शशक २०२२ - निकाल
मिपा शशक २०२२ स्पर्धेला दिलेल्या अभुतपूर्व प्रतिसादा बद्दल सर्व स्पर्धकांचे व त्यांना भरभरुन मते देणार्या मिपा सदस्यांचे मनापासून आभार.
या स्पर्धे विषयी काही महत्वाची आकडेवारी खालील प्रमाणे
या स्पर्धे मुळे विविध विषयांवरच्या अनेक चांगल्या कथा वाचता आल्या, बर्याच जणांनी अनेक दिवसांनी लेखणी हाती धरुन आपल्या प्रतिभेला वाट मोकळी करुन दिली. या सर्व लेखकांना लिहिते रहाण्याची विनंती. या स्पर्धेत काही नवोदीत लेखकही आपल्या भेटीला आले, त्यांचेही स्वागत.
अंतिम निकाल असा आहे :-
मत मोजणी करताना असे आढळुन आले की दोन तीन कथांना एकाच वाचकाने चुकून दोन वेळा मतदान केलेले होते. मते मोजताना या वाचकांचे दुसरे मत हे बाद ठरवण्यात आले आहे.
स्पर्धेत आलेल्या कथा आणि त्यांचे लेखक यांची यादी खालील प्रमाणे.
| एकूण कथा | 64 |
|---|---|
| एकूण लेखक | 46 |
| एकूण मते | 680 |
| एकूण मतदार | 97 |
| प्रतिसादांची संख्या | 1041 |
| कथेचे नाव | लेखक | &एकूण मते |
|---|---|---|
| शशक'२०२२ - बाप | काड्यासारू आगलावे | &39 |
| श श क २०२२ -डिलीवरी | हर्षल वैद्य | &33 |
| शशक'२०२२ - टेलिपॅथी | कर्नलतपस्वी | &30 |
| शशक'२०२२ - वेदना | बिपीन सुरेश सांगळे | &29 |
| शशक'२०२२ - योगायोग | सुरसंगम | &24 |
| शशक'२०२२ - फरियाद | सिरुसेरि | &24 |
वाचने
71008
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
विजेत्यांचे कौतुक !
स्पर्धकांचे अभिनंदन !
संयोजकांचे मनापासून आभार !
आणि संपादक मंडळाला आभार शशक स्पर्धा आयोजित केल्याबद्दल.
वा वा !
विजेते, सहभागी,आयोजक,मतदाते सर्वांचे अभिनंदन!
विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी सदस्यांचे कौतुक.
स्पर्धेच्या दर्जावर, लेखनावर टीका केली गेली त्यात मीही आलोच पण मूळात शंभर शब्दांच्या आकृतिबंधात कथा बसवणे अत्यंत अवघड. मात्र स्पर्धकांनी हे आव्हान पेलले, सदस्य भरभरून लिहिते झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या उत्तम कथांचा आस्वाद वाचकांना घेता आला.
कथेतील शब्द मोजणे, कथा वेळोवेळी प्रकाशित करत राहणे, इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या कथांचे प्रतिसाद अचूक मोजून वेळेवर निकाल प्रकाशित करणे हे मोठ्या कष्टाचे काम. साहित्य संपादकांनी हे काम मोठ्या चिकाटीने तडीस नेऊन स्पर्धा यशस्वी करून दाखवली याबद्दल त्यांचेही खास आभार.
खरेतर कोणाला एखादी गोष्ट सांगणे हे मोठ्या जिकीरीचे काम आहे आणि त्यात ती गोष्ट शंभरच शब्दात बसवणे हे त्या पेक्षा मोठे आव्हान आहे. असे खडतर आव्हान तब्बल ४६ जणांनी यशस्वी पणे पेलले त्या बद्द्ल त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन, आता लेखणी खाली ठेवु नका.
याच बरोबर प्रत्येक कथेला १०.६२ च्या सरासरीने तब्बल ६८० मते देणार्या त्या ९७ मतदारांचेही अभिनंदन. हे मतदार नुसते मतदान करुन थांबले नाहित तर ती कथा त्यांना का आवडली किंवा का नाही आवडली हे त्यांनी मोकळेपणाने प्रतिसादात नमुद केले असे तब्बल ३६१ मतदानेतर प्रतिसाद या सर्व धाग्यांवर त्यांनी दिले. त्यांच्या या सूचना सर्व लेखकांना पुढील लेखनाकरता नक्कीच मोलाच्या ठरणार आहेत.
पण तरी सुध्दा मतदारांचा ९७ हा आकडा मिपाच्या वाचक संख्येच्या मानाने फारच कमी वाटतो. याचाच अर्थ काही वाचकांनी आपला हात अखडता घेतला. या निद्रिस्त मिपाकरांना विनंती की पुढील उपक्रमात त्यांनी आवर्जून भाग घ्यावा व लेखकांना प्रोत्साहित करावे.
