मन...

शब्दवेडा's picture
शब्दवेडा in जे न देखे रवी...
28 Dec 2007 - 9:10 pm

मन पाखरांची किलबिल
ओल्या हिरव्या रानी..
मन दवबिंदू सांडलेले
गवताच्या पानोपानी..
मन मुग्ध वसंताची चाहूल
मन बोचर्या शिशिरातील पानगळ..
मन झुळुक वार्याची हळुवार..
मन भयाण वादळ अनिवार..
मन शोध सुखाचा दूरवर..
मन दु:ख दडलेले खोलवर..
मन मुक्त हास्याची खळखळ..
मन मुक्या अश्रून्ची गलबल...

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

शब्दवेडा's picture

28 Dec 2007 - 9:12 pm | शब्दवेडा

चूक भूल देणे घेणे...

विसोबा खेचर's picture

29 Dec 2007 - 10:33 am | विसोबा खेचर

अतिशय सुंदर कविता...

मन झुळुक वार्याची हळुवार..
मन भयाण वादळ अनिवार..
मन मुक्या अश्रून्ची गलबल...

या ओळी सर्वात जास्त आवडल्या...

(मनस्वी) तात्या.

प्राजु's picture

30 Dec 2007 - 8:17 am | प्राजु

मन टपोरा मोती
आळवाच्या पानावर
मन नाजूक ज्योती
थरथरे दिव्यावर...

- प्राजु.

शब्दवेडे राव,
आपली कविता खूपच छान आहे.

मन दवबिंदू सांडलेले
गवताच्या पानोपानी..

ही ओळ खास..

- प्राजु

स्वाती राजेश's picture

31 Dec 2007 - 11:16 pm | स्वाती राजेश

छानच लिहिले आहे.
मन मुक्त हास्याची खळखळ..
मन मुक्या अश्रून्ची गलबल...
या ओळी खासच.