वाढदिवस

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
16 Nov 2008 - 9:52 pm

२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती. सर्व टीम मधे अनडीसप्युटेड लीडर झालो होतो. पगार मजबुत. सुट्टी फक्त रविवार ३ ते१०. ह्या सुट्टीच्या वेळात छबिलदास नाहीतर शिवाजी नाट्यमंदिर,ग्रेट् पंजाब, आणि दुर्गाश्रम हा कार्यक्रम असायचा.एकंदरीत करिअर मार्गाला लागले होते.
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार - ह्या ओळी मला अजिबात पटत नाहीत. कितीही वेडा असला तरी कुंभारसाहेब सर्वांना त्यांच्या कर्मानुसार लोणी, व अंगार देत असावेत. पण अंगाराच्या कवतिका त मिळालेले लोणी वितळून जात असावे.
कुटंब्-नियोजन कार्यक्रमाला आमच्या साहेबांनी आयुष्य वाहिलेले होते. सतत नव्या, नव्या कल्पना मांडत असत. त्यानी परदेशातुन एक तंबू मागवेलेला होता. छोटे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर होता तो तंबू. हा तंबू वस्ती वस्ती मधून फिरवायचे ते.
तळागाळात पोचायला सर्वोत्तम उपाय.
शनिवारचा दिवस होता. सुमारे २ ची वेळ. एक गृहस्थ आले. ३ मुली होत्या. वंशाचा दिवा हवा होता. त्यांचा प्रष्न होता, गॅरंटीड मुलगा व्हायला काही गोळ्या आहेत का? तसे काही नसते हे त्याना समजवले. आत्तापर्यंत सुमारे ४ एक हजार चुराडा केलेला होता ह्या नादापायी त्या गृहस्थाने. नंतर चर्चा झाली नेहेमीची. पगारपाणी, भविष्यातले शिक्षणाचे खर्च. एकंदरीत दिवा येता येता ह्यांचीच बत्ती गुल होण्याची मी सांगितलेली शक्यता त्याना पटली. लगेच शस्त्रक्रिया करुन घेतली. बायकोला न विचारता असा निर्णय घेऊ नका हा माझ्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
संध्याकाळी काम आटोपुन निघणार इतक्यात समोरुन १५ बायकांचा समुह येताना दिसला. हातात लाटण्या. मी एकटाच होतो. डॉक्टर निघून गेले होते. तो तांडा तंबू समोर येउन थडकला. त्यातली एक ४० ची बाई जोराजोराने रडत होती. मला काय करावे सुचेना. घोषणाबाजी सुरु झाली. जमाव वाढत होता. धीर करुन पुढे झालो तेंव्हा लक्षात आले की ही बाई दुपारी शस्त्रक्रिया केलेल्या गृहस्थाची बायको. मी माझ्या परीने सर्व भगिनि समाजासमोर माझी बा़जू मांडली. त्यातल्या काही सुज्ञ बायकांना माझे म्हणणे पटू लागले होते. तितक्यात बाहेरील जमावातून एक दगड आला.आणि साहेबांची भविष्यवाणी खरी झाली.
चांगलीच जखम झाली होती. दोन मिनिटे शुद्ध गेली. भानावर आलो तर शर्ट रक्ताने भरलेला. आजुबा़जूला कोणीच नाही. सगळे रक्त बघुन पळालेले. कसाबसा उठलो. तंबू बंद केला. साहेबांना फोन केला. त्यांनी टॅक्सी करुन के.ई.एम. ला बोलवले. पाउण तासाने हॉस्पिटल ला पोचलो. साहेब दरवाजात उभे. नंतर काय झाले ते मला माहित नाही. रात्री १० वाजता भान आल्यावर बघतो साहेब बाजूला उभे. डोक्याला ६ टाके होते. मोठे बँडेज.
साहेबः You will be alright. Everything is fine. Stay with me today. And let us celebrate your birthday in a different way.
Do you feel like vomitting?
मी नाही म्हटले. रात्री साहेबांच्या महालात पोचलो. जेवलो. झोपलो. घरी कळवले नव्हते. गरज नाही वाटली. गॉड्फादर होता ना.
दुस-या दिवशी चहा पिताना साहेबांनी खबरबात घेतली प्रकृतीची. नंतर येणेप्रमाणे.
साहेबः You have a choice. You can go home and take it easy for couple of days. or take your position in the tent as if nothing has happened. You see the point is if I send someone else there it will be a win for cowardise. If you take the stand today you will never have problem ever. This is the best present you can give yourself on your birth day.
मी कामावर गेलो. साहेबांच्या बायकोने भरपूर मोठा जेवणाचा डबा दिला. नेहेमीप्रमाणे तंबू मी उघडलेला बघुन ती बाई आली -माफी मागुन गेली झाल्या प्रकाराबद्दल.
चार दिवसांनी बिर्ला मातोष्री मधे माझा सत्कार समांरभ होता. त्या वर्षातला यंगेस्ट अँड बेस्ट मोटीवेटरचा. साहेबांनी हातात माईक दिला. त्यावेळी काय संचारले माझ्यात मला माहित नाही. दो या तीन पुरे करा. हम दो हमारे दो पण विसरा. आता हम दो हमारा एक ची वेळ आली आहे. बक्षिस घेताना तेंव्हाचे सेकेटरी श्री. यू.डी. सुखटणकर म्हणाले, देव बरे करो तुगेले पुता.
जाता जाता: माझ्या तेंव्हा न झालेल्या बायकोचे नशिब बलवत्तर म्हणुन उलटी झाली नाही. नाही तर स्वर्गात काही देवगणाना माझ्या समुपदेशनाचा जाच सहन करावा लागला असता.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

