प्रेरणा सामंतांची कविता "खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव"
फेसाळत्या सागरतीरी सांज घेते ठाव
बोटीतून आलास इथे कोण तुझे गाव
कुठे मारी गोळ्या कधी उठे बाँबची गाज
सांग गड्या ! कभिन्न रात्र संपेल का रे आज
सण सण सटासट मारिशी गोळ्या
रक्त बघुन बांधवांचे पाणी आले डोळा
नको रे भ्याडा! लपू तू असा हॉटेला मधे
खेचून काढू आसशील तेथून आता तुझे मढे
आवर रे ! सागरा आता तुझी खळ्खळ
संपवू कायमची या शेजार्यांची मळमळ
संपवल्यावीना नका ठेवू शस्त्र आता खाली
मोक्ष यांना देण्याची वेळ आता आली
कवटी
अवांतर : सद्यपरीस्थीतीत कविता अप्रकाशीत करावी लागल्यास माझी हरकत नाही.
प्रतिक्रिया
28 Nov 2008 - 11:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरं आहे रे जे तू लिहिलं आहेस, कवटीभय्या! किती रक्त अजून सांडणार आहे कोण जाणे!