नक्की प्रॉब्लम काये ?

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
31 May 2020 - 4:08 pm

एकतर २/४ जण सोडले तर इथे कुणाशी व्यक्तिगत ओळख नाही. त्यात फक्त २ जण मला प्रत्यक्ष भेटलेत. त्यात एक माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि दुसर्‍याशी आंतरजालीय ओळख आहे.

सांगायचं कारण असं की फोकस कायम लेखनावर आहे.
कुणाशीही व्यक्तिगत मित्रत्व किंवा शत्रुत्व नाही.

____________________________________________

१. देवभोळे लोक :

जगातले ९०% लोक देवभोळे आहेत. संकेतस्थळ हा त्याच समाजाचा फोरम आहे.

देव ही मानवी कल्पना आहे आणि मेंदूपलिकडे त्याला काही अस्तित्व नाही. अस्तित्व रहस्यमय आहे पण ते स्वयंभू आहे.
थोडक्यात ते चालवणारा असा कुणी नाही.

देव ही कल्पना आहे म्हटल्यावर हे ९०% लोक खवळतात.
त्यांना वाटतं आपण इतके दिवस काय झक मारली की काय ?
पण वरकरणी ते दाखवतात की हा श्रद्धेचा प्रष्ण आहे.
श्रद्धा म्ह्टल्यावर लॉजिक खलास, विषय संपला !

वास्तविकात देव या कल्पनेमुळे मानवता अनेकानेक धर्मात विभागली गेली आहे.
आणि ती कल्पनाच धर्मविस्तार आणि परिणामी अनेक युद्धांचं कारण आहे.
अशा युद्धांमुळे मानवतेचं अतोनात नुकसान झालं आहे.

देवभोळ्यांना ही उघड गोष्ट मंजूर नाही.
आपली ती खरी श्रद्धा आणि दुसर्‍याची ती अंधश्रद्धा ही प्रत्येकाची धारणा आहे.

प्रत्येक धर्म ही खरं तर स्वरुपाचा उलगडा करण्याची प्रणाली आहे.
तस्मात, वरुन भिन्नता दिसली तरी धर्माचं अंतीम प्रयोजन साधकाला स्वरुपाप्रत आणणं आहे.

सांगायचं कारण असं की वरची एकही गोष्ट लक्षात न घेता देवभोळे लेखनावर तुटून पडतात.
अर्थात, कल्पनेचा वास्तविकतेपुढे काय पाड लागणार ?
परिणामी ते निरुत्तर होतात.

मग हेकेखोर, पढत मूर्ख, स्वतःला शहाणा समजणारा... अशा बिरुदावली लावल्या जातात.

थोडक्यात, जिथे फोरमवर वस्तुनिष्ठ चर्चा व्हायला हवी तिथे आखाडा तयार होतो.
____________________________________________

२. नाम, जप, परिक्रमा.........

एकदा देव ही कल्पना आहे म्हटल्यावर तदनुषंगिक सर्व गोष्टी केवळ टाईमपास होतात.

पण वर्षानुवर्षे या गोष्टीत रमलेले तंद्रीतून बाहेर पडायला राजी होत नाहीत.

इथे पोथ्याच्या पोथ्या, परिक्रमेच्या लेखमाला आणि भक्तीमार्गियांचे भावूक लेख आणि कविता टाकल्या जातात.

त्यावर भाविकांचे भावविभोर प्रतिसाद चालू होतात.

आता जरा काही वास्तववादी बोललं की येळकोट सुरु होतो.

कसा निर्माण होणार वैज्ञानिक दृष्टीकोन ?
का त्याची देशाला गरजच नाही ?

___________________________________________

३. राजकारण

सरकार ही एक सर्विस प्रोवायडर संस्था आहे.
प्रत्येक सेवा आणि वस्तुवर जनता जो कर देते त्यातून जनहीताची कामं करणं हे सरकारचं एकमेव काम आहे.
फक्त इन्कम टॅक्स भरणारे देशसेवा करतात आणि इतरांना जाब विचारण्याचा अधिकार नाही हा गैरसमज आहे.

सामान्यांचं जीवनमान उंचावलं जाणं आणि नागरिकांचं जगणं सुखाचं होणं हा सरकारच्या यशस्वीतेचा एकमेव मानक आहे.

सरकारच्या निर्णयाबद्दल चर्चा म्हणजे देशद्रोह अशी जर नागरिकांची समजूत असेल तर लोकशाहीला अर्थच उरत नाही.

पंतप्रधानासकट प्रत्येक लोकप्रतिनीधी हा जनतेचा नोकर आहे.
पगार घेत नाही म्हणून कुणीही देशाचा मालक होत नाही.
पदावर असेपर्यंत तो जनतेचा नोकर आहे आणि
सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा जाब विचारायचा हक्क नागरिकांना आहे.

थोडक्यात, नेत्याला डोक्यावर घेणं गैर आहे.
सव्वाशे कोटींच्या देशात कुणाला ऐकमेव समजणं हा देशाच्या बुद्धीमत्तेचा अपमान आहे.

तस्मात, सरकारी निर्णयावर भक्त आणि विरोधक असे तट सुशिक्षितातच पडले,
तर देशाला प्रो-पब्लिक पॉलिटिक्स करणारं नेतृत्व लाभण्याची शक्यता शून्य !
______________________________________

४. अध्यात्म

सर्व चराचर, सत्यानं अंतर्बाह्य व्याप्त आहे
हा अध्यात्माचा साधा अर्थ आहे.
त्याचा व्यत्त्यास म्हणजे सत्यापरता इथे काहीही नाही.

तरीही "मी सत्य आहे" म्हटलं की......
लोक जाम पिसाटतात.
जर सर्वच सत्य आहे तर
इथला प्रत्येक जण, त्याला तो उलगडा होवो किंवा न होवो,
सत्यच आहे.

पण आपल्याला उलगडा होत नाही याचा अर्थ लोक,
आपण चुतिया आहोत असा काढतात !

मग ज्याला उलगडा झाला त्याचं काही ऐकण्यापेक्षा;
तोच कसा मूर्ख आहे हे दाखवण्याची चढाओढ लागते.

परिणामी लोकांना आपणही सत्य आहोत हे समजण्याची शक्यता मावळते.

