डी जे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Nov 2008 - 2:53 pm

डीजे म्हणजे डिस्क जॉकी असे वाटत असेल तर तो फुल्ल गैरसमज आहे.
पी जे म्हणजे पुअर जोक्स असतील तर डीजे म्हणजे डबडे जोक्स असतात
तुम्हाला येणारे सुपर डुपर डबडे डी जे अर्थात डबडे जोक्स लिहा. यात कोडी जोक्स चारोळी काही वर्ज्य नाही.विनोदी किस्सा सांगुनही ऐकणार्‍या माणसाला हसु येउ नये याची १०००% खबरादारी घ्यायची इतकेच पथ्य पाळायचे .
उदाहारण म्हणून एक डीजे
१) तीन गुडघे असणार्‍या माणसाचे नाव
नीतीन ( नी = knee =गुडघा)
सहा गुडघे असलेल्या माणसाचे नाव
सहानी
नऊ गुडघे असलेल्या माणसाचे नाव
नितीन सहानी
२) एक हत्ती झाडाखाली कोक पीत बसला होता
त्यात एक मुंगी पडली. त्या मुंगीच्या आईने हत्तीला सांगितले
तुम्हारी कोक मे मेरा बच्चा है.
३) तुम्ही अतीशय उत्सुकतेने पुढच्या डीजे च्या अपेक्षेत हे वाक्य पुर्ण वाचून काढले आहे.

वावरमत

प्रतिक्रिया

मराठी_माणूस's picture

11 Nov 2008 - 3:01 pm | मराठी_माणूस

.

अभिरत भिरभि-या's picture

11 Nov 2008 - 3:04 pm | अभिरत भिरभि-या

.. =))

हा बेस्ट डी जे होता ( धमाकेदार जोक)
असो पण मंडळी ,
दिवाळी संपलीये. आपण टिकल्या फुलबाज्या बंद करुयात

घाशीराम कोतवाल १.२'s picture

11 Nov 2008 - 3:08 pm | घाशीराम कोतवाल १.२

अग्निशामक दलाचा(फायर ब्रिगेड)रंग लाल का?

उत्तर:
अग्निशमन दलाच्या जवानांकडे एक असते शिडी
शिडीला असतात पायऱ्या
पायऱ्या चढायच्या पायांनी
पायांना इंग्रजीत म्हणतात फुट
फुटांचं मोजमाप:पट्टी,इंग्रजीत रूलर
पण,रूलरचा दुसरा अर्थ राज्यकर्ता,म्हणजे राजा/राणी
इंग्लंडच्या राणीचं नाव एलिझाबेथ
एलिझाबेथ हे एक जहाज
जहाज चालतं पाण्यावर
पाण्यात असतात मासे
माशांना असतात कल्ले
कल्ल्यांना इंग्रजीत म्हणतात फिन्स
फिनलंड देशाच्या रहिवाशांनाही म्हणतात फिन्स
फिनलंडच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे लाल...!!!

... म्हणून फायर ब्रिगेडचा रंग लाल !!!

संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 3:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फिनलंडचा लाल झेंडा

महेश हतोळकर's picture

11 Nov 2008 - 3:20 pm | महेश हतोळकर

सलाम -^-. पूर्ण डी जे वाचलास तू? तुझा झेंडा बघुनच मला वाचायची इच्छा झाली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पूर्ण डी जे वाचलास तू?

छे हो! मी येवढीही म्याड नाही आहे ... मला चूकच बरोब्बर दिसली! :-)

महेश हतोळकर's picture

11 Nov 2008 - 5:26 pm | महेश हतोळकर

दोनदा आल्यने प्र.का.टा.आ.

महेश हतोळकर's picture

11 Nov 2008 - 5:25 pm | महेश हतोळकर

मी पूर्ण वाचला...
म्याड महेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 5:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी पूर्ण वाचला...

हा पण एक डबडा (पण प्रॅक्टीकल) जोक आहे असं तुम्ही थोड्या वेळानी मान्य कराल! ;-)

अदिती

विनायक प्रभू's picture

11 Nov 2008 - 6:12 pm | विनायक प्रभू

लाल झेंडा? अग आई ग
स्वातंत्र्य दिन केंव्हा हो.
झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 6:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही समजले मला .... गाईड द्या ना पुन्हा एकदा!

अवलिया's picture

11 Nov 2008 - 6:18 pm | अवलिया

जोशीबै
अहो तुम्हाला गाईडची काय जरुरी?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Nov 2008 - 6:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो तुम्हाला गाईडची काय जरुरी?
हा जोक डबडा नव्हता, त्यास्तव हा प्रतिसाद अवांतर आहे.

अदिती

टारझन's picture

11 Nov 2008 - 6:34 pm | टारझन

झेंडा वंदनाला कुठले गाणे म्हणतात.
उठी उठी गोपाळाआआआ ... अरुणोदय झालाआआ ...... आआआआ

--टारायक ट्रभू

आनंदयात्री's picture

11 Nov 2008 - 6:41 pm | आनंदयात्री

छे रे टार्‍या ... उठी उठी गोपाळा करायला तु काय चाळीशी क्रॉस केलीस का ?

तु म्हणायचे गाणे म्हणजे ,, सो जा राजकुमारी .. सोssssssss जा !!

-
आंद्या चेंगट

अवलिया's picture

11 Nov 2008 - 6:50 pm | अवलिया

टा-याला
आपडी थापडी .... हेच बरे
नाहीतर अडगुल मडगुल...

नाना

विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ ।
कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥
चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा ।
मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥

आनंदयात्री's picture

11 Nov 2008 - 6:53 pm | आनंदयात्री

हो क्काले तालुबाल ?
फक्त आपली थापली ??

टारझन's picture

11 Nov 2008 - 7:05 pm | टारझन

अरे अंमळ चोच्यांनो ...
मी 'ते' लोक कुढलं गाणं म्हणत असतील ह्ये सांगितलं रे ...
बाकी आम्ही 'मर्डर'ची गाणी लावतो .. कंसे ... आपडी थापडी काळा'च्या 'पडद्या' आड (गेलं) रे

- (टारयात्री) टारा चेंगट

आनंदयात्री's picture

11 Nov 2008 - 6:53 pm | आनंदयात्री

प्रकाटाआ

सुनील's picture

11 Nov 2008 - 3:21 pm | सुनील

गूगलून पाहिले. फिनलंडचा राष्टध्वज निळ्या क्रॉसचा आहे.

असो, डीजेमध्ये तपशीलातील चूका चालतही असाव्यात पण मिपावर ढकलपत्रातील विनोद चालतात का?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

11 Nov 2008 - 7:59 pm | विजुभाऊ

ढकलपत्र म्हणजे अगदी टाईट तुडुम्ब भरलेल्या पोष्टाच्या पेटीत खुपसुनखुपसुन भरतात ते पत्र.
span style="color: #9900FF;"> झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम