दोन शशक- नीट

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
29 Mar 2023 - 12:16 pm

"अहो, तुम्ही नका ना त्याला सारखे सारखे टोचून बोलू. आपण दोघे डॉक्टर आहोत म्हणजे त्याने सुद्धा डॉक्टरच व्हायला पाहिजे का? एकुलता एक मुलगा आपला.नसेल त्याची इच्छा तर त्याला जे करायचे ते करू दे ना?"

म्हणजे काय? एव्हढी मेहनत करून आपण हे हॉस्पिटल उभारलंय. ते कोण सांभाळणार पुढे? त्यात रशिया युक्रेनचाही पर्याय बंद झालाय. चायनाबद्दल तर बोलायलाच नको. त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला. म्हणाला "डॉक्टरसाब चिंता मत करो. आप बस जेब ढिली रखो, और कितने मार्क्स चाहिये बोलो. बाबू को डॉक्टर बनाने की जिम्मेदारी मेरी"
==============================
खरेतर मला सायन्सला ऍडमिशन घ्यायचीच नव्हती. पण आई बाबांची भुणभुण. त्यात आता हे नीटचे भूत मानगुटीवर बसलेय. मान मोडेतोवर अभ्यास केला पण बायोलॉजि मुळातच आवडत नाही तर काय? बाबांना सांगितले , तर म्हणतात "तू काळजी करू नको, मी बघतो." अरे पण नीट द्यायला मला कॉन्फिडन्स पाहिजे ना?तिकडे तुम्ही थोडीच येणार मदत करायला?

काल रामसिंग आला होता. मला म्हणाला "बाबू, तुम चिंता मत करो.बस मैं बोलता हू वो मोबाईल,सिम और ब्लु टूथ खरीदलो. बाकी मैं संभालुंगा"

आज नीटची परीक्षा आहे. रामसिंगने निळा शर्ट घालून यायला सांगितलेय. छातीत धडधड होतेय. निळा शर्टवाले बरेच दिसताहेत.बुटात मोबाईल टोचतोय, आणि कानात ब्लूटूथ. कानात सूचना ऐकायला येताहेत. आता पुढे?

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

29 Mar 2023 - 1:22 pm | कुमार१

आवडल्याच ..
वास्तव दर्शन...

सरिता बांदेकर's picture

29 Mar 2023 - 1:52 pm | सरिता बांदेकर

आजू बाजूला दिसणारं वास्तव नेटक्या शब्दात मांडलंय.
आवडली शशक.

विवेकपटाईत's picture

29 Mar 2023 - 4:28 pm | विवेकपटाईत

ज्यांना स्वत:वर विश्वास नसतो ते जाळ्यात अटकतात. पूर्वी दिल्लीत ही असे दलाल भरपूर होते. पद्धत सौपी लोकांकडून पैशे घ्यायचे. त्यातला एखादा आपसूक पास होणार आणि त्याला नौकरी लागणार. क्रेडिट दलाल घेणार. इमानदार दलाल बाकीच्या लोकांचे 70 ते 80 टक्के घेतलेला पैसा परत करायचे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Mar 2023 - 7:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

ही मास कॉपी करायची आधुनिक टेक्निक आहे. दलाल पैसे घेतो, उमेदवार कानात ब्लु टूथ लावुन परीक्षेला बसतो. मोबाईल कुठेतरी दडवलेला असतो. पेपर सुरु झाला, की फोनवर सगळी उत्तरे सांगितली जातात. उमेदवार ऐकुन ऐकुन लिहितो.पास होण्याची हमखास गॅरेंटी. आता बोला.

सुजित जाधव's picture

1 Apr 2023 - 7:47 am | सुजित जाधव

हे रोखण्यासाठी परीक्षा हॉल मध्ये जामर बसवले तर..??

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Apr 2023 - 7:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

किवा सध्या जे ई ई मेन्स किवा बँक प्रवेश परीक्षा टि सी एस च्या टेस्ट सेंटरमध्ये होतात, एकदम कडेकोट बंदोबस्त असतो. अर्थात ती परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि संगणकावर असते. तसे काहीतरी केले पाहीजे हे गैर प्रकार रोखायला.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2023 - 8:49 pm | कर्नलतपस्वी

त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला.

Let reader be on tenterhook.

काही वर्षापुर्वी आमचे नाम धारी माणसाने वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रियेत असेच काहीसे कांड केले. बातमी प्रसारित झाली. मला पण काही फोन आले पण मी साफ म्हणालो तो मी नव्हेच.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2023 - 8:49 pm | कर्नलतपस्वी

त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक कल्पना आलेय. रामसिंग आठवतो तुला?आपल्या हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय होता तो? आजकाल टेचात मर्सिडीजमधून हिंडत असतो. परवाच भेटला होता मला.

Let reader be on tenterhook.

काही वर्षापुर्वी आमचे नाम धारी माणसाने वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रक्रियेत असेच काहीसे कांड केले. बातमी प्रसारित झाली. मला पण काही फोन आले पण मी साफ म्हणालो तो मी नव्हेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Mar 2023 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडल्या कथा. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

31 Mar 2023 - 3:40 pm | सौंदाळा

भारी आहेत दोन्ही, पुढचे भाग पण लिहा.
शशक किंवा लेखमाला कोणत्याही स्वरुपात.