आणि अर्थातच सासंचेही मनःपूर्वक अभिनंदन
पैजारबुवा,
विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार !
विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार
शशक मेजवानीबद्दल लेखकांचे आणि संपादक मंडळाचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन!
स्पर्धकांचे अभिनंदन.
विजेत्यांचे कौतुक.
संयोजकांचे आभार.
मिपा
संचालक
संपादक
लेखक
वाचक
मतदार
साऱ्यांचेच खूप आभार
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व साहित्य संपादकांचे मनापासून आभार. सोपे काम नव्हते हे सगळे आयोजित करणे. मिपाबद्दल खूप छान वाटले.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि साहित्य संपादकांचे आभार.
सर्व विजेत्यांचे व या स्पर्धेत कथा लिहिणार्यांचे हार्दिक अभिनंदन व हि स्पर्धा यशस्वी करण्याकरता मोलाचे सहकार्य देणार्या साहित्य संपादकांचे देखील अभिनंदन.
पहीला आल्याबद्दल माझे अभिनंदन, :) तसेच दुसरा व तिसरा आल्या बद्दल हर्षल वैद्य नि कर्नल तपस्विंचेही . स्पर्धा आयोजात केल्याबद्दल मिपा साहीत्य संपादकांचे ही अभिनंदन. सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार.
बाप ह्या कथेविषयी:-
खरं तर ही आमची घरातीलच कथा. मी पुण्यात नोकरील असतो लहान भाऊ गावी. ही कथा जन्मली त्याच्या सुपीक डोक्यातून. आमचे शेत वगैरे काही नाही. सुरूवातीला मी कथा लिहून त्याला दाखवली पण त्याला ती आवडली नाही. गावाकडच्या मूलाचं लाखाचं नूकसान हवंच असं त्याचं म्हणणं. मग कथानक दोन वेळा बदलवून त्याच्या कडून तपासून घेतलं, त्याला पुर्ण आवडली नी मग त्याने प्रकाशीत करायला परवानगी दिली.
मला ही कथा ईतकी आवडली नव्हती. पहीली येईल हे तर आजिबातच वाटलं नव्हतं. त्यापेक्षी “नवाकाळ“ ही कथा जास्त प्रसिध्द होईल असं वाटलेलं. नवाकाळ ने सुरूवातीला आघाडी ऊघडलेली पण ससा कासवाच्या कथेतील सस्या सारखी मध्येच झोपली. अनेकांना बाप ही कथा भावली. पण ह्या कथेला दुसरी बाजू देखील आहे. नवाकाळ प्रसिध्द केली नसती तर शहरातील मुलाची बाजूही लिहीनार होतो.
In reply to पहीला आल्याबद्दल माझे अभिनंदन by काड्यासारू आगलावे
स्पर्धा संपली असली तरी शहरातील मुलाची बाजू सांगणारी कथा जरुर लिहा. वाचायला आवडेल.
विजेत्यांचे अभिनंदन.
विजेत्यांचे व सहभागींचे अभिनंदन. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल साहित्य संपादकांचे आभार.
-गा.पै.
सर्व प्रथम साहित्य संपादकांचे मनःपूर्वक धन्यवाद. ही स्पर्धा माझ्यासाठी नवीन व आगळा वेगळा अनुभव आहे.
सर्व प्रतीसादकांचे व वाचकांचे मनःपूर्वक आभार. वाचकांचे प्रतीसाद मग ते प्रशंसनीय किवा टिका, दोन्ही मनोबल वाढवतात.
माझ्या सारखा आयुष्यभर हिन्दीभाषीकात रहाणारा जेंव्हा मायभाषेत लिहीतो तेव्हां भाषा आणी शुद्धलेखन याबद्दल चुका होणारच. मिपाकरांनी सांभाळून घेतले प्रोत्साहन दिले. स्पर्धेत मिळालेल्या यामधे त्यांचा मोठा वाटा आहे.
उपायोजक,मुवी,तुषार,सचिन डाॅक्टर बिरूटे,प्रचेतस, भक्ती,चौको ,पैजारबुवा आणी विजुभाऊ यांचे विषेश आभार.
मला संपत्ती,नवाकाळ,डिलेव्हरी,बाप या कथा खुपच आवडल्या. बाकी सुद्धा छानच आहेत.
"सोन्याच्या बांगड्या", ही कथा एक नुकत्याच एम बी बी एस झालेल्या मित्राच्या अनुभवावर आधारीत आहे. त्याचे आगदी जवळचे नातेवाईक महामारीने गेल्यावर सुद्धा मनोधैर्य कायम होते. माणुसकीचा दुसरा चेहरा आजींच्या नातेवाईकाचा. आजीला माहीत होते सगळे आसुन सुद्धा माझे शेवटचे क्रियाकर्म करणारे कुणी नाही म्हणून त्या नवोदित डाॅ ला विनंती करतात व खर्चासाठी आपल्या सोन्याच्या बांगड्या काढून देतात. त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईक बांगड्या मागण्यासाठी येतात. निस्वार्थी पणे डाॅक्टर त्या परत करतात.ही
कथा मी त्या मित्रा करता लिहीली पण वाचकांपर्यंत पोहचवू शकलो नाही ही माझ्यातली कमी.
