पाऊस मनातला
पाऊस आठवणीतला
पाऊस तुषारांचा
पाऊस वळवाचा
पाऊस कडाडणाऱ्या विजांचा
पाऊस घनगर्द काळ्या नभाचा
पाऊस सरींवर सरींचा
पाऊस भरून वाहणाऱ्या नद्यांचा
पाऊस खळाळत येणाऱ्या ओढ्यांचा
पाऊस धबधब्यातून कोसळणारा
पाऊस निसर्गात भरून राहिलेला
पाऊस छत्रीच्या किनारीवरून ओघळणारा
पाऊस भिजलेल्या कपड्यांच्या वासाचा
पाऊस झाडाखाली थांबलेला
पाऊस पत्र्यावर टपटपणारा
पाऊस सर्द काडेपेटीतला
पाऊस मिठालाही पाझर फोडणारा
पाऊस पापडाला मऊ करणारा
पाऊस चपलेतून पाय सटकवणारा
पाऊस वस्त्रे उंचावून चालवणारा
पाऊस ओले केस निथळणारा
पाऊस कौलांवर शेवाळ पांघरणारा
पाऊस
डोळ्यातलं पाणी
हलकेच मिसळून घेणारा
प्रतिक्रिया
17 Oct 2020 - 2:08 pm | गणेशा
पाऊस
डोळ्यातलं पाणी
हलकेच मिसळून घेणारा
__^__
छान
1 Dec 2020 - 11:46 pm | छोटा चेतन-२०१५
शेवटची ओळ
क्या बात है!
सुंदर