॥ कृष्णतृष्णा ॥

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
15 Aug 2020 - 10:44 pm

इंद्रलोकीचे दिव्य फूल ते
द्याल मजला का श्रीहरी।
हट्ट पुरवण्या भामेचा मग
लावला पारिजात दारी ॥

क्षणिक ठरले सुख भामेचे
हरिस प्रिय मी रुक्मिणीहुनी।
गेले ते अवसान गळोनी
सडा पाहता तिच्या अंगणी ॥

प्रासादी ना रमली मीरा
प्रभूभजनी दंग जाहली।
मनी वरोनी गिरीधारिसी
विषप्यालाही सुखे प्याली॥

लावण्यासवे पाहुनी कृष्णा
कुब्जा लपवी शापित याैवन।
हरखुनी गेली उमगे जेव्हा
शाम होता तिजसाठी पण॥

रंगुनीया रंगात साऱ्या
एक झाला रंग अवघा ।
राधा होई का निळी हे
अजुनी न कळे श्रीरंगा॥

कदंबतळी रासलीलेचे
विलोभनीय दृश्य दिसे।
हरेक गोपिकेच्या संगे
कृष्ण दिसे...कृष्ण दिसे॥

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Aug 2020 - 4:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना
प्रस्तावनाही आवडली.

मी-दिपाली's picture

17 Aug 2020 - 3:37 pm | मी-दिपाली

धन्यवाद

गणेशा's picture

16 Aug 2020 - 5:00 pm | गणेशा

छान

मी-दिपाली's picture

17 Aug 2020 - 3:37 pm | मी-दिपाली

धन्यवाद

तुषार काळभोर's picture

16 Aug 2020 - 7:47 pm | तुषार काळभोर

कविता, शेवटचा प्रकटन व्हिडिओ आणि विशेषतः कवितेचं नाव - कृष्ण तृष्णा - आवडलं.

मी-दिपाली's picture

17 Aug 2020 - 3:37 pm | मी-दिपाली

धन्यवाद

अहाहा.. किती सुंदर निरुपणासह सादरीकरण आवडले.तुमची 'पंखा' झाले मी. :)

मी-दिपाली's picture

17 Aug 2020 - 3:36 pm | मी-दिपाली

धन्यवाद भक्ती. :)

Jayagandha Bhatkhande's picture

30 Oct 2020 - 3:26 pm | Jayagandha Bhat...

मस्त कविता.
खूssप आवडली..

प्राची अश्विनी's picture

30 Oct 2020 - 8:18 pm | प्राची अश्विनी

सुरेख रचना!

माहितगार's picture

31 Oct 2020 - 7:13 pm | माहितगार

सुंदर काव्य रचना सुरेख काव्य वाचन.

मिपावर आणि इतरत्रही स्त्री कवियत्रींच्या कृष्ण विषयक दर्जेदार काव्य वाचनात येते त्यातील काही कवितांचे तरी एकत्रित रसग्रहण वाचनाचा योग यावा अशी इच्छा आणि आशा या निमीत्ताने नोंदवावीशी वाटते .