ओंजळभर पाणी

हर्षदा विनया's picture
हर्षदा विनया in जे न देखे रवी...
4 Nov 2008 - 10:54 am

ओंजळभर पाणी
खूप तहान लागलीये, हो ना?
ह्म्मं..मलाही, या वाळवंटात,
चल,आपणच खोदूया एक विहीर,
आपल्या दोघांसाठी,खोल-खोल..

मी माती सारते बाजूला थोडी,
मग तूही सार माती थोडी,
मग मी सारेन मोठाला दगड,
तूही कर तसंच,अगदी तसंच..

आलटून-पालटून, आळीपाळीने,
आपण सारत राहू एकेक सगळं
खूप खोल खोल जाण्यासाठी..

मग कूठेतरी लागेल ओलावा,
उत्साह दूणावेल आणि तहानही..
अचानक हाताला लागेल थोडंसं पाणी,
अगदी थोडं-थोडकंच हं...!!!

उडवून पाहीन मी ते पाणी,
तूझ्या नाक,गाल, ओठांवर,
शहारशील तू कदाचित, अचानक,
पण ओठ जरा जास्तच हपापतील..

तूझा उजवा हात दे अन माझा डावा घे,
बनवू आपण 'दोन' हातांची 'एक' ओंजळ,
दोन हातांची नि दोन जीवांची..एकच ओंजळ.

ओंजळीत घेउ ते थोडं-थोडकं पाणी,
येउ इतके जवळ की भिजून जाउ दोघंही !
त्या ओंजळभर पाण्यात, चिंब चिंब.................................................
पूढचा भाग वाचा..http://www.karadyaachhata.blogspot.com/

प्रेमकाव्यप्रकटन

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

8 Nov 2008 - 10:56 am | अरुण मनोहर

सुंदर कल्पना आहे. छान मांडली आहे.
मी माती सारते बाजूला थोडी,
मग तूही सार माती थोडी,
मग मी सारेन मोठाला दगड,
तूही कर तसंच,अगदी तसंच..

पण ७३ वेळा सारून झाल्यावर एक देखील ओंजळ प्रतिसादाचे अर्घ्य द्यायला पुढे आली नाही ह्याचा लेखक म्हणून विषाद वाटला.

हर्षदा विनया's picture

8 Nov 2008 - 8:42 pm | हर्षदा विनया

धन्यवाद अरुण मनोहर..
खेद नसावा...

आपली आभारी..कविता पूढे ही आहे.. दूसरा भाग देखील आहे ब्लोग वर..

हर्षदा विनया's picture

8 Nov 2008 - 8:44 pm | हर्षदा विनया

भिजून झाले आपले चिंब चिंब,'
की होतील कधीतरी श्वास थंड,
मग आवरून घेऊ...
बाजूला सारलेलं सगळं..
परत तसंच आळीपाळीने !!
एकेक दगड रचत राहू..

सगळं सावरून मग येऊ,
त्या 'खोलातून' 'जमिनीवर'.
एकमेकांकडे पाहून किंचित हसत!

रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी,
जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी'
निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर,
कादाचित वेगळ्या,हातातला हात सोडून,
एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता..

मी मात्र पाहीन वाट,
कधीतरी वळणं घेतील वाटा,
छेदतील एकमेकांना, 'चूकून.'.
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!!
harShadaa..

www.karadyaachhata.blogspot.com

अरुण मनोहर's picture

9 Nov 2008 - 6:24 am | अरुण मनोहर

क्या बात है! खूपच भावली ही कविता.

पावसाची परी's picture

9 Nov 2008 - 9:53 am | पावसाची परी

खुप आवडली. सोप आणि सुन्दर शब्द

हर्षदा विनया's picture

9 Nov 2008 - 6:50 pm | हर्षदा विनया

अरूण मनोहर आणि पावसाची परी..
धन्यवाद..