"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Nov 2008 - 10:13 pm

मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला. त्याच्या घराजवळ आणखी काही छोटी छोटी बंगलेवजा घरं होती.प्रत्येकाच्या घरामागे परसात असून भरपूर झाडी होती.त्यामुळे पालघर थोडं खेड तर थोडं शहर वाटायचं.
पावलुच्या घरी जाता जाता त्याचा सर्व आजूबाजूचा परिसर मला खूपच छान वाटला.
मी त्याला म्हणालो,
"आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य बघून ते तसं ठेवल्या बद्दल लोकांच कौतूक करावसं वाटतं."
त्यावर पावलु मला हंसून म्हणाला,
"ही जी पहाट तुला दिसते आहे त्याच्यापूर्वी रात्र होती."
आणि पुढे थोडासा दम घेऊन म्हणाला,
"मी येण्यापूर्वी इथे खूपच बेशिस्त होती.जो तो आपलं घर मात्र साफ ठेवायचा आणि घरातला कचरा आपल्याच घराच्या समोर बाहेर फेकून द्दायचा.
आमच्या बाल्कनीत उभं राहून बिल्डिंगच्या सभोवती मी ज्यावेळी बघत असायचो त्यावेळी मला कसं मनात अगदी समाधान वाटत असायचं.आणि ज्यावेळेला मी माझी दृष्टी आणखी चारीबाजूला फिरवायचो तेव्हा असं दिसाचं की ज्याला आपण सर्व साधारण कचरा समजतो अशा वस्तू म्हणजे,फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्या,रबराच्या वस्तू,जूनी वर्तमानपत्र,लाकडाचे तुकडे,जूने कपडे ह्या सर्व वस्तू कारण नसताना साठा करून घरी वाढवत असतो.आणि मग कधी तरी बाहेर फेकून देतो.प्रत्येक वस्तू कधी ना कधी उपयोगात येत असते,आणि त्याचा तसा उपयोग जर आपण करू शकलो तर? हे ह्या समजूतीचं कारण असावं.आणि म्हणून आपण त्याची सांठवण करून ठेवतो.वस्तू पुन्हा वापरात आणण्याच्या समजूतीवर मी जास्त भिस्त बाळगून होतो.

आमच्या आजूबाजूच्या परिसरात लोक आपल्या मागच्या परड्यात किंवा समोरच्या अंगणात पडत असलेली झाडांची पानं,फुलं वगैरे घराच्या समोर ढिग करून ठेवतात मग म्युनिसीपालीटीची गाडी येऊन घेऊन जाईल ह्या इराद्दाने,तसं करतात.
माझ्या ह्या कचर्‍याबद्दलच्या-पुन्हा वापरात आणण्याच्या- समजूतीचा प्रेमाप्रित्यर्थ मी एक नवी योजना आखली.जे जे त्यांच्या घरासमोर पालापाचोळा टाकत असत त्या जागी लाकडाचे तळ नसलेले लांब लचक खोके तयार करून "ह्यात तुमचा पालापाचोळा टाका" अशी पाटी लिहून ठेवली.जसजसा त्यात कचरा वाढत चालला तसतसं मी त्यात पावसाळी गटारातलं पाणी शिंपडू लागलो.त्या साठी आणखी काही होतकरू कच्चेबच्चे मला मदत करण्यात उपयोगात आणले.आजू बाजूची गटारातली माती त्या पाल्यापचोळ्यावर टाकून त्याची उपयुक्त माती तयार करून जागोजागी सजावटी बाग तयार केली.रंगीबेरंगी रानटी फुलांच तो बगिचाच झाला.

टाकून दिलेली वस्तू पुन्हा वापरत आणणं ही गोष्ट मी क्षुल्लक ही समजत नाही किंवा विलक्षण ही समजत नाही.जो कचरा आपण तयार करतो तो बहुदा आपण अति गर्दीच्या जागी जिथे गरिब लोकांची वस्ति असते तेथे नेऊन टाकतो.
खरंच कुठचीच वस्तू फेकून देण्यालायाक नसते.थोडी मेहनत घेतली तर प्रत्येक वस्तू पुन्हा वापरात आणता येते. उदाहरणार्थ,आंघोळीचं पाणी बागेला वापरता येतं.फुलं,भाजी तयार करता येते.
मला वाटतं चूका आणि कमजोरी मधूनच काही तरी शिकायचं असतं.नक्कीच त्याचं परिवर्तन चांगल्या गोष्टीत होतं.