संकेतस्थळावर अध्यात्मिक लेखनाची अशी वाट लागते म्हटल्यावर,
इथे ते लेखन बंद करण्यापरता पर्याय राहिला नाही.
______________________________________

५. स्वरुपाचा उलगडा आणि जीवनविषयीक आकलन

स्वरुपाचा उलगडा मनाच्या सर्व पैलूंचं ज्ञान आपसूक घडवतो
प्राणायाम आणि योगामुळे शारिरिक कार्यप्रणालीचं व्यावहारिक ज्ञान उपलब्ध होतं.

स्वरुपाचा उलगडा कार्यकौशल्य आणि कार्य सहज करण्याला सहाय्यभूत होतो.
परिणामी समस्येचं त्वरित आकलन आणि सोडवणूकीचा सोपा मार्ग दिसतो.

स्वरुपाचा उलगडा वक्तव्यात ठामपणा आणतो.

कोणत्याही विषयावर काहीही लिहीलं की लोक सुरु :
मीच शहाणा, मलाच सगळं कळतं, मी म्हणतो तेच खरं.....

मग अशा वेगळ्या विषयांवर चर्चा कशी होणार ?

मन हा बायोकंप्युटर नाही का ?
नवजात अर्भकाचा मेंदू ही ब्रँड न्यू हार्डडिस्क नाही का ?
त्यावर डेटा पेस्टच झाला नाही तर तो रिट्रीव कसा होईल ?
असा एकसंध डेटा पेस्ट व्हायला तो कुण्या व्यक्तीची अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग असायला हवी.
यालाच आपण पुनर्जन्म म्हणून सगळा विषय अगम्य करुन ठेवलायं का ?

___________________________________________________

६. व्यावसाय :

पैसा हा जीवनाचा एक महत्तम पैलू आहे.
व्यावसायिक अनुभवामुळे त्याच्या सर्वप्रकारे अभ्यास झाला आहे.
अध्यात्मामुळे पैशामागच्या सर्व मानसिकतेची उकल झाली आहे.
जुगारा पासून ते बजेटपर्यंत सगळ्या बाबींचा यथोचित विचार झाला आहे.

सांगायचं कारण असं की जे लिहीतो ते अनुभवातून आलेलं आहे
आणि सर्वांना उपयोगी व्हावं म्हणून लिहीतो.

तरीही लोक लपाछपीचे धंदे बंद होणार,
अमक्या अ‍ॅक्टमुळे दुकान बंद होणार....
जिएसटी रिटर्नस आणि सोनोग्राफीची रिटर्न्ससारखीच
तुम्हाला भरपूर वेळ दिसतो.
काल हा भास आहे तर रिटर्न्स कशाला वेळेवर भरायची ?

अशा काहीही कमेंटस मारतात.

मग मनात नसतांना बखेडा सुरु होतो.

__________________________________________

७. भग्व्दगीता :

हा ग्रंथ भारतीय अध्यात्मात मानदंड मानला गेला आहे.

पण कृष्णाचं मूळ प्रयोजन साधकांना मार्गदर्शन नसून
अर्जुनाला युद्धप्रवण करणं आहे.
त्यामुळे संसारी किंवा सामान्य साधकाला खरं तर याचा उपयोग नाही.

थोडक्यात, तो सर्वांना दिशादर्शक ठरेल असा,
अध्यात्मिक ग्रंथ नाही.

सांख्ययोगातले दोन श्लोक;
नैनं च्छिंदंती शस्त्राणी, आणि
या निशा सर्व भूतानां, सोडले तर,
सामान्य साधकाला उपयोगी होतील,
असे कोणतेही श्लोक यात नाहीत.

यातल्या कर्मयोगानं तर भारतीय मानसिकतेचा
कर्माप्रती पुरता गोंधळ उडवून दिला आहे.

फलाकांक्षारहित कर्म, इश्वरसमर्पित कर्म....
अशा अव्यवार्ह कल्पनांमुळे
बहुतेकांचा कल,
सचोटी आणि तन्मयतेनं काम करण्याऐवजी;
नाईलाज म्हणून काम आणि
शक्यतो कर्ममुक्तीकडे वळला आहे.

गीतेचे वेगवेगळे अर्थ काढण्याचं काम
भारतात गेली हजारो वर्ष चालू आहे.

या निरर्थक प्रयासाबद्दल,
जरा कुठे वस्तुनिष्ठ विचार मांडला
की गीताप्रेमी हुल्लड चालू करतात.

नक्की काय संदेश दिलायं या ग्रंथानं,
ज्यानं देशाचं भलं झालं ?
कोणती साधनाप्रणाली साधकांना स्वरुपाचा उलगडा घडवू शकली ?
यावर वस्तुनिष्ठ आणि खुल्या चर्चा,
पब्लिक फोरमवर घडायला काय हरकत आहे ?

_________________________

तर अशी सगळी परिस्थिती आहे.

मग कुणी खरडफळा रगडतोयं,

अचानक भूछत्रीसारखे ट्रोलर्स प्रकट होतायंत
ज्यांना दोन ओळी धड लिहीता येत नाही
ते मला विचारतात
तीन वर्ष झक मारली का ?

आत्मपूजा उपनिषदावर आख्खी सिरीज
मनोगतवर प्रकाशित झाली आहे.
अष्टावक्राच्या सांख्ययोगावर
लेखमाला लिहीली आहे.
निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीवर
लेख प्रकाशित झाले आहेत.
बुद्ध, ओशो, विविध ध्यान प्रणाली
यांचावर तिथे लिहीलं आहे.
कर्मयोगासारख्या रोजच्या विषयावर
लोकोपयोगी भाष्य केलंय.
विवाह, उत्सव, भय, सजगता
अशा अनेकविध विषयांवर
लेखन केलंय....

कुणी तद्दन कविता टाकतो.
कुणी भंकस लेख लिहीतो....

गप्प करणारं उत्तर दिलं की मग
वातावरण बिघडल्याचा कांगावा होतो !

काय साधतो आपण या सगळ्यातून ?

-----–---------------------–-----------------------------------
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असल्याने आणि बरेच वैयक्तिक आणि आक्षेपार्ह प्रतिसाद वाढत असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन

----------------------------------------------------------------

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर क्राउड पुलर.

