शशक २०२२ - निकाल

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
1 Jun 2022 - 7:10 am

मिपा शशक २०२२ स्पर्धेला दिलेल्या अभुतपूर्व प्रतिसादा बद्दल सर्व स्पर्धकांचे व त्यांना भरभरुन मते देणार्‍या मिपा सदस्यांचे मनापासून आभार.

या स्पर्धे विषयी काही महत्वाची आकडेवारी खालील प्रमाणे

table, th, td {
border: 1px solid black;
border-collapse: collapse;
}
th, td {
text-align: left;
padding: 8px;
}

tr:nth-child(even) {
background-color: #D6EEEE;
}

एकूण कथा64
एकूण लेखक46
एकूण मते680
एकूण मतदार97
प्रतिसादांची संख्या1041

या स्पर्धे मुळे विविध विषयांवरच्या अनेक चांगल्या कथा वाचता आल्या, बर्‍याच जणांनी अनेक दिवसांनी लेखणी हाती धरुन आपल्या प्रतिभेला वाट मोकळी करुन दिली. या सर्व लेखकांना लिहिते रहाण्याची विनंती. या स्पर्धेत काही नवोदीत लेखकही आपल्या भेटीला आले, त्यांचेही स्वागत.

अंतिम निकाल असा आहे :-

table, th, td {
border: 1px solid black;
border-collapse: collapse;
}
th, td {
text-align: centre;
padding: 8px;
}
tr:nth-child(even) {
background-color: #D6EEEE;
}

कथेचे नावलेखक&एकूण मते
शशक'२०२२ - बापकाड्यासारू आगलावे&39
श श क २०२२ -डिलीवरीहर्षल वैद्य&33
शशक'२०२२ - टेलिपॅथीकर्नलतपस्वी&30
शशक'२०२२ - वेदनाबिपीन सुरेश सांगळे&29
शशक'२०२२ - योगायोगसुरसंगम&24
शशक'२०२२ - फरियादसिरुसेरि&24

मत मोजणी करताना असे आढळुन आले की दोन तीन कथांना एकाच वाचकाने चुकून दोन वेळा मतदान केलेले होते. मते मोजताना या वाचकांचे दुसरे मत हे बाद ठरवण्यात आले आहे.

स्पर्धेत आलेल्या कथा आणि त्यांचे लेखक यांची यादी खालील प्रमाणे.

table, th, td {
border: 1px solid black;
border-collapse: collapse;
}
th, td {
text-align: centre;
padding: 8px;
}
tr:nth-child(even) {
background-color: #D6EEEE;
}

कथेचे नावलेखकाचे नाव
नथिंग न्यू अंडर द सनविश्वनिर्माता
नियंताविश्वनिर्माता
स्क्रीनटाईमअनन्त्_यात्री
कौतुकब़जरबट्टू
विमनस्कसरीवर सरी
व्यसनअमरेंद्र बाहुबली
तुटलेले दोरसिरुसेरि
मोबदलासरिता बांदेकर
ठीकायपाटिल
फरियादसिरुसेरि
योगायोगसुरसंगम
सूचितचैतन्य रासकर
बुडबुडापाटिल
तेच तेच पुन्हा पुन्हाभागो
चोरीआजी
मलमअमरेंद्र बाहुबली
उल्काज्ञानोबाचे पैजार
रँगोज्ञानोबाचे पैजार
चल रे भोपळ्या टुणूक टुणूकभागो
कलियुगात कॉनमॅनकॉमी
आईचा मारचांदणे संदीप
संपत्तीकुमार१
कळब़जरबट्टू
जॉन डोप्रचेतस
धडपडतर्कवादी
डिलीवरीहर्षल वैद्य
नवा काळ..काड्यासारू आगलावे
बापकाड्यासारू आगलावे
हाऊ डिड यू डाय?चैतन्य रासकर
पेचआंबट गोड
समाजप्रबोधनात अंधश्रद्धासविता००१
टेलिपॅथीकर्नलतपस्वी
सेन्सेशन....कपिलमुनी
पूर्णब्रह्मकानडाऊ योगेशु
सामनाकासव
...कॉमी
Attentionजव्हेरगंज
वेड?चष्मेबद्दूर
सोन्याच्या बांगड्याकर्नलतपस्वी
आम्हीही महाराजांचेच!उत्खनक
गारवानिओ
अफेअरश्रीगुरुजी
लक्षवेधमोहन
वेदनाबिपीन सुरेश सांगळे
चॅरिटीतुर्रमखान
वियोगआंबट गोड
फ्रॉम डस्क टिल डॉनमार्कस ऑरेलियस
आई होतानासरीवर सरी
बक्षीसनीळा
अनोळखी मदतप्रमोद देर्देकर
आभासस्मिताके
टेडी बेअरशब्दानुज
पढाईप्रमोद देर्देकर
सत्य आणि ज्ञानबिपीन सुरेश सांगळे
विश्वासDoga
मी का तु?नीळा
ब्रेकअपचहाबाज
हिस्सायोगी९००
बदलाVRINDA MOGHE
खानावळशब्दसखी
मु. पो. वाटंब्रेस्वधर्म
एका (संभाव्य) विजेत्याची रोजनिशीतर्कवादी
हाय काय, नाय कायमनस्विता
आंबाशब्दानुज

