस्तार होऊन विविध प्रकारच्या बोटी आणि महाकाय जहाजे निर्माण झाली.

जगातले जे देश बेट स्वरूपाचे आहेत त्यांच्या दृष्टीने तर जलप्रवास अत्यंत आवश्यक ठरला. अशा देशांपैकी एक ठळक नाव म्हणजे इंग्लंड. तिथे पर्यटन, व्यापार आणि वसाहतवाद या कारणांसाठी बोट आणि जहाजे या साधनांचा वेगाने विकास झाला. त्यातून तिथल्या जनतेचे बोट व जहाज या नित्याच्या प्रवासी साधनांशी अगदी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. जलप्रवासाच्या संदर्भात अनेक नवे शब्द इंग्लिशमध्ये निर्माण झाले. कालांतराने हे शब्द सामान्य व्यवहारात देखील सर्रास वापरले जाऊ लागले. त्यातल्या काही शब्दांना मूळ अर्थाशिवाय वैशिष्ट्यपूर्ण लाक्षणिक अर्थ देखील प्राप्त झाले. कालौघात अशाच काही शब्दसमूहांच्या म्हणी आणि वाक्प्रचार देखील बनले. इंग्लिश भाषेचे सौंदर्य खुलवणाऱ्या अशा काही सामुद्रिक शब्दसमूहांचा धांडोळा घेण्यासाठी हा लेख.
ok

लेखाच्या चित्रविचित्र शीर्षकावरून वाचक चक्रावले असण्याची शक्यता आहे ! आता अधिक वेळ न दवडता त्यातल्या पहिल्या शब्दापासूनच सुरुवात करतो.
A1
इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेतील जहाजांचे महत्त्व लक्षात घेता तिथे व्यापारी जहाजांच्या दर्जाकडे विशेष लक्ष दिले जाई. काफिल्यामध्ये अनेक नवीजुनी जहाजे असत. त्यांच्या दर्जा निश्चितीसाठी काहीतरी चिन्हप्रणाली असणे आवश्यक ठरले. त्यानुसार नव्या कोऱ्या जहाजांना A असे म्हटले गेले आणि नव्यांपैकी जे सर्वोत्कृष्ट अवस्थेत असेल त्याला 1 अनुक्रमांक दिला गेला. अर्थात, A1 जहाज म्हणजे काफिल्यातले सर्वोत्कृष्ट ! सन १८००च्या आसपास ही प्रणाली अस्तित्वात आली. कालांतराने हा शब्दप्रयोग सामान्य व्यवहारात देखील रूढ झाला. एखादी वस्तू, कला किंवा अन्य कशाचाही सर्वोत्तम दर्जा व्यक्त करण्यासाठी A1 हा शब्दप्रयोग केला जातो.

slush fund
समुद्रसफरीमध्ये जहाजांवरती खारावलेले मांस शिजवले जाई. त्या प्रक्रियेदरम्यान चरबी (grease) बाहेर पडत असे. तिला त्या विश्वात slush असे म्हणतात. ती चरबी बऱ्यापैकी असल्याने व्यवस्थित गोळा करत आणि पुढे मोठ्या हंड्यांमध्ये भरून ती बंदरावर लिलावात विकली जाई. त्या विक्रीतून जे पैसे मिळत त्याला slush fund असे नाव पडले. या पैशांचा हिशोब जहाज-प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची गरज नसे. जहाजावरीलच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या संमतीने तो अतिरिक्त मिळालेला पैसा खलाशांमध्ये वाटला जाई. नेहमीच्या पगारातून चैनीसाठी पैसा उरत नसे. मग अशा प्रकारे मिळालेल्या पैशातून काही सुखसोयी उपभोगता येत. कालांतराने व्यवहारात slush fund ला लाक्षणिक अर्थ प्राप्त झाला. आपल्या आर्थिक व्यवहारातून काही रक्कम बाजूला काढून तिचा विनियोग लाच देण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी केला जाऊ लागला.

मुळात वर उल्लेखलेली चरबी ही अर्धद्रव अवस्थेत असते. यावरून (पैशाने) अधिकाऱ्यांचे ‘हात ओले करणे’(greasing palms) हा शब्दप्रयोग देखील रूढ झाला.
slush fund ला सकारात्मक अर्थ पण आहे. तो गुंतवणुकशास्त्रात असतो - कुठलाही विशिष्ट हेतू मनात न ठेवता बाजूला काढून ठेवलेली रक्कम (राखीव धनसंचय).