कोहंसोहं१०'s picture

2 Jun 2020 - 4:28 pm | कोहंसोहं१०

जर परमहंसाना काली दिसते आणि खरी वाटते तर हनुमानाला राम का दिसतो आणि तितकाच का खरा वाटतो ? तुकारामांना विठ्ठल भेटतो तर त्यांना राम का दर्शन देत नाही ? महाप्रभूंना कृष्ण भेटतो तेंव्हा काली कुठे गेलेली असते ? ---------> याचे उत्तर श्रीकृष्णांनी गीतेत दिले आहे. श्रीकृष्ण म्हणतात जो मला ज्या रूपात/भावात पुजतो त्याला मी त्या रूपात किंवा भावात दर्शन देतो.

मग भक्तमंडळी समन्वयाचा मार्ग शोधतात ते म्हणतात काली म्हणजे राम आणि राम म्हणजे विठ्ठल आणि कृष्ण म्हणजेच काली ! कशाला हवा हा कल्पनेचा गुंता ? --------> हे कल्पना आणि हा गुंता आपल्यासाठी असेल. त्यांच्यासाठी ते सत्य होते. आणि आहेच. निर्गुण असले म्हणून सांगून असूच नये असे आपले म्हणणे आहे. द्विरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा लिहितो- "एकच मनुष्य पण नात्यामध्ये कोणाचा मुलगा असतो, कोणाचा भाऊ, कोणाचे वडील, तर कोणाचा मित्र पण शेवटी माणूस म्हणून एकच. जरी माणूस एकच असला तरी व्यवहाराच्या दृष्टीने तो वेगवेगळ्या नात्यांमध्ये पण बांधला गेला आहे आणि त्या अनुरूप जाणला जातो तसेच देव आणि ब्रह्मन यांचे आहे. त्यामुळे तुम्ही जो दृष्टिकोन ठेवता त्यावर अवलंबून पण त्याचा अर्थ दुसरा दृष्टिकोन चुकीचा आहे असे समजणे हे चुकीचे. हा एकांगी विचार झाला."

परमहंसांची गोष्ट आहे.

तोतापुरी त्यांचाकडे आले तेंव्हा परमहंस कालीपूजेत दंग होते.
त्यांना साक्षात काली दिसायची आणि
ते तिच्याशी बोलायचे सुद्धा !

तोतापुरी त्यांना म्हणाले तू त्या कालीला संपव !
त्याशिवाय तुला गती नाही.

परमहंस अवाक झाले
काली त्यांचं परम दैवत
आणि तिला संपवणं म्हणजे प्राणघात !

परमहंस म्हणाले कालीला विचारतो.

तोतापुरी म्हणाले, तू काहीही कर.
ती फक्त तुला दिसायला लागली की हात वर कर.

परमहंस ध्यानस्थ झाले.
काली डोळ्यासमोर आल्यावर त्यांनी हात उचलला..
तत्क्षणी तोतापुरींनी एका धारदार शस्त्रानी त्यांच्या आज्ञाचक्रावर वार केला !

तदनंतर परमहंसांना साक्षात्कार झाला
म्हणजे डोळ्यासमोर असलेला निराकार;
जो काली सारखा अडवत होती, तो दिसला !
असं सांगतात.

म्हणजे आधी काल्पनिक देव निर्माण करा
आणि मग तो खलास करा !
____________________________

कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ?

कोहंसोहं१०'s picture

2 Jun 2020 - 8:09 pm | कोहंसोहं१०

छान. पण तुम्ही अर्धवट गोष्ट सांगितली. मला प्रतिसाद देताना त्यापुढील कथा अभिप्रेत होती. तुम्ही कदाचित ती विसरलात किंवा सोयीस्करपणे टाळलीत. - तोतापुरी महाराज हे अद्वैताचे खंदे पुरस्कर्ते आणि ते कालीला मानीत नसत. रामकृष्णांनी बरेच समजावून पहिले परंतु त्यांच्यामध्ये फरक पडला नाही. शेवटी कालीमातेने एक लीला रचली आणि तोतापुरींना पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि अनंत यातना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना ध्यान देखील नीट लावता येत नसे. शेवटी तो त्रास सहन करण्यापेक्षा तोतापुरी यांनी देह सोडायचे ठरवले आणि जलसमाधीसाठी नदीमध्ये गेले तेंव्हा चमत्कार झाला आणि नदीच्या पाण्याची पातळी गुडघ्यापेक्षाही खाली आली. नदीपात्रात जेथे गेले तेथे हेच झाले. त्यांना साधी जलसमाधीपण घेता येईना. शेवटी नाईलाजाने परत आले तेंव्हा रामकृष्णांनी त्यांना एकदा दुखण्याबद्दल कालीमातेला विनंती करून पाहायला सांगितले. शेवटचा उपाय म्हणून नाईलाजाने तोतापुरींनी कालीमातेला विनंती केली आणि कालीमातेने विनंती स्वीकार करून आशीर्वाद दिला आणि पोटदुखीचा त्रास संपवला. त्यानंतर तोतापुरींनी कालीमातेचे अस्तित्व मान्य केले आणि तेथून प्रयाण केले.
थोडक्यात काय तर सत्य एकच आहे यात दुमत किंवा वाद नाही परंतु त्याच सत्याचा नाम रूपात्मक स्वरूप हा भास आहे हे मानणे चुकीचे. तो भास नसून अभिव्यक्ती आहे. एकं सत विप्रा बहुदा वदन्ति

कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ?----> या भानगडी आहेत हा तुमचा दृष्टिकोन. बाकीच्यांसाठी तो त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. या मार्गावरून अनेकजण गेले आहेत आणि सत्यस्वरूप जाणले आहे. याला तुम्ही भानगडी भास म्हणणे म्हणजे नाण्याची एक बाजू पाहून दुसरी नाहीच असे म्हणणे आहे.

