सुयोधन आणी कर्ण

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
16 Dec 2008 - 12:21 pm

गेल्या काहि दिवसात मैत्रीशी संबधीत काहि धागे मि.पा. वर वाचावयास मिळाले आणी बरेच दिवस तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असे वाटत असलेली एक गोष्ट लिहायची प्रबळ इच्छा झाली.

गोष्ट तशी जुनी म्हणजे महाभारतातील आहे, आपल्या पैकी बर्‍याच लोकांना माहितीही असेल.
म्रुत्युंजय कर्ण एकदा सुयोधनाला (ह्याला आपण दुर्योधन या नावाने ओळखतो) भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला होता, काही महत्वाच्या कामानिमित्त तेंव्हा सुयोधन बाहेर गेला होता व त्याला येण्यास थोडा अवधी लागणार होता. मित्राची वाट बघत बसलेल्या कर्णास सुयोधन पत्नी भानुमती हिने बुद्धिबळ खेळण्याचा आग्रह केला. झाले खेळ चालु झाला, काहि वेळातच २/३ चालीत कर्ण जिंकणार हे स्पष्ट झाले, हार हा शब्द माहित नसलेली भानुमती आता मात्र भांबावली आणी कामाचा बहाणा करुन जायला लागली. आयुष्यात अनेक लोकांनी कर्णाकडे पाठ फिरवली होती त्याचा अपमान केला होता, आता विजयाच्या या क्षणी सुद्धा भानुमती कडुन मिळणारी हि वागणुक पाहुन कर्ण काहिसा संतापला आणी त्यानी रागाच्या भरात भानुमतीला हाताला धरुन खाली बसवायचा प्रयत्न केला. ह्या गडबडित भानुमती कर्णाच्या अंगावर पडली आणी तिच्या गळ्यातिल अत्यंत मौल्यवान अशी मौतिक माला ( मोत्यांची माळ) तुटुन तिचे मोती सर्वत्र विखुरले, आणी त्याच क्षणी सुयोधन महालात प्रवेश करता झाला. विचार करा आपली सुंदर पत्नी आपल्याच मित्राच्या (ज्याच्या सौंदर्याची, देखणेपणाची, विरतेची चर्चा सर्वत्र आहे) अंगावर पडलेली आहे, तिच्या गळ्यातिल माला तुटुन सर्वत्र मोती विखुरले आहेत हे पाहुन एखद्या संयमी पुरुषोत्तम हि शंकेने ग्रासला गेला असता त्यानी मनाचा काहि गैरसमज करुन घेतला असता. पण त्यांना या अवस्थेत बघुन सुयोधनानी कपाळाला हात लावला आणी हसत हसत म्हणाला "अरे काय रे तुम्ही दोघे ? येव्हडे मोठे झालात पण तुमच्यातील दंगेखोर लहाणपणा मात्र गेला नाही. येव्हड्या मुश्किलीनी घडवुन घेतलेली माळा सुद्धा तुमच्या दंगा मस्तीत तुटली बघा." असे म्हणुन तो सुर्‍हुद, तो मित्रोत्तम स्वत: खाली बसुन मोती वेचायला लागला.

प्रतिसाद अपेक्षा :- UUU

कथामाहिती

प्रतिक्रिया

शेखर's picture

16 Dec 2008 - 12:35 pm | शेखर

ज्या मित्रा बद्दल आपल्या मनात शंका येते त्या क्षणी मैत्रीच्या अधःपतानास सुरवात होते.

- शेखर

सखाराम_गटणे™'s picture

16 Dec 2008 - 1:41 pm | सखाराम_गटणे™

>>ज्या मित्रा बद्दल आपल्या मनात शंका येते त्या क्षणी मैत्रीच्या अधःपतानास सुरवात होते.
सहमत

----
सखाराम गटणे

संदीप चित्रे's picture

16 Dec 2008 - 8:23 pm | संदीप चित्रे

मीही असेच म्हणतो शेखर

अवलिया's picture

16 Dec 2008 - 1:39 pm | अवलिया

राजकुमारा,

एक चांगली कथा दिली आहे. दिसते तसे नसते या उक्तिचा प्रत्यय या कथेतुन येतो. कर्ण वा सुयोधन (दुर्योधन) प्रत्यक्ष कसे होते किंवा त्यांचे आचरण कसे होते याचा विचार न करता या कथेकडे पाहिले तर आपल्याला एक चांगला संदेश मिळतो.