Scuttlebutt
मजेशीर उच्चार असलेला हा एक लांबसर संयोगशब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थाकडून लाक्षणिक अर्थाकडे झालेला प्रवास पाहणे रंजक आहे.
जहाजाच्या डेकवर खलाशांना पाणी पिण्यासाठी एक मोठे पिंप (butt) ठेवलेले असते. त्यातून पाणी घेता येण्यासाठी त्याला एक भोक (scuttle) असते :

ok
काम करता करता तहान लागली की खलाशी त्या पिंपाजवळ पाणी पिण्यासाठी एकत्र जमतात. एकत्र जमले की विरंगुळा म्हणून गप्पाटप्पा आणि कुजबुज आलीच. त्यावरून नौदलात या कुजबुजीलाच scuttlebutt म्हणू लागले. एकंदरीत कुजबुज हा प्रकार सार्वत्रिक असल्यामुळे पुढे हा शब्द अन्य दैनंदिन कार्यालयीन जीवनात देखील पसरला. आता ‘कर्मचाऱ्यांनी केलेली कार्यालयीन कुजबुज’ असा त्याचा अर्थ रूढ आहे.

By and large
‘सर्वसाधारणपणे’ किंवा ‘एकंदरीत’ या अर्थाने नेहमी वापरला जाणारा हा शब्दसमूह. याचा उगम देखील जहाजावरूनच झालेला आहे. जहाजाच्या सागरी प्रवासात वाऱ्याची दिशा हा एक महत्त्वाचा घटक. ती दिशा कधी अनुकूल असते तर कधी प्रतिकूल. एखादे जहाज कधी वाऱ्याच्या दिशेने जात असते तर कधी त्याच्या विरुद्ध दिशेने. अशा दोन्ही दिशांच्या प्रवासात त्याची स्थिरता महत्वाची असते. इथे मूळ अर्थ असे आहेत :
by = near /toward = वाऱ्याकडे जाणारे जहाज
large = जहाजाच्या मागच्या बाजूवर वारा धडकत असताना
By and large = वरील दोन्हीही परिस्थितीत (जहाज व्यवस्थित तरू शकते).

पुढे हा शब्द सामान्य व्यवहारात शिरला आणि ‘अनेक दिशांनी/प्रकारांनी जाऊ शकणारे’ असा अर्थ त्याला प्राप्त झाला. एखाद्या विषयाचा सारांश सांगताना By and large चा वापर बऱ्यापैकी करतात.

Aloof
एकलकोंडया किंवा तुटक वागणाऱ्या माणसासाठी आपण हे विशेषण नेहमी वापरतो. याचा उगम देखील जहाजविश्वातून आहे. या शब्दाची फोड a + loof अशी असून त्याचा अर्थ, ‘वाऱ्याच्या दिशेने’ असा आहे. जहाजाची सफर चालू असताना त्याचा अग्रभाग वाऱ्याच्या दिशेने झोकून द्यायचा, जेणेकरून जहाज किनारा अथवा अन्य धोक्यापासून कायम दूर राहते. या संदर्भात त्याचा विरुद्ध अर्थ alee असा आहे.

ok
असा हा मूळचा नाविक शब्द पुढे सामान्य व्यवहारात, कायम इतरांपासून लांब/तुटक राहणाऱ्या व्यक्तीसाठी वापरला जाऊ लागला.

Offing
‘लवकरच येणारा’ किंवा ‘येऊ घातलेला’ अशा अर्थी हा शब्द आपल्याला परिचित आहे. ‘In the offing’ या प्रकारे त्याचा नेहमी वापर होतो. आता त्याचे मूळ पाहू.
ok
जहाज समुद्रावर असताना त्याच्या एखाद्या स्थितीत जेव्हा जमीन दृष्टिक्षेपात असते परंतु पुरेशी लांब असते, अशा स्थितीला offing (off + ing) म्हणतात. तसेच किनाऱ्यावर उभे राहून समुद्रातील जहाजाचे निरीक्षण करताना पण हा शब्दप्रयोग वापरता येतो.

• in the doldrums
चाकोरीत अडकलेल्या किंवा नाउमेद अवस्थेसाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. आता त्याचा नाविक जगातील उगम पाहू. तो एका विशिष्ट भौगोलिक स्थानाशी (Inter-Tropical Convergence Zone) निगडीत आहे.

ok

१९व्या शतकाच्या सुरुवातीस जहाजांसाठी पवनऊर्जा हा महत्त्वाचा ऊर्जास्त्रोत असायचा. विषुववृत्ताजवळच्या पट्ट्यामध्ये भूपृष्ठ वारे खूप कमी वाहतात. जर का एखादे जहाज प्रवास करीत त्या पट्ट्यात येऊन पोचले आणि पुढे काही आठवड्यांपर्यंत तिथे अनुकूल वारे वाहत नसतील तर ते जहाज वाऱ्याअभावी तिथेच अडकून पडायचे. अशा प्रकारे जेव्हा जहाजाची मार्गक्रमणा थांबून ते समुद्रातच अडकून पडते (dulled) त्याला in the doldrums हा शब्दप्रयोग वापरला गेला. त्यातूनच पुढे एखाद्या अतिशय शांत, उदास किंवा निरुत्साही स्थितीसाठी त्याचा वापर होऊ लागला.

.. आणि आता या विवेचनातील शेवटचा शब्द :

Feeling blue
अत्यंत दुःखी अवस्थेत असताना किंवा मन विषण्ण झालेले असताना हा शब्दप्रयोग वापरतात. याचा उगम जहाजावरील दुःखद घटनेशी निगडित आहे. एखाद्या सफरीदरम्यान जेव्हा जहाजाच्या कप्तानाचा मृत्यू होतो तेव्हा तिथल्या सर्वांचेच मनोधैर्य खचलेले असते. त्याचे प्रतीक म्हणून निळ्या रंगाचा वापर केला जातो. त्या जहाजाच्या संपूर्ण परतीच्या प्रवासादरम्यान खलाशी निळे झेंडे फडकवतात आणि जहाजाच्या बाहेरील संपूर्ण बाजूवर निळा पट्टा रंगवलेला असतो.
..

समुद्र, जहाज आणि नाविक या त्रयीने इंग्लिश भाषेला शेकडो शब्द दिलेले आहेत. वर वर्णन केलेले ८ शब्द ही त्याची केवळ एक झलक. आपण जर बोट/जहाज यांच्या समानार्थी इंग्लिश शब्दांची यादी पाहिली तर ती सुमारे १५०च्या आसपास आहे !

या थरारक सामुद्रिक जगाने अनेक इंग्लिश लेखकांना भुरळ घातली यात नवल ते कसले? या विश्वाशी संबंधित असंख्य साहित्यप्रकार प्रसवले गेले आहेत. त्यामध्ये प्रणयकथा व कादंबऱ्या आहेत आणि बखरी सुद्धा. अनेक संतचरित्रे आणि आत्मचरित्रे देखील यावर बेतली गेलीत. अशा बहुतेक कथा-कादंबऱ्या पौरुष आणि पराक्रम या सूत्राभोवती गुंफलेल्या असतात. खवळलेला दर्या आणि प्रतिकूल निसर्गाशी झगडून एखादा नायक कसे यश मिळवतो ही अनेक लेखकांची आवडती संकल्पना. या संदर्भात ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ हे चटकन आठवणारे एक सुपरिचित उदाहरण. अशा काही गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित भव्य चित्रपट देखील निघालेत आणि ते कमालीचे लोकप्रिय झालेत.

नाविकांच्या अफाट व धोकादायक जगातील काही शब्दांचे अर्थ आणि त्यांचे लाक्षणिक अर्थ समजून घेताना या भाषासमुद्रात थोडीशी डुबकी मारता आली याचा आनंद वाटतो. त्या सागररत्नांचा हा अल्पपरिचय वाचकांना पसंत पडावा.
*****************************************************************************

संदर्भ : विविध इंग्लिश शब्दकोश, व्युत्पत्तीकोश आणि ज्ञानकोश
• चित्रे जालावरून साभार !

भाषाआस्वाद

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

27 Aug 2023 - 9:40 pm | तुषार काळभोर

A1, in the blues, in the doldrums हे नेहमीच्या वापरातील शब्दप्रयोग. पण त्यांची व्युत्पत्ती इंग्रजांच्या नौकानयनात असेळण्याची कल्पनाही करणे अशक्य आहे.
कुठून कुठून शोधून काढता :D

रामचंद्र's picture

28 Aug 2023 - 12:05 am | रामचंद्र

खरंच छान विषय सुरू केलात, डॉक्टरसाहेब. कुठल्याही व्यवसायावरून, क्षेत्रावरून भाषेत भर पडणाऱ्या शब्दांची मजा वेगळीच! आता सागरी पार्श्वभूमी (बहुधा) असलेला अजून एक परिचित शब्द म्हणजे पॉश - posh - port out, starboard home.

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 6:08 am | कुमार१

posh - port out, starboard home.

नाही ! हा गैरसमज आहे. इथे पहा :

More likely it is from slang posh "a dandy" (1890), from thieves' slang meaning "money" (1830), originally "coin of small value, halfpenny,"

रामचंद्र's picture

28 Aug 2023 - 7:14 am | रामचंद्र

ही तर अजूनच गंमतीदार माहिती!

