मेरा कुछ सामान...

Primary tabs

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
9 Mar 2020 - 5:30 pm

1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची!
राहणारच ना रे??
मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती!

2 तिरपी किरणं राहिली,
तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली..
अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली..
अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का?
तिरपागडीच तू...

3 जगजीतची गझलसुद्धा राहिली..
कुठली होती रे ती??
आयला, अशी कशी विसरले??
वय झालं बघ माझं!!

4 काचेचं बाऊल राहिलं..
चाफ्याची फुलं राहिली..
ती बांधून आणलेला कागद राहिला....
त्यावरचा पुडीचा दोरा राहिला..
(तू तो नीट गुंडाळून ठेवलास आणि कागद घडी करून..
पक्का पुणेरी तू!!!)

5 btw त्या दो-याचं नि कागदाचं काय करणार तू???
आठवणी वगैरे बांधायला तो दोरा वापरू नकोस हं..;)
कारण दोरा भिजून जाईल, अन् आठवणी वाळून.
त्यापेक्षा त्या नीट घडी करून ठेवलेल्या कागदावर चित्र काढ,
कुठलंही......

6 काय राहिलं काय घेऊन आले,
याचा हिशोबही राहिलाच.
तूच कर तो कधीतरी..
काही बाकी उरलंच तर जपून ठेव.
पुन्हा येईन तेव्हा घेऊन जाईन मी...
(आता तू याला cliche म्हणणार, माहितीये..;))

7 फक्त एक संध्याकाळ
आणि गुलझारची नज्म कशी अचानक
आपली बनून जाते नाही??
मेरा कुछ सामान...

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Mar 2020 - 6:38 pm | प्रचेतस

नेहमीप्रमाणेच सुरेख

पैलवान's picture

9 Mar 2020 - 6:43 pm | पैलवान

..

मेरा कुछ वाणसामान तुम्हारे पास पडा है

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Mar 2020 - 9:00 am | ज्ञानोबाचे पैजार

बाउल काचेची,
पुडी फुलांची,
फुले चाफ्याची,
गजल जगजितची
वेळ हिशेबाची
यादी राहिलेल्या सामानाची
धमकी परत येण्याची
इच्छा सक्त वसुलीची
पण वाणी असिम त्यागाची
ओवी ज्ञानेशाची
किंवा आर्या मयुरपंताची
ही कहाणी घरा घराची

पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

10 Mar 2020 - 10:42 am | अनन्त्_यात्री

बारोळीत सुफळ संपूर्ण!
- खास पैजार टच __/\__ ! :)

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2020 - 9:29 pm | प्राची अश्विनी

:):)

टवाळ कार्टा's picture

11 Mar 2020 - 2:58 am | टवाळ कार्टा

दंडवत घ्या बुआ

शा वि कु's picture

11 Mar 2020 - 8:56 am | शा वि कु

कोण्या एकल्या टपरीमध्ये
अर्धा अर्धा चहा घेत होतो
अर्धे तू अर्धे मी, ttmm तर ठरलंच होतं
तुझे पाच कदाचित तुझ्या जीन्सच्या तळाशी निपचीत पडले आहेत
वो भिजवादो, मेरा वो सामान लौटा दो :p

पैलवान's picture

11 Mar 2020 - 11:11 am | पैलवान

..