दिवाळी अंक २०२० - आवाहन

यंदाचा मिपा दिवाळी अंक असणार आहे 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक'!. प्रेमाची, शृंगाराची, रोमान्सची इतकी रूपं, इतक्या छटा, इतके रंग... तर या प्रेमावर तुमच्या लेखांची, अनुभवांंची, कथांची, कवितांची आम्ही वाट पाहतोय.

लेखन देण्याची मुदत : २५ ऑक्टोबर, २०२०.

दिवाळी अंक २०२० - आवाहन

जमतारा (की जामतारा) पॅटर्न : कॅशबॅकच्या नावाखाली लुटीचा नविन प्रकार

Primary tabs

सॅनफ्लॉवर्स's picture
सॅनफ्लॉवर्स in जनातलं, मनातलं
22 Sep 2020 - 6:14 pm

(बरेच वर्ष मिसळपावचा सभासद आहे पण लिहिण्याचा योग आज आला. काही शुद्धलेखण्याच्या चुका असतील तर जरून सांगा. मी हे लेखन गूगल इनपुट टूल वापरून केलेलं आहे जे मला खूपच सोपं वाटत. पण नंतर गमभन टंकलिपी वापरुन पाहिली, तीपण सोपी आहे वापरायला, त्यामुळे यानंतरच लेखन तेच वापरुन करेन. )

आजचा (18 सप्टेंबर 2020) माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला अज्ञात क्रमांकावरून फोन आला की तो मुंबईतील फोनपे मुख्य कार्यालयातून कॉल करीत आहे आणि मला काही फोनपे कॅशबॅक मिळाली आहे पण त्यासाठी त्याला माझ्याकडून काही माहिती हवी आहे. भाषा खूप सभ्य होती परंतु इंग्रजी खूपच खराब होती. मी यापूर्वी अशा बनावट कॉलबद्दल ऐकले होते त्यामुळे मला त्या घटनांची आठवण झाली. जेव्हा मी अधिक चौकशी केली आणि त्याला वरिष्ठांकडे कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले तेव्हा त्याने प्रथम टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा मी आग्रह केला तेव्हा त्याने मला कॉल चालू ठेवण्यास सांगितले आणि त्याच्या वरिष्ठांना कॉन्फरेन्समध्ये घेतो असे म्हणाला. थोड्या वेळाने, त्याचे वरिष्ठ (तथाकथित ?? ) ऑनलाइन आले. मी सहज म्हटले की त्याचा नंबर मुंबईबाहेरचा आहे का, मग तो म्हणाला कंपनीच्या धोरणानुसार ही माहिती देऊ शकत नाही. तो कोण आहे हे विचारल्यावर पहिल्या व्यक्तीने त्याच्या मागच्या बाजूला काही वाईट शब्द कुजबुजले आणि शेवटी त्यांनी कॉल कट केला आणि त्यानंतर काही काळ फोन उचलला नाही. बराच वेळ फोन करून पाहिला तर ती मोबाइलमधली बाई बंगाली भाषेत सांगत होती कि हा माणूस बिझी आहे . कॉल उचलल्यावर त्याने खूप वाईट अपशब्द वापरण्यास सुरवात केली कारण त्याची युक्ती अयशस्वी झाली होती. जेव्हा मी त्याला म्हणालो कि पैसे कमावण्यासाठी काम का करत नाही तेव्हा तो म्हणाला की तेच तर करत आहे. त्याने मला प्रतिप्रश्न केला कि तुम्ही तर नाही अडकलात ना या सगळ्यात मग कशाला या चौकश्या करत आहात .

हे कॉलर सामान्यत: जामतारा, बिहार किंवा झारखंड येथून कॉल करतात आणि अमुक-अमुक कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बोलतोय. मग तुम्हाला सांगतात कि तुम्हाला फोनपे किंवा पेटीएम अकाउंट वर कॅशबॅक आली आहे आणि ते खात्यामध्ये वळते करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कन्फर्म कराव्या लागतील. त्यानंतर ते तुम्हाला ते ऍप ओपन करायला सांगतात ज्यावर एक लिंक आलेली असते जी कि खरं तर या लोकांनीच पेमेंट रिक्वेस्ट म्हणून पाठविलेली असते. तुम्ही ती लिंक ओपन केली कि ते तुम्हाला तुमचा पासवर्ड मागत जो कि तुमचा युपीआय चा पासवर्ड असतो. आणि तो टाकल्यानंतर तुमच्या अकाऊंटवरून पैसे त्यांच्या अकाउंटला जातात. (यासारखे अजून बरेच प्रकार आहेत, हा फक्त नमुनादाखल दिला आहे.)

