नथुराम गोडसे आणि गांधी यांचा फोटो. खरा कि खोटा..?

हा फोटो एकाने मला मेल केला होता.

लेखनविषय:: 
लेखनप्रकार: 

प्रतिक्रिया

नथुरामचे कपडे पहा...
बाकीचे लोकं जणू काही पुढे काय होणार हे पहायला पोज देऊन उभे आहेत
गांधीजींच्या दोन्ही बाजूस दोन सहकारी मुली होत्या त्या पण दिसत नाहीत
मुख्य म्हणजे नथुरामच तो चेहरा वाटत नाही.

किती प्रामाणिक उत्तर देताय. कपडे पहा आणि केस पहा.

फोटुतला नथुराम हा असा दिसतो - हॉलिवूड हिरोसारखा.

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

हा फोटो मी पहिल्यानदाच पहातो आहे.
आता खरा कि खोटा ? माहित नाही, पण जबरद्स्त....

कोपर्‍यात फक्त रीकन्स्ट्रक्शन असे लिहिले की झाले...
बाकी इतक्या जुन्या काळातसुद्धा आजच्यासारखी सनसनाटी पत्रकारिता होती हे पाहून अंमळ बरे वाटले...

आयबी एन सेव्हन / क्राईम डायरी ष्टाईल... किंवा इंडिया टीव्हीवर काल दाखवत होते आतंकीका बयान.... आणि कोपर्‍यात रीकन्स्ट्रक्शन तेही इन्ग्रजीत..म्हणजे फक्त हिंदी समजणार्‍यांना तेही कळायला नको...

_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरील चित्रातील पिस्तुलधारी व्यक्ती ही श्री.नथुराम गोडसे असतील ह्याची शक्यता कमी वाटते आहे.
विकिपिडियावरील गांधीवधाच्या आरोपात असलेल्या आरोपींच्या फोटोमध्ये श्री. तात्याराव सावरकरांच्या शेजारी बसलेले गोडसे आणि वरील फोटोतील व्यक्ती ह्यांच्यात फारसं साम्य दिसत नाही.
तसेच, इतर फोटोही गुगलुन पाहिले..साम्य फारसं दिसतं नाही.

*त्याकाळीदेखील पत्रकारिता-मिडिया असेच बायस्ड असलेले पाहुन अंमळ आश्चर्य वाटले...

ही मेल याआधीच येवुन गेली होती.
तेव्हाच मनात वाटल की हा फोटु खरा नसावाच.
कारण चित्रपटात दाखवतात तस अगदि पोज वै?
धमाल ने दिलेल्या लिन्क वर जावुन पाहिल की लगेच लक्षात येत.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

कारण.
१) चित्रातील तरुणाचा चेहरा पाहता तो भारतीय वाटत नाही.
अ) नथूराम गोडसेंच्या चेहर्‍याशी या तरुणाचा चेहरा अजिबातच जुळत नाही.

२) त्याच्या समोर बाप्पू पाठीत वाकून उभे आहेत, आणि त्या तरुणाच्या नजरेचा रोख मात्र वर सरळ रेषेत दिसतोय.(बाप्पूकडे बघतच नाहीये तो.)

अधिक माहितीकरिता मोबाईलवर ladh bappu असे लिहून ५४३२१ ला समस करा. थ्यांक्यू!
-इनंजय
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

हा फोटो... ढळढळीत खोटा आहे.....

कारण... गांधीजींवर गोळ्या झाडण्याच्या आधी ,म्हणजे...३० जानेवारी १९४८ च्या आधी ६ महिन्यांपासुन.... "नथुराम गोडसे" ने दाढी वाढवलेली होती.....

त्याला पकडल्यानंतरही... बर्‍याच लोकांना तो "मुस्लिम" वाटला होता....
पण काकासाहेब गाडगीळांनी "अरे नथुराम तू?!?" असे उद्गार काढल्यानंतर सर्वांना उलगडा झाला.

आणि नथुराम'ची उन्ची फोटोत दाखवलेल्या उन्चीपेक्षा साधरणतः ३-४ इन्च कमीच होती....

खोटे छायाचित्र प्रदर्शित करुन.... महापुरुषांन्ची विटम्बना करणार्‍याला कठोर शिक्षा व्हावी... ही माफक अपेक्षा.....

जय हिन्द!!!...जय शिवराय!!!

त्याला पकडल्यानंतरही... बर्‍याच लोकांना तो "मुस्लिम" वाटला होता....पण काकासाहेब गाडगीळांनी "अरे नथुराम तू?!?" असे उद्गार काढल्यानंतर सर्वांना उलगडा झाला.