16 Nov 2008 - 9:57 pm | धोंडोपंत

वा विनायकराव,

उत्तम लेख. अभिनंदन

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 2:01 am | विसोबा खेचर

वा विनायकराव,
उत्तम लेख. अभिनंदन

अगदी हेच म्हणतो..!

रामपुरी's picture

17 Nov 2008 - 8:04 am | रामपुरी

+१

अवलिया's picture

17 Nov 2008 - 7:38 pm | अवलिया

नाना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2008 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा विनायकराव,

उत्तम लेख. अभिनंदन

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Nov 2008 - 10:07 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त अनुभवकथन... नेहमीप्रमाणेच. साहेबांचा सल्ला बरोबर होता.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

16 Nov 2008 - 10:13 pm | टारझन

मस्त .. एक णंबर ... २०व्या वाढदिवसाला आम्ही बहुदा एटिकेटीचं गुणपत्रक बाबांच्या हाती दिल्याचं आठवलं

नाही तर स्वर्गात काही देवगणाना माझ्या समुपदेशनाचा जाच सहन करावा लागला असता.
हाहाहा , तिकडे नसबंदी कशी करणार ? ठिश्श केलं की पोरं होतात म्हणे, विदाउट काँटॅक्ट, मी महाभारतात पण पाहिलय.

-(हम दो हमारा एक का ? हमारी एक का नको ?)
सप्तर्षी टारवर्य

विनायक प्रभू's picture

17 Nov 2008 - 10:33 am | विनायक प्रभू

टारझना,
तुला लेका स्वर्गात काय चालते ते काय माहित रे.
महाभारतात प्रगत तंत्राला तोटा नव्हता.पाच पांडवांचा जन्म आय्.वी.एफं(टेस्ट ट्युब) ने झाला असावा.
आजही ज्याना मुलगा हवा असतो ते हेच उदाहरण देतात. पाचही मुलगे कसे? असा प्रश्न विचारतात. आणि ह्या नादाला लागून खूप पैसा खर्च करतात.
तुझे हिंदी अंमळ कच्चे आहे असे दिसते. हमारा एक मधे मुलगी सुद्धा आली की?
आपला नम्र
वि.प्र.
अवांतरः माझे समुपदेशन नसबंदी वर करणार नाही. फक्त तेथील देवगणांची लोकसंख्या आणि कर्मचारी संख्या ह्या बाबतीत संवाद साधीन. रंभा आणि उर्वशी ने किती लोड संभाळायचा रे बाबा.

प्राजु's picture

16 Nov 2008 - 10:15 pm | प्राजु

असे काहि घडले म्हणूनच तुम्हाला तुमचा २० वा वाढदिवस लक्षात राहिला. आवडले लेखन.
साहेबांचा सल्ला एकदम योग्य आणि तुमचा निर्णयही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

17 Nov 2008 - 12:50 am | एकलव्य

साहेबांचा सल्ला एकदम योग्य आणि तुमचा निर्णयही.

