एक योजना

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
30 Nov 2008 - 8:04 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी

गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे.
एकूणच सगळ्यावर मी आणि अदिती इतरांप्रमाणेच दु:खी होतो.. हे सारं करताना काहितरी करायला हवं हे जाणवत होतंच.. नक्की काय करावं हे मात्र समजत नव्हतं...यातूनच खरडा खरडी चालु झाली... हे सगळं बदलायचं तर आहेच.. पण कसं?
अनेक उपाय आहेत.. उपाय असु शकतील....पण कुठून तरी सुरूवात झाली पाहिजेच..

सुदैवाने लोकशाहिचा "बदल "हा पाया आहे. यासाठी कोणत्याहि यादवीची गरज नाहि.. गरज आहे एका मताची.. एका विचारपूर्वक दिलेल्या मताची..

पण हा विचार कशाच्या आधारावर करणार, आणि सगळे प्रतिनीधी इथून तिथून सारखेच!!... पण खरंच सगळे इथून तिथून सारखेच? आमच्या मते नाहि. लोकांना आपल्या मतदारसंघात निवडणूकीला कोण उभं आहे हे देखील माहित नसतं.. त्याची पात्रता तर सोडाच!!

मग लोकांना जर सहजतेने- विषेश कष्ट न करता -कळलं की मतदारसंघात कोण उभे आहे तर निकाल वेगळे लागू शकतात. या अश्या विचारांतून डोक्यात एक योजना उभी राहिली आहे.

प्रतिनीधींबद्दलची माहिती योजना

या अंतर्गत अशी वेबसाईट तयार केली जाईल ज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा/लोकसभा निवडणूकीसाठी कोण उभे आहे, आणि त्या प्रत्येकाची विस्तृत माहिती दिली जईल. या माहितीत ढोबळपणे: नाव, जन्मस्थान, घोषित मिळकत, घोषित स्थावर, पुर्वरेकॉर्ड, अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड (खरंतर बोलता येणार्‍या भाषा ही , पण त्या गोळा कशा करणार?)!! थोडक्यात अशी माहिती ज्यावरून लोकांना त्यांचा निर्णय घेता येईल.

या योजनेचे मुख्यत्त्वे करून ४ भाग करता येतील
१. मराठी व इंग्रजी अश्या दोन भाषांत साईट बनवणे [तांत्रिक बाजू]
२. विदा संकलन (निवडणूक आयोगाकडून काहि माहिती प्रकाशित होते, त्याच बरोबर माहितीच्या अधिकारा अंतर्गत बाकीची महिती शोधणे)
३. विदा संगोपन (विदा वेळोवेळी अपडेटेड ठेवणे)
४. प्रचार आणि प्रसार

असे डोक्यात आले की नुसत्या साईटने काम होणार नाहि कारण शहरी भाग सोडल्यास इतरांना जालाचा ऍक्सेस नाहि.
त्यासाठी काहि पर्यायः
१. एकदा साईट बनली की या कामात वेगस्वेगळे एन्जीओ, प्रभावी व्यक्ती वगैरेंची मदत घेता येईलसे वाटते..
२. दुसरा पर्याय सध्यातरी टार्गेट ऑडीयन्स फक्त जालावरील मतदार ठेवायचा.. पुढचं पुढे

हा केवळ डोक्यात आलेला विचार आहे.. अधिक चर्चेने विस्तार करता येईलच. त्यासाठीच हा काथ्याकूट
अर्थातच हे काम एकट्याचे नाहि. तेव्हा

  • प्रत्येकाची मदत तर लागेलच
  • या शिवाय जर अशी सुविधा जालावर असेल तर पुन्हा करण्यात काहिच पॉइंट नाहि. तेव्हा अशी सुविधा पाहण्यात माहितीत असेल तर कळवा
  • मला या संबीधीचा कायद्याचा अँगल माहित नाहि. अशी माहिती गैरसरकारी व्यक्तीने / समुहाने देणे कायद्यात बसते का??.. हे कोणी शोधू शकले तर उत्तम

