घायाळ हरिणी

राजा's picture
राजा in जे न देखे रवी...
17 Dec 2008 - 9:53 am

घायाळ हरिणी
मुंबई आमची आई
तिच्यावरच अशी वेळ येई
किती निर्बल आम्ही लेकरे
आईचे रक्षण करु शकत नाही
बाहेरच्या देशातुन अतिरेकी येतात
खुलेआम बाम्ब स्फोट करतात
शेकडो लोकांचे सहज बळि जातात
शांतीच्या राज्यात अशांती माजवतात
राज्यकर्ते मग जखमींना भेटतात
हात जोडुन मदत जाहीर करतात
पैसे देता देता घेणारे म्हातारे होतात
लढ्तांना मेले त्यांना ‘वीर‘ म्हणतात
पैसे देताना ‘धीर’ धरायला सांगतात
पोलीसांना कडक कारवाई करायला लावतात
स्वत: पंख्या खली बसुन टि.व्ही. बघतात
आमच्या ह्या आईने किती दु:ख सोसले
मागे एकदा पुरामध्ये अर्धे लोक गेले
शेकडो मालमत्तेचे नुकसान झाले
थोडे सावरले नाही, तोच रेल्वेत बाम्ब स्फोट झाले
आमच्या आईला आता फार जखमी केले
सारे जण एक व्हा, आता खुप झाले
आपल्यात एकी नाही म्हणुन बाहेरचे माजले
रात्र वैर्याची आहे झोपा काढता कशाला
प्रत्येक जण शिवबा आहे जागवा स्वःताला
सिंहासारखे फाडु त्या नालायक राक्षसांला
पुन्हा काय धक्का लावील तो आईच्या केसाला
सारे मिळुन आधार देऊ घायाळ हरिणीला.

श्री.राजाभाऊ गायकवाड
शिवाजीनगर , सातपुर , नाशिक
दुरध्वनी : ९७६६२००४५३

कविताविचार