मला देखील ही कथा माहीत आहे. पण ही अशीच एक अफवा आहे असे वाटते. कधी स्पष्टपणे कुठेही वाचलेले नाही.

"गांधीहत्या आणि मी" का "पंच्चावन्न कोटींचे बळी" या पैकी एका पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आणि रीचर्ड ऍटनबरोने (संशोधना अंती ) काढलेल्या "गांधी चित्रपटातपण नथुरामने दाढी वाढवलेली नव्हती अथवा वेष वगैरे काही बदलला नव्हता. नथुरामचे विचार/कृतीचे कोणी समर्थन करो अथवा विरोध (माझा विरोधच आहे), पण तो एकीकडे अभ्यासू आणि दुसरीकडे माथेफिरू होता ही वस्तुस्थिती सर्वमान्य होण्यासारखी होती आणि आहे. बाकी या घटनेचे वर्णन मला स्वतःला योग्य वाटत नसल्याने तसेच विषयाला एकंदरीत अवांतर होऊ शकेल म्हणून येथे देण्याचे टाळतो.

ह्या फोटोत मागे उभ्या अस्लेल्या एक बाई लता मन्गेश्कर सारख्या दिसत आहेत असे मला वाट्ते. :>

चुक भुल द्यावी घ्यावी.

तो फोटो एक भारी .. त्यात लता मन्गेश्कर =))
वा!

मी लगेच आजूबाजूला शंकर जयकिशन, मदनमोहन वगैरे दिसतात का ते पाहिले... =))
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मी लगेच आजूबाजूला शंकर जयकिशन, मदनमोहन वगैरे दिसतात का ते पाहिले... =))
मी पण शोधले. मला लता मंगेशकरांच्या बाजुला शुभा खोटे सापडल्या... तसेच कोट घातलेला आशिष विद्यार्थी पण सापडला.
नथुराम मला जरा हॅरिसन फोर्ड सारखा वाटतोय....

कवटी

एकदम पर्फेक्ट ! लता मदनमोहन :P वगैरे जाउदेत... पण तो माणूस थेट हॅरिसन फोर्ड सारखा दिसतोय आणि फ्युजिटिव्ह मध्ये जो अखंड तणाव त्याच्या चेहर्‍यावर आहे टॉमी पासून पळण्याचा आणि मूळ खूनी शोधण्याचा .. अगदी तस्सा चेहरा आहे !
काय पण फोटो !

नथुराम मला जरा हॅरिसन फोर्ड सारखा वाटतोय....

खरेच की, "इंडियाना जोन्स मीट्स महात्मा गांधी" ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचे हे छायाचित्र असावे. मला आठवते त्या प्रमाणे ती हातातील बंदूक इंडी गांधीजींच्या पायाशी ठेवून अहींसेचा वसा घेतो. :-)

हे जर खरे छायाचित्र असते तर इतके दिवस आपल्यापासून आणि जगापासून लपून राहिले नसते.

तद्द्न्न खोटे !

अरे हे नथुराम गोडसे नाही तर शाहिद कपूर आहे !
आणि हे गांधीजी नसून दिलिप प्रभावळकर आहेत!
मुन्नाभाईच्या चित्रिकरणाच्या वेळेस शाहीद कपूर तिथे आला होता म्हणे त्यावेळी या दोघांनी एक पोझ दिली.

मारायची थाप च्या मायला! कुणाला कळणार आहे! :D
आम्ही येथे पडीक असतो!

गिरगाव चौपाटीवर दादीशेठ रोडच्या नोबेल टेलरचे मालक कोणी जब्बार खान खरंच आहेत का याची माहिती काढा...
घनश्याम भडेकर कोणत्या वृत्तपत्रासाठी १९८५ साली पत्रकारिता करत होते ते शोधा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

फेक फेक फेक.........

बिपिन कार्यकर्ते

ह्या फोटोवर तारीख का नाहीये?? आणि गांधींना मारण्या अगोदर ते काय नथुरामना गीता समजावून सांगत आहेत का? काहीही.कॉम...

त्याला पकडल्यानंतरही... बर्‍याच लोकांना तो "मुस्लिम" वाटला होता....
पण काकासाहेब गाडगीळांनी "अरे नथुराम तू?!?" असे उद्गार काढल्यानंतर सर्वांना उलगडा झाला. >>>>>

मॄगनयनी,

ही खोटी कथा आहे. नथूराम ने तिथेच थांबून आपले खरे नाव सांग सांगीतले. एवढेच नाही तर त्याचा दुसर्‍याच दिवशी ३१ जानेवारीच्या युरोप मधील पेपरात हिंदू नथूराम ने गांधीचा खून केला ह्या बातम्या आहेत. मग ह्या बातम्या कश्या आल्या? हवे असल्यास आर्काईव्ह शोधून इथे लिंक देतो.
त्याने दाढीही वाढविली न्हवती व सुंताही केली न्हव्ती. त्या कथेत पुढे हिंदू मुस्लीम दंगे व्हावेत म्हणून नथुराम ने सुंता केली होती असेही सांगीतले जाते.