बाकी माझ्या काही सरळ प्रश्नाची उत्तरे तुम्ही द्याल हि अपेक्षा होती. चुकून दुर्लक्ष झाले असल्यास पुन्हा देतो:
आता ज्या शून्याचा साक्षात्कार, किंवा सत्य गवसले वगैरे जे आपण म्हणालात तो शंकराचार्यांना, रामकृष्ण परमहंसांना, ज्ञानेश्वरांना झाला होता असे आपल्याला वाटते का?
असल्यास तो होऊनही शंकराचार्यांनी १०० किंवा आधी देवीदेवतांची स्तोत्रे का बरे रचली असावीत? रामकृष्ण परमहंसांनी देह असेपर्यंत कालीमातेचे पूजा का बरे केली असावी? ज्ञानेश्वरांनी हरिपाठ का बरे सांगितलं असेल असे आपल्याला वाटते?

१. > आणि पोटदुखीचा त्रास संपवला !

२. >जलसमाधीसाठी नदीमध्ये गेले तेंव्हा चमत्कार झाला आणि नदीच्या पाण्याची पातळी गुडघ्यापेक्षाही खाली आली. नदीपात्रात जेथे गेले तेथे हेच झाले. त्यांना साधी जलसमाधीपण घेता येईना. शेवटी नाईलाजाने परत आले !

३. > त्यानंतर तोतापुरींनी कालीमातेचे अस्तित्व मान्य केले आणि तेथून प्रयाण केले.

____________________________

देव या कल्पनेचा बाजा वाजू नये
म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या
पश्चात स्टोर्‍या आहेत !
__________________________

तुम्ही इक्झॅक्टली माझा मुद्दाच सिद्ध केला आहे !

पाणी कायम समपातळीत रहातं
तो वैज्ञानिक सिद्धांत आहे.
हे आपण शिकलो नाही का ?

ते तोतापुरी चालतील तशी पातळी कशी बदलेल ?

भक्त अशा गोष्टींवर विश्वास कसा ठेवतात ?
----------------------

काली पोटदुखीचा त्रास संपवते ?

मग इतक्या वैद्कीय संशोधनाची गरज काय ?
इतके डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स कशासाठी लागतात ?

पोट दुखायला लागल्यावर भक्त
कालीला साकडं न घालता
डॉक्टरकडे कशाला जातात ?

-----------------------------------

आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ?

---------------------------------------

आता तुमच्या लक्षात आलं असेल
की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो.

परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते.
वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो.

सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं !

कोहंसोहं१०'s picture

3 Jun 2020 - 1:40 am | कोहंसोहं१०

देव या कल्पनेचा बाजा वाजू नये म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या पश्चात स्टोर्‍या आहेत !----> हाहाहा. उत्तर नसले की त्या स्टोर्‍या आहेत म्हणून मोकळे झालात. म्हणजे तुम्ही दिलेली कथा तीच खरी आणि तुम्हाला माहिती नाही किंवा तुमचे विचार खोडणारी ह्या पश्चात स्टोर्‍या. अश्या महाज्ञानी माणसाबरोबर मी पामर काय चर्चा करणार. ज्ञान वाढवा एवढेच म्हणेन.

आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ?---> तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगत सुटला आहेत त्यामुळे हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो. परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते. वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो. सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं ! ------->>> हसं तर आपले होत आहे. याआधीही झालेले आहे. फक्त अजूनही ते तुम्हाला समजलेलं नाही

कोहंसोहं१०'s picture

3 Jun 2020 - 1:43 am | कोहंसोहं१०

देव या कल्पनेचा बाजा वाजू नये म्हणून भक्तांनी लावलेल्या या सगळ्या पश्चात स्टोर्‍या आहेत !----> हाहाहा. उत्तर नसले की त्या स्टोर्‍या आहेत म्हणून मोकळे झालात. म्हणजे तुम्ही दिलेली कथा तीच खरी आणि तुम्हाला माहिती नाही किंवा तुमचे विचार खोडणारी ह्या पश्चात स्टोर्‍या. अश्या महाज्ञानी माणसाबरोबर मी पामर काय चर्चा करणार. ज्ञान वाढवा एवढेच म्हणेन.

आपण पब्लिक फोरमवर अशा गोष्टी लिहीण्याचं साहस कसं करु शकतो ?---> तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर, रामकृष्ण परमहंस, शंकराचार्य यांनी काय करावे आणि काय करू नये हे सांगत सुटला आहेत त्यामुळे हा प्रश्न एकदा तुम्ही स्वतःला विचारून पहा. तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग.

आता तुमच्या लक्षात आलं असेल की भक्तीमार्ग भक्तांना कसं भ्रमित करतो. परिणामी आपली वस्तुनिष्ठता हरवते. वैज्ञानिक दृष्टीकोन हरवतो. सगळ्या जगासमोर आपलं हसूं होतं ! ------->>> हसं तर आपले होत आहे. याआधीही झालेले आहे. फक्त अजूनही ते तुम्हाला समजलेलं नाही

१. पाणी समपातळीत राहातं
हा वैज्ञानिक सिद्धांत अमान्य केला
तरच ती स्टोरी तग धरेल.

आणि इतकी उघड गोष्ट नाकारता येणार नाही

काय प्रतिवाद कराल याचा तुम्ही ?

२. काली जर पोट दुखी थांबवत असेल
तर डॉक्टर, हॉस्पिटल्सची गरज काय ?

देवभोळ्यांचं प्रमाण ९०% टक्के आहे
तरीही मेडीकल सायन्सची गरज कशासाठी आहे ?

व्यक्तिगत जीवनात शारिरिक त्रास सुरु झाल्यावर
तुम्ही काय करता ?

किंवा देवाला शरण गेल्यापासून
तुम्ही डॉक्टर जीवनातून हद्दपार केला का ?

> तुम्ही एवढ्यांदा ट्रोल का झालात हेही समजेल मग.

देवभोळ्यांच्या अशा तर्कशून्य विधानांवर
किंवा त्यांच्या चुकीच्या धारणांवर
लिहीलं जातं, तेंव्हा निरुत्तर झाल्यावर,
ट्रोलींग करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय रहात नाही

आणि तेच तुम्ही सांगतायं !

मामाजी's picture

2 Jun 2020 - 11:08 pm | मामाजी

म्हणजे आधी काल्पनिक देव निर्माण करा
आणि मग तो खलास करा !
कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ?