स्वाभाविक पुढे येणारा प्रश्नः हिच योजना का?:
कारण काहि नाहि.. कुठूनतरी सुरवात करायलाच हवी.. कोणतीतरी काडी उचलायलाच हवी.. तुमची काहि पुरक योजना असेल तरी हरकत नाहि. इथे जरूर कळवा. मात्र पूर्ण वेगळी योजना असल्यास कृपया वेगळा धागा सुरू करा म्हणजे दोन्हीस न्याय देता येईल.
एक नक्की की आता आपणहि काहितरी केलेच पाहिजे ही जाणीव प्रकर्षाने झाली आहे (असेल अशी अपेक्षा)..

इथे यावर ठोस आणि भरपूर चर्चा झाली कीपुढील संपर्कासाठी एक गुगल ग्रुप तयार केला आहे. ज्यांना वाटते त्यांनी विरोपाचा पत्ता (शक्यतो गुगल) मला विरोपातून कळवला की मी तुम्हाला ग्रुप मधे ऍड करेन

टीपः
या योजनेमधे कोणत्याहि संस्थळ-प्रशासनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. मात्र प्रशासनातील व्यक्ती वैयक्तीक रित्या भाग घेऊ शकतात हे वे सां न ल

प्रतिक्रिया

अभिजीत's picture

30 Nov 2008 - 11:03 pm | अभिजीत

ऋषिकेश आणि अदिती,
सर्वप्रथम ठोस चर्चेला सुरुवात केल्याबद्दल आणि योजना मांडल्याबद्दल अभिनंदन.

उमेदवाराची माहिती संकलीत करुन जालावर उपलब्ध करुन देणे ही योजना चांगली आहे.

>>निवडणूक आयोगाकडून काहि माहिती प्रकाशित होते
निवडणुक आयोगाच्या साइटवर http://eci.gov.in/ सर्व निवडणुकांबद्दल माहिती उपलब्ध आहे.

उमेदवाराचे ऍफिडेविट उपलब्ध आहे. यात स्थावर-जंगम मालमत्ता, गुंतवणुक व आरोप-गुन्ह्यांच्या-माहिती आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची ऍफिडेविट इथे पहा - http://ceodelhi.nic.in/

तथापि, जालावर उमेदवारांची माहिती देण्यावर एखादं स्थळ सुरु करण्यापासुन सुरुवात करणं हा नक्कीच चांगला प्रयोग ठरेल. यात पुढे भर घालता येइल.

माझा विरोपाचा पत्ता व्यनि केला आहे.

कायद्याची बाजु तपासायला हवी याला सहमत.

बाकी विस्ताराने पुन्हा लिहिन.

- अभिजीत

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

माफ कर ऋष्या, पण आज संख्येने अक्षरश: अफाट असणारा झोपडपट्टीतला मतदार जळ्ळं मरायला तुझं ते नेट बघतोय कशाला? अजून संगणक ही वस्तू साधी जवळूनही न पाहिलेली किती माणसं मी तुला दाखवू?

या अंतर्गत अशी वेबसाईट तयार केली जाईल ज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा/लोकसभा निवडणूकीसाठी कोण उभे आहे, आणि त्या प्रत्येकाची विस्तृत माहिती दिली जईल. या माहितीत ढोबळपणे: नाव, जन्मस्थान, घोषित मिळकत, घोषित स्थावर, पुर्वरेकॉर्ड, अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड (खरंतर बोलता येणार्‍या भाषा ही , पण त्या गोळा कशा करणार?)!! थोडक्यात अशी माहिती ज्यावरून लोकांना त्यांचा निर्णय घेता येईल.

ऋष्या, तुझी कळकळ कळते रे! पण ती अत्यंत हास्यास्पद आहे.. अरे साध्या ठाणा मुलशीपाल्टीतच्या निवडणुकांच्या आदल्या रात्री अक्षरश: खोर्‍यानं नोटा वाटल्या जातात तिथे तुझा तो संगणकीय विदा कोण बघणार आहे?

तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Dec 2008 - 10:25 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तात्या, तुमचं म्हणणं मान्य आहे. पण ....

अरे साध्या ठाणा मुलशीपाल्टीतच्या निवडणुकांच्या आदल्या रात्री अक्षरश: खोर्‍यानं नोटा वाटल्या जातात तिथे तुझा तो संगणकीय विदा कोण बघणार आहे?
पण त्याच ठाण्यात असेही वॉर्डस आहेत जिथे बहुतांश सुशिक्षित, मध्यमवर्गीय मतदारच आहेत. आणि त्यांच्यापासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे? ते पण आपल्यासारखेच आहेत ना? आणि शहरांमधे असेही मतदारसंघ असतीलच ना जिथे नेट सॅव्ही मतदार बर्‍यापैकी प्रमाणात आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं लोकांचं बोलून फार झालं. यावेळच्या दहशतवादी हल्ल्यानंतरही आपले माननीय मुख्यमंत्री चित्रपटक्षेत्रातल्या लोकांना घेऊन ताज हॉटेलमधे सहलीला गेले होते. म्हणजे काही ठोस काम ना ते करत आहेत ना आपण. मग सुरुवात करायला काय हरकत आहे?
(तरूण रक्त आहे, काम करण्याची इच्छा आहे, आम्हालाही टक्केटोणपे खाऊ द्या; तुम्ही "पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा".)

आणि ऋषिकेश म्हणाला आहे त्याप्रमाणे ही फक्त एक कल्पना आहे; अजून कोणाच्या डोक्यात इतर काही ठोस विचार असेल तर तो जरुर मांडावा. त्यावरही चर्चा, विचार करुन काम करता येईल.

(अस्वस्थ) अदिती

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Dec 2008 - 1:16 am | बिपिन कार्यकर्ते

ऋष्या... चांगली योजना.

एक करोड जनतेत १ जरी माणूस सुधारला तरी तेवढ्या पटीत समाज सुधारलाच की रे... :) सुरूवात करूच आणि पुढे काय होईल ते होईल.

बिपिन कार्यकर्ते

कपिल काळे's picture

1 Dec 2008 - 2:27 am | कपिल काळे

बदल हा थोडा थोडाच होत असतो. बदल ज्याच्या मध्ये होवू शकतो तो थोडा सेन्सीबल असतो. झोपडीतल्या मतदारातही बदल होइल. पण असे घटक जास्त म्हणून ज्यांच्यात बदल होवू शकतो अश्यांवर काम का नाही करायचं?.

माझा पूर्ण पाठिंबा आहे. आता तर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सुशिक्षित, मध्यमवर्गीय मतदारांना महत्त्व प्राप्त होणार आहे. निवडणूकीचा केंद्रबिंदू आता खेड्यांकडून शहराकडे झुकणार आहे.

तेव्हा ऋषिकेश आणि अदिती काय काय मदत करु शकतो ते सांगा. डिसें नंतर भारतातच आहे.

http://kalekapil.blogspot.com/

विकास's picture

1 Dec 2008 - 3:08 am | विकास

माझा पाठींबा राहील

धमाल मुलगा's picture

1 Dec 2008 - 2:10 pm | धमाल मुलगा

ॠषिकेश आणि अदिती,
आपला हा विचार खचितच उत्तम आहे.

वर अभिजीतने दिलेले दुवे जरी उपरोक्त माहिती देत असले तरी शासकीय संस्थळांची एकुणात दुरावस्था पाहता, ती संस्थळे उघडायला लागणारा वेळ, योग्य वेळी माहितीचे अद्ययावत न केले जाणे इत्यादी शासकीय संस्थळांचे सर्वसाधारण अनुभव जमेस धरता, अशी एखादी नवी जागा जिथे ही माहिती मिळेल, करुन देणं हे नक्कीच उत्तम कार्य आहे.

बाकी, तात्या म्हणतात तसं, ह्यामागचा कार्यकारणभाव जरी उत्तम असला तरी हे काम तळागाळातल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं सद्यस्थितीत जरा अवघडच वाटतं. पण तरीही....सुरुवात करायला काहीच हरकत नाही.

