पिचकारी

सातारकर's picture
सातारकर in जनातलं, मनातलं
11 Dec 2008 - 3:19 pm

उन मी म्हणत होते. त्यात आमची गाड़ी थंड हवेच्या ठिकाणी सोलापुरात थाम्बली होती. चालक वाहक बदलायचे असल्याने गाड़ी अर्धा तास तरी हलणार नव्हती. उन असले तरीही मी सवयिप्रमाणे चहाच घेउन परत गाडित येउन बसलो.

अजुन सहा तास प्रवास कसा होणार याचा विचार करत आजूबाजुच्या प्रवाशांकडे पाहत होतो. म्हणजे कोणी चांगले सह्प्रवासी आहेत का ते पाहत होतो. पण असे कोणीही प्रवासी गाडित नव्हते. बाहेर स्थानकावरतिही नव्हते. आमचे नशिबच ख़राब दुसरे काय?

गाडिमधे उजव्या बाजुच्या रांगेत सगळ्यात पुढे एक म्हातारबाबा ऐस्पैस बसले होते. त्यांनी एकटयानीच तीन सीट्चे बाकडे अडवले होते. त्यांच्यामागे दोन लेकुरवाळया स्त्रिया बसल्या होत्या आणि त्यांच्या लेकरान्नी ती s.t. म्हणजे बागच आहे असे समजून झक्कास पैकी धिन्गाणा चालवला होता. डाव्या बाजूला पुढून तिसय्रा चौथ्या बाकावर एक भक्कम काकू किंवा आज्जी बसल्या होत्या. त्यांचा फलाहार चालला होता. बाकि गाड़ी सगळी रिकामिच होती. आणि ती कमी ती लेकर भरून काढत होती.

स्थानकामधे मात्र गाड्यांची गर्दी बरीच होती. आमची गाड़ी सग्ळयात उजविकड़च्या फलाटावर लागली होती. आमच्या शेजारची आधीची गाड़ी जाऊन दूसरी आली. ही नविन आलेली गाड़ी त्या चालकाने व्यवस्थित लावल्याने त्या गाडीचे शेवटचे बाक हे आमच्या गाडिच्या काकू बसल्या होत्या त्या बाकाशेजारी आले. आमची गाड़ी नीट लावली नसल्याने त्या गाडित आणि आमच्या गाडित फ़क्त वितभर अंतर होते.

हे इतके सगळे रामायण सांगयाचे कारण इथे पुढे सांगितलेल्या घटनेत स्थान महाताम्य फार आहे. आता आपल्याकडे कोणालाही पान-तम्बाखू खाणार्याला कशी मोकळ चाकळ थुन्कून रंगपंचमी साजरी करायची सवय असते. आपल्याकडे एकुणच सगळया गोष्टींचे स्वातंत्र्य आहे. रस्त्यावर, भिन्तिन्वर अशी सगळीकडची रंगपंचमी पाहून त्याचा प्रत्यय सतत येतच असतो. त्यातून s.t. (एकुणच सार्वजनिक वहातुक व्यवस्था) म्हणजे तर हक्काची जागा. कधीही खिडकितून तोंड बाहेर काढून आपण मन मोकळ करून घेतो. किंवा अगदीच जवळ मन-मोकळ करायचे असल तर बसलोय तिथेच थोड़ वाकून ह्म्म्म!!!. आता आजुबाजुला कोणी लोक असतील तर तो काही आपला प्रश्न नसतो.

आत्तापर्यंत आमच्या गाडिची आणि शेजारच्या गाडिची भौगोलिक स्थिति तुमच्या लक्षात आलीच असल. झालं अस की त्या शेजारच्या गडितल्या एका गृहस्थाला असेच मन मोकळ करायची इच्छा झाली. तो आपला बोलत बोलत पुढच्या बाकावारून उठून त्या गाडिच्या मागच्या बाकावारती आला. तो ज्या कोणाशी बोलत होता त्याच्याच्कडे पाहत बाकावारुन खिडकिकडे सरकला आणि त्याने त्या खिडकितून डोके बाहेर काढून एक झकास पिंक टाकली.