संक्षी साहेब, आपले तर्क हे असे अव्यवहारिक असतात.. ज्यांना कोणाला सीए, डॉक्टर, इंजीनियर वगैरे व्हायचे आहे त्यांनी पहिली, दुसरी चौथी, पाचवी अथवा दहावी बारावी च्या परिक्षा देत कशाला वेळ घालवत बसायचे आज्ञाचक्र तोडू शकणारा कोणीतरी तोतापूरी शोधून त्याच्याकडून एकदम त्या त्या विषयांची ची फायनल परीक्षा ऊत्तीर्ण करून घ्यायची..
आधी गहू आणा मग ते दळुन घ्या नंतर कणीक भिजवा, पोळ्या लाटा, तव्यावर भाजून घ्या मग त्या शेवटी पोटातच ढकलायच्याना कशाला पाहिजेत इतक्या भानगडी ? त्यापेक्षा सरळ पोटभर गहू खाऊनच मोकळ व्हाव..

आधी काली तयार केल्यामुळे
आज्ञाचक्रावर वार करणारा तोतापुरी शोधावा लागला
काली तयारच केली नसती
तर कायम समोर उभा ठाकलेला निराकार
सहज दिसला असता.

असा मुद्दा आहे !

________________________

> त्यांनी पहिली, दुसरी चौथी, पाचवी अथवा दहावी बारावी च्या परिक्षा देत कशाला वेळ घालवत बसायचे ?

एवढं शिकून जर, तोतापुरीच्या चालण्यानं
नदीच्या पाण्याची लेवल बदलायला लागली....
आणि त्या स्टोरीवर आपला विश्वास बसायला लागला

तर पुन्हा कितवी पासून सुरुवात करायला हवी ?

> त्यापेक्षा सरळ पोटभर गहू खाऊनच मोकळ व्हाव..

काली जर पोटदुखी थांबवू शकते

तर भक्तच गहू खाऊन
त्याच्या पोटात पोळ्या होतील....

या आशेवर राहू शकतील.

इथे ज्या निर्गुण निराकाराची चर्चा होते आहे ते अ‍ॅच्युअल निर्गुण निराकारापेक्षा भिन्न आहे.

सत्य हे आदिम रहस्य आहे म्हटल्यावर इतर काहि बोलण्यात अर्थ उरत नाहि. इट बिकम्स अ ब्लॅक बॉक्स. आपले अनुभव एका मर्यादेपलिकडे वेध घेऊ शकत नाहि. आपल्या मर्यादेला अंतीम सत्य मानुन इतरांच्या अनुभवाला कल्पना मानण्यात काहि शहाणपण नाहि. आपण निर्गुणाला सिद्ध करु शकत नाहि. का ? तर तो एक ब्लॅक बॉक्स आहे. मग त्याला पोकळी, कशात काहि नाहि वगैरे भारंभार विशेषणं लावायची. हे म्हणजे आपल्याला हवा दिसत नाहि, म्हणु तिला कशात काहि नाहि वगैरे म्हणण्यासारखं आहे. त्यापेक्षा प्रामाणिकपणे स्वच्छ कबुल करावं ना कि माझी दृष्टी हवेचे मॉलिक्युल्स बघु शकत नाहि.

सगुण साकार म्हणजे साधकाचा कल्पना विलास नसुन "अभावतुन, शुण्यातुन निर्मीती होऊ शकत नाहि" हि थेअरी आहे. अव्यक्तातुन काहिच व्यक्त होऊ शकत नाहि. शुण्यातुन पूर्ण निर्माण होऊ शकत नाहि. जीवनाचा उगम जीवनच आहे. ज्याला आपण अव्यक्त, शुण्य म्हणतो ति त्या व्यक्ताचीच एक प्रॉपर्टी आहे. हा सदा-सर्वदा व्यक्त असलेलाच 'व्यक्ती'. म्हणुन हि ऑर शी बिकम्स अ पर्सन. बुद्धीने त्याचा वेध घेता येत नाहि. पण त्याच्याशी असलेल्या एकरूपकत्वचा जॉइनींग पॉइण्ट म्हणजे प्रेम (प्रेम का कुठल्याही गोष्टीचा इंडक्शन पॉइण्ट असतो). इथपर्यंत थेरॉटीकल गोष्टी करता येतात. आता या जॉइनींग पॉइण्टचा विकास आपल्यामधे कसा करायचा (किंवा करायचा कि नाहि ) हे ज्याचं त्याने ठरवावं. नसेल करायचा तर उगाच ज्यांनी तो केला आहे त्यांना नावं ठेऊ नये.
असो.

सोत्रि's picture

2 Jun 2020 - 8:36 pm | सोत्रि

सत्य हे आदिम रहस्य आहे म्हटल्यावर इतर काहि बोलण्यात अर्थ उरत नाहि

जर ते सत्य आहे तर रहस्य असूच शकत नाही! :)

- (साधक) सोकाजी

अर्धवटराव's picture

2 Jun 2020 - 8:56 pm | अर्धवटराव

एकसे बढकर एक कॉकटेल्स पेश करणारे सोत्री तुम्हीच का ?? =))

शाम भागवत's picture

3 Jun 2020 - 3:39 pm | शाम भागवत

आता हे काय नवीन?

अर्थवटराव!!!
एवढं तरी पूर्ण करा बॉ.
:)

सोत्रि's picture

3 Jun 2020 - 5:17 pm | सोत्रि

अर्धवटराव, अध्यात्माचं कॉकटेलही 'सहजावस्था' देतं!

त्यामुळे फिकर नॉट तोच सोत्रि आहे. :=))

- (कॉकटेलच्या पलिकडचा उलगडा झालेला) सोकाजी

सुबोध खरे's picture

3 Jun 2020 - 12:31 am | सुबोध खरे

नर्मदा परिक्रमेच्या वेळेस (1956) रा भि जोशी यांनी आपला अनुभव लिहिला आहे.
एक गुहेच्या बाहेर लिहिले होते
10 पैशात ब्रम्हदर्शन !
मी आत गेलो.
तेथे एक साधू बसले होते.
त्यांनी खूण केली इथे पैसे ठेवा.
मी 10 पैसे ठेवले.
त्यांनी एक खडीसाखरेचा खडा दिला आणि म्हणाले खा.
मी खाल्ला
त्यांनी विचारलं कसा लागला चवीला?
मी म्हणालो गोड.
ते म्हणाले गोड म्हणजे कसा गूळ की गुलाबजाम की बासुंदी?
मी म्हणालो असं कसं सांगणार? तुम्हाला ते स्वतःखाऊन पाहायला लागेल!
त्यावर ते साधू म्हणाले की ब्रम्हदर्शन असंच असतं.
ते ज्यांचं त्यालाच व्हावं लागतं!