हिच योजना का?:
कारण काहि नाहि.. कुठूनतरी सुरवात करायलाच हवी.. कोणतीतरी काडी उचलायलाच हवी..

अगदी अगदी!
कोणतीतरी उचलायची तर ही काडी उचलुन पाहुया की!

पण एक प्रश्न आहे.
संस्थळ चालु केल्यानंतर त्याचा लाभ घेणारे असणार ते सुशिक्षित मतदार. आजची परिस्थिती पाहता, ह्यातले कितीजण मतदान करतात?
तात्यांच्या म्हणण्याशी ह्याबाबतीत सहमत आहे. जिथे नोटांच्या पुडक्यावर मताचा शिक्का कोणत्या चिन्हावर मारायचा हे ठरतं तिथे ह्या माहितीचा उपयोग होणार नाही.

तेव्हा, आपलं टार्गेट असेल ते सुशिक्षित मतदार. त्यांना केवळ माहिती देऊन नाही भागणार, मतदानासाठीही उद्युक्त करणे गरजेचे आहे असं वाटते. भले तुम्ही आपलं मत कोणालाही देऊ नका...फॉर्म १७-अ वापरा, पण तुमचं मत तिथे न जाऊन वाया घालवू नका..कारण तुम्ही गेला नाहीत तर तुमच्या नावाने मोलावर आणलेले बोगस मतदार तुमचं मत देणारच.

अनामिका's picture

1 Dec 2008 - 10:45 am | अनामिका

अदिती ,ऋषिकेश
माझा देखिल याला पाठींबा आहे.
तुमच्या इतकी या क्षेत्रातील माहितगार नाही मी खरतर पण तुमच्या या अभियानात सामिल व्हायला मनापासुन आवडेल.
"अनामिका"

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Dec 2008 - 1:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

ॠषिकेश आणि अदिती,
आपला हा विचार खचितच उत्तम आहे.
मग चला करा सुरुवात मी आहे काही मदत लागली तर कधी ही हाक मारा आपण तयार आहोत
आणी तात्या काय राव पोर काम करुन र्‍हायलीत आणी तुमी त्यास्नी माग वडताय मराठी माण्साची खेकड्याची उपमा सोडा राव

मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

विसोबा खेचर's picture

1 Dec 2008 - 1:20 pm | विसोबा खेचर

आणी तात्या काय राव पोर काम करुन र्‍हायलीत आणी तुमी त्यास्नी माग वडताय मराठी माण्साची खेकड्याची उपमा सोडा राव

ठीक आहे!

आम्ही फक्त आमचा मुद्दा मांडला.. वस्तुस्थितीला धरून ह्या योजनेतली प्रॅक्टिकल अडचण काय आहे एवढंच आम्ही सांगितलं... शेवटी ऋषी आणि अदिती यांना रोखणारे आम्ही कोण? आमच्याही त्यांना मनापासून शुभेच्छा!

तात्या.

ऋषिकेश's picture

1 Dec 2008 - 2:08 pm | ऋषिकेश

तात्या,
शुभेच्छांबद्दल अनेक आभार! :)
वास्तवाची जाणीव करून दिलीत याबद्दलहि अनेक आभार.. आपले मुद्दे रास्त आहेतच. किंबहुना चर्चा चालु करताना अश्या समस्यांची जाणीव व्हावी हा एक उद्देश होताच. इतरांनीही असे रास्त मुद्दे मांडले तरीही ती एकप्रकारची मदतच असेल.

फक्त अदिती म्हणते तसे आम्हालाहि थोडं लढून बघु द्या ;) काहितरी केल्याचं समाधान तर मिळेल. आपण फक्त लढ म्हणा :)

तात्या आपल्याकडे अथवा इतर कोणाहीकडे दुसरी योजना असल्यास कृपया मांडावी. सगळे मिळून विचार करूयात.

-ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Dec 2008 - 1:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणी तात्या काय राव पोर काम करुन र्‍हायलीत आणी तुमी त्यास्नी माग वडताय मराठी माण्साची खेकड्याची उपमा सोडा राव
पाय ओढणे आणि मार्गातल्या अडचणी दाखवणे यात किंचित (खरंतर बर्राच) फरक आहे असं नमूद करावसं वाटतंय.

तात्या, धन्यवाद.

अदिती

राघव's picture

1 Dec 2008 - 1:42 pm | राघव

ऋषीकेश आणि अदिती,
विचार खरोखर उत्तम. सुरुवात करायला काहीही हरकत नाही. पूर्ण पाठिंबा.
मुमुक्षु

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 2:02 pm | विनायक प्रभू

मला विदा कळत नाही. संगणक त्याहुन नाही. तू त्यांत हुशार आहेस ना ,बास मला .
मी काय करायचे ते मला कळेल त्या भाषेत सांग. मी करेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Dec 2008 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Dec 2008 - 2:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

वा मग बोला कधी सुरुवात करताय
आदीती बोला कधी नारळ फोडायचा मुहुर्ताचा मी बा आपल्या बापुडा तयार आहे नारळ घेउन
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

नीलकांत's picture

1 Dec 2008 - 4:23 pm | नीलकांत

मी या प्रकल्पात काही मदत करू शकतो का?

नीलकांत

ऋषिकेश's picture

1 Dec 2008 - 4:55 pm | ऋषिकेश

काय मस्करी करता राव! ;)
तुमच्या सारख्याच्या मदतीला कोण कशाला नाहि म्हणेल :)
स्वागत! आणि अनेक आभार!

-(गोंधळलेला) ऋषिकेश

विनायक प्रभू's picture

1 Dec 2008 - 5:04 pm | विनायक प्रभू

इफ निल कान्ट दॅन नोबडी कॅन

यशोधरा's picture

1 Dec 2008 - 5:02 pm | यशोधरा

ऋषिकेश, अदिती, मी तुम्हाला काय मदत करु शकते?

यश हे तुमचेच आहे. मदत लागेल तर आठवन काढा.
वेताळ

भिंगरि's picture

1 Dec 2008 - 10:20 pm | भिंगरि

प्रत्यक्ष कृति करण्याच मनावर घेतल्याबद्दल मनापासुन अभिनंदन! तात्यांनि उपस्थित केलेल्या मुद्यातहि तथ्य आहे पण वरति अनेकांनि म्हंटल्याप्रमाणे कुठेतरि सुरुवात हि कराविच लागणार. तुमच्या या उपक्रमाला माझा पाठिंबा, मी काहि मदत करु शणार असेन तर जरूर सांगा. पुढिल वाटचालिसाठि शुभेछ्छा.

स्वप्निल..'s picture

2 Dec 2008 - 4:25 am | स्वप्निल..

मी पण तयार आहे मदत करायला..

विजुभाऊ's picture

2 Dec 2008 - 12:51 pm | विजुभाऊ

उत्तम प्रकल्प
या प्रकल्पाबाबत वृत्त पत्रां मधुन माहिती देउन लोकाना त्या साईट कडे वळवु शकतो
मी असे वृत्तपत्रीय लिखाण करु शकतो.
अजून कोणत्या प्रकारची मदत लागणार असेल तर सांगा

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

विजुभाऊ's picture

2 Dec 2008 - 12:51 pm | विजुभाऊ

उत्तम प्रकल्प
या प्रकल्पाबाबत वृत्त पत्रां मधुन माहिती देउन लोकाना त्या साईट कडे वळवु शकतो
मी असे वृत्तपत्रीय लिखाण करु शकतो.
अजून कोणत्या प्रकारची मदत लागणार असेल तर सांगा

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

सुनील's picture

2 Dec 2008 - 1:40 pm | सुनील

उपक्रम स्तुत्यच. परंतु, केवळ घोषित मिळकत, घोषित स्थावर, पुर्वरेकॉर्ड, अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड हे निर्णय घेण्यास पुरेसे नाही, असे वाटते. ही सर्व माहिती उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना द्यावीच लागते. त्यामुळे ती तशी सहज उपलब्ध होऊही शकते. याखेरीज अजूनही बरीच माहिती द्यावी लागेल जसे की,

