पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Nov 2021 - 1:38 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो. अभिरुचिसंपन्न वाचक हा एकतर उच्च अभिरुचीसंपन्न वाचक बनतो अथवा त्याच पायरीवर अधूनमधून वाचन करत राहतो...
संपूर्ण लेख : http://sudhirdeore29.blogspot.com/2021/11/blog-post.html
संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com/

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

शिवाय त्याच्याकडे वेळ आणि पैसा हवा. दुष्काळ ठराविक विषयाला अधिकच असतो.

पाषाणभेद's picture

1 Nov 2021 - 7:00 pm | पाषाणभेद

ओ सर, संपूर्ण लेख येथेच टाकत चला ना.
ही दुसरी सुचना आहे.

पाषाणभेद's picture

1 Nov 2021 - 10:36 pm | पाषाणभेद

हाच प्रश्न त्यांच्या ब्लॉगलाही लागू पडतो ना?

उगाचच मुख्य प्रश्नाला फाटे फोडू नका.

एकतर लेख संपूर्ण टाका अन्यथा येथे अर्धवट लेख अन वरतून खाजगी लिंका द्यायच्या हे योग्य नव्हे.

सुक्या's picture

2 Nov 2021 - 12:22 am | सुक्या

देवरे सरांच्या ब्लॉगला वाचकांचा दुष्काळ बघावा लागतो आहे हे जरी खरे असले तरी कुणी तिथे जाउण वाचन करावे असेही काही दिसले नाही. मी मुद्दाम हा लेख तिथे जाउन वाचला तर केवळ उसासे व्यतीरिक्त काही सापडले नाही .. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाला मोकळा वेळ जसा कमी झाला आहे तसेच करमणुकीची बरीच ईतर साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचन हेच एक परमोच्च करमणुकीची / विद्या अर्जनाचे साधन आहे आणी बाकी बाबी फोल आहेत हे ग्रुहीतक चुकीचे आहे.

जे ज्ञान मी ३० मिनीटांची डॉक्युमेंटरी बघुन मिळवु शकतो त्यासाठी ४ तास वाचन करण्याची मला गरज वाटत नाही ... बाकी सरांचे याला वेळ आहे / त्याला वेळ आहे पण वाचनाला वेळ नाही हा नकारार्थी सुर बघुन परत त्या ब्लॉग वर मी जाइल की नाही याची शाश्वती नाही ...

आवांतर : संपूर्ण लेख येथेच टाकावा या सुचनेशी सहमत ..

सुरिया's picture

2 Nov 2021 - 7:44 am | सुरिया

अरेवा.
ब्लॉगवर जाऊन वाचला लेख. सुक्यारावानी म्हणल्याप्रमाणे उसासे वगैरे आहेतच. आणि सूर ही फारसा पटला नाही. ज्याला जे करावे वाटते ते करू द्यावे असा सध्याचा फंडा आहे. उगी लोकांची अभिरुची संपन्नता वाढवायची हा उद्योग आपण लेखनातून करावा. वाचक तसे झाले तर ठीकच आहे पण ते दुसरेच काहीतरी करत असल्यास दोष वाचन नाही असा ढकलता येणार नाही. किंबहुना हा दोषच नाही असे वाटते. असो. लेख पूर्णपणे इथेच टाकावा ह्या सुचानेशिही सहमत.
बादवे ते शेवटी लिहिलात ते थिंक महाराष्ट्र चालू आहे काय अजून? ते वाचले की आमच्या तात्याचे ब्रॉडबँड बुड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळणे फक्त आठवते. ;)

जेम्स वांड's picture

2 Nov 2021 - 8:59 am | जेम्स वांड

तुम्ही किती का आरडाओरड करा, त्यांच्यालेखी मिपा फक्त जाहिरात फलक असून त्यावर ते एक अवाक्षर इथं बोलणारही नाहीत अन लिहिणारही नाही.

Laughing man

त्यांना कदाचित मिपा वगैरे प्रकरणे त्यांच्या लेव्हलची वाटत नसतील, जे काही असेना का, पण एकंदरीतच त्यांना माझ्या चार वर्षे सभासदत्व काळात कोणालाच प्रतिसाद देताना, मनमोकळे बोलताना, व्यक्त होताना बघितले नाहीए.

पाषाणभेद's picture

2 Nov 2021 - 12:14 pm | पाषाणभेद

त्यांना प्राध्यापक, डॉक्टर पदाची स्वतंत्र पदवी मिळाली असल्याने प्रत्येक लेखाचा स्वतंत्रपणे अभ्यास करत असावेत.
व अभ्यासात व्यत्यय नको म्हणून इतरांचे लेखन महत्वाचे मानत नसावेत.
खॅ खॅ खॅ