पुस्तके पाहिजे आहेत बी.कॉम भाग -२ शिवाजी विध्यापीठ कोल्हापुर...

विवेचन's picture
विवेचन in जनातलं, मनातलं
4 Dec 2008 - 2:14 am

नमस्कार मित्रांनो...मला शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर ची पुस्तके हवी आहेत्...बी.कॉम भाग-२ ..मी मुंबईत राहत आहे . अभ्यासासाठी मला लवकरात लवकर पुस्तकाची गरज आहे..तुम्हाला माहित असेल तर कृपया मला सांगा...कि मी मुंबईमधुन कशा प्रकारे पुस्तके मिळवु शकतो....एखादे पुस्तकाचे दुकान माहित असेल तर पत्ता पण द्या.

आपला नविन मि.पा. सदस्य.
विवेचन

शिक्षणमाहिती

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

4 Dec 2008 - 1:59 pm | घाशीराम कोतवाल १.२

काय राव तात्या हे काय चाललय कोनाला खानावळ पायजे
कोनाला संगणक दुरुस्तीची माहिति पाहिजे तर
कोनाला संगनकाची किमत पायजे हे मिपा वर योग्य हाय का......
नाय मग एक करा तात्या यांच्या कडुन जाहिरातीचे पैसे घ्याच नाय तर मग रोज कोन ना कोन जाहिरात करत बसल हो

गलगले आता पैसे घ्यायचे नाय घ्यायचे हे मालक / संपादक बघतील तुम्हाला का फुकाचा त्रास हा लोकांना राग येतो आपला गलगले तेव्हा बघा

गलगले परत निघाले राव.................

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2008 - 1:28 pm | परिकथेतील राजकुमार

जाउदे कोतवाल साहेब, नका त्रास करुन घेउ !

विवेचन मित्रा, खालील लिंक ट्राय कर, मी निट अभ्यासली नाहिये पण तुला नक्कि मदत मिळेल !
लिंक :- http://www.unishivaji.ac.in/lib/index.htm

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्राजु's picture

5 Dec 2008 - 12:51 am | प्राजु

"चौकशी/माहिती " नावाचे एखादे सदर चालू करावे लागणार. तिथे लोकांना अशा प्रकारच्या चौकश्या करता येतील.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकि's picture

5 Dec 2008 - 12:33 pm | विकि

तु आधी गिरगावात(धोबीतलाव च्या गल्लीतून सुरू हो) जा तिथे पुस्तकांची बरीच दुकाने आहेत.तिथे ही नाही मिळाली तर दादर ला ये दादरला आयडियला भेट दे तिथेही नाही मिळाली तर कबुतर खान्याच्या समोर (ऍन्टोनिओ डिसिल्वा कॉलेजच्या बाजूला)गल्लीत जा तिथे खुप पुस्तकांची दुकाने आहेत.तिथेही नाही मिळाली तर शारदाश्रम कडे चालत जा.तिथे प्रगती बुक डेपो आहे तिथे विचार.इथेही नाही मिळाले तर घाटकोपर (प.)रेल्वेस्टेशनला लागूनच दुकाने आहेत(भलतीकडे जाऊ नकोस).तिथेही नाही भेटली तर भांडूप(प.) लाये तिथे एलबीस मार्गाजवळ सरळ चालत ये.डावीकडे वळ .सरळ चाल तिथे डाव्या गल्लीत एक पुस्तकाचे दुकान आहे तिथे बघ. तिथे नाही भेटले तर ठाण्याला ये तिथे तलावपाळीकडे सरळ चालत ये तुला जगदीश,लक्ष्मी,गुरूकृपा बुक डेपो दिसतील तिथे विचार.तिथे ही नाही भेटले तर .................
गुरू़कृपाचा दुरध्वनी क्रमांक घे २५४०३४२३ इथे विचार.

विवेचन's picture

6 Dec 2008 - 1:45 am | विवेचन

धन्यवाद विकि....खुप खुप आभारी आहे. पुस्तके भेटतात का ते पहातो..

विवेचन