भोंडल्याची (डोंबलाची ) गाणी

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
1 Nov 2008 - 11:18 am

(थोडस चर्‍हाट : भारत- ऑस्ट्रेलीया कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. गेल्यावेळेची मालिका ही रंगतदार झाली होती. पण ती मालिका जास्त गाजली ती खेळा व्यतीरिक्त इतर कारणांमूळे. कांगारूंची शेरेबाजी (स्लॉजींग) , हरभजन- सायमंडस वाद , पंच स्टीव्ह बकनर ह्यांचे पक्षपाती निर्णय इत्यादी इत्यादी. सदर विडंबन (?) ही पार्श्वभूमी लक्षात घेउन वाचावे)

भोंडल्याची गाणी (डोंबलाची गाणी)

पात्र (वात्र) परिचय
बका- स्टीव बकनर
बना- बेन्सन
माया - माईक प्रॉक्टर
सया - सायमंडस
रेखा - रिकी पाँटींग
कला- मायकल क्लार्क

वेशभूषा- छगन भाई आणि मगन भाई ड्रेस वाले
केशभूषा - श्री शंकर केश कर्तनालय
गीत - असच कूणीस
चाल - नेहेमीचीच (वाकडी)

ढाप ग 'बका'
ढापू मी कशी
या गावचा त्या गावचा 'ऑप्टीशीयन' नाही आला
चष्मा नाही मला ढापू मी कशी

लाट ग 'बना'
लाटू मी कशी
या गावचा त्या गावचा 'वाणी' नाही आला
कणीक नाही मला लाटू मी कशी

नाच ग 'सया'
नाचू मी कशी
या गावचा त्या गावचा 'मदारी' नाही आला
स्टेप्स नाही मला नाचू मी कशी

आउट ग 'कला'
आउट मी कशी
या अम्पायरचा त्या अम्पायरचा 'डीसीजन' नाही आला
आउट नाही दिला आउट मी कशी

लाज ग 'रेखा'
लाजू मी कशी
जनाची नाही मनाचीपण नाही
लाजच नाही मला लाजू मी कशी.

बोल ग माया
बोलू मी कशी
या गावचा त्या गावचा 'रायटर' नाही आला
स्क्रीप्ट नाही मला बोलू मी कशी.

(मंडळी आता अजून उखाण्याचा कार्यक्रम व्हायचा आहे. तो बहूदा मालिका सम्पल्यावर हूश्श...)

चू. भू. द्या. घ्या

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

झकासराव's picture

1 Nov 2008 - 12:11 pm | झकासराव

हे हे हे हे हे हे हे हे हे...
नवीन परिस्थितीवर कायतरी येवु देकी आता. :)

................
बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय.
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

2 Nov 2008 - 7:42 am | विसोबा खेचर

मस्त! :)

मूखदूर्बळ's picture

13 Jan 2009 - 10:00 pm | मूखदूर्बळ

धन्यवाद :)