लवकरच नव्या उपक्रमासह पुन्हा एकदा भेटू, तो वर आपला मिपावरचा लोभ राहो ही विनंती.

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

1 Jun 2022 - 7:18 am | कुमार१

विजेत्यांचे कौतुक !
स्पर्धकांचे अभिनंदन !
संयोजकांचे मनापासून आभार !

जेम्स वांड's picture

1 Jun 2022 - 7:22 am | जेम्स वांड

आणि संपादक मंडळाला आभार शशक स्पर्धा आयोजित केल्याबद्दल.

Bhakti's picture

1 Jun 2022 - 7:55 am | Bhakti

वा वा !
विजेते, सहभागी,आयोजक,मतदाते सर्वांचे अभिनंदन!

भागो's picture

1 Jun 2022 - 5:49 pm | भागो

+१

प्रचेतस's picture

1 Jun 2022 - 8:06 am | प्रचेतस

विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी सदस्यांचे कौतुक.
स्पर्धेच्या दर्जावर, लेखनावर टीका केली गेली त्यात मीही आलोच पण मूळात शंभर शब्दांच्या आकृतिबंधात कथा बसवणे अत्यंत अवघड. मात्र स्पर्धकांनी हे आव्हान पेलले, सदस्य भरभरून लिहिते झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्तम कथांचा आस्वाद वाचकांना घेता आला.

कथेतील शब्द मोजणे, कथा वेळोवेळी प्रकाशित करत राहणे, इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या कथांचे प्रतिसाद अचूक मोजून वेळेवर निकाल प्रकाशित करणे हे मोठ्या कष्टाचे काम. साहित्य संपादकांनी हे काम मोठ्या चिकाटीने तडीस नेऊन स्पर्धा यशस्वी करून दाखवली याबद्दल त्यांचेही खास आभार.

खरेतर कोणाला एखादी गोष्ट सांगणे हे मोठ्या जिकीरीचे काम आहे आणि त्यात ती गोष्ट शंभरच शब्दात बसवणे हे त्या पेक्षा मोठे आव्हान आहे. असे खडतर आव्हान तब्बल ४६ जणांनी यशस्वी पणे पेलले त्या बद्द्ल त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आता लेखणी खाली ठेवु नका.

याच बरोबर प्रत्येक कथेला १०.६२ च्या सरासरीने तब्बल ६८० मते देणार्‍या त्या ९७ मतदारांचेही अभिनंदन. हे मतदार नुसते मतदान करुन थांबले नाहित तर ती कथा त्यांना का आवडली किंवा का नाही आवडली हे त्यांनी मोकळेपणाने प्रतिसादात नमुद केले असे तब्बल ३६१ मतदानेतर प्रतिसाद या सर्व धाग्यांवर त्यांनी दिले. त्यांच्या या सूचना सर्व लेखकांना पुढील लेखनाकरता नक्कीच मोलाच्या ठरणार आहेत.