चौकस२१२'s picture

28 Aug 2023 - 4:47 am | चौकस२१२

मिपावरील वेगळा आणि माहितीपूर्ण आणि जोडीला त्याबद्दल समर्पक छायाचित्र .. असलेल्या लेखांची जर यादी असेल तर त्यात हा लेख नक्कीच नोंद करण्याच्या योग्यतेचा

सुंदर माहितीप्रद लेख. योगायोग म्हणजे कालच जालावर चाळवाचाळव करत असता समुद्र आणि जहाजे यांची अप्रतिम चित्रे रंगवणारे पितापुत्र असलेले दोन इंग्लिश चित्रकार सापडले. आता नावे विसरलो, हुडकून त्यांची चित्रे देईन.

रामचंद्र's picture

28 Aug 2023 - 7:13 am | रामचंद्र

साधारणपणे सत्तरच्या दशकात रीडर्स डायजेस्टमधील अप्रतिम समुद्रचित्रे काढणारे चित्रकार कोण असावेत, काही सांगू शकाल काय? Scharry अशी काहीतरी त्यांची सही असायची.

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 6:11 am | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना
धन्यवाद !
आपल्यासारख्या सुजाण वाचकांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य होते.

विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला ते लिहिण्याचा मोह आवरत नाहीय.

विज्ञानाची सुरुवातच मुळी आपण नेहेमी करीत असलेल्या गोष्टींमागची कारणमीमांसा शोधण्यातून झाली. जसं पहारीमुळे मोठे खडक फोडणं सुलभ होणे, फोडलेले खडक पहारीनेच हलविणे, दही घुसळून लोणी काढणे, वगैरे.

गणितातील लिनिअर अल्जिब्रा हि शाखा तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या नियोजनातून जन्माला आली. तसेच संख्या शास्त्रातील प्रोबॅबिलिटी थिअरीची पायाभरणी जुगार्यांनी केली.

विज्ञान श्रेष्ठ आहे असं कितीही म्हटलं तरीही कधी कधी फारशी कारणमीमांसा ज्ञात नसलेल्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनाला आव्हान देऊ शकतात. लुई पाश्चरला त्याच्या हयातीत पारंपरिक फ्रेंच बिअर पेक्षा चांगली बिअर प्रयोगशाळेत बनविता आली नव्हती असं काहीसं वाचल्याचं आठवतंय.

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 10:07 am | कुमार१

विज्ञानाच्या बाबतीत विविध व्यवसायांनी कसा हातभार लावला

तुम्ही दिलेली उदाहरणे रंजक असून आवडली. त्यात आता एका आरोग्य विज्ञानातील शोधाची भर घालतो. रुग्णाची वैद्यकीय तपासणी करताना शरीराच्या एका भागावर बोट ठेवून त्यावर दुसऱ्या हाताच्या बोटाने टकटक करणे हे तंत्र महत्वाचे असते. त्याला percussion असे म्हणतात. त्याचा शोध Josef Leopold Auenbrugger या डॉक्टरांनी लावला.

ok

गमतीचा भाग पुढे आहे.
या डॉक्टरांचे वडील खानावळीचे मालक होते आणि त्यांच्या तिथल्या डेपोमध्ये दारुने भरलेली पिंपे असायची. ती अपारदर्शक असल्यामुळे बाहेरून पाहताना पिपात दारू किती शिल्लक आहे हे समजत नसे. मग या चिरंजीव पठ्ठ्याने त्या पिंपांवर
चाळा म्हणून percussion या तंत्राचा वापर सुरू केला.

पिंपातील जो भाग द्रवाने भरलेला असतो तिथे बद्द असा आवाज येतो आणि जो भाग रिकामा असतो तिथे अर्थातच पोकळी दर्शवणारा आवाज येतो. यावरूनच त्याला या तंत्राची कल्पना वैद्यकीय विज्ञानात वापरावी वाटली.

वन्स इन अ ब्लू मून या शब्दाचा लाक्षणीक अर्थ माहीत आहे. पण हा शब्द नक्की कसा उगम पावला.
आणि त्यात ब्लू हा शब्द कसा आला?

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 11:34 am | कुमार१

त्यात ब्लू हा शब्द कसा आला?

व्युत्पत्ती कोशानुसार 'ब्ल्यू' हा लाक्षणिक अर्थाने कसा आला ते नक्की सांगता येत नाही.

