सामान्य माणूस....

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
10 Dec 2020 - 11:11 am

सामान्य माणूस...

वर्गात लोकं म्हणती स्कॉलर,
जपतो आमची स्वच्छ कॉलर,
सहसा नशिबी नसतात डॉलर,
खिशात फक्त ओंजळभर चिल्लर...

रांगोळीत आमच्या सजते,
आकांक्षांची नक्षी,
स्वप्नांच्या झाडावर रोज,
नव्या इच्छांचे पक्षी...

मनातल्या नकाशावर,
आयुष्याची रूपरेखा,
वाळूत काढतो रेषा,
ते आम्ही पांढरपेशा...

सुख दुःखाच्या प्रसंगी,
आम्हा सोडत नाही चिंता,
डोळ्यासमोर सतत फिरतो,
महागाईचा वरवंटा..

कोणतीही असो दशा,
आम्ही सोडत नाही दिशा,
कर्तृत्वाला झळाळी देते,
आमच्या मनातली आशा..

गरजा कंठशोष करून सांगतात,
तू क्षणभर नको थांबूस,
छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो,
"मी सामान्य माणूस"....!

जयगंधा...
१०-१२-२०२०.

कविता

प्रतिक्रिया

गोंधळी's picture

21 Dec 2020 - 8:54 pm | गोंधळी

सहसा नशिबी नसतात डॉलर, अमेरीकन सा.माणूस?

प्रचेतस's picture

22 Dec 2020 - 9:57 am | प्रचेतस

यमक जुळवून केलेली कविता :)