पण तरी सुध्दा मतदारांचा ९७ हा आकडा मिपाच्या वाचक संख्येच्या मानाने फारच कमी वाटतो. याचाच अर्थ काही वाचकांनी आपला हात अखडता घेतला. या निद्रिस्त मिपाकरांना विनंती की पुढील उपक्रमात त्यांनी आवर्जून भाग घ्यावा व लेखकांना प्रोत्साहित करावे.

आणि अर्थातच सासंचेही मनःपूर्वक अभिनंदन

पैजारबुवा,

विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार !

प्रमोद देर्देकर's picture

1 Jun 2022 - 8:47 am | प्रमोद देर्देकर

विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार

श्वेता व्यास's picture

1 Jun 2022 - 10:26 am | श्वेता व्यास

शशक मेजवानीबद्दल लेखकांचे आणि संपादक मंडळाचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन!

वामन देशमुख's picture

1 Jun 2022 - 10:59 am | वामन देशमुख

स्पर्धकांचे अभिनंदन.
विजेत्यांचे कौतुक.
संयोजकांचे आभार.

बिपीन सुरेश सांगळे's picture

1 Jun 2022 - 11:22 am | बिपीन सुरेश सांगळे

मिपा
संचालक
संपादक
लेखक
वाचक
मतदार

साऱ्यांचेच खूप आभार

स्वधर्म's picture

1 Jun 2022 - 11:30 am | स्वधर्म

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व साहित्य संपादकांचे मनापासून आभार. सोपे काम नव्हते हे सगळे आयोजित करणे. मिपाबद्दल खूप छान वाटले.

सरिता बांदेकर's picture

1 Jun 2022 - 12:14 pm | सरिता बांदेकर

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकांचे आभार.

प्रसाद_१९८२'s picture

1 Jun 2022 - 12:55 pm | प्रसाद_१९८२

सर्व विजेत्यांचे व या स्पर्धेत कथा लिहिणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन व हि स्पर्धा यशस्वी करण्याकरता मोलाचे सहकार्य देणार्‍या साहित्य संपादकांचे देखील अभिनंदन.

काड्यासारू आगलावे's picture

1 Jun 2022 - 12:57 pm | काड्यासारू आगलावे

पहीला आल्याबद्दल माझे अभिनंदन, :) तसेच दुसरा व तिसरा आल्या बद्दल हर्षल वैद्य नि कर्नल तपस्विंचेही . स्पर्धा आयोजात केल्याबद्दल मिपा साहीत्य संपादकांचे ही अभिनंदन. सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.

बाप ह्या कथेविषयी:-
खरं तर ही आमची घरातीलच कथा. मी पुण्यात नोकरील असतो लहान भाऊ गावी. ही कथा जन्मली त्याच्या सुपीक डोक्यातून. आमचे शेत वगैरे काही नाही. सुरूवातीला मी कथा लिहून त्याला दाखवली पण त्याला ती आवडली नाही. गावाकडच्या मूलाचं लाखाचं नूकसान हवंच असं त्याचं म्हणणं. मग कथानक दोन वेळा बदलवून त्याच्या कडून तपासून घेतलं, त्याला पुर्ण आवडली नी मग त्याने प्रकाशीत करायला परवानगी दिली.
मला ही कथा ईतकी आवडली नव्हती. पहीली येईल हे तर आजिबातच वाटलं नव्हतं. त्यापेक्षी “नवाकाळ“ ही कथा जास्त प्रसिध्द होईल असं वाटलेलं. नवाकाळ ने सुरूवातीला आघाडी ऊघडलेली पण ससा कासवाच्या कथेतील सस्या सारखी मध्येच झोपली. अनेकांना बाप ही कथा भावली. पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे. नवाकाळ प्रसिध्द केली नसती तर शहरातील मुलाची बाजूही लिहीनार होतो.

