अनुत्त्तरीत प्रश्न

जयेश माधव's picture
जयेश माधव in जनातलं, मनातलं
5 Dec 2008 - 5:30 am

आत्ताच ताज ओबेराय वर जो अतीरेकी हल्ला झाला,त्यात पोलीस तसेच आर्मीचे जवान शहीद झाले,त्या शहीद झालेल्या सर्व जवाना॑ना मानाचा मुजरा! पण पुढे झालेले राजकारण बघुन काही प्रश्न अनुत्तरीत रहातात ते असे----
१..पोलिस आणि आर्मीचे जे जवान शहिद झाले त्या शहीदा॑वर राजकारणी लोका॑नी लाखो॑ करोडो रुपये ओवाळुन टाकले पण...पण..रोज बोर्डरवर मरणार्या शहीद जवाना॑साठी कोण काय देतो?
२..ताज ओबेराय या प॑चतारा॑कीत होटेला॑वर हल्ला झाला म्हणुन गळा काढुन रडणारे सीने तारे आणि तारका मुलु॑ड,घाट्कोपर तसेच अन्य ठिकाणी झालेल्या बोम्ब हल्ल्यात कीतीतरी सामान्य माणूस मेले तेव्हा कुठे होते?

जयेश अ.माधव

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

5 Dec 2008 - 6:50 am | विनायक प्रभू

५०% दारिद्र्य रेषेच्या खाली. ४५ % जरा वर. ह्या पैकी कोणी गेले तर त्याची काळजी करायची नसते. राहिलेल्या ५% मुळे जग चालते हे तुम्हाला माहित नाही वाटते. असो. तुम्ही कुठले. ९५ सामान्य मधले की ५ मधले.
अवांतरः तुम्ही सांगितलेल्या सुची मधल्यांना त्यांच्या औकाती प्रमाणे काही ना काही तरी मिळाले आहे.

आम्हाघरीधन's picture

5 Dec 2008 - 3:54 pm | आम्हाघरीधन

आतापर्यन्त ४५०० पेक्षा जास्त शेतकर्यान्नी आत्महत्या केल्या आहेत त्यान्च्या बद्द्दल शासनाला कसलाही भाव नाही. जे पन्च तारान्कित सन्स्क्रुतीतील लोक मारले गेले त्याबद्दल मात्र त्रास झाला. मरण दोघान्चेही पण फरक मात्र केला गेलाय.

दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

विकास's picture

5 Dec 2008 - 7:37 pm | विकास

सर्वप्रथम चांगले प्रश्न आहेत...

पोलिस आणि आर्मीचे जे जवान शहिद झाले त्या शहीदा॑वर राजकारणी लोका॑नी लाखो॑ करोडो रुपये ओवाळुन टाकले पण...पण..रोज बोर्डरवर मरणार्या शहीद जवाना॑साठी कोण काय देतो?

हा जरी सीमेवर आपले जीवन देणार्‍या जवानांवर वरकरणी अन्याय वाटला तरी, तसा वाटून घेणे या संदर्भात बरोबर वाटत नाही. जे (विशेष करून) पोलीस आणि अगदी एन एसजी अतिरेकी हल्ल्यात गेले त्यांच्या नेहमीच्या जीवनात ते "तळहातावर शीर" घेऊन नसतात आणि तरी देखील वेळ आल्यावर त्यांनी मागेपुढे पाहीले नाही. याचा अर्थ सीमेवरील जवानांचे कमी नाही, पण दुर्दैवाने ते त्यांचे काम आहे. या संदर्भात जर अन्यायच म्हणाल तर तो इतकाच म्हणता येईल की आपली माध्यमे अशा जवानांना त्यांच्या धारातिर्थी पडण्यावरून सलाम ठोकत नाहीत (काही वेळचे अपवाद वगळता) आणि जनतेला माहीती करून देत नाहीत. मला खात्री आहे की त्यांचा विमा असणार आणि त्यांना पेन्शन/मोबदला मिळत असेल. तरी देखील या संदर्भात माहीती अधिकार वापरून सरकारला अशा जवानांच्या कुटूंबांचे काय होते हे जाहीर करायला लावले पाहीजे. म्हणजे तसा नियम/धोरण म्हणून अन्याय जर होत असेल तर तो थांबेल.

ताज ओबेराय या प॑चतारा॑कीत होटेला॑वर हल्ला झाला म्हणुन गळा काढुन रडणारे सीने तारे आणि तारका मुलु॑ड,घाट्कोपर तसेच अन्य ठिकाणी झालेल्या बोम्ब हल्ल्यात कीतीतरी सामान्य माणूस मेले तेव्हा कुठे होते?

ज्याचं जळतं त्यालाचं कळतं. बाकी नक्की कुठल्या कुठल्या सीनेनटनट्यांनी जाहीर गळे काढून निषेध केला ते माहीती करून घेयला आवडेल. (काही वाचलेत पण सगळे नाही माहीती). खासदार गोविंदा, खासदार प्रिया दत्त आणि गांधीगिरी करणारा तीचा भाऊ संजय दत्त यांनी काही बोलल्याचे निदान मी तरी ऐकले नाही... प्रिती झींटाला सामान्यांच्या गर्दीत गेटवे ऑफ इंडीयावर गेल्याचे पाहीले.