१) उमेदवाराने केलेली लोकोपयोगी कामे (त्या मतदारसंघात वा इतरत्र).
या कामांची जंत्री मिळवणे तसे सोपे आहे पण जाहीर करण्यापूर्वी बरीच पडताळणी करावी लागेल.
२) विविध राजकीय, सामाजिक तसेच स्थनिक प्रश्नांबाबात संबंधित उमेदवाराचे मत वा कल.
ही माहिती मिळणे सोपे नाही. बराच विदा उपसावा लागेल!

वरील दोन बाबीदेखिल नियोजित संस्थळावर टाकल्यात, तर तो अधिक परिपूर्ण होईल, असे वाटते.

या नंतर प्रश्न येतो तो प्रसार आणि प्रचाराचा. माझ्या मते, सुरुवातीला तरी फक्त शहरी मध्यमवर्ग हाच नजरेसमोर ठेवावा. त्या-त्या विभागातील गृहसंस्थांच्या सेक्रेटरींना गाठावे. गृहसंस्थेतील रहिवाशांची एक छोटी सभा बोलवण्यासंबंधी बोलणी करावीत. शक्यतो रविवारी (वा सुट्टीच्या दिवशी) सभा ठेवावी. सभेपूर्वी किमान दोन दिवस आधी, प्रत्येक रहिवाशाकडे माहिती पत्रक पाठवावे.

प्रत्यक्ष सभेत कोणत्याही एका पक्षाचा/उमेदवाराचा प्रचार होणार नाही, हे पाहावे. आणि प्रत्येक रहिवाशास मतदानास जाण्यासंबंधी कळकळीची विनंती करावी.

अजून काही आठवल्यास जरूर कळवीन.

शुभेच्छा!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

2 Dec 2008 - 2:15 pm | ऋषिकेश

सर्वप्रथम धन्यवाद!
माझ्या डोक्यात या अनुषंगाने काहि मुद्दे आले ते असे
१. लोकोपयोगी कामांची यादी प्रत्येक पक्ष अगदी घराघरात वाटतो. तेव्हा ते लोकांना महित असते.
२. शिवाय असा विदा मोठ्या पक्षांतर्फे मिळू शकतो मात्र छोटे छोटे उमेदवार, अपक्ष वगैरेंकडून असा विदा मिळायला खूप मोठी यंत्रणा लागेल
३. याशिवाय यात चुकूनहि चुकीची माहिती दिली गेली तरी कायद्याच्या कचाट्यात पूर्ण प्रकल्प अडकू शकतो तेव्हा आपण म्हणता तसे पडताळाणीचे काम करायला अजून एक पूर्णवेळ यंत्रणा लागेल

मला तर घोषित सरकारी माहितीही एखाद्या ठिकाणी देणे कायद्यात बसते की नाहि याची अजून खात्री झालेली नाहि :(

प्रचार प्रसारावेळी आपण सुचवलेले उपाय रास्त व उपयुक्त वाटले. एखाद्या/काहि एन्जीओंशी संपर्क साधून असे काम करता येईल.

आपल्यालला अजून / पुरक सुचेल ते जरूर कळवा.. जितके विचार, मार्गदर्शन मिळेल तितके उत्तमच आहे

जागोरे हे ह्याप्रकारे जालावरून लोकोपयोगी कार्य करणारे संस्थळही बघा.. मला आवडले.. त्यांना याकामी संपर्क करावा का आहेचर्चेचा मुद्दा आहे

-(गोंधळलेला) ऋषिकेश

mungi's picture

3 Dec 2008 - 12:08 pm | mungi

स्वरूपात साइट तयार केल्यास उमेदवारान्ची माहिति लोकान कडुनच घेता येइल.