दुसऱ्याचा अनुभव किंवा मार्ग कामाचा नाही!

वरच्या चर्चेत मला *शून्य* कळलं (की कळलं नाही?)

सुबोध खरे's picture

3 Jun 2020 - 12:31 am | सुबोध खरे

नर्मदा परिक्रमेच्या वेळेस (1956) रा भि जोशी यांनी आपला अनुभव लिहिला आहे.
एक गुहेच्या बाहेर लिहिले होते
10 पैशात ब्रम्हदर्शन !
मी आत गेलो.
तेथे एक साधू बसले होते.
त्यांनी खूण केली इथे पैसे ठेवा.
मी 10 पैसे ठेवले.
त्यांनी एक खडीसाखरेचा खडा दिला आणि म्हणाले खा.
मी खाल्ला
त्यांनी विचारलं कसा लागला चवीला?
मी म्हणालो गोड.
ते म्हणाले गोड म्हणजे कसा गूळ की गुलाबजाम की बासुंदी?
मी म्हणालो असं कसं सांगणार? तुम्हाला ते स्वतःखाऊन पाहायला लागेल!
त्यावर ते साधू म्हणाले की ब्रम्हदर्शन असंच असतं.
ते ज्यांचं त्यालाच व्हावं लागतं!

दुसऱ्याचा अनुभव किंवा मार्ग कामाचा नाही!

वरच्या चर्चेत मला *शून्य* कळलं (की कळलं नाही?)

संजय क्षीरसागर's picture

3 Jun 2020 - 1:10 am | संजय क्षीरसागर

मस्त स्टोरी आहे !

mrcoolguynice's picture

3 Jun 2020 - 7:13 am | mrcoolguynice

Z

चौकटराजा's picture

3 Jun 2020 - 9:24 am | चौकटराजा

मिपा काढण्याचा मूळ उद्द्देश काय ..... मराठीचे संवर्धन ? ज्ञानाची देवाण घेवाण ? की मीच शहाणा आहे याची मस्ती जिरवण्याची जागा ? हे स्पष्ट नाही. मी माझ्या व्यक्तीगत जीवनात बायका मुलांसकट सर्वाशी असे धोरण ठेवले आहे ...... एक दोनदा उपदेश करा .पुढे खड्डा आहे हे सांगा , काही फरक नाही पडला तर समोरच्या माणसाचे खड्यात पडणे एन्जॉय करा ! तरी मी सांगत होतो ... असे म्हणण्याचीही तसदी घेऊन नका ! बदलायचे तर स्वतः ला बदला इतराना बदलण्याच्या फन्दात पडू नका ! मस्त आयुष्य चालले आहे. ज्ञान ,सल्ला, उपदेश मागितला तरच त्याचे महत्व असते.

ह्या विषयावर खूप चर्चा झाली लेखक स्वतः च्या मतावर ठाम आहेत.
ते सांगतात तेच योग्य आहे असे त्यांचे ठाम मत आहे.

आणि आम्ही लेखकाच्या कोणत्याच मताशी सहमत नाही आहोत.

क्षीरसागरातील संजयाच्या दिव्य दृष्टीला जे दिसलं/दिसतं तेच अंतिम सत्य आहे. बाकी सर्वांचे म्हणणे मिथ्या आहे.

फक्त काल हा भ्रम असताना ती मध्यंतरीच्या काळाची फट कुठून पडली हा प्रश्न विचारला की संजय नजर कुरुक्षेत्रावरुन हटवतो आणि आपण असं काही विचारलंच नाही असं करतो.

महाराज की जय हो, जय हो महाराज की ||

राघव's picture

3 Jun 2020 - 4:46 pm | राघव

अनेकांनी अनेक पद्धतीनं सांगून देखील जिथं काही उपयोग होत नाही तिथं या प्रतिक्रियेनं काही उपयोग होईल, असा विचार करणं खरंतर हास्यास्पद आहे. पण म्हटलं तुम्ही "नक्की प्रॉब्लेम काये" असं स्वतःच विचारताहात, तर एक प्रयत्न आपण ".. फिरून एकदा" करण्यास तशी हरकत काय. :-)

अध्यात्मिक साधनेत [यालाही तुमच्याकडे काही वेगळा शब्द असल्यास तसं म्हणा] तुमचा मार्ग तुम्ही चोखळला. त्यात तुम्हाला काही अनुभव आला/नाही आला. यात कुणाला काहीच आक्षेप असण्याचं कारण नाही. मग "प्रॉब्लेम काये?" तो हा -

  • इतर जे काही करतात ते योग्य की अयोग्य हे तुम्ही अकारण मांडत बसता.
  • दुसरे मार्ग असूच शकत नाहीत ही तुमची धारणा झालेली आहे. तेही स्वतःपुरतं असतं तर ठीके म्हणू. पण तुम्ही ते इतरांना पटवून देण्याच्या मागे लागता.
  • ज्या ज्ञानाचा अनुभव आल्याबद्दल तुम्ही सांगता, ते तुमच्या कृतीत कुठंच दिसत नाही. "विद्या विनयेन शोभते" या वचनावर तुमचा दूरवरपर्यंत विश्वास नाही असंच दिसतं.
  • तुमच्या म्हणण्यानुसार आद्य शंकराचार्य, श्रीज्ञानेश्वर महाराज, श्रीतुकाराम महाराज, श्रीसमर्थ वगैरे सगळेच भ्रमात होतेत. त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून साधन करण्याचा प्रयत्न करणारा आपसुक भ्रमातच आहे. त्यामुळे ते सर्व सोडून, तुमचा जो काही सिद्धांत आहे तो बरोबर आहे असं मानून, लोकांनी तेच आचरावं असा तुमचा अट्टाहास! अरे कोण तुम्ही? वर उल्लेखलेली सर्व मंडळी आणि असे अनेक लोकं ही "संत" पदी पोहोचलेल्या व्यक्ती आहेत. कशासाठी लोकांनी या सगळ्यांचं सोडून तुमचं ऐकावं?

