एक योजना
नमस्कार मंडळी
गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे.
एकूणच सगळ्यावर मी आणि अदिती इतरांप्रमाणेच दु:खी होतो.. हे सारं करताना काहितरी करायला हवं हे जाणवत होतंच.. नक्की काय करावं हे मात्र समजत नव्हतं...यातूनच खरडा खरडी चालु झाली... हे सगळं बदलायचं तर आहेच.. पण कसं?
अनेक उपाय आहेत.. उपाय असु शकतील....पण कुठून तरी सुरूवात झाली पाहिजेच..
सुदैवाने लोकशाहिचा "बदल "हा पाया आहे. यासाठी कोणत्याहि यादवीची गरज नाहि.. गरज आहे एका मताची.. एका विचारपूर्वक दिलेल्या मताची..
पण हा विचार कशाच्या आधारावर करणार, आणि सगळे प्रतिनीधी इथून तिथून सारखेच!!... पण खरंच सगळे इथून तिथून सारखेच? आमच्या मते नाहि. लोकांना आपल्या मतदारसंघात निवडणूकीला कोण उभं आहे हे देखील माहित नसतं.. त्याची पात्रता तर सोडाच!!
मग लोकांना जर सहजतेने- विषेश कष्ट न करता -कळलं की मतदारसंघात कोण उभे आहे तर निकाल वेगळे लागू शकतात. या अश्या विचारांतून डोक्यात एक योजना उभी राहिली आहे.
प्रतिनीधींबद्दलची माहिती योजना
या अंतर्गत अशी वेबसाईट तयार केली जाईल ज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा/लोकसभा निवडणूकीसाठी कोण उभे आहे, आणि त्या प्रत्येकाची विस्तृत माहिती दिली जईल. या माहितीत ढोबळपणे: नाव, जन्मस्थान, घोषित मिळकत, घोषित स्थावर, पुर्वरेकॉर्ड, अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड (खरंतर बोलता येणार्या भाषा ही , पण त्या गोळा कशा करणार?)!! थोडक्यात अशी माहिती ज्यावरून लोकांना त्यांचा निर्णय घेता येईल.
या योजनेचे मुख्यत्त्वे करून ४ भाग करता येतील
१. मराठी व इंग्रजी अश्या दोन भाषांत साईट बनवणे [तांत्रिक बाजू]
२. विदा संकलन (निवडणूक आयोगाकडून काहि माहिती प्रकाशित होते, त्याच बरोबर माहितीच्या अधिकारा अंतर्गत बाकीची महिती शोधणे)
३. विदा संगोपन (विदा वेळोवेळी अपडेटेड ठेवणे)
४. प्रचार आणि प्रसार
असे डोक्यात आले की नुसत्या साईटने काम होणार नाहि कारण शहरी भाग सोडल्यास इतरांना जालाचा ऍक्सेस नाहि.
त्यासाठी काहि पर्यायः
१. एकदा साईट बनली की या कामात वेगस्वेगळे एन्जीओ, प्रभावी व्यक्ती वगैरेंची मदत घेता येईलसे वाटते..
२. दुसरा पर्याय सध्यातरी टार्गेट ऑडीयन्स फक्त जालावरील मतदार ठेवायचा.. पुढचं पुढे
हा केवळ डोक्यात आलेला विचार आहे.. अधिक चर्चेने विस्तार करता येईलच. त्यासाठीच हा काथ्याकूट
अर्थातच हे काम एकट्याचे नाहि. तेव्हा
- प्रत्येकाची मदत तर लागेलच
- या शिवाय जर अशी सुविधा जालावर असेल तर पुन्हा करण्यात काहिच पॉइंट नाहि. तेव्हा अशी सुविधा पाहण्यात माहितीत असेल तर कळवा
- मला या संबीधीचा कायद्याचा अँगल माहित नाहि. अशी माहिती गैरसरकारी व्यक्तीने / समुहाने देणे कायद्यात बसते का??.. हे कोणी शोधू शकले तर उत्तम
वाचने
10894
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
ऋषिकेश आणि
माफ कर
In reply to माफ कर by विसोबा खेचर
तात्या,
चांगली योजना
बदल
+१
उत्तम सुरुवात!
अदिती
माझा पाठींबा राहील
In reply to माझा पाठींबा राहील by घाशीराम कोतवाल १.२
आणी तात्या
In reply to आणी तात्या by विसोबा खेचर
आभार
In reply to माझा पाठींबा राहील by घाशीराम कोतवाल १.२
आणी तात्या
पूर्ण सहमत.
In reply to पूर्ण सहमत. by राघव
विदागर
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
वा मग बोला कधी सुरुवात करताय
माझा वाटा
In reply to माझा वाटा by नीलकांत
जरूर
In reply to माझा वाटा by नीलकांत
इफ
ऋषिकेश,
चांगल्या कामासाठी शुभेच्छा
अभिनंदन
चांगली सुरुवात
उत्तम
उत्तम
काही सुचवण्या
In reply to काही सुचवण्या by सुनील
धन्यवाद :)
विकिपिडिया
स्तुत्य उपक्रम
सुरुवात केव्हा करावी?
छान विषय.........
छान उपक्रम आहे.
कल्पना
हम्म. चांगल
सर्व
In reply to सर्व by सखाराम बाइंडर
?
दादा माला पण घ्या ना :)
In reply to दादा माला पण घ्या ना :) by गोगोल
सॉरी!!