ती पिंक एकदम अचुकरित्या आमच्या गाडित पुढे ज्या भक्कम काकू बसल्या होत्या त्यांच्या अन्गावारती आणि त्या जे काही खात होत्या त्यावरती विसावली. महाराजांच्या लक्षात त्यांची चुक आली तेंव्हा बराच उशीर झाला होता.

त्या काकुन्नी तोपर्यंत साहेबांची गचंडी धरली होती. बर धरली ती धरली ती पण अशी की त्या साहेबांचे तोंड दोन्ही s.t. च्या मधेच अडकले होते, ते मागेदेखिल घेता येइना.
काकुनी पट्टा सुरु केला, भाड्या, आन्धळा हैस का डोळं फुटल? बाईमाणुस बसलेल दिसना व्हय? (म्हणजे बहुधा पुरुषांच्या अंगावर थुन्कला असता तरी चालले असते ). जरा भाईर बघाव बिघाव का न्हाई. सगळी कापड ख़राब केली मेल्याने....
पुढचे पाच एक मिनिट त्या अश्याच कचा कचा चावत होत्या. अजूनही त्यांनी मानगुट सोडली नव्हती. आता पुढच्या बाकावरचे म्हातारबाबाही आणि त्या लेकुरवाळया बयाकाही सामिल झाल्या. आर लेका बघायचे जरा हिकड तिकड का आपल पांन्डूरंगाने तोंड दिल म्हनून कसबी वापरायचे व्हय?

हे थुन्कणारे लोक देखील मजेशीर असतात. ते कधी एक पिचाकारित सगळे सम्पवित नाहीत. दोन वेळा तीन वेळा थुन्कल्यावर मगच त्यांचे समाधान होते. आमच्या शेजारच्या गडितल्या माणसाने देखील असेच केले होते. त्यामुळ काकुनी गचंडी धरली असली तरी त्याच्या तोंडात अर्धी पिंक शिल्लक होती. त्याला ती थुन्कता येइना आणि काकुंची माफ़ी देखील मागता येइना. तो नुसताच तोंडाने ह्म्म्म ह्म्म्म असा आवाज काढत होता.

पण त्यामुळ काकुंच्या संतापाची परिसीमा झाली आणि त्यानी त्याच्या श्रीमुखात एक ठेउन दिली. तशी त्याच्या तोंडातली उरलेली अर्धी पिंक बाहेर आली आणि ह्यावेळेस तर ती थेट काकुंच्या तोंडावर... काकुंच्या संतापाचा कडेलोट झाला. त्या माणसाला त्या खिडकितुनच बाहेर ओढू लागल्या. तो माणूस गयावाया करू लागला. पण इकडे त्या लेकुरवाळया बायकान्नी मधे तोंड घातले. अच्छा रखके दो उसको. मैं तो केहती हूँ उसको पुलिस्मेंच लेके चलो.

ह्या सगळया गोंधळात जवळ पास पंधरा विस मिनिट गेले.
तेवढ्यात नविन चालक वाहक आले. घटनास्थळावरती आल्यावर परिस्थितिचा अंदाज यायला त्या दोघांनी पुन्हा पाच मिनिट खाल्ले.
मग वहाकानी मध्यस्थी केली. जाउद्याहो बाई, दिसले नसल त्याला.
त्यावर काकुन्नी प्रतिप्रश्ना केला तुज्या तोंडावर थुन्कला असता म्हंजी? वहाकाचे तोंड काकुन्नी बंद केले.
पण त्याला बिचार्याला गाड़ी पुढे न्ह्यायाची होती. तो पुन्हा म्हणाला, अहो बाई तुम्हाला घरी पोचायाचे न्हाई का? अक्खी गाड़ी तुमच्यासाठी अर्धा तास थाम्बिवली. ही मात्रा लागु पडली, कारण काकुन्ना त्या कोंच्यातरी मयताला चालल्याचे आठवले. मला मयताला जायाच हायर, न्हैतर तुजीच किर्डी बसविली अस्ति. असे म्हणुन त्यांनी त्याची कॉलर सोडली आणि वहाकानी डबल मारली.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Dec 2008 - 5:01 pm | घाशीराम कोतवाल १.२

मुंबईच्या लोकल मधे हे रोज होते राव लोक चालु लोकल मधुन पचापच थुकतात
आनि मग नामा निराळे राहतात
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...