परंतु वैज्ञानिक दृष्टीने पाहता इतिहासात काही दुर्मिळ क्षण येऊन गेलेले आहेत की जेव्हा चंद्र खरोखर निळा दिसत होता ( सन 1883, 1927, 1951). त्यावेळी पर्यावरणात काही टोकाचे बदल झालेले होते.

.. the sense of blue here is obscure. Literal blue moons do sometimes occur under extreme atmospheric conditions.

Nitin Palkar's picture

7 Nov 2023 - 8:14 pm | Nitin Palkar

वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही..
नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

Nitin Palkar's picture

7 Nov 2023 - 8:14 pm | Nitin Palkar

वन्स इन अ ब्लू मून सारखं नोव्हेंबर महिन्यात 'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी' असं म्हणायला हरकत नाही..
नोव्हेंबरमध्ये एक आणि तीस तारखेला आशा दोन संकष्टी चतुर्थ्या आल्या आहेत..

कुमार१'s picture

8 Nov 2023 - 8:33 am | कुमार१

'वन्स ऑन अ ब्लू संकष्टी'

रोचक ! असे योग दुर्मिळ असावेत

आंद्रे वडापाव's picture

28 Aug 2023 - 11:40 am | आंद्रे वडापाव

A1 लेख !

अश्या लेखांसाठीच मिपा प्रसिद्ध व्हावं .. ही अपेक्षा !

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Aug 2023 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त माहीतीपूर्ण लेख. अनोखा विषय शिवाय समर्पक चित्रे यामुळे वाचायला मजा आली.
वन मोर फिदर इन युवर कॅप कुमार सर!!

रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह आठवले :)

वाटोळं करा- ट्रेक सुरु होण्यापुर्वी सदस्य संख्या मोजण्यासाठी गोल करुन उभे रहाण्याची सूचना
खाऊन घे गचागच- ३-४ दिवसांच्या ट्रेक मध्ये जेवण खाण वेळेत होईलच याची शाश्वती नसते तसेच काय खायला मिळेल पोटभर मिळेल का हेही माहित नसते, त्यामुळे "मिळालेय तर पोट गच्च भरुन घे" असा अर्थ
नावातच हावरटपणा- ट्रेकमध्ये आपल्याकडे खाण्यापिण्याचे पदार्थ नसल्यास दुसर्‍याला लाडीगोडी लावुन किवा ढापुन त्याच्या सॅकमधील किवा वाटणीचे खाल्ले की ही शिवी देतात(अस्सल हावरट आहेस या अर्थी)

बाकी चैतन्यकांडी, धूर निघणे,डबा टाकणे,न्युटन बॉटल(२ भोके असलेली बाटली) वगैरे बरेच आहेत.

आंद्रे वडापाव's picture

28 Aug 2023 - 1:18 pm | आंद्रे वडापाव

रच्याकने- ट्रेकिंग मधले काही मजेदार शब्दसमूह

वासोट्याच्या ट्रेक मध्ये आमच्या ग्रुप मधले दोघेजण ... माथ्यावर जाईपर्यंत खूप दमले होते ...

तेव्हा ते दोघे म्हणाले ...

"आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "...

"वासोटे कपाळात जाणे ", हा एकवाक्प्रचार तेव्हा पासून ग्रुप मध्ये सुरु झाला ..

चौकस२१२'s picture

30 Aug 2023 - 7:44 am | चौकस२१२

"आमचे 'वासोटे' कपाळात गेलें ... ट्रेक करून "...

पुरुष = वासोटे कपाळात गेले
स्त्री: = दाण्याचे कूट झाले

इंग्रजी = क्राउन ज्वेल्स
जयवंत दळवी : २ पपनस ची उपमा

असो वासोट्याची काळजी घ्याची असले तर हे उत्पादन घ्या
https://www.bodyheal.com.au/products/500-body-assist-suspensory-testicul...

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 1:45 pm | कुमार१

तुमचे 'वाटोळं' आणि वासोटा हे भलतेच आवडले आहे !

यावरून माझ्या तरुणातल्या काही गिर्यारोहण आठवणी :
1. पावसाळ्यात गड उतरत असताना पाय घसरण्याचे प्रकार वारंवार होत राहतात. अशा पाय घसरण्याला आमच्या वेळी ‘सिक्सर मारणे’ असे म्हणायचे. संपूर्ण गड उतरल्यानंतर प्रत्येकाच्या सिक्सरचा हिशोब लावला जाई !