नथुराम बद्दल सत्यकथा कमी आणी घोळच जास्त आहेत.

धमाल मुलगा ---
>
तुम्ही वापरलेला वध हा शब्द योग्य नाही असे माझे मत आहे.
महात्म्याच्या हत्येला वध म्हणणे हा महात्म्याचा अपमान होईल.
कृपया योग्य शब्द वापरा.

विश्वजय काका,
आपण 'धमाल मुलगा' यांच्या प्रतिसादाबद्दल लिहित होतात तर त्यांच्या प्रतिसादाला 'उत्तर द्या' ही कृती केली असतीत तर बरं झालं असतं; नाही म्हणजे एवढं स्क्रोल करून बोटं दमली माझी!

विश्वजय काका बहुधा मायबोलीवरून ट्रान्सफर झाले असतील. तिकडे प्रतिसाद लिनियर असतात त्यामुळे असेच लिहावे लागतात. बाकी मनोगत, उपक्रम आणि मिपावर विशिष्ट प्रतिसादाला प्रतिसाद असे देता येतात.

(मायबोलीवरून ट्रान्सफर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तुम्ही "मी नथूराम गोडसे बोलतोय" नाटक पहा. मग तुम्हाला कळेल "वध" हा शब्द काय वापरलाय तो!
आम्ही येथे पडीक असतो!

श्री.विश्वजय,

योग्य शब्दप्रयोग वापरा
ह्या आपल्या मताचा पुर्ण आदर करुन एक खुलासा करु इच्छीतो.

>>तुम्ही वापरलेला वध हा शब्द योग्य नाही असे माझे मत आहे.
माझे मत हत्या हा शब्द योग्य नाही असे आहे. आणि 'we agree to disagree' काय म्हणता? :)

श्री. रम्या म्हणतात त्याप्रमाणे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे एकदा पहाच. मी वापरलेल्या संबोधनाचा अर्थबोध होईल.

माझे मत हत्या हा शब्द योग्य नाही असे आहे.
असेच म्हणतो.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

हेच म्हणते.

"मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकातल्या गोष्टी विश्वसनीय नाहीत [किंवा दुसर्‍या शब्दांत "नाटकात लिहिलेलं काय खरं मानायचं का?"] असे येथील एका हिंदुत्ववाद्यांनी आग्रहाने एन्फोर्स केले आहे. त्यामुळे त्या नाटकावर विसंबून मत बनवण्याचा सल्ला कोणी कोणाला देऊ नये.

"मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकातल्या गोष्टी विश्वसनीय नाहीत [किंवा दुसर्‍या शब्दांत "नाटकात लिहिलेलं काय खरं मानायचं का?"] असे येथील एका हिंदुत्ववाद्यांनी आग्रहाने एन्फोर्स केले आहे.

एन्फोर्स केले गेले ते हिंदूत्ववादी म्हणून का संदर्भ नाही म्हणून अर्थात असत्य विधान म्हणून? येथील गांधीवादी (सभासद आयडी नाही तर तत्वतः) त्या विरुद्ध सिद्ध करू शकले का? नसल्यास का नाही?

ज्यांनी 'आग्रहानं एन्फोर्स' केलं ते सभ्य म्हणून नुसत्या एन्फोर्सवर सुटले लोक...आमच्यासारखा असता तर 'खुंदल खुंदल के' सांगितलं असतं.

तरीही प्रेमळ सल्ल्याबद्दल मंडळ कच्चकन आभारी आहे जनाब थत्तेचच्चा. :)
येतो मग...खुदा हापिस.

तीनदा झाल्याने काढून टाकला

तीनदा झाल्याने काढून टाकला.

भूतकाळातील महान विभूतींनी (कदाचित ?) ज्या काही चुका केल्या असतील, त्यावर भारतीय जनतेला त्यांच्यावर दगड भिरावून मारण्याचा हक्क आहेच, पण हाती दगड उचलण्याअगोदर त्या विभूतींनी आपले सर्वस्व पणाला लावून जनहितासाठी जे कार्य केले त्याच्या निदान एक शतांश पटीने जनहित साधावे, मग काय तो दगड उचलावा.

एक प्रश्न : भले हि कोणी भूतकाळात हजारो चुका केल्या असतील, पण मग आज आपण आहोत कशाला ? नव्या चुका करायला कि, त्या झालेल्या चुका सुधारावायला ?