टिप - ही कथा प्रक्षिप्त आहे. मुळ महाभारतात असा उल्लेख नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. मानणे जरुरी नाही.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

टारझन's picture

16 Dec 2008 - 2:10 pm | टारझन

हल्ली दिल्लीमधे असे सुयोधन सर्रास दिसतात म्हणे .... मागे वाईफ-स्वाईप प्रकरणात बरेच पकडले गेले होते !!

ता.क : हे अवांतर वाटल्यास आणि पुढच्या क्षणाला इथं न दिसल्यास माझी काहीही हरकत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2008 - 7:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हल्ली दिल्लीमधे असे सुयोधन सर्रास दिसतात म्हणे .... मागे वाईफ-स्वाईप प्रकरणात बरेच पकडले गेले होते !!
वाईफला स्वाईप कसं करत असतील, महाभारत काळात?

टारझन's picture

16 Dec 2008 - 8:02 pm | टारझन

वाईफला स्वाईप कसं करत असतील, महाभारत काळात?

आपण यावर कौलगुरू सगदेवाला स्मरून एक कौल काढावा ! या विषयावर कितीही काहीही प्रतिक्रिया दिली तरी ती अवांतर न समजता रिलेव्हंट समजावी !

- कौलभक्त) ट्रल्हाद

ऍडीजोशी's picture

16 Dec 2008 - 1:42 pm | ऍडीजोशी (not verified)

वरची गोष्ट खरी खोटी माहिती नाही पण दुर्योधनाने ज्या कर्णाला केवळ पांडवांना शह द्यायला पुढे-मागे उपयोगी पडेल म्हणून स्वार्थापोटी जवळ केलं तो त्याच्यावर इतका विश्वास ठेवेल हे मलातरी अशक्य वाटतं. तसंच "येव्हडे मोठे झालात पण तुमच्यातील दंगेखोर लहाणपणा मात्र गेला नाही"" हे त्याच्या मनचं वाक्य न वाटता त्याने दुर्लक्ष करण्यासाठी केलेली सारवासारव वाटते.

अवांतर - मैत्री कशी असावी ह्याचे उदाहरण म्हणून 'गोष्ट' उत्तम आहे.

विसुनाना's picture

16 Dec 2008 - 2:18 pm | विसुनाना

कथा म्हणून उत्तम आहे. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणून आणि दुर्योधनाच्या स्वभावाचे उदात्तीकरण करण्यासाठी म्हणून - दोन्ही बाजूंनी. आवडली.
परंतु ती महाभारताच्या कोणत्या पर्वात येते आणि श्लोकसंख्या काय? हे संदर्भ दिले असते तर ती मूळ महाभारतात आहे हे सप्रमाण सिद्ध झाले असते. अथवा तशी ती तेथे नसेल तर मग प्रथम कोठे उगम पावली त्याचा शोध घेता आला असता. असो.
*अवांतर - इथे तात्यांचा (सु/कु)प्रसिद्ध व्यासविरोध आणि माहितीकरिता संदर्भांच्या अट्टाहासाचा विरोध हे दोन्ही (सु/दु)विरोध अवांतर प्रतिसादाच्या माध्यमातून प्रकट होतील अशी अपेक्षा आहे. ;)

भडकमकर मास्तर's picture

16 Dec 2008 - 4:52 pm | भडकमकर मास्तर

बाळबोध निष्कर्ष :
१.बुद्धिबळ खेळ वाईट अवघड असतो.... असे असूनसुद्धा कर्णाने तिला हरवत आणले , म्हणजे कर्ण खूप हुशार असला पाहिजे....

कॉन्स्पिरसी थिअरी...
२. असे काही घडवून आणि नंतर चांगले वागून कर्णाला मैत्रीपाशात जखडून टाकण्याचा कारस्थानी डाव सुयोधनाने आखला असला पाहिजे...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2008 - 4:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझं मत दुसर्‍या पर्यायाला! (हल्ली त्याचीच जास्त चलती आहे म्हणे!)

किंवा आर्थिक मंदीमुळे तो कुणा मित्राला ज्याला त्याने राज्याचा काही भाग दिला होता, त्याला शत्रू बनवू इच्छित नव्हता.

लिखाळ's picture

16 Dec 2008 - 4:59 pm | लिखाळ

माझेही मत कॉन्सपीरसी थेअरीला.

दुर्योधन आणि त्याची बायको जाम हुशार होते. हा प्रसंग सास भी कभी वाल्यांना सांगीतला तर दोन चार एपिसोडसाठी कच्चा माल मिळेल.

(या वाक्यातील माल शब्दावर कोटी होऊ शकते याची जाणीव आहे. पण ती कोटी करणारा प्रतिसाद अवांतर ठरेल की अतिअवांतर याचा विचार करतो आहे.)
-- लिखाळ.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:44 pm | अवलिया

जर पहिले मत विचारात घेतले तर भानुमती अतिशय मठ्ठ असली पाहिजे असे पण होवु शकते.