2. त्याकाळी जेव्हा बोचेगळ आणि लिंगाणा ही नावे प्रथम ऐकली तेव्हा भलतंच भारी वाटलं होतं ! आता यांना शब्दशः अर्थ म्हणायचं की लाक्षणिक ते माहित नाही &# 128578 ;

अजून एक मजेशीर उपमा नंतर लिहीतो..

अत्यंत रोचक. यातील बहुतांश शब्दांची व्युत्पत्ती माहीत नव्हती.

बाय द वे.. आधी जलवाहतूक अनेक शतके स्थिरावली होती. मग जेव्हा विमान वाहतूक सुरू झाली तेव्हा जलवाहतूक क्षेत्रातले अनेक शब्द आणि संकल्पना जशाच्या तशा विमानन क्षेत्रातही आल्या.

स्टारबोर्ड: उजवी बाजू
पोर्ट : डावी बाजू

नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा.

दोन्हीच्या रेडिओ कम्युनिकेशनमध्ये खूप एकसारख्या गोष्टी येतात. आणि त्याचं मूळ जलवाहतूक क्षेत्रात आहे.

हवेतील अंतराची मापे आणि पाण्यावरील मापे यात जरा वेगवेगळे लॉजिक असले तरी शाब्दिक टर्म्स एकसारख्या आहेत.

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 2:29 pm | कुमार१

नॉटिकल मैल, नॉट्स (वेगाचे युनिट) आणि इतर अनेक संज्ञा.

अगदी अगदी !
..
या चर्चेत बरीच जाणकार मंडळी सहभागी होत आहेत त्याचा आनंद वाटतो. या लेखनादरम्यान माझ्या मनात एक शंका आली ती विचारतो.
एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे.

प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?

एका संदर्भानुसार जलप्रवासाची सुरुवात ( म्हणजे ओंडका वगैरे) अंदाजे ९ लाख वर्षांपूर्वी आहे. मानवी उगम अंदाजे 20 ते 24 लाख वर्षांपूर्वी (सेपिअन्स पुस्तकानुसार) आहे.

प्रश्न असा आहे की, पायांनी चालणे यानंतरची दुसरी मानवी वाहनप्रवासाची अवस्था कोणती ? प्राण्यांचा वापर की जलप्रवास की अन्य ?

इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही. तुम्ही प्रचेतस यांना विचारून पहा.

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 2:58 pm | कुमार१

इतके जुने आता वयोमानानुसार आठवत नाही

अरे बापरे ! इतके वय झाले की काय !! 🙂

नुकताच मी प्राईम व्हिडिओवरील Passengers हा इंग्लिश चित्रपट पाहीला. त्यात एक अवकाशयान पृथ्वीवरून अन्य कुठल्यातरी अति लांबच्या ग्रहावर चाललेले आहे. त्यामुळे त्यातील कर्मचारी व उतारू 120 वर्षांसाठी झोपून राहणार आहेत..... वगैरे भन्नाट कल्पना आहेत त्यात.

"वॉटरकूलर टॉक्स"

हे तर झकास !

गवि's picture

28 Aug 2023 - 2:43 pm | गवि

या लेखातील Scuttlebutt या शब्दाला आताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात "वॉटरकूलर टॉक्स" "वॉटरकूलर गॉसिप" असेही शब्द आहेत. अफवा किंवा अंदाजपंचे काहीतरी बातम्या पसरणे हे टाळण्यासाठी वॉटरकूलर टॉक्स टाळावेत वगैरे..

सुधीर कांदळकर's picture

28 Aug 2023 - 6:28 pm | सुधीर कांदळकर

सोल्जर्स ब्लू नावाचा एक सिनेमा पाहिला होता.

ब्लू मूनः एका चांद्रमासात दोन पौर्णिमा आल्या की दुसर्‍या पौर्णिमेला ब्लू मून म्हणता असे अनेक वर्षांपापूर्वी वाचले होते. दुसरी कां व कशी होते त्याचे तपशील विसरलो. असे क्वचितच घडत असल्यामुळे क्वचितच घडणार्‍या घटनेला वन्स इन अ ब्लू मून म्हणतात.

इन द डोलड्रम्स नेहमी ऐकतो आणि वापरतोही. त्याचा उगम आत्ता कळला. वारा अनुकूल नसेल तर जहाजे अनेक दिवस बंदरात अडकून पडत हे खरे आहे.

फारच मनोरंजन माहिती. लेख आवडलाच. धन्यवाद.

उद्या 30 ऑगस्ट रोजी सुपर ब्लू मून पाहता येणार आहे. या घटनेदरम्यान चंद्र आणि पृथ्वी यांच्यातले अंतर सर्वात कमी असते.

