वसुली

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
6 Nov 2008 - 9:57 pm

शरिराला आपण बरेच वेळा "कसले काय? " समजून -टेकन फॉर ग्रॅंटेड समजून-नकळत त्या शरिरावर अत्याचार करीत असतो.परिणाम ज्याचे त्याला भोगावे लागतात.समजून उमजून हे असं होतच असतं.त्याची केव्हा उमज येणार?

आपण करतो वेळेची वसुली
वेळच करते आपुली वसुली
घेतो श्रम विसरुनी विश्रांती
करते वेळ वसुली विश्रांतीची
श्रम आणि विश्रांतीचा हा लपंडाव
करितो आपुल्या प्रकृतीचा पाडाव

देते शरिर इशारा अधून मधून
घेऊ काळजी शरिराची
त्या इशार्‍या मधून
ज्याच्या शरिरावर
होतो जो अत्याचार
त्याचा त्यालाच भोगावा
लागतो परिणाम
केल्यामुळे अविचार

सोडूया मोह आता
वेळेच्या वसुलीचा
आणि
विश्रांती विना श्रमाचा
अथवा पस्तावू
आनंद सुखाने जगण्याचा

श्रीकृष्ण सामंत

कविताविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Nov 2008 - 12:48 am | विसोबा खेचर

आवश्यक तेथे विश्रांती घेऊन, शरीर वेळोवेळी ज्या सूचना देत असतं त्या समजून घेऊन उत्तम आयुरारोग्य कसं राखावं हे सांगणारी सहजसुंदर कविता..

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 1:18 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्याला कविता आवडली हे वाचून बरं वाटलं
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर's picture

7 Nov 2008 - 7:48 am | अरुण मनोहर

शरीर हे इश्वरर्निर्मीत अद्भूत यंत्र आहे. आपण मानवनिर्मित यंत्रांना तेलपाणी देतो, मशागत करतो. पण शरीर यंत्राकडून मोठाली कामे करून त्याची योग्य निगा राखत नाही. समतोल आणि नियमित आहार, भरपूर विश्रांती, मनासाठी हास्य विनोद, कला ह्यांचा खुराक इत्यादि गरजा असतात. पण ह्या यंत्राला पैसे कमावण्याच्या वेड्या शर्यतीत वाटेल तसे ताबडवून आपण ते शरीर जे ओरडून ओरडून मागत आहे, त्याकडे दुर्लक्ष करतो.

ह्या घोडचुकांकडे लक्ष वेधणारी चांगली कविता.

श्रीकृष्ण सामंत's picture

7 Nov 2008 - 9:15 am | श्रीकृष्ण सामंत

अरुण मनोहर,
आपल्या मुद्दाशी एकदम सहमत
प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com