सदू आणि दादू

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
8 Nov 2008 - 11:42 am

सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून मिसळ पाव वर भेटताहेत )

सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहुली)
दादू : नमस्कार सदू. मी आहे (हसणारी बाहुली)
सदू : तू आहेस का मला वाटल कुणीच नसणारै (मनात : कशाला उगवलास रे अवेळी. चांगला एकांतात भेटणार होतो गोदूला)
दादू : अरे पण तू ह्या वेळी कसा काय (मनात: चल कट बर लवकर)
सदू : अरे थोड कंपनीच काम करत होतो. आता आटोपल. म्हटल कुणी आहे का पहाव?(समाधानी बाहुली)
दादू : छान. तू पण माझ्यासारख मन लावून काम करतोस वाटत (अतीव समाधानी बाहुली) (मनात: लेका दिवसभर घरीच तर असतोस. मला काय माहीती नाही काय बच्चमजी. पॉलीसी विकतो म्हणे)
सदू : बर सध्या काय वाचतोहेस चांगल ?
दादू : सध्या विशेष अस काही नाही रे. जमल तर लोकसत्ता वाचतो वेळ मिळेल तेंव्हा. का रे ? (एक शंकेखोर बाहुली)
सदू : नाही जमलच तर मी नूकतीच 'जो न देखे रवी' वर एक प्रेम कविता टाकलीये. वाच वाच (आनंदी बाहुली)
दादू : बर. वेळ मिळेल तेंव्हा वाचेन (एक आनंदी बाहुली) (मनात: वाट बघ)
सदू : बर तू जेवलास का रे (आनंदी बाहुली)
दादू : का म्हणजे? भूक लागली म्हणून (खुळचट बाहुली)
सदू : तस नव्हे. म्हणजे आता जेवण झाल का (बावळट बाहुली)
दादू : अस्स होय (यूरेका यूरेका बाहुली) हो जेवलो. तू? (मनात जा की गूमान गिळायला)
सदू : नाही अजून. थोड्या वेळाने जेवणार. छोले, पुरी आणि विजय स्टोअर्स ची बासूंदी. (आनंदी बाहुली)
दादू : अरे अरे. मेनू नको टाकू लगेच. मेनू टाकायला हा तूला पाक कॄती चा धागा वाटला का? (हसणारी बाहुली)
सदू : हो रे जागा चुकली (खजील बाहुली)
दादू : (पेटलेली बाहुली) अस काय लिहीशील तर तूझ्यावर वात्रटीका लीहीतील बर का मंडळी
सदू : बर ते जाउ दे. मला एक सांग ह्या वेळी तू इथे काय करतोहेस (एक संशयी बाहुली)
दादू : टी पी करतोय. बर तू इथे काय करतोहेस (दोन संशयी बाहुल्या)
सदू : मी वाट बघतोय ( एक आनंदी बाहुली)
दादू : अस्स का. मग तूला सांगायला हरकत नाही. मी पण वाट बघतोय (दोन आनंदी बाहुल्या)
सदू : कोणाची ? (चौकस बाहुली)
दादू : तूला का रे चौकश्या (वैतागलेली बाहुली)
सदू : अरे मी तूझा मित्र ना म्हणून विचारल (हिरमूसलेली बाहुली)
दादू : ठीक ठीक. मी गोदूची वाट बघतोय (आनंदी बाहुली)
सदू : काय (आश्चर्य कारक बाहुली) तू पण (चरफडणारी बाहुली)
दादू : तू पण म्हणजे? तू पण (विस्मय कारक बाहुली)
सदू : म्हणजे गोदूने तूला पण बोलवलय (संगम चित्रपटातली राज कपूर शी साधर्म्य दाखवणारी बाहुली)
दादू : हो मला पण (अंदाज चित्रपटातली दिलीप कूमारशी साधर्म्य दाखवणारी बाहुली)
सदू : पण ती नक्की येइल का रे
दादू : येइलच. तूला काय वाटत (एक बेसावध बाहुली)
सदू : नाही आली तरी मी वाट बघेन. मूसळधार पावसात सूर्य विझेल तोपर्यंत. पौर्णिमेचा चंद्र सागरात बूडेल तोपर्यंत. आकाशातल्या तारका खेळताहेत तोपर्यंत
दादू : नको नको (पस्तावलेली बाहुली)
सदू : काय नको (गोंधळलेली बाहुली)
दादू : कविता नको रे. आज आधीच भरपूर शिणलाय मेंदू. नाहीच धीर धरवत तर ' जो न देखे रवी' मध्ये टाक (मनात मिपा करांची क्षमा मागतो)
सदू : बर बर (दूखावलेली बाहुली)
दादू : अरे ती खरो खर असेल का कुणी ड्युप्लीकेट आय डी त्या 'मूख दूर्बळ' सारखी (संशयी बाहुली)
सदू : गप रे. ती ओरिजीनल असणारै. ती नक्की येणारै. वाट बघ (आनंदी बाहुली)
दादू : पण ती नाही आली तर
सदू : शूभ बोल रे दाद्या (आनंदी बाहुली)
दादू : तिने कुठले कपडे घातले असतील रे (स्वप्नाळू बाहुली)
सदू : तिला किनै आकाशी रंग खूलून दिसेल अस माझ मन मला सांगतय (हरवलेली बाहुली)
दादू : तू पाहील आहेस का तिला (संशयी बाहुली)
सदू : माझ्या नजरेन बघ म्हणजे दिसेल तूला (जास्तीच हरवलेली बाहुली)
दादू : (पूढचा धोका ओळखून) हो रे दिसली दिसली.
सदू : तिचे स्वैर केस बघ कसे वार्‍यावर उडताहेत. आपल्या नाजूक बोटांनी ती कपाळावरील बट मागे सरकवतेय.
(दादू चपापून एकदा आय पी पत्ता चेक करओ. आय पी पत्ता बरोबर असतो)