पक्या's picture

3 Dec 2008 - 2:01 pm | पक्या

ऋषिकेश ,अदिती ...स्तुत्य उपक्रम.
वरील प्रतिसादातील ऋषिकेश चे मुद्दे बघता आणि तात्यांचा प्रॅक्टीकल विचार बघता प्रकल्प अशक्य नसला तरी वाटतो तितका सोपा नाही. पण तरीही सुरवात कुठेतरी व्हायलाच हवी हे पटतयं.

उमेदवारांची अगदी सखोल नसली तरी बेसिक माहिती एकत्रित मिळाली तरी खूप फायदा होईल. ऍटलिस्ट कोण गुंड्प्रवृत्तीचा आहे कोण जरा बरा आहे हे तरी एका क्लिक द्वारे कळेल.
सुरवात म्हणून याच संदर्भात एखादी साखळी मेल लिहून ती अनेकांना फारवर्ड करता येईल.

साईट तयार झाल्यावर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी साईट वरील माहितीची प्रिंट आउट काढून त्याच्या कॉपीज संगणक-अशिक्षित लोकांना वाटाव्यात. सर्वच लोक वाचतील असे नाही पण काही लोक तरी नक्की वाचतीलच.

सुनील's picture

3 Dec 2008 - 3:52 pm | सुनील

निवडणूकांना अद्याप काही महिने अवकाश आहे. निवडणूका जाहीर झाल्यानंतर, काही काळांनंतर विविध पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करतात. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूकांना जेमतेम महिना-सव्वा महिनाच उरलेला असतो.

या ४-५ आठवड्याच्या काळात, जाहिर झालेल्या उमेदवारांची माहिती गोळा करणे, त्याची छाननी/पडताळणी करणे, ती संस्थाळवर चढवणे आणि त्याचा प्रचार्-प्रसार करणे ही कामे आटोपायची तर त्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागेल.

तेव्हा पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी आताच करायला सुरुवात केल्यास उत्तम.

१) नियोजित संस्थळाच्या नावाचे नोंदणीकरण.
२) संस्थळाचा कच्चा आराखडा - उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्याविषयी साधारणतः कोणत्या प्रकारची माहिती उपलब्व्ध केली जाईल, त्याचा गोषवारा.
३) शहरी मध्यमवर्ग लक्षणिय संख्येने असलेल्या निवड़क मतदारसंघांची सुची (सुरुवातीला केवळ याच मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करावे, असे सुचवावेसे वाटते).
४) या निवड़क मतदारसंघातील विविध पक्षातील संभाव्य उमेदवारांच्या संबंधीतील विदा गोळा करण्यास सुरुवात.

एकदा ह्या गोष्टी झाल्या की, रहिवाशांच्या छोट्या सभा घेण्यास सुरुवात करावी. त्यासाठी निवडणूका/उमेदवार जाहीर होण्याची वाट बघायची गरज नाही. मात्र रहिवाशांना संस्थळाचे नाव देण्यास तसेच रहिवाशांचा इ-मेल नोंदवून घेण्यास विसरू नये. ह्या सर्व इ-मेल्सचा एक छान डेटाबेस तयार होईल, तो संस्थाळाच्या अपडेटविषयीची माहिती पुरवण्यास उपयोगी येईल. दरवेळेस सभा घेणे शक्य होणार नाही.

असो, उंटावरून फार शेळ्या हाकलल्या. आता थांबतो!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रुपेश सातारकर's picture

5 Dec 2008 - 3:56 pm | रुपेश सातारकर

केवळ बदलेल म्हणुन वाट पहाणे योग्य नाहि.....................
सुरवात तर नक्की करु..............

रुपेश (सातारकर.......)

इनोबा म्हणे's picture

5 Dec 2008 - 4:31 pm | इनोबा म्हणे

आमची मदत लागली तर सांगा भौ! बाकी चर्चा कट्ट्यावर करुच. आमचा हातभार लागल्यास आम्हाला ही बरे वाटेल.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भडकमकर मास्तर's picture

5 Dec 2008 - 4:56 pm | भडकमकर मास्तर

कल्पना उत्तम आहे...
काहीच न करण्यापेक्षा कुठूनतरी सुरुवात होणे महत्त्वाचे...