कर्नलतपस्वी's picture

29 Aug 2023 - 10:08 pm | कर्नलतपस्वी

आजच खुप जवळ दिसत आहे.

अनिल हटेला's picture

28 Aug 2023 - 6:47 pm | अनिल हटेला

लेख आनि त्यावरील सर्व प्रतिक्रीया

A 1+

छान आणी माहितीपुर्ण.
अजुन येउ द्यात..

कुमार१'s picture

28 Aug 2023 - 7:47 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
जहाजांची वाहतूक कोंडी कधी ऐकली आहे का ?
नसल्यास ही बातमी पहा

पनामा कालव्यातील पाणी कमी पडल्यामुळे जहाजे आता तिथे अडकून पडली आहेत आणि पुढे जाऊ शकत नाहीत .

टर्मीनेटर's picture

29 Aug 2023 - 12:54 am | टर्मीनेटर

छान विषय, मस्त लेख 👍
विषयाशी संबंधीत शब्द / वाक्य प्रयोगात असलेल्या 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो पण आज खरंच तेवढा वेळ नाही...
(फिर मिलते हैं एक लंबेसे ब्रेक के बाद 😀)

स्वधर्म's picture

29 Aug 2023 - 3:10 pm | स्वधर्म

कुमार सर, लेख अत्यंत आवडला. पहिल्यांदा शिर्षक काहीसे राजकीय वाटले होते. आता तुंम्ही वाहतुकीचाच विषय काढलाय तर, खालील दोन मराठी शब्द अगदी गेल्या एकदोन दशकातच जन्मले असावेत असे वाटते.
वडाप: सांगली, कोल्हापूरकडे शेअर रिक्षा किंवा बस वाहतुकीला वडाप हा शब्द सर्रास वापरात आहे. बहुधा ज्या प्रकारे बस स्थानकातून प्रवासी ‘वडून’ नेले जातात, त्यामुळे हा अत्यंत अर्थवाही शब्द तयार झाला असावा.
टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी हा शब्द वापरात होता. बजाज टेम्पोच्या सहा आसनी रिक्षांच्या खास आवाजामुळे हा शब्द आकाराला आला असावा. आता त्या सहा आसनी रिक्षा फारशा दिसत नाहीत, पण शब्द मात्र तसाच वापरात आहे.

आंद्रे वडापाव's picture

29 Aug 2023 - 6:00 pm | आंद्रे वडापाव

'वडाप' चा जन्म वडा- हाफ़ या हाटेलातील संज्ञा वर आधारित आहे , असे कोल्हापूरकरा कडून ऐकले होते ..

एक वडा दोघात शेअर करतात ... तशीच एक ट्रिप अनेकांत शेअर केली कि तिला वडाप म्हणत्यात ...

सुरिया's picture

29 Aug 2023 - 7:33 pm | सुरिया

वाटून अर्धा वडा खाण्याचा कद्रुपणा कोल्लापुरात करत नसतेत. तवा वडा हाफ तसलं काय नसतंय ओ.
वढून नेयाचं काम ते वढाप. वाढणारे वाढपी तसं.
.
आणि टमटम आवाजानं म्हणत नाह्यती. पूर्वी व्हिक्टोरिया असायच्या घोड्याच्या. त्याला टमटम म्हणायचे. टॅक्सीसारखे पासिंग असायचे त्यांना. आठवा व्हिक्टोरिया नंबर २०३. नंतर मुंबई सोडून त्या नामषेष झाल्या पण पाशिंजरं वाहून न्यायचं काम करणारी टमटम हे नाव राह्यलं

आंद्रे वडापाव's picture

30 Aug 2023 - 8:57 am | आंद्रे वडापाव

वढून नेयाचं काम ते वढाप

हा हे जास्ती शिस्तीत बरुबर वाटतंया..

कुमार१'s picture

29 Aug 2023 - 3:56 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
..
१. 'सेफ्टी वीक' बद्दल प्रतिसादात लिहिणार होतो >>> प्रतीक्षेत !
..
२. वडाप >>>
होय, हा अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा अन्य एक अर्थ " तांदळाचे वडे वगैरे असलेले सुग्रास जेवण (कोकणी)" इथल्या चर्चेत वाचला

कुमार१'s picture

29 Aug 2023 - 4:01 pm | कुमार१

टमटम: पुण्यात शेअर रिक्षांसाठी

याचा उगम अगदी अलीकडील आहे की जुन्या शब्दावरून आला आहे ? एक शंका

टमटम =
घोड्याची एक प्रकारची गाडी. [ध्व.]

