महिला दिन शुभेच्छा

.

इव्हेंट होरायझोन : खूप चांगला भयपट

Primary tabs

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
19 Oct 2020 - 6:55 am

स्पेस होरर हा भयपटांचा प्रकार मला विशेष प्रिय आहे. नेहमीच्या भूता खेतांच्या चित्रपटा पेक्षा येथील भय हे वेगळ्या प्रकारचे असते. आवर्जून बघावे असे स्पेस हॉरर चित्रपट अनेक आहेत ह्यांतील एलियन हि सिरीज मला विशेष प्रिय आहे. पण इव्हेंट होरायझोन हा चित्रपट (एलियन सिरीज मधला नसला तरी) खरोखर सुरेख आहे.

इव्हेंट होरायझोन हे पृथ्वीवरील एक स्पेस क्राफ्ट दुसऱ्या आकाशगंगेंत पाठवले जाते आणि अचानक गायब होते. सात वर्षांनी सौरमालिकेच्या बाहेर अचानक हे यां प्रकट होते आणि पृथीवर एक सिग्नल पाठवते. ह्या यानाची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवली जाते. इव्हेंट होरायझोन यान बाहेरून व्यवस्थित असले तरी आंत कोणीच जिवंत नसतो. नक्की काय घडले हे पाहण्यासाठी अवकाशयात्री व्हिडीओ लॉग पाहतात, त्यांत इव्हेंट होरायझोन चा संपूर्ण क्रू एक मेकांशी संभोग करत एकमेकांची हत्या करत आहे आणि आपले डोळे स्वतःहून खेचून बाहेर काढत आहे असे दृश्य पाहायला मिळते. ते पाहून सर्वच जण हादरून जातात.

इव्हेंट होरायझोन यानावर एक गुप्त तंत्रज्ञान (ग्रॅव्हिटी ड्राईव्ह) असते आणि त्याद्वारे दुसऱ्या विश्वांत प्रवेश करण्यासाठी वर्म होल निर्माण करण्याची शक्ती असते. ह्या वर्म होल मधून हे यान दुसऱ्या विश्वांत गेले होते आणि हे विश्व एक नरका प्रमाणे होते. इथे ह्या यानाला स्वतःचा असा जीव प्राप्त झाला आणि ते पुन्हा आमच्या सौरमालेंत प्रकट झाले. हळू हळू अवकाश यात्रींना ह्या यानावर भास होऊ लागतात, विचित्र अपघात होतात आणि शेवटी त्यांचे मूळ यान नष्ट होऊन सर्वजण इव्हेंट होरायझोन वर अडकतात.

पुढे काय होते हे मी सांगून रसभंग करत नाही पण कथा सोपी वाटली तरी ज्या पद्धतीने ती मंडळी जाते त्यातून दर्शकांना विविध प्रकारचे क्लस्सिक स्पेस भय चकित करणारे क्षण अनुभवायला मिळतात.

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

19 Oct 2020 - 8:51 am | कानडाऊ योगेशु

कुठे पाहायला मिळेल?

सत्य धर्म's picture

20 Oct 2020 - 3:00 pm | सत्य धर्म

कुठे पाहायला मिळेल?

नीलस्वप्निल's picture

21 Oct 2020 - 1:13 am | नीलस्वप्निल

कुठे पाहायला मिळेल?

नेत्रेश's picture

21 Oct 2020 - 3:46 am | नेत्रेश

हा खुप जुना चित्रपट आहे, १९९७ ला प्रदर्शीत झाला आहे. फारसा चालला नाही.

साहना यांनी खुप चांगले लिहीले आहे, पण चित्रपट पाहील्यावर अपेक्षाभंगाची शक्यता जास्त आहे.

सोत्रि's picture

21 Oct 2020 - 5:58 pm | सोत्रि

ट्रेलर बघितल्यावर असंच वाटलं!

-(सिनेमाप्रेमी) सोकाजी

कपिलमुनी's picture

21 Oct 2020 - 2:17 pm | कपिलमुनी

चित्रपट आवडला नाही .
लेख उत्तम आहे.

तुषार काळभोर's picture

22 Oct 2020 - 7:42 am | तुषार काळभोर

दोन वर्षांपूर्वी पाहिला होता. चांगला विषय पण चित्रपट एवढा खास नाही. भितीदायक तर अजिबात नाही. सस्पेन्स सुद्धा तितकासा नाही. कदाचित टिव्हीवर पाहिल्यामुळे तसं वाटलं असावं.