यूट्यूब.कॉमवर या विषयावर बरेच व्हिडिओ आहेत. मी अशा एका व्हिडिओची लिंक दिली आहे.
https://youtu.be/ynmbCRECZso

आपल्या परिसरात, शहरात किंवा खेड्यात, असे बरेच गरीब नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकही आहेत, जे अशा भुलाव्याला बळी पडतात आणि त्यांच्या खात्यावर यूपीआय व्यवहार करून लुटले जातात. मग त्यांच्याकडे पोलिसांना द्यायलासुद्धा भक्कम पुरावा नसतो. असं सगळं करून हे लोक रोज 10000-20000 मिळवतात. तर कृपया अज्ञात क्रमांकावर कोणताही ओटीपी, पिन, आधार किंवा पॅन तपशील देऊ नका.

मी हे प्रकरण सायबर सेलकडे दाखल करण्याचा विचार करीत आहे. त्याच पुढे काय होत ते पाहूया. अजून कुणाला असा अनुभव आला असल्यास कळवावे आणि त्यावर काय उपाय केला तेसुद्धा सांगावे.

पुढच्यास ठेच ,मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे समस्त वाचकांनी यापासून योग्य तो धडा घ्यावा यासाठी हा सारा लेखनप्रपंच.

आपला नम्र
सॅनफ्लॉवर्स

समाजअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Sep 2020 - 7:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

माझा अनुभव--

मी काही महिन्यांपुर्वी ओ एल एक्स वर एक वस्तू विकायला टाकली होती. बरेच दिवस ती विकली जात नव्हती, शेवटी एक दिवस एक कॉल आला जो माणुस ती वस्तू थोडी घासाघीस करुन विकत घ्यायला तयार झाला. भाषा ग्रामिण हिंदी (वॉचमन टाईप माणुस). मी त्याला प्रत्यक्ष येउन घेउन जा म्हणुन सांगितले. पेमेंट कसे करु म्हणाला तर कॅश्/गूगल पे काहिहि चालेल म्हणालो. तो मात्र गूगल पे करायला लगेच तयार झाला. वस्तू जाण्याच्या आनंदात मीही फार चिकित्सा केली नाही.

पुढे त्याने मला माझा स्कॅन कोड पाठवायला सांगितले. मी सहसा गूगल पे ने पैसे दिले आहेत घेतले नाहित त्यामुळे मी जरा बावचळलो पण कोड पाठवला. मग त्याने मला एक रिक्वेस्ट पाठवली आणि क्लिक करा म्हणजे पैसे "क्रेडिट" होतील म्हणाला. मी ती क्लिक करणारच होतो तितक्यात मला "डेबिट" शब्द तिथे दिसला. मेसेज पुन्हा पुन्हा नीट वाचला, ती डेबिट्ची रिक्वेस्ट होती. एक क्षण विचार केला नसता तर मला चुना लागला असता. फोन करुन त्याला घाल घाल शिव्या घातल्या. मात्र सायबर सेल वगैरे भानगडी करत बसलो नाहि.

आज काल पेटी एम अपग्रेड करायच्या बहाण्याने लुटयचे पण बरेच प्रकार ऐकु येताहेत.
आता तर काय--आपला सगळाच डेटा चायनाला जातोय म्हणे, थोडक्यात पुन्हा लँडलाईन, पोस्ट पत्रे आणि कॅश् कडे वळायची वेळ आलीये.

सॅनफ्लॉवर्स's picture

23 Sep 2020 - 11:20 am | सॅनफ्लॉवर्स

हे सगळे उदाहरणादाखल दिलेले आहे. काळ बदलला तसा लोकांना लुटण्याचे प्रकार पण बदलले.

धन्यवाद. लेखामुळे इतर लोकही सावध राहतील.

ज्येष्ठ नागरिक, आताच स्मार्टफोनकडे वळलेले फसतात याचे कारण ती लिंक पुढे येते व त्याला टच केल्यावर लगेच माहिती ट्रान्सफर होते.
ओटीपी येणाऱ्या नंबरचे सिम कार्ड दुसऱ्या एका साध्या फोनमध्ये ठेवून वापरणे योग्य ठरेल. त्यासाठी आणखी एक सिम आणि नंबर घ्यावा लागतो. पण कुटुंबात एक असे ठेवता येईल आणि नेटबँकिंगच्या फ्रॉडमधून सुटका होईल. त्या दुसऱ्या सिमचे महिना पन्नास रुपये भरून नंबर चालू ठेवणे हा खर्च येतो. सुरक्षिततेचा विचार केल्यास हा खर्च वाया नाही.