उमेदवार जाहीर झाल्यानंतर हे काम करायला वेळ खूप कमी असेल हे सुनील यांचे म्हणणे पटते...
माझ्याकडून शक्य ती मदत मी करायला तयार आहे...

अशीच संस्थळे लोकप्रतिनीधीवर निवडणुकीनंतरही जबाबदार राहण्यास, दबाव ठेवण्यास उपयोगी पडावीत असे वाटते,
( हे कितपत शक्य आहे माहित नाही पण मी आशावादी आहे आणि प्रयत्न केला पाहिजे असे मनापासून वाटते)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

झकासराव's picture

6 Dec 2008 - 4:52 pm | झकासराव

हम्म.
चांगली योजना आहे.
सध्या ह्या योजनेचा स्कोप सध्या लिमिटेड असला तरी, अशी माहिती लोकांसमोर येण हे प्रथमच होत आहे.
ह्यातुन नेमक काय साध्य करायच आहे हे उद्दीष्ट आपल्या नजरेसमोर हवय पण.
नुसती माहिती देवुन काय होइल किंवा ह्या माहितीचा काय उपयोग होइल सर्वाना हे पटवुन देण गरजेच आहे.
ह्यासोबतच फॉर्म १७-ए (की ४९-ओ) ह्याची माहितीदेखील लोकांपर्यंत पोचवता येइल.
ह्या फॉर्मच बटन मतदान यंत्रातच असाव अशी सुविधा करण्यासाठी आपण निवडणूक आयोगाला विनंती करु शकतो का??
(ओन्लाइन स्वरुपात सगळ्यांच्या नावानीशी. जस अब्दुल कलाम हेच परत राष्ट्रपती असावेत ह्यासाठी एक ओनलाइन पिटिशन होत, किंवा अलिकडेच न्युज चॅनेलवाल्यांविरुद्ध असलेल पिटिशन)
ह्यासाठी मिडिआ जसे की वर्तमानपत्र, रेडिओ (प्रायव्हेट चॅनेल्स रेडिओ मिर्ची सारखे) , किंवा न्युज चॅनेल्स मधुन प्रसिद्धि देता येइल.
(ह्यासाठी आपापले असलेले वैयक्तिक संबंध देखील वापरता येतील.)
अजुन काहि आठवल तर नक्की सांगेन.
मी अजुन कशाप्रकारे मदत कसु शकतो???
मला संगणक आणि त्या क्षेत्रातील ज्ञान शुन्य आहे.
व्यनी करतो.

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सखाराम बाइंडर's picture

1 Jan 2009 - 9:30 am | सखाराम बाइंडर

सर्व वाचाळवीरांना २००९ च्या शुभेच्छा
:D

गझनी महात्मा

सुनील's picture

1 Jan 2009 - 9:37 am | सुनील

अरे डॉन्या, तू जर खरोखरच "खरा" असशील तर नाव का लपवतोयस?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गोगोल's picture

1 Jan 2009 - 7:33 pm | गोगोल

खर म्हणजे हा हल्ला व्हायचया आधी मी माझ्या एका मित्राला खालील पत्र लोकसभा निवडणुकिनसम्बन्धी ११/०८/२००८ ला पाठवल होत.
---------------------------------------------------------------------------

How about creating a website where we keep track of each candidate?
What did they promise before the elections and how much did they really achieve?
An objective evaluation of everyone. Not just for this election but
for many more to come.
We could probably also include candidate which are currently ruling
and there achievements.
That way people can look up and see what did these people have really
achieved. And even though right now not many people are connected to
net, in 10 years down the line, many people might be able to do so.
That time it will really make a difference. It will also keep pressure
on candidates to really achieve something as it creates a sense of
competition.

गोगोल's picture

1 Jan 2009 - 9:00 pm | गोगोल

पत्रतल्या घाणेरड्या ईन्ग्रजिबद्दल माफी असावी. रात्रि झोपेत खरडलय :(