दुस-या कॉन्सपीरसी थेअरीचा विचार केला तर असे असु शकते की सु(दु)योधन भानुमतीला कंटाळलेला असेल. जर ब्याद जात असेल तर जावु द्या किंवा कर्णाच्या पत्नीवर त्याचा डोळा असेल तेव्हा तो कार्यभाग साधता यावा म्हणुन कर्णाला मोकळीक दिली असावी. म्हणजेच हल्ली दिल्लीमधे असे सुयोधन सर्रास दिसतात म्हणे .... मागे वाईफ-स्वॉप प्रकरणात बरेच पकडले गेले होते असे काही नाही तर हे पुर्वापार तिकडे चालत आले असावे.

पुरानी रस्म है भाई... छोडना नही

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 5:21 pm | विनायक प्रभू

जॅक केम टंबलींग आफ्टर.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 5:26 pm | अवलिया

मला नाही वाटत.
ह्या कथेकडे थोडे वेगळ्या दृष्टीने पाहीले पाहीजे. कारण मुळात ही कथा प्रक्षिप्त आहे. त्यामुळे प्रत्यक्षात घडलेली नाही. जेव्हा प्रत्यक्षात नसलेली कथा जेव्हा सांगितली जाते तेव्हा त्यातुन मानवी भावभावनांचा अभिनिवेश न होता, लेखकाला जे तात्पर्य सांगायचे असेल तेच दृगोचर होते. या कथेकडे पण असेच पहावे. त्यामुळे तुम्ही जो संदर्भ देत आहात तो गैरलागु असावा.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 5:34 pm | विनायक प्रभू

तुम्ही सांगता तसेच पाहिले पाहिजे का? मला वाटले ते मी लिहिले.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 5:35 pm | अवलिया

सहमत आहे. मी पण हेच म्हणतो माझे मत मी मांडले.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 5:41 pm | विनायक प्रभू

तुम्ही दहा ओळीत लिहिले ते मी एका ओळीत म्हटले. मग मी वेगळा दृष्टीने म्हटले असे तुम्हाला का वाटले.

विकास's picture

16 Dec 2008 - 5:37 pm | विकास

महाभारत काळात बुद्धीबळ होते का?

बाकी कर्ण हा चिडका आणि अहंकारी होता. (यावर येथे प्रतिसाद दिलेत तर अवांतर होत जाईल अशी भिती वाटते :-) ) त्याच्यामुळेच द्रौपदीस ओढत आणून वस्त्रहरण करण्याची कल्पना दुर्योधनास सुचली होती. त्यामुळे तो असे काही वागू शकेल यात आश्चर्य वाटले नाही.

दुर्योधनाबाबतची कॉन्स्पिरसी थिअरी मात्र मान्य आहे. त्याने अंगदेश अशाच कारणाने कर्णाला दिला होता. अर्थात त्यात मला काही गैर वाटत नाही कारण त्याने त्याच्या साम्राज्यातील तुकडा त्याला हवे त्याला दिला, मुंबईसारखे नाही ;)

अवलिया's picture

16 Dec 2008 - 6:59 pm | अवलिया

महाभारत काळात द्युत होते. आता त्यालाच त्याकाळी बुद्धीबळ म्हणत असतील तर कल्पना नाही.
द्रौपदीला भर दरबारात आणायची कल्पना दुर्योधनाची होती परंतु तिचे वस्रहरण (जे कधी झालेच नाही) करण्याची कल्पना कर्णाने दिली होती.
बाकी मुंबई पोर्तुगीजांनी इंग्रजांना कशी दिली, का दिली, त्याचे काय परिणाम झाले ह्याविषयीचे माझे ज्ञान तुटपुंजे आहे हे नम्रपणे कबुल करतो

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सुनील's picture

16 Dec 2008 - 7:10 pm | सुनील

महाभारत काळात द्युत होते. आता त्यालाच त्याकाळी बुद्धीबळ म्हणत असतील तर कल्पना नाही.
नसावे. द्युत हा फासे टाकून खेळायचा प्रकार. थोडक्यात जुगार. बुद्धिबळ हा जुगार नाही.

असो, महाभारत काळात बुद्धिबळ होते किंवा नव्हते याविषयी कल्पना नाही.

