सकाळी सकाळी

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जनातलं, मनातलं
2 Jan 2019 - 12:28 pm

ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चिडलेलं बाळ बापाला मागे ढकलत आणी रडत आत जायला नकार देउ लागलं.जर्कीनची कॕप बाजुला झाल्याने ती बाहुली आता ठळक दिसु लागली. आणी कपाळापासुन मानेपर्यंत एक सारख्या कट असलेल्या केसांखाली गोल चेहर्याची आणी नकट्या नाकाची बाहुली ,रडुन लाल झालेलं नाक.

शेवटी बापाला दया येउन त्याने पुन्हा बाहुलीला उचलुन कडेत घेतलं आणी समजुत घालु लागला.पण एकंदरीत थंडी गारठ्याचं झोपेतनं उठवुन जबरदस्ती शाळेच्या तुरुंगात कोंडण्याच्या बापाच्या कृत्याचा निशेध एवढा तिव्र होता की नाईलाजाने बाप पुन्हा सगळं उचलुन गाडीकडे निघाला.

समोर अजुन एक कार येउन थांबली.आतुन पुन्हा (पात्र बदलेली) अजुन एक महानाट्याला सुरुवात होत होती.एवढ्यात बापाच्या कुशीत एक वादळ तयार झालं.हृssssतु अशी किंचाळी फोडत आणी हातपाय झाडत बाहुली बापाच्या हातातुन सुटली आणी धावत त्या कारकडे गेली.आईच्या हातातला हृतीकही गोड हसत बाहुलीकडे पळाला.आणी आपल्या छोट्याश्या बॉयफ्रेंडचा हात पकडुन बापाला विसरलेली बाहुली शाळेच्या गेटातुन आत गेली.

हसणार्या बापाच्या डोळ्यात दोन थेंब नक्कीच होते.

नाट्यलेख

प्रतिक्रिया

बाजीगर's picture

2 Jan 2019 - 3:54 pm | बाजीगर

सुंदर लिहीलत हो.
अगदी शब्दचित्र उभं केलतं.
you have style.
तुमचे डोळे घटनेचे चलतचित्र record करतात,
आणि details !
तुमच्या लिखाणाचा strong point आहे.

pls लिहित रहा,
अजून वाचायला आवडेल.

प्रमोद पानसे's picture

2 Jan 2019 - 4:33 pm | प्रमोद पानसे

थँक्यू

प्रमोद पानसे's picture

2 Jan 2019 - 4:34 pm | प्रमोद पानसे

थँक्यू

भारी... आणि सत्य घटना असणार हे सांगायला नकोच!

Blackcat's picture

2 Jan 2019 - 10:02 pm | Blackcat (not verified)

छान

समीर वैद्य's picture

5 Jan 2019 - 6:54 pm | समीर वैद्य

खूप छान

पद्मावति's picture

6 Jan 2019 - 2:22 pm | पद्मावति

मस्तच :)

सविता००१'s picture

7 Jan 2019 - 5:56 pm | सविता००१

गोड आहे कथा