आमच्या पपीचंच घे.ह्या कुत्रीला मी ज्यावेळी न्याहाळून बघतो त्यावेळी ती माझ्या जीवनातली एक आनंददायी बाब म्हणून पहातो.पण खरं तर ही पपी कुणीतरी रस्त्यावर सोडून दिली होती.अगदी लहान असलेल्या त्या पिल्लाला डोळे उघडायला सुद्धा येत नव्हते.ती आता झकास पपी झाली आहे.तिला पाहिल्यावर कसल्या संकटातून तिला जावं लागलं याची आठवण येऊन माझं मन खिन्न होतं.
कधी कधी वाटतं,होईन कदाचित मी पण एकदा असाच पुन्हा वापरण्या साठी उपयोगी.आणि माझ्यातलं गुप्त धन हूडकून काढायला कुणाचं तरी मन धजावेल. जसं मी पुन्हा वापरात आणण्यासाठी प्रत्येक वस्तूकडे पहातो अगदी तसं.जसं त्या रानटीफुलांच्या छोट्या छोट्या बगिच्याकडे पाहून एखादा बाजूने जाणारा म्हणेल,
"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"

हे सर्व ऐकून झाल्यावर मी त्याला म्हणालो,
"खरंच,मी जर तुझ्या घरी प्रत्यक्ष पाहायला आलो नसतो तर नुसतं वर्णन करून समजून घेण्यासारखं हे प्रकरण नव्हतं. रिसायकलींग हा प्रकार मी ऐकला आहे.म्युनीसिपालीटी प्लास्टीक,रबर,लाकडाचे तुकडे जूने कपडे यांची विल्हेवाट लावेल पण पाल्या पाचोळ्याचा विनीयोग तू खरंच मोठया कल्पकतेने केलास म्हणूनच मी प्रथमच ज्यावळी हे फुलांचे ताटवे आणि बगीचे प्रत्येक घरसमोर पाहिले तेव्हा मनात म्हणालो कुणाची तरी मनापासून आणि तू म्हणतोस तशी प्रेमाप्रित्यर्थ केलेली मेहनत असायलाच हवी."
पावलु फर्नांडीस मिश्कील हंसत म्हणाला,
"म्हणूच मी तुला पालघरला ये म्हणून मागे लागलो होतो.हे बघून तू ऍप्रिशीयेट करणार हे मला ठाऊक होतं."

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2008 - 11:38 pm | पर्नल नेने मराठे

माझ माहेर पालघर :> छानच असणार

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Nov 2008 - 2:12 am | श्रीकृष्ण सामंत

चुचु ,
खरंच पालघर सुंदर आहे.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

रेवती's picture

13 Nov 2008 - 3:53 am | रेवती

एकदा पालघरला गेलीये.
तीथल्या जवळच्या समुद्रकिनार्‍यावर व भरपूर छोटी छोटी देवळे आहेत तीथेही जाऊन आलीये.
मला आवडलं पालघर.

रेवती

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Nov 2008 - 6:32 am | श्रीकृष्ण सामंत

रेवती,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 11:36 am | विसोबा खेचर

पावलु फर्नांडीस मिश्कील हंसत म्हणाला,
"म्हणूच मी तुला पालघरला ये म्हणून मागे लागलो होतो.हे बघून तू ऍप्रिशीयेट करणार हे मला ठाऊक होतं."

वा!

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Nov 2008 - 9:06 pm | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

सोनम's picture

9 Dec 2008 - 1:18 pm | सोनम

"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"
अरे तुम्ही तर टाकाऊ वस्तुचा टिकाऊ वापर केला आहे. फुले तर कोठेही छान दिसतात.
तुमच्या वर्णनावरुन पालघर कसे असेल याची मी कल्पना करते आहे.
अजून मला पालघरला जाण्याचा योग आला नाही.
:H :H :H :H :H

(पुण्याची सोनम) राम राम मिपा

चन्द्रशेखर गोखले's picture

9 Dec 2008 - 1:36 pm | चन्द्रशेखर गोखले

साधा, सोपा सरळ सुंदर लेख आवडला.....!