तुम्ही सुचवलेला दुसर्या सिमचा पर्याय पण चांगला आहे.

अज्ञात क्रमांकावरून फोन आला

घरच्या फोनमध्ये landline? , मोबाइलमध्ये कॉल आला पण नंबर दिसत नाही?

सॅनफ्लॉवर्स's picture

23 Sep 2020 - 9:32 am | सॅनफ्लॉवर्स

मी मोबाईलवरुनच बोलत होतो पण तो नंबर माझ्याकडे सेव्ह नसल्यामुळे "Unknown" असे लिहिले आहे.

जिन्क्स's picture

22 Sep 2020 - 8:31 pm | जिन्क्स

ह्या विषयावर खूप छान series आहे netflix वर.
https://www.netflix.com/in/title/81183491?preventIntent=true

सॅनफ्लॉवर्स's picture

23 Sep 2020 - 11:15 am | सॅनफ्लॉवर्स

हो. मी पण ऐकुन आहे या सिरिज बद्दल.

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2020 - 12:39 pm | चौथा कोनाडा

मी या मालिकेचे काही भाग पहिले होते. उदबोधक आहे मालिका. फसवणार्‍या सर्व साखळ्या एकमेकांना सहकार्य करत त्वरेने कशी लुटमार करतात हे पाहण्यासारखे आहे ! स्वतःला दक्ष राहण्यासाठी अश्या माहितीचा फार उपयोग होतो !

सर्वोतो परी सावध राहणे हाच उत्तम उपाय !

वामन देशमुख's picture

24 Sep 2020 - 8:01 am | वामन देशमुख

फसवणुकीचे प्रकार घडत होते, आहेत आणि राहतील.
काल पल्प-कागद होते, आज इ-मीडिया आहेत उद्या अजून काही असेल.
सर्व काळांत फसवणारे, फसणारे, न-फसणारे लोक असतातच.

रच्याक, भारतातील काही शहरांच्या नावांचे योग्य उच्चार -
कोवळ्ळम, कोळीकोड, माणिकगढ़, जामताड़ा, छपड़ा, खड़गपूर, हावड़ा, खगड़िया...

Nitin Palkar's picture

25 Sep 2020 - 1:30 pm | Nitin Palkar

जम्तारा (जामताडा) फ्रॉडस या प्रकारातील हा फसवणुकीचा प्रकार(तुमच्या सावधानतेमुळे फसलेला). काही वर्षांपूर्वी नायजेरियन स्कॅम्स जोरात होते. वामन देशमुख यांनी लिहिल्याप्रमाणे सर्व काळांत फसवणारे, फसणारे, न-फसणारे लोक असतातच.
"मी हे प्रकरण सायबर सेलकडे दाखल करण्याचा विचार करीत आहे" --- मी अशीच एक तक्रार सायबर सेलकडे दाखल केली होती. तत्काळ त्याची पोच मिळाली. पुढे काय झाले काही माहित नाही. स्वतःच्या सावधानतेने माझेही कोणतेच नुकसान झालेले नसल्याने केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा मी केला नाही.

Nitin Palkar's picture

25 Sep 2020 - 1:31 pm | Nitin Palkar

जम्तारा (जामताडा) फ्रॉडस या प्रकारातील हा फसवणुकीचा प्रकार(तुमच्या सावधानतेमुळे फसलेला). काही वर्षांपूर्वी नायजेरियन स्कॅम्स जोरात होते. वामन देशमुख यांनी लिहिल्याप्रमाणे सर्व काळांत फसवणारे, फसणारे, न-फसणारे लोक असतातच.
"मी हे प्रकरण सायबर सेलकडे दाखल करण्याचा विचार करीत आहे" --- मी अशीच एक तक्रार सायबर सेलकडे दाखल केली होती. तत्काळ त्याची पोच मिळाली. पुढे काय झाले काही माहित नाही. स्वतःच्या सावधानतेने माझेही कोणतेच नुकसान झालेले नसल्याने केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा मी केला नाही.

मला पण गेल्या २-३ महिन्यात बरेच कॉल्स आले होते. पण टिपीकल भैया टोन ऐकुन सरळ समजल की स्पॅम कॉल आहेत आणि कट केले.
ट्रु कॉलर अ‍ॅप ची ही मदत होते ह्यासाठी बर्यापैकी. जर कोणी हे असे नंबर स्पॅम म्हणुन टॅग केले असतील तर ट्रु कॉलर स्पॅम नंबर म्हणुन दाखवतो स्क्रिन वर ...