हा अट्टाहास/दुराग्रह हेच तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ आहे. तुमचा मार्ग/सिद्धांत जो काही असेल तो समजावून सांगण्यासाठी इतरांच्या पंच्याला हात घालण्याची काय गरज? तो मार्ग/सिद्धांत ज्याला पटेल, आचरावासा वाटेल तो करेल की तसं. पण नाही, तुम्हास ही अगदी साधी गोष्टही पटत नाही.. तुम्हाला ते पटवून घ्यायचंच नाही.

हेच सगळं अनेक वेळा/अनेक पद्धतींनी/अनेकांनी पोटतिडिकीनं सांगूनही पुन्हा "ये रे माझ्या मागल्या" हेच होत असतं. आणि त्याचमुळं तुमच्या ज्ञानाबद्दल जिथं आदर निर्माण व्हायला हवा, तिथं लोकं तुमचा तिरस्कार/द्वेष करतात. मला तर खरंच अशी दाट शंका आहे की, केवळ प्रतिवाद करून +/- प्रतिक्रिया मिळवत रहायच्या या एकाच उद्देशानं तुमची वाटचाल सुरु असावी! त्यामुळंच तुमच्या अध्यात्मिक विचारांवर तुम्हाला प्रतिक्रिया देणं मी कधीचंच बंद केलंय. हीसुद्धा शेवटचीच अशी प्रतिक्रिया.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2020 - 5:01 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि त्याचमुळं तुमच्या ज्ञानाबद्दल जिथं आदर निर्माण व्हायला हवा, तिथं लोकं तुमचा तिरस्कार/द्वेष >>> स्वतःला जे समजलं असा हा माणूस म्हणतो ते तो दुसऱ्यांना कधीही समजावून सांगू शकलेला नाही .तशी कुवतच त्याच्यामध्ये नाही . एका अर्थी तो मतिमंद असल्यात जमा आहे . असा माणूस मनोरूग्ण असतो, त्यामुळे त्याचं ज्ञान आणि त्याबद्दलचा आदर ही आपलीच फसवणूक असते. आपण त्याची रुग्णता समजून घेऊन तिथेच थांबायला हवं.

> ते तो दुसऱ्यांना कधीही समजावून सांगू शकलेला नाही ?

ज्यांना लोकांच्या श्रद्धेचाच आधार आहे
त्यांना माझं वस्तुनिष्ठ लेखन सहन होणं अवघड,
ते समजणं तर फार दूरची गोष्ट आहे.
_________________________________

> एका अर्थी तो मतिमंद असल्यात जमा आहे ?

काय सांगता ?

खर्‍या मतीमंदाचे विचार काय असतात ते पाहा :

पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते.

________________________________________

> असा माणूस मनोरूग्ण असतो, त्यामुळे त्याचं ज्ञान आणि त्याबद्दलचा आदर ही आपलीच फसवणूक असते ?

काय सांगता ?

अस्सल मनोरुग्ण इतरांबरोबर,
स्वतःचीही फसवणूक करत असतो.

कशी ते पाहा :

ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते.
_______________________________

> आपण त्याची रुग्णता समजून घेऊन तिथेच थांबायला हवं ?

खरं की काय ?

खरी रुग्णता अशी आहे
की आपण लोकांच्या अंधश्रद्धाना
रोज पाणी घालतो.
लोकांच्या अंधश्रद्धांवर तर देव या कल्पनेचं अस्तित्व अवलंबून आहे.

ते असं :

कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे.

> लोकांनी तेच आचरावं असा तुमचा अट्टाहास !

देवभोळ्या लोकांनी लावलेल्या स्टोर्‍या...
तोतापुरींच्या चालण्याबरोबर नदीच्या पाण्याची पातळी बदलत गेली,
किंवा कालीनी पोटदुखी बरी केली
काय दर्शवतात ?

कुठे नेलंय समाजाला या शिकवणीनं ?

असा अ-वैज्ञानिक भाबडेपणा करुन
किती पिढ्यानी अजून आपलं हसं करुन घ्यावं असं तुम्हाला वाटतं ?

काय प्रतिवाद कराल तुम्ही याचा ?
_______________________________________

> मला तर खरंच अशी दाट शंका आहे की, केवळ प्रतिवाद करून +/- प्रतिक्रिया मिळवत रहायच्या या एकाच उद्देशानं तुमची वाटचाल सुरु असावी!

माझ्या लेखनाचा उद्देश,
लोकांचा संभ्रम दूर करणं आहे

काय आहे हा संभ्रम ?

मूर्ती म्हणजेच देव की इतरत्रही त्याचं अस्तित्व आहे? इतके देव सांगीतलेत तेवढेच नक्की असतील की अजूनही काही उरलेत ?

आणि तरीही

घरी मी श्रद्धेनं, शक्यतो विधीवत पूजा करतो.

हा संभ्रम असलेली मंडळी
त्या संभ्रमात रहाणं सोयीचं मानतात
कारण माझ्या लेखनानं त्यांच्या धारणांना धक्का बसतो !

मग ते मला असा सल्ल देतात :
" इतर जे काही करतात ते योग्य की अयोग्य हे तुम्ही अकारण मांडत बसता. "

मेमरी स्ट्रीन्ग अवकाशात विलीन होतात.. कधि कधि चुकुन नवजात अर्भकाच्या मेंदुत कॉपी पेस्ट होतात. शरीरातील संवेदना मेंदुला पोचतात, मग मेंदु पासुन पुढे 'आपल्यापर्यंत' येतात.. कशा येतात? तर आपोआप येतात.. त्यामागे काहि यंत्रणा वगैरे लागत नाहि. सगळं कसं रहस्यमय रित्या अ‍ॅटोमॅटीक होतं. हा यांचा 'वैज्ञानीक' दृष्टीकोन. आणि वरुन इतरांना वैज्ञानीक दृष्टीकोन नसल्याचा कळवळा. आहे कि नाहि मजा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jun 2020 - 4:55 pm | अत्रुप्त आत्मा

या धाग्यावरील सर्वांनी हा संक्षिप्त चित्रपट पहा.. पुन्हा या'चा एकही लेख वाचण्याची गरज पडणार नाही. 11:34 मिनिटांची शॉटफिल्म आहे. बघताना आपण ह्याच धाग्यावर-आहोत/होतो,हे कळेल. जरूर बघा.