सर टोबी's picture

29 Aug 2023 - 6:16 pm | सर टोबी

मला वाटते कुठल्यातरी पूर्वेकडील देशात टुकटुक नावाची रिक्षा हि प्रेरणा असावी. त्यात सहा आसनी रिक्षाचा जो पहिला अवतार होता त्याचा सायलेन्सर हा समोर असायचा आणि त्यावर असलेलं धातूचं झाकण टमटम आवाज करीत असायचं असं काही तरी आठवतंय.

कर्नलतपस्वी's picture

29 Aug 2023 - 6:17 pm | कर्नलतपस्वी

बस पास संपला,पैसे नसले कीचला अकरा नंबरच्या बसने,हे आगदी सहज बोलले जायचे.

कुमार सर धन्यवाद रंजक व माहितीपूर्ण लेख.

आजानुकर्ण's picture

29 Aug 2023 - 6:26 pm | आजानुकर्ण

छोटेखानी परंतु सुंदर लेख.

कुमार१'s picture

29 Aug 2023 - 7:38 pm | कुमार१

वरील सर्वांना धन्यवाद !
.....

टुकटुक रिक्षा


सध्या त्या मुख्यत्वे थायलंडमध्ये आहेत परंतु त्यांचा उगम काहीसा वादग्रस्त आहे. त्यांच्या इंजिनचा आवाज टुकटुक असा येतो.

विअर्ड विक्स's picture

30 Aug 2023 - 10:46 am | विअर्ड विक्स

लेख आवडला ...

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 7:49 am | कुमार१

या विषयावरील एक नवे मराठी पुस्तक :
वसुंधरेचे शोधयात्री
डॉ. अनुराग लव्हेकर
राजहंस प्रकाशन

सुमारे दोन हजार वर्षांच्या जागतिक समुद्र सफरींचा इतिहास
अशा सफरींच्या विस्तृत इतिहास नोंदणीसाठी periplus हा शब्द आहे

नठ्यारा's picture

6 Nov 2023 - 7:12 pm | नठ्यारा

लॉंच हा शब्दही असाच सागराशी निगडीत वाटतो. टेक ऑफ याविषयी नक्की सांगता येत नाही.

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 7:24 pm | कुमार१

लॉंच

सन 1400 पासून बोटीशी निगडित पण कालांतराने 'कशाचीही सुरुवात होणे' या अर्थी .
..

टेक ऑफ

हवेत जाण्याशी निगडित दिसतोय

आजानुकर्ण's picture

6 Nov 2023 - 8:46 pm | आजानुकर्ण

सुंदर लेख. खूप आवडला.

ऑल हँड्स ऑन डेक हा आणखी एक कार्यालयीन कामकाजात घुसलेला सामुद्रिक वाक्प्रयोग. आणीबाणीच्या काळात (जी प्रत्येक कंपनीत कायमच असते!), सर्वांनी मदत करणे अपेक्षित असते. त्यासाठी केलेल्या व्यवस्थापकीय आवाहनात 'ऑल हँड्स ऑन डेक' हमखास ऐकायला मिळते.

---
मूळ अर्थ - जहाजाच्या दिशेने एखादे वाईट वादळ किंवा तत्सम गंभीर प्रसंग येत असल्यास, बचावाची तयारी करण्यासाठी सर्व हात (म्ह. - मनुष्यबळ) डेकवर (म्ह. - बोटीचा मुख्य वरचा भाग) असणे अपेक्षित आहे. अशाप्रसंगी कोणताही अपवाद न करता प्रत्येकाने मदत करणे आवश्यक आहे.

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 9:14 pm | कुमार१

ऑल हँड्स ऑन डेक

पत्त्यांचा जोड

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 9:15 pm | कुमार१

ऑल हँड्स ऑन डेक

पत्त्यांचा जोड

कुमार१'s picture

6 Nov 2023 - 9:18 pm | कुमार१

ऑल हँड्स ऑन डेक
वा ! सुंदरच आहे. आवडला.

deck याचा अजून एक अर्थ म्हणजे खेळण्याच्या पत्त्यांचा जोड

बोटवाले कुणी मिपाकर नाहीत.

स्वीटटॉकर होते पण ते आता लिहीत नाहीत.

कंजूस's picture

7 Nov 2023 - 9:50 am | कंजूस

Ibis Triology लिहिणाऱ्या अमिताब घोष यांच्या पुस्तकांत बोटीचेंच उल्लेख आहेत. कादंबऱ्या असल्या
तरी संदर्भ भारी आहेत.

कुमार१'s picture

7 Nov 2023 - 12:12 pm | कुमार१

अमिताब घोष

चांगली माहिती.