वाटणी - एक लघुकथा

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
29 Aug 2018 - 5:07 pm

त्या माणसाने स्वतःच्या मनाशी ठरवले - हीच मोठी लाकडी पेटी न्यावी. उचलण्याचा प्रयत्न केला तर पेटी एक इंचही हलली नाही. अवजड पेटीशी झटापट करत असतांना दुसरा त्याला बघत होता. ह्या दुसऱ्याला स्वतःसाठी काही सापडले नव्हते.

- 'मी मदत करू का तुला?' त्याने पहिल्याला विचारले. पहिला तयार झाला.

मजबूत हातांनी पेटी उचलून पाठीवर ठेवली. पहिल्याने फक्त हात लावला जरासा. दोघे बाहेर निघाले.

पेटी फारच जड होती. उचलणाऱ्याच्या पाठीला कळ लागत होती. त्याचे पायही दुखू लागले. पण पेटीत असलेल्या घबाडातून मिळणाऱ्या वाट्याच्या अपेक्षेमुळे तो त्रास सहन करायला तयार होता. त्याच्यापेक्षा पहिला माणूस अगदीच कमकुवत होता, पेटीला नुसता हात लावून तो मागेमागे चालत होता - स्वतःचा हक्क कायम ठेवत.

दोघे सुरक्षित स्थानी पोचले. पेटी खाली ठेवून दमलेल्याने विचारले - आता बोल, मला ह्यातील किती माल देणार?

- पाव भाग तुझा, रुपयात चार आणे.

- खूप कमी होतात.

- कमी नाही, उलट खूप जास्त देतोय. पेटीवर आधी मीच हात टाकला होता ना?

- ते ठीक आहे, पण हे धूड इथवर उचलून कोणी आणले?

- ठीक आहे. दोघांत अर्धे-अर्धे वाटून घेऊ. बोल, मंजूर?

- मंजूर. उघड पेटी.

पेटी उघडली. त्यातून हाती तलवार घेतलेला एक माणूस बाहेर पडला. तलवारीनी सपासप वार करत त्याने दोन वाटेकऱ्यांची चार तुकड्यात वाटणी केली !

(सआदत हसन मंटो ह्यांच्या 'तक़सीम' ह्या मूळ उर्दू कथेवर आधारित.)

* * *

ज्यांनी इथवर वाचलंय त्यांच्यासाठी :-

तक़सीम ही कथा प्रसिद्ध झाली १९४८ साली. पण तेंव्हा मंटोंना 'साहित्यकार' मानायला कोणी तयार नव्हते. अनेक लोकांना तर मंटोंना वेड लागलंय असा दाट संशय होता. पुढे वीसेक वर्षानंतर त्यांच्या साहित्याला लोकप्रियता मिळाली. मला स्वतःला ही कथा प्रतीकात्मक वाटते.

भाषान्तरातले न्यून ते माझे समजावे.

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

29 Aug 2018 - 5:25 pm | खटपट्या

खरी कथा एवढीच लहान आहे की मोठी आहे. जर अनुवाद करत असाल तर पुर्ण करा म्हणजे वाचायला मजा येइल.
आवडली

मंटोंची मूळ कथा छोटीशीच आहे, जेमतेम २४० शब्दांची.
खऱ्या अर्थाने 'लघु'कथा.

निशाचर's picture

29 Aug 2018 - 5:40 pm | निशाचर

कथा आवडली.

अनिंद्य's picture

29 Aug 2018 - 9:45 pm | अनिंद्य

_/\_

कुमार१'s picture

29 Aug 2018 - 6:19 pm | कुमार१

बरोबर , ती प्रतिकात्मक आहे

अनिंद्य's picture

29 Aug 2018 - 9:47 pm | अनिंद्य

आणि दुर्दैवाने तत्कालीन प्रतीके आजही प्रासंगिक आहेत :-(

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2018 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडली ! बरीच अर्थपूर्ण आहे कथा.

अनिंद्य's picture

29 Aug 2018 - 9:48 pm | अनिंद्य

आभार !

_/\_

प्रचेतस's picture

30 Aug 2018 - 6:03 am | प्रचेतस

परिणामकारक कथा.

अनिंद्य's picture

30 Aug 2018 - 11:03 am | अनिंद्य

थँक्यू !

ही कथा सुद्धा आधी वाचनात आली नव्हती. छान अनुवाद केला आहेत, धन्यवाद.

होय, आधीच मराठीत आलेल्या मंटो कथा वगळतो आहे.
प्रतिसादाबद्दल आभार.

सिरुसेरि's picture

30 Aug 2018 - 8:31 am | सिरुसेरि

छान अर्थपूर्ण कथा .

अनिंद्य's picture

30 Aug 2018 - 2:47 pm | अनिंद्य

आभार !

पद्मावति's picture

30 Aug 2018 - 3:07 pm | पद्मावति

कथा आवडली.

अनिंद्य's picture

30 Aug 2018 - 3:53 pm | अनिंद्य

@ पद्मावति,
आभार.

Nitin Palkar's picture

30 Aug 2018 - 8:29 pm | Nitin Palkar

शेवट खूपच परिणामकारक.

अनिंद्य's picture

31 Aug 2018 - 11:05 am | अनिंद्य

_/\_

आणि मूळ लेखक किती शब्दकृपण आहेत ते बघा.

ज्योति अळवणी's picture

31 Aug 2018 - 10:03 pm | ज्योति अळवणी

छान अनुवाद. आवडली कथा

अनिंद्य's picture

1 Sep 2018 - 6:39 pm | अनिंद्य

@ ज्योति अलवनि,
आभार.

थोडक्यात पण सुंदर लघु कथा. म्हणताना "घागर में सागर". अनेक अार्थ सांगून जाणारी अल्प शब्दातील नाविन्य असणारी लघु कथा. सुंदर अनुवाद. आणखीन वाचायला आवडेल.

अनिंद्य's picture

4 Sep 2018 - 11:22 am | अनिंद्य

@ Sanjay Uwach,

आभार !

मी यापूर्वी मंटोंची कथा 'करामत' इथे मिपावर प्रसिद्ध केली आहे.
आणखी काही लघुकथांचे मराठी भाषांतर करीत आहे.

अनिंद्य