"टेलीपॅथी", सुद्धा माझ्या सैन्यातील अनुभवावरून लिहीलंय. फार कठीण काम होते ते.
सर्व मिपाकरांचे पुन्हा एकदा आभार .
क लो आ
विजेत्यांचे अभिनंदन
सहभागी कथा लेखकांचे सुद्धा आभार व अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन आणि आयोजनाबद्दल संपादक मंडळाचे आभार
विजेत्यांचे अभिनंदन आणि सा. सं. मं. चे आभार. आणखी उपक्रम लवकर येवोत!
आणि आयोजक, लेखक, मतदार, वाचक यांचे आभार!!
मराठी आंतरजालावर शतशब्दकथा या प्रकाराची ओळख करून देणाऱ्या आणि ती रुजवणाऱ्या आतिवास ताईंनादेखील मनःपूर्वक धन्यवाद.
रंजक पद्धतीने कथा सांगणे हे एक कौशल्यच आहे. त्यात ती शंभर शब्दात बसवणे कठीण. पण इतक्या होतकरू लेखकांनी इतका मनापासून प्रयत्न केला की मागील तीन आठवडे रोज कथा वाचायची सवयच लागली होती.
अजून अशाच रोचक उपक्रमांच्या प्रतीक्षेत ....
सर्वांचे अभिनंदन ह्यात सर्व काही आले. खूप कथा अत्यंत छान होत्या त्यावरून मिपाच्या दर्जाची कल्पना येते. मागील एखाद दोन स्पर्धात भाग घेतला होता, त्यावेळी देखील इतर कथांचा दर्जा पाहता आपल्याला अजून चांगले लिहायची आवश्यकता आहे ही जाणीव झाली होती.
ह्यावेळी मनात शशकची काही रोपटी रुजली होती, पण मलाच ती न आवडल्यामुळे उपटून टाकली.
युद्धाच्या वेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार.
काही मोजके अपवाद वगळता बहुतेक कथा आवडल्या होत्या, त्यानुसार अवडलेलल्या मतदान केले होते !
(मी किती मतं दिली होती ते मोजायला पाहिजे, दुबार मतदान तर मी खात्रीने केले नव्हते)
💐
विजेत्यांचे कौतुक ! स्पर्धकांचे अभिनंदन ! संयोजकांचे मनापासून आभार ! स्वगत : बाप शशक विजेता काड्यासारू आगलावे मात्र डयूआयडी वाटतोय, बरोबर स्पर्धेपूर्वीच मिपा सभासदत्व आणि आयडीनाव जाळपोळ करणारे (पैजार बुवा असावेत का ?)In reply to अभिनंदन .. by चौथा कोनाडा
आमच्यावर सौंषय?
राम नुसता एकवचनी एकपत्नी एकबाणी होता,
आम्ही एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि एकअयडी आहोत.
प्रत्येक्श ब्रम्हदेव पण आमच्या शपथा खातो.
पैजारबुवा,
In reply to (पैजार बुवा असावेत का ?) by ज्ञानोबाचे पैजार
*एकप्रतिसादी *
हे पन लिहायचे होते;)
In reply to (पैजार बुवा असावेत का ?) by ज्ञानोबाचे पैजार
आमच्यावर सौंषय?अन्दाज करुन बघितला.
राम नुसता एकवचनी एकपत्नी एकबाणी होता, आम्ही एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि एकअयडी आहोत.हा .... हा .... हा .... !
प्रत्येक्श ब्रम्हदेव पण आमच्या शपथा खातो.मग ठीकाय, तुम्ही नक्की नसणार ! कोन आसंल बरं ह्यो ड्युआयडी ?
In reply to अभिनंदन .. by चौथा कोनाडा
स्वगत
आयडीचा अतिउत्साह पाहता अबा असावा :)
विजेत्यांचे, इतर स्पर्धकांचे, साहित्य संपादकांचे अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. सर्व स्पर्धकांचे अभिनंदन व आभार.
संपादक मंडळाचे विशेष आभार..
महाराष्ट्रात आल्यापासून जास्त वेळ मिपावर येता आलं नाही. तसंही वयोमानानुसार आता कंटाळा येतोच. ;-) फुरसतीत सगळ्या वाचून काढून झआल्यावर पुनःप्रतिक्रीया देतो. तोवर मिपाचरणी रुमाल टाकून ठेवतोय..
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. शशक लिहिणे अजिबात सोपे नाहीये हे अगदीच कळले. पण लिहिताना मजा आली.
वा ! वा !!