सिंहगड!

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
12 Dec 2022 - 11:58 pm

"गड आला पण सिंह गेला","आधी लगीन कोंढाण्याच,मग माझ्या रायबाचं"ह्या ऐतिहासिक सिंहगर्जना लहानपणापासून ऐकून स्फुरण चढत.गड किल्ल्यांचा इतिहास केवळ वाचून नाही तर इथल्या पावन भूमीला स्पर्शून अनुभवला पाहिजे हे समजायला जरा उशीर झाला.पण ठीक आहे एक मुलीला इतिहास आवडतो,तर मुलीला हे लहानपणापासून समजलं तर खुप छान बदल घडेल.त्यामुळे जसे जमेल तसे गड दर्शनकरावं असं ठरवलं.सर्वात सोपा सिंहगड आहे , असं ऐकलं.

पुणे दरवाज्यातून चढाई सुरु केली ,तिथेच शरभ चिन्ह आणि तानाजी मालुसरे,नावजी बलकवडे यांनी हा किल्ला शत्रुंकडून जिंकल्याचा उल्लेख आढळला.बलकवडे यांचा उल्लेख पहिल्यांदाच लक्षात आला.पुढे घोड्यांचे टाके,दारू टाके पाहिलं.वन विभागाचे गेस्ट हाऊसचे पुरातन प्रवेशद्वार,त्यावर वाढलेल्या वेली खुपचं आकर्षक वाटल्या.

कन्या पुढे पुढे पळत असल्याने कोंढणेश्वर ,टिळक निवास , अमृतेश्वर पाहायचं राहिलं.तिच्यामागे पळत पळत थेट कलावंतीण बुरुज जे शेवटचं टोक आहे तिथं पोहचलो.आजूबाजूचे डोंगर धुंद कुंद वातावरण आनंद देत होतं :)

परत मागे फिरून कल्याण दरवाजा उतरलो,पाहिला.त्यावर एका बाजूचे हत्तीचे शिल्प मोहक होतं. पुढे तानाजी मालुसरे यांचं स्मारक पाहिलं.इथे बरेच माहिती फलक आहेत.एका शाळेची सहल इथे सहलीला आली होती.लहान लहान मुलं महाराजांच्या गाण्यावर उत्तम नृत्याविष्कार करत होते.

आता पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हा गडावरचं‌ पिठल आणि ज्वारी तांदूळ मिश्रणाची पातळ भाकरी यथेच्छ खाल्ली.छोट्या छोट्या मटक्यातलं ताज दही म्हणजे वाह!! परततांना रेंगाळत रेंगाळत फुलांचे फोटो काढत परत मागे निघालो.खडकवासला तळ्याजवळ चहा घेऊन पहिली दुर्ग भटकंती मनभर रेंगाळली
-भक्ती
E

R
T

w
BkQU" alt="A" />
D

https://youtu.be/GuCjlgJSbjE

प्रवास

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Dec 2022 - 1:05 am | कंजूस

तटबंदीचा फोटो झकास.
पुढचा गड - शिवनेरी?

आमचीपण जाहिरात तुमच्या धाग्यावर, नावजीचा पराक्रम इथे वाचा
https://www.misalpav.com/node/43804

आणि पुढचा इतिहास
https://www.misalpav.com/node/43853

थोडक्यात आटोपलंत. सिंहगडावर पूर्वी अनेकदा गेलोय पण हल्ली सततच्या गर्दीमुळे जायला आवडत नाही. गडावर जिथे तानाजी मालुसरेंचे स्मारक आहे त्याच्याच बाजूला तानाजीचा वीरगळ आहे त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. गडावरील राजाराम महाराजांची समाधी आवर्जून बघण्याजोगी आहे. पाबे घाटातून जाताना सिंहगडाचे एका वेगळयाच कोनातून होणारे दर्शन आकर्षक आहे.

कंकाका,बहुतेक तरी शिवनेरी:)

मनो तुमचा लेख दोन तीनदा आधी वाचलाच होता _/\_

प्रचेतस ,अगदी बरोबर जरा अजून निवांत भटकंती पाहिजे होती.

कंकका,मनो,प्रचेतस तुम्ही मात्तबर अभ्यासू ,पक्के प्रवासी लोक मी आपली आनंद प्रवासी :) दृष्टिकोन आणखिन व्यापक करतेय.

प्रचेतस ही कोणती वीरगळ आहे.
A

प्रचेतस's picture

13 Dec 2022 - 8:18 pm | प्रचेतस

हा वीरगळ नसून स्मृतीशिळा दिसतेय. पेशवेकालीन किंवा त्यांनंतरची असावी असा अंदाज.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2022 - 8:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

फोटोही छान आले आहेत, भटकणे असेच चालु ठेवा. पुण्याहुन वन डे करता येण्यासरखे खुप किल्ले आहेत. स्वतःचे वाहन असल्यास उत्तमच.

स्मिताके's picture

13 Dec 2022 - 11:18 pm | स्मिताके

मस्त भ्रमंती आणि वर्णन.
पहिला फोटो खूप आवडला.

श्वेता२४'s picture

14 Dec 2022 - 11:18 am | श्वेता२४

भटकंती करताना लहान मुले सोबत असली की, त्यांच्या कलाने घ्यावंच लागतं व त्यामुळे नियोजनातही त्यानुसार तडजोडी कराव्या लागतात. छान भटकंती. फोटो अगदी सुंदर आलेत.

Bhakti's picture

14 Dec 2022 - 3:17 pm | Bhakti

राजेंद्रजी, होय पुण्याहून अनेक गड किल्ले पाहणं सोयिस्कर आहे.
स्मिताके मलापण आवडला पहिला फोटो:)
श्वेता ,प्रवासात प्रवासापेक्षा लहान मुलांची सेफ्टी हेच पहिलं प्राधान्य होतं :)

पॉइंट ब्लँक's picture

14 Dec 2022 - 3:25 pm | पॉइंट ब्लँक

वीस एक वर्ष होत आली गडाला भेट देवून. तुमच्या लेखामुळे सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला. पिठल-भाकरी-दही तेव्हाही मिळत होत आणि गड चढुन वर गेल्यावर लागलेली भुक शमवन्यासाठी अजुन चांगली मेजवानी असुच शकत नाही. फोटो मस्तच!

गोरगावलेकर's picture

15 Dec 2022 - 12:10 pm | गोरगावलेकर

सिंहगडला दोनदा जाणे झाले पण तेही घाईतच. आता एकदा निवांतपणे बघायला हवा.

नक्कीच निवांत पहा.खरं‌ म्हणजे सिंहगडावर काय पाहिलं पाहिजे याविषयी जालावर खुप शोधलं पण काहीच विशेष नाही सापडलं.
तिथे गेल्यावर हा नकाशा दिसला.तेव्हा थोडीफार मदत झाली.त्यामुळे आता लक्षात आलाय किल्ले पाहताना काही विशेष ठिकाण पाहताना असे नकाशे मिळवायचे आणि मोहीम फत्ते करायची.
A