स्मिताके's picture

1 Jun 2022 - 8:28 pm | स्मिताके

स्पर्धा संपली असली तरी शहरातील मुलाची बाजू सांगणारी कथा जरुर लिहा. वाचायला आवडेल.

नि३सोलपुरकर's picture

1 Jun 2022 - 1:26 pm | नि३सोलपुरकर

विजेत्यांचे अभिनंदन.

गामा पैलवान's picture

1 Jun 2022 - 1:29 pm | गामा पैलवान

विजेत्यांचे व सहभागींचे अभिनंदन. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादकांचे आभार.
-गा.पै.

कर्नलतपस्वी's picture

1 Jun 2022 - 1:59 pm | कर्नलतपस्वी

सर्व प्रथम साहित्य संपादकांचे मनःपूर्वक धन्यवाद. ही स्पर्धा माझ्यासाठी नवीन व आगळा वेगळा अनुभव आहे.

सर्व प्रतीसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार. वाचकांचे प्रतीसाद मग ते प्रशंसनीय किवा टिका, दोन्ही मनोबल वाढवतात.
माझ्या सारखा आयुष्यभर हिन्दीभाषीकात रहाणारा जेंव्हा मायभाषेत लिहीतो तेव्हां भाषा आणी शुद्धलेखन याबद्दल चुका होणारच. मिपाकरांनी सांभाळून घेतले प्रोत्साहन दिले. स्पर्धेत मिळालेल्या यामधे त्यांचा मोठा वाटा आहे.

उपायोजक,मुवी,तुषार,सचिन डाॅक्टर बिरूटे,प्रचेतस, भक्ती,चौको ,पैजारबुवा आणी विजुभाऊ यांचे विषेश आभार.

मला संपत्ती,नवाकाळ,डिलेव्हरी,बाप या कथा खुपच आवडल्या. बाकी सुद्धा छानच आहेत.

"सोन्याच्या बांगड्या", ही कथा एक नुकत्याच एम बी बी एस झालेल्या मित्राच्या अनुभवावर आधारीत आहे. त्याचे आगदी जवळचे नातेवाईक महामारीने गेल्यावर सुद्धा मनोधैर्य कायम होते. माणुसकीचा दुसरा चेहरा आजींच्या नातेवाईकाचा. आजीला माहीत होते सगळे आसुन सुद्धा माझे शेवटचे क्रियाकर्म करणारे कुणी नाही म्हणून त्या नवोदित डाॅ ला विनंती करतात व खर्चासाठी आपल्या सोन्याच्या बांगड्या काढून देतात. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक बांगड्या मागण्यासाठी येतात. निस्वार्थी पणे डाॅक्टर त्या परत करतात.ही
कथा मी त्या मित्रा करता लिहीली पण वाचकांपर्यंत पोहचवू शकलो नाही ही माझ्यातली कमी.

"टेलीपॅथी", सुद्धा माझ्या सैन्यातील अनुभवावरून लिहीलंय. फार कठीण काम होते ते.

सर्व मिपाकरांचे पुन्हा एकदा आभार .
क लो आ

यश राज's picture

1 Jun 2022 - 3:37 pm | यश राज

विजेत्यांचे अभिनंदन
सहभागी कथा लेखकांचे सुद्धा आभार व अभिनंदन

विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार

स्मिताके's picture

1 Jun 2022 - 8:30 pm | स्मिताके

विजेत्यांचे अभिनंदन आणि सा. सं. मं. चे आभार. आणखी उपक्रम लवकर येवोत!

तुषार काळभोर's picture

1 Jun 2022 - 10:04 pm | तुषार काळभोर

आणि आयोजक, लेखक, मतदार, वाचक यांचे आभार!!
मराठी आंतरजालावर शतशब्दकथा या प्रकाराची ओळख करून देणाऱ्या आणि ती रुजवणाऱ्या आतिवास ताईंनादेखील मनःपूर्वक धन्यवाद.
रंजक पद्धतीने कथा सांगणे हे एक कौशल्यच आहे. त्यात ती शंभर शब्दात बसवणे कठीण. पण इतक्या होतकरू लेखकांनी इतका मनापासून प्रयत्न केला की मागील तीन आठवडे रोज कथा वाचायची सवयच लागली होती.

