विस्मरणात गेलेले किचन टुल..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Dec 2019 - 3:01 pm

.
चिमटा हे स्वयंपाक गृहातले महत्वाचे टुल आहे..
हल्ली अनेक प्रकारचे चिमटे बाजारात मिळतात..
आमच्या लहान पणी असा चिमटा स्वयंपाक गृहात असायचा..
एका बाजुनी गरम पातेली सतेले आदी साठी होता तर दुसरी अर्ध गोलाकार
बाजुनी "अर्धी कडची" उकळत्या द्रवांची मोठी पातली उचलण्यासाठी वापरली जाते. एका बाजूने चांगली पकड मिळते आणि उकळीच्या
वाफा-यापासून हात लांब रहात असे..

असो..
अहा ते सुंदर दिन हरपले

..

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

9 Dec 2019 - 3:49 pm | जॉनविक्क

भिंतीवरून सभार का ?

कंजूस's picture

10 Dec 2019 - 11:29 am | कंजूस

मग पातेलं उचलतात कसे चिमट्याशिवाय?
---------
जातं ?

इतके दिवस हे टूल आपण नेमकं कुठं ठेवलं होतं ?

अचानक ते मिपाकरांना प्रकट करायचे कसे जमले ?

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2019 - 6:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

आमच्याकडे अजुनही पातेली उचलायला चिमटाच वापरतात. फक्त चित्रात दाखविलेला चिमटा बिडाचा किंवा लोखंडी आहे, तर हल्ली स्टीलचे मिळतात.
ताक घुसळायला रवी, वस्तु कुटायला खलबत्ता,काही उगाळायला सहाण, नारळ फोडायला कोयता हे अजुनही वापरात आहेत. परंतु पाटा वरवंटा, उखळ/मुसळ, जाते वगैरे गेले.

तेजस आठवले's picture

10 Dec 2019 - 10:15 pm | तेजस आठवले

घोर निराशा. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे. तुमच्या प्रतिभेला झालंय तरी काय? ऑ ?
"तो चिमटा असते ना म्हणून जरा दुकते, पण आपल्या वाईफचा चिमटा म्हणून जरा मज्जा पन वाटते" असं काहीतरी असेल असं वाटलं होतं.
-पेस्तनजी जहांगीर हुबळीवाला

पुध्चे धागे टूल डूल कुल मुल चुल हुल पुल ह्या शब्दान्वर येउद्या.

पाषाणभेद's picture

12 Dec 2019 - 9:23 am | पाषाणभेद

येस अकुजी यु हॅव मोअर पोटेंशिअल टू क्रिएट न्यू आर्टीकल्स. यु हॅव अ‍ॅबीलीटी टू डू ऐनीथींग मोअर प्रॉफीटेबल फॉर अस.
नाईस.

आय रिमेंबर्ड सेम टूल माय ग्रांडमदर वॉज युंजींग इन हर किचन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Dec 2019 - 3:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या तात्याचं अजून एक टूल सध्या विस्मरणात गेलं आहे
Chappal
चित्र अंजा वरुन साभार
पैजारबुवा,

सनईचौघडा's picture

23 Jan 2021 - 8:25 pm | सनईचौघडा

अकु काका तुम्ही ज्याला चिमटा म्हणतात त्याला आम्ही पक्कड म्हणतो.