सुबोध खरे's picture

3 Jun 2020 - 8:44 pm | सुबोध खरे

200 प्रतिसाद झाल्यावरही कोण नक्की काय म्हणतो आहे हेच कळेना झालंय.

असो. आमची बालबुद्धी आहे झालं!

vikramaditya's picture

3 Jun 2020 - 9:42 pm | vikramaditya

Provoke, Argue, Self Glorification, Insult others' wisdom, threaten to go away, talk of launching paid-website to enlighten entire universe, exit MIPA, no audience to preach or ridicule, return to MIPA. < loop starts again>

mrcoolguynice's picture

3 Jun 2020 - 11:29 pm | mrcoolguynice

You see the whole country of this system is just a position by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
You see such extenuating circumstances coerce me to preclude you from such extravagances.
You see the coefficient of the linear
is juxtapositioned by the hemoglobin of the atmospheric pressure in the country!

सुबोध खरे's picture

3 Jun 2020 - 11:42 pm | सुबोध खरे

I am the who of the you of the me of who?

म्हणजे हो काय?

आमच्या बाबांच्या शब्दात सांगतो
बेंबट्या ब्रम्हदेवाचा आवडता प्राणी गाढव त्यामुळे त्याने सर्व माणसांत गाढवाचा अंश टाकला

तस्मात कुंभार हो गाढवांचा तोटा नाही.

आता गाढव बनून पुस्तक (छापलं गेल्यास)विकत घायचं किंवा ऑनलाइन( सशुल्क) कोर्स करायचा हे ज्याचे त्याने ठरवायचंय!

झम्प्या दामले's picture

3 Jun 2020 - 11:51 pm | झम्प्या दामले

खरे ,तुम्ही पु ल देशपांडेंचे भाऊ का?? कधी तरी स्वतःचं काही तरी लिहीत जा. गूगल किंवा पुस्तकातलं किती दिवस कॉपी पेस्ट करणार.

रानरेडा's picture

4 Jun 2020 - 12:04 am | रानरेडा

राइट क्लिक हा प्रकार माहीत आहे का ?
हा तर डॉक्टर खरे यांच्या नावावर राइट क्लिक केली की त्यांनी स्वतःचं काही तरी किती लिहिले आहे ते कळेल .
आणि हो देशातील एक अग्रगण्य मेडिकल कॉलेज चे ते चांगले एम डी रेडिओलॉजी असलेले डॉक्टर आहेत ते ,
अर्थात तुम्हाला इतके न कळल्याने आपण आपले अज्ञान दाखवून दिले आहेच .
बाकी आपण के लिहिले आहे ?

> त्यामुळे त्याने सर्व माणसांत गाढवाचा अंश टाकला

हे तुम्ही मानत असाल तर,

तो अंश तुमच्यातही आलायं
असा अर्थ निघतो.

त्यामुळे आता हे

> आता गाढव बनून .....

वेगळं करायची आवश्यकता नाही.
___________________________

मी ब्रह्मदेव वगैरे फालतू गोष्टी मानत नाही
आणि लेखाचं नेमकं प्रयोजन,
तेच सांगणं आहे.

सुबोध खरे's picture

3 Jun 2020 - 11:56 pm | सुबोध खरे

दळभद्री माणसांना मी प्रतिसाद देत नाही

झम्प्या दामले's picture

4 Jun 2020 - 12:00 am | झम्प्या दामले

म्हणजे बेंबट्या तू पण महागाढवच की

श्रिपाद पणशिकर's picture

4 Jun 2020 - 12:14 am | श्रिपाद पणशिकर

हे असले प्रकार चालतात पण आम्हि मात्र एक संतुलित प्रतिक्रिया दिली होति रींगमास्टरांच्या धाग्यावर ति मात्र उडवण्यात आली.

बिग्रेडि झालाय मिपा माझा.

श्रिपाद पणशिकर's picture

4 Jun 2020 - 12:08 am | श्रिपाद पणशिकर

"खरे ,तुम्ही पु ल देशपांडेंचे भाऊ का?? कधी तरी स्वतःचं काही तरी लिहीत जा. गूगल किंवा पुस्तकातलं किती दिवस कॉपी पेस्ट करणार"

आणि हे कोण विचारतय तर झम्प्या दामले । Hyppocrites ;)

त्याला वाचन असावे लागते म्हणजे मग कॉपी पेस्ट करावि लागत नाहि.

मोदक's picture

4 Jun 2020 - 1:43 am | मोदक

काय ठरलं मग..?

___________________________

मी ब्रह्मदेव वगैरे फालतू गोष्टी मानत नाही
आणि लेखाचं नेमकं प्रयोजन,
तेच सांगणं आहे.
तुमच्या मताला कोण विचारतेय .
तुम्ही काय स्वतःला महान व्यक्ती समजत आहात काय.
तुमची असण्याची गरज जगाला 0 आहे .

संजय क्षीरसागर's picture

4 Jun 2020 - 9:28 am | संजय क्षीरसागर

ज्या प्रतिसादात काही अर्थ असतो,
त्यांना मी उत्तर देतो

काही प्रतिसादांना उत्तर दिल्यावर,
आलेल्या उपप्रतिसादातून,
प्रतिसादकाला कळण्याची शक्यता किती याचा अंदाज येतो.

प्रतिसादकाला कळण्याची शक्यता नसेल,
तर तिथे वेळ घालवणं व्यर्थ आहे.

त्यामुळे ज्यांना उत्तर दिलेलं नाही,
किंवा ज्यांच्या उपप्रतिसादाला उत्तर दिलं नाही
त्यांनी माझे इतर प्रतिसाद नीट वाचले,
तरी त्यांना उत्तर मिळू शकेल

अर्थात, तुमच्या मताला कोण विचारतेय ?
असं म्हणणार्‍याला
आपणच या धाग्यावर प्रष्ण विचारलेत,
हे लक्षात यायला हरकत नाही.