इतक्यात .....
गोदू : हाय सदू हाय दादू. कसे आहात? (स्मित करणारी बाहुली)

दादू : गोदू तू आलीस (आनंदी बाहुली)
सदू : गोदू तू आलीस (आनंदी बाहुली)
गोदू : आले म्हणजे? येणारच होते
सदू : नाही म्हणजे आजून पर्यंत कधी आली नव्हतीस म्हणून (उत्साही बाहुली)
गोदू : हो पण लगेच जाणारै. (आनंदी बाहुली)
दादू : जाणार लगेच (दुख्खी बाहुली) कुठे?
गोदू : श्याम ला भेटायला (आनंदी बाहुली)
सदू : हा श्याम म्हणजे तो टे टे खेळतो तो (भकास बाहुली)
गोदू : हो तोच तो.त्याच्याबरोबर माझ लग्न ठरलय. येत्या मे महिन्यात (आनंदी बाहुली) चला मी येते बाय
दादू : (फूटकी बाहुली) अभिनंदन. बाय. शुभ रात्री.
सदू : त्रिवार अभिनंदन (मोडकी बाहुली)
(गोदू जाते आणि सदू आणि दादू भग्न हृदयी बाहुल्या शोधत रहातात)

समाप्त.

(प्रेरणा : खरच सांगायला हव का ? :) )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

8 Nov 2008 - 12:15 pm | जैनाचं कार्ट (not verified)

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

महेश हतोळकर's picture

8 Nov 2008 - 12:19 pm | महेश हतोळकर

छान जमलीय....
तुझ्या प्रयत्नाने पुलकीत झालो मुखदुर्बळा!

महेश हतोळकर

टारझन's picture

8 Nov 2008 - 12:30 pm | टारझन

झकास लिवला (उल्हासित बाहुली)
मजा आली रे बाल्या वाचायला (रसिक बाहुली)
आणि मनाप्रमाणे संदर्भ पण लाउन घेतले .. त्यामुळे एक खौट हसु आलं ( जेम्स बॉड बाहुली)

- टारझन
(शक्तिमान बाहुला)

अनिल हटेला's picture

8 Nov 2008 - 12:46 pm | अनिल हटेला

हा हा हा !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मूखदूर्बळ's picture

13 Nov 2008 - 9:39 am | मूखदूर्बळ

धन्यवाद मि पा कर :)