अवांतर - त्या का॑ळात बुद्धिबळ हा खेळ अस्तित्वात नव्हता असे सिद्ध झाल्यास कथेत थोडा फेरफार करून ते दोघे सापशिडी खेळत होते, असे लिहिता येईल. ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:13 pm | अवलिया

परत मुळ मुद्दा येतोच की, साप शिडी होती का?
त्यापेक्षा द्युतच खेळत होते असे समजुया. आणि भानुमतीने दुर्योधनाला पणाला लावले व हरली त्यामुळे दुर्योधनाला काही बोलता आले नाही असे समजले की सगळा उलगडा होतो. काय म्हणता?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सुनील's picture

16 Dec 2008 - 7:18 pm | सुनील

:)) :))

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

16 Dec 2008 - 7:15 pm | विकास

नसावे. द्युत हा फासे टाकून खेळायचा प्रकार. थोडक्यात जुगार. बुद्धिबळ हा जुगार नाही.

तेच म्हणणे होते...

कवटी's picture

16 Dec 2008 - 6:12 pm | कवटी

मैत्रीचा आदर्श, मित्रोत्तम वगैरे गोष्टींसाठी ही कथा पटली नाही.
मुळात कितीही चांगला मित्र असला आणि त्याच्या मनात तसला वाकडा तिकडा हेतू नसला तरी कुठल्या नवर्‍याला तो आपल्या बायकोच्या अंगचटीला गेलेला खपेल?
अवांतर : या आशयाचा कौल काढावा काय? :/

कवटी

http://www.misalpav.com/user/765

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:00 pm | अवलिया

महाभारत काळातील समाजजीवन आजच्यापेक्षा खुप भिन्न होते. त्यामुळे आजच्या नीती अनीतीच्या तसेच पावित्र्याच्या कल्पना जशाच्या तशा त्या काळाला लागु होतील असे वाटत नाही.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:24 pm | विनायक प्रभू

काही गोष्टी आजही महाभारताप्रमाणे चालत आहेत

कवटी's picture

16 Dec 2008 - 7:39 pm | कवटी

महाभारत काळातील समाजजीवन आजच्यापेक्षा खुप भिन्न होते. त्यामुळे आजच्या नीती अनीतीच्या तसेच पावित्र्याच्या कल्पना जशाच्या तशा त्या काळाला लागु होतील असे वाटत नाही.
माझ्या माहितीप्रमाणे दु:शासनाने द्रौपदीच्या निरीला घातलेला हात आणि दुर्योधनाने दाखवलेली मांडी पांडवाना खपली नव्हती. त्यामुळेच हात उपटला गेला व मांडी फोडण्यात आली. हे तर आजच्या समाज जीवनासारखेच आहे. (संदर्भः तात्याने कुणाला तरी छेड काढतो म्हणून बडवले.)

कौरव तर चुलत भाऊच होते. त्यांचे खपेना तर मग मित्राने बायकोच्या अंगचटीला गेलेले कसे खपले?

एक तर ही कथा पंचतंत्र / इसापनिती / साने गुरुजींच्या गोड गोड गोष्टी छापाची नंतर घुसडण्यात आलेली असणार नाही तर वर कोणी तरी म्हणाला तसे यात दुर्योधनाचा डाव असणार.
कवटी

http://www.misalpav.com/user/765

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:42 pm | अवलिया

माझ्या माहितीप्रमाणे दु:शासनाने द्रौपदीच्या निरीला घातलेला हात आणि दुर्योधनाने दाखवलेली मांडी पांडवाना खपली नव्हती. त्यामुळेच हात उपटला गेला व मांडी फोडण्यात आली.
अगदी बरोबर. पण ते १३ वर्षांनंतर झाले युद्धभुमीवर (तात्या लगेच रस्त्यातच बडवतात)

कौरव तर चुलत भाऊच होते. त्यांचे खपेना तर मग मित्राने बायकोच्या अंगचटीला गेलेले कसे खपले?
ते पांडवांना खपले नाही. दुर्योधनाचे विचार कदाचित वेगळे असतील.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

कवटी's picture

16 Dec 2008 - 7:48 pm | कवटी

तात्या लगेच रस्त्यातच बडवतात
तात्यानी पण साधनसुचीता/परंपरा म्हणून १२ -१३ वर्ष वनवासात जाउन मग त्याला बडवायला हवे होते काय? ( ह. घ्या.)

ते पांडवांना खपले नाही. दुर्योधनाचे विचार कदाचित वेगळे असतील.
अहो हेच तर म्हणतोय मी. त्यावेळचे समाजजीवन या बाबतीत आजच्या सारखेच असणार. फक्त दुर्योधनाचा काही तरी डाव असेल म्हणून तो तसे वागला.

कवटी

http://www.misalpav.com/user/765

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:50 pm | अवलिया

कशाला आमच्या तात्यांना वनवासात पाठवता हो...
अहो आजकाल बहुपत्नीत्व किंवा बहुपतित्व आहे का?
मग समाज वेगळा नाही का?

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:56 pm | विनायक प्रभू

अन ऑफिशियल बाबतीत काहीही फरक नाही आहे.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:58 pm | अवलिया

हो पण आपल्याला ऑफिशियल गोष्टींचीच चर्चा करण्याची ऑफिशियल ऑर्डर आहे.
अनऑफिशियल खव मधे येवु द्या

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:59 pm | विनायक प्रभू

समाज ह्या विषयाला धरुन बोलतो आहे. खव कशाला?

अवलिया's picture

16 Dec 2008 - 8:00 pm | अवलिया

मास्तर
विषय महाभारत आहे.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 8:03 pm | विनायक प्रभू

गेले काही दिवस महाभारत चालले आहे की भुतकाळाचे महाभारत.

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:45 pm | विनायक प्रभू

मला वाटते १४

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:47 pm | अवलिया

१४ वर्षे रामाचा वनवास काल होता
पांडव १२ वर्षे वनवास + १ वर्ष अज्ञातवास असा एकुण १३ वर्षांचा हिशोब.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:53 pm | विनायक प्रभू

अज्ञात वासानंतर लगोलग युद्ध सुरु झाले काय?
सगळा राडा सुरु व्हायला वेळ गेलाच की.
म्हणुन १४

कवटी's picture

16 Dec 2008 - 7:48 pm | कवटी

प्रकाटाआ

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 7:49 pm | विनायक प्रभू

दुर्योधन कधीच बदलत नसतात.

अवलिया's picture

16 Dec 2008 - 7:59 pm | अवलिया

हो. आणि आपण सारेच अर्जुन... कृष्णाच्या प्रतिक्षेत

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 8:01 pm | विनायक प्रभू

मी अर्जुन नाही. तुम्ही ड्रीम सिक्वेन्स मधे तर नाही ना?

अवलिया's picture

16 Dec 2008 - 8:04 pm | अवलिया

नाही.
कौरवांत मी पांडवांत मी
अणुरेणुत भरलो

मी अद्वैतवादी आहे.

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 8:05 pm | विनायक प्रभू

आता आण्खी एक वाद आला का?

JAGOMOHANPYARE's picture

16 Dec 2008 - 8:23 pm | JAGOMOHANPYARE

वाईफला स्वाईप कसं करत असतील, महाभारत काळात?

कसे म्हणजे.... ? कर्ण आणि सगळे पांडव त्याशिवाय का जन्माला आले ? सगळे ' देवांचे'च पुत्र होते की ! ( देवांचे पुत्र या विषयावर मागे कुठे तरी एका काथ्याकूटवर वाद झाला होता... त्याच्याशी याचा 'संबंध' नाही )

:)

विनायक प्रभू's picture

16 Dec 2008 - 9:13 pm | विनायक प्रभू

वेगळ्या प्रकारचे क्रेडीट कार्ड होते तेंव्हा.

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 8:50 am | विसोबा खेचर

विचार करा आपली सुंदर पत्नी आपल्याच मित्राच्या (ज्याच्या सौंदर्याची, देखणेपणाची, विरतेची चर्चा सर्वत्र आहे) अंगावर पडलेली आहे, तिच्या गळ्यातिल माला तुटुन सर्वत्र मोती विखुरले आहेत

वा!

तात्या.

धमाल मुलगा's picture

17 Dec 2008 - 10:36 am | धमाल मुलगा

विचार करा आपली सुंदर पत्नी आपल्याच मित्राच्या (ज्याच्या सौंदर्याची, देखणेपणाची, विरतेची चर्चा सर्वत्र आहे) अंगावर पडलेली आहे, तिच्या गळ्यातिल माला तुटुन सर्वत्र मोती विखुरले आहेत

वा!

=)) =))
कस्सला ज ह ब ह र्‍या प्रतिसाद आहे हो तात्या!!!!

च्यायला, एका...अक्षरशः एकाक्षरी प्रतिसादात सगळ्यांची विकेट काढली!!!!
_/\_

विसोबा खेचर's picture

17 Dec 2008 - 12:59 pm | विसोबा खेचर

कस्सला ज ह ब ह र्‍या प्रतिसाद आहे हो तात्या!!!!
च्यायला, एका...अक्षरशः एकाक्षरी प्रतिसादात सगळ्यांची विकेट काढली!!!!

सिनिऑरिटी काउंट्स! ;)