अजून अशाच रोचक उपक्रमांच्या प्रतीक्षेत ....

सौन्दर्य's picture

1 Jun 2022 - 10:59 pm | सौन्दर्य

सर्वांचे अभिनंदन ह्यात सर्व काही आले. खूप कथा अत्यंत छान होत्या त्यावरून मिपाच्या दर्जाची कल्पना येते. मागील एखाद दोन स्पर्धात भाग घेतला होता, त्यावेळी देखील इतर कथांचा दर्जा पाहता आपल्याला अजून चांगले लिहायची आवश्यकता आहे ही जाणीव झाली होती.

ह्यावेळी मनात शशकची काही रोपटी रुजली होती, पण मलाच ती न आवडल्यामुळे उपटून टाकली.

युद्धाच्या वेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार.

चौथा कोनाडा's picture

2 Jun 2022 - 12:45 pm | चौथा कोनाडा

काही मोजके अपवाद वगळता बहुतेक कथा आवडल्या होत्या, त्यानुसार अवडलेलल्या मतदान केले होते !
(मी किती मतं दिली होती ते मोजायला पाहिजे, दुबार मतदान तर मी खात्रीने केले नव्हते)
💐

विजेत्यांचे कौतुक !
स्पर्धकांचे अभिनंदन !
संयोजकांचे मनापासून आभार !

स्वगत :

बाप शशक विजेता काड्यासारू आगलावे मात्र डयूआयडी वाटतोय,
बरोबर स्पर्धेपूर्वीच मिपा सभासदत्व आणि आयडीनाव जाळपोळ करणारे
(पैजार बुवा असावेत का ?)

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Jun 2022 - 1:55 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्यावर सौंषय?
राम नुसता एकवचनी एकपत्नी एकबाणी होता,
आम्ही एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि एकअयडी आहोत.
प्रत्येक्श ब्रम्हदेव पण आमच्या शपथा खातो.
पैजारबुवा,

विजुभाऊ's picture

2 Jun 2022 - 4:07 pm | विजुभाऊ

*एकप्रतिसादी *
हे पन लिहायचे होते;)

चौथा कोनाडा's picture

2 Jun 2022 - 5:39 pm | चौथा कोनाडा

आमच्यावर सौंषय?

अन्दाज करुन बघितला.

राम नुसता एकवचनी एकपत्नी एकबाणी होता,
आम्ही एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि एकअयडी आहोत.

हा .... हा .... हा .... !

प्रत्येक्श ब्रम्हदेव पण आमच्या शपथा खातो.

मग ठीकाय, तुम्ही नक्की नसणार !

कोन आसंल बरं ह्यो ड्युआयडी ?

Bhakti's picture

2 Jun 2022 - 2:59 pm | Bhakti

स्वगत
आयडीचा अतिउत्साह पाहता अबा असावा :)

नचिकेत जवखेडकर's picture

3 Jun 2022 - 1:36 pm | नचिकेत जवखेडकर

विजेत्यांचे, इतर स्पर्धकांचे, साहित्य संपादकांचे अभिनंदन!

चिगो's picture

9 Jun 2022 - 8:41 pm | चिगो

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व आभार.
संपादक मंडळाचे विशेष आभार..

महाराष्ट्रात आल्यापासून जास्त वेळ मिपावर येता आलं नाही. तसंही वयोमानानुसार आता कंटाळा येतोच. ;-) फुरसतीत सगळ्या वाचून काढून झआल्यावर पुनःप्रतिक्रीया देतो. तोवर मिपाचरणी रुमाल टाकून ठेवतोय..

चष्मेबद्दूर's picture

17 Jun 2022 - 10:25 am | चष्मेबद्दूर

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. शशक लिहिणे अजिबात सोपे नाहीये हे अगदीच कळले. पण लिहिताना मजा आली.