मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

जलाशय

Primary tabs

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
12 Jan 2021 - 1:01 pm

आलो परतुनी आणखी
जाहलो जुना जरी
अजून माझा जीव तरंगे
पाचूच्या पाण्यावरी

गारवा असा त्याचा की
भिडतो आत्म्यास थेट
वितळते जग अवघे
मीच एक तरंगते बेट

तिरप्या कोनातूनी येई
सुवर्ण प्रकाश शलाका
स्पर्षता पाण्यास गारठे
कवडसे जणू मूक हाका

बाजूस एका आत्ममग्न
संतत स्फटीकधार सांडते
घुमते गव्हारात उन्हाच्या
संगीत हाकांस लाभते

का अजून मी अडकलो
तिथेच मनाने ना कळे
बहुदा आठवती शांत ते
तुझे जलाशयासम डोळे

-अनुप

कविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 1:05 pm | मुक्त विहारि

आवडले

अन्या बुद्धे's picture

12 Jan 2021 - 10:34 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!