अनामिका's picture

5 Dec 2008 - 8:34 pm | अनामिका

नट नट्यांच्या वक्तव्यांना मराठी वृत्तपत्र व माध्यमे बहुदा प्रसिद्धी देत नाहित अस दिसतय?
परवा म्हणे महान गांधिवादि श्री संजय दत्त यांच्या सौभाग्यवती मान्यता दत्त यांनी आपले सासरे स्व सुनिल दत्त यांच्या सेवाभावि वृत्तीची धुरा आपल्या खांद्यावर घेत एका स्वयंसेवी संस्थे मार्फत माणसे एकत्र करुन गेट वे येथे या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.(सुत्र-आजतक व तत्सम वृत्तवाहिन्या)
मराठी वृत्त माध्यमे किती एकांगी पत्रकारिता करतात याचे अजुन एक उदाहरण
http://www.misalpav.com/node/4958#comment-72132
या प्रतिसादातले दुवे तपासा
या अश्या प्रतिक्रिया खर तर सगळ्या वृत्तपत्रांमधुन छापुन यायला हव्यात पण नाही इतर भाषांचे व नटनट्यांचे वावडे असल्यासारखे मराठी माध्यमे वागतात आणि मग उगिच ठराविक धर्माबद्दल आकस निर्माण होतो नाहि का? 8}
जयेश,
मुंबईतील हल्ल्यात शहिद झालेल्या व्यक्तींसाठी सध्या राजकारण्यांमार्फत जाहिर झालेल्या सगळ्या रकमा त्यांच्या पर्यंत पोहोचतात कि नाही हाच खरा प्रश्न आहे.राजकिय फायदा या शहिदांच्या निमित्ताने उठवणे व स्वतःची सत्तेची पोळी भाजुन घेणे इतकाच एक उद्देश असतो या राजकारण्यांचा .................!

कारगिल मधे धारातिर्थी पडलेल्या जवानांची आपल सरकार व सगळे सरकारी कर्मचारी किती पत्रास ठेवतात ते गुल पनांग व ओम पुरि यांचा सक्षम अभिनय असलेला धुप हा चित्रपट बघितल्यानंतर तुम्हांस कळु शकेल अर्थात तो चित्रपट तुंम्ही बघितला नसेल तर!.
अनुज नय्यर या कारगिल युद्धात शहिद झालेल्या एका जवानाच्या आइवडिलांना अनुज याला मरणांत दिला गेलेल पेट्रोलपंप मिळवताना झालेला मनस्ताप या चित्रपटात मांडलाय.
http://www.rediff.com/news/2004/jan/02diary.htm.
मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सैन्याचा वापर केला गेला पण तो हल्ला ताज वर झाला होता म्हणून्.कुठल्या सर्वसामान्यांच्या एखाद्या वास्तुला अतिरेक्यांनी वेठिस धरले असते तर अश्या प्रकारचे ऑपरेशन नक्की करण्यात आले असते का?निदान असली भ्रामक कल्पना माझी तरी नाही.वास्तव चटके देणारच आहे.ताज सोडुन इतर कुठल्या ठिकाणी हा हल्ला झाला असता तर कदाचित मुंबई पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करुन व शौर्य गाजवुन ह्या हल्ल्याचा व अतिरेक्यांचा बिमोड करावा लागला असता.................आज हे सगळे सिने कलावंत इतके हळहळत आहेत कारण या अतिरेकी हल्ल्याच्या निमित्ताने हा उच्चभ्रु वर्ग देखिल असल्या प्रकाराला बळि पडु शकतो हे सिद्ध झाले म्हणुन केवळ हा आटापिटा.
या आधी मुंबईत झालेल्या बाँबस्फोटांमधे सर्वसामान्य कष्टकरी नागरिक बळी पडले तेंव्हा कुठे गेली होती यांची संवेदना.
धोनी ,सचिन, इरफान पठाण यांच्या संवेदना अंतःकरणापासुन आलेल्या असु शकतात कारण हे सगळे मध्यमवर्गातुन आलेले आहेत.
मेकअप करुन व चेहर्‍यावर गॉगल लावुन संवेदना व्यक्त करणार्‍या कुठल्याही व्यक्तीचा निषेध करावा तितका कमी आहे.
"अनामिका"

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Dec 2008 - 11:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिकाबाई,

या अश्या प्रतिक्रिया खर तर सगळ्या वृत्तपत्रांमधुन छापुन यायला हव्यात पण नाही इतर भाषांचे व नटनट्यांचे वावडे असल्यासारखे मराठी माध्यमे वागतात आणि मग उगिच ठराविक धर्माबद्दल आकस निर्माण होतो नाहि का?
आपण म.टा. वाचत नसाल तर मग हे ही वाचाच. भारतीय नव्हे, पाकिस्तानी तरूणांनीही या हल्ल्याचा निषेध केल्याची बातमी आहे.
आणि हो, (मराठी सोडून?) इतर भाषिक व नटनट्या फक्त ठराविक धर्माचेच असतात असं नाही.

बाकी टग्याशेठच्याच शब्दात पुन्हा एकदा:
आग भडकलेली आहे. ती विझवता आली तर उत्तम, पण नाही तर निदान त्यात पेट्रोल टाकण्याचे सत्कार्य तरी करू नका ही नम्र विनंती.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2008 - 9:34 am | विसोबा खेचर

पण...पण..रोज बोर्डरवर मरणार्या शहीद जवाना॑साठी कोण काय देतो?
२..ताज ओबेराय या प॑चतारा॑कीत होटेला॑वर हल्ला झाला म्हणुन गळा काढुन रडणारे सीने तारे आणि तारका मुलु॑ड,घाट्कोपर तसेच अन्य ठिकाणी झालेल्या बोम्ब हल्ल्यात कीतीतरी सामान्य माणूस मेले तेव्हा कुठे होते?

दोन्ही प्रश्न वाजवी आहेत..!

तात्या.