- अंगठाबहाद्दर

रेवती's picture

16 Nov 2008 - 10:55 pm | रेवती

हेच मार्गदर्शक म्हणून लाभले हे भाग्य म्हणायला हवे.

रेवती

विप्र तुम्ही ग्रेट आहात! :)

चतुरंग

नंदन's picture

17 Nov 2008 - 7:16 am | नंदन

रंगरावांशी सहमत आहे, लेख आवडला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

17 Nov 2008 - 8:42 am | सहज

सहमत.

लेख आवडला. योग्य सल्ला.

लिखाळ's picture

17 Nov 2008 - 5:31 pm | लिखाळ

अगदी सहमत !
लेख आवडला...
-- लिखाळ.

कशिद's picture

17 Nov 2008 - 12:09 am | कशिद

राव तुम्ही २० वय व्या वर्षी डॉ. कसे काय जालत वो?

पण मस्स्त आहे अनुभव लिखाण करत जा वाचोन वेगलीच उर्मी येते ...:)

कपिल काळे's picture

17 Nov 2008 - 6:14 am | कपिल काळे

<<२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती>>

लवकरात लवकर म्हणजे १७ व्या वर्षी बारावी होतात . मग २० व्या वर्षी कसे काय डॉ. होउ शकलात? .

आयला माझा डावा मेंदू अती वास्तववादी विचार करतोय का?

http://kalekapil.blogspot.com/

रेवती's picture

17 Nov 2008 - 6:16 am | रेवती

तोच प्रश्न पडला होता.

रेवती

घाटावरचे भट's picture

17 Nov 2008 - 6:50 am | घाटावरचे भट

छान लेख!!!

विनायक प्रभू's picture

17 Nov 2008 - 7:23 am | विनायक प्रभू

जनतेने प्रेमाने दिलेली उपाधी. मी डॉक्टर नाही हे माहित असुन सुद्धा.

रेवती's picture

17 Nov 2008 - 5:13 pm | रेवती

प्रेमळ उपाधी म्हणायची.

रेवती

मनस्वी's picture

17 Nov 2008 - 10:44 am | मनस्वी

छान अनुभव आहे. वाढदिवसाची उत्तम भेट!

अजुनही दिवटा हवा , हे बदलायला अजुनही वेळ लागणार.पण समाज हळुहळु बदलत आहे हे पण काही कमी नाही.
वेताळ

महेश हतोळकर's picture

17 Nov 2008 - 11:22 am | महेश हतोळकर

तुमचे आणि तुमच्या साहेबाचेही. दगडं सहन करायला खूप शक्ती लागते हो. आम्हाला तर आपल्याच घरातल्यांचे वटारलेले डोळेही सहन करता येत नाहीत.

तुमच्या साहेबाचे नाव काय हो? (झोकुन देऊन काम करणार्‍या माणसाचे किमानपक्षी नाव तरी माहीत असावं. वेळप्रसंगी स्वतःलाच खूप उपयोग होतो.)

महेश हतोळकर

ब्रिटिश's picture

17 Nov 2008 - 7:01 pm | ब्रिटिश

दादुस तु मास्तर हाईस क डाकटर हाइस ? क मास्तरांचा डाकटर क डाकटरांचा मास्तर?
कई बी आसलास तरी लिवतोस भारी बोल.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विनायक प्रभू's picture

17 Nov 2008 - 7:10 pm | विनायक प्रभू

जल्ला कदी कदी माला पन कलत नाय मी कोन ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Nov 2008 - 7:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कलल तवा आमाला बी सांगा.

बाकी वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत.

अवांतर प्रश्नः तुम्ही कधी स्वतःवर 'प्लास्टीक सर्जरी' केली आहेत का?

विनायक प्रभू's picture

17 Nov 2008 - 7:21 pm | विनायक प्रभू

तुझा काय अंदाज आहे?

टारझन's picture

17 Nov 2008 - 7:37 pm | टारझन

अंदाज पण प्लास्टिक सर्जरीतुन करता येतो ... चालू द्या

डॉ.टारझन सरडे(प्लास्टिक सर्जन, एम.डी.,सी.डी.,डी.व्ही.डी.)