सूर्योदय

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 May 2018 - 12:57 pm

कुणा रातीला पडले कोड़े
कुठून येतसे सखी चांदणी
शीतल कोमल तरुही सजले
अंधार उजळण्या हो आतुर

गळामिठी मग समीराचीही
स्पर्शु पाहातो गात्रो-गात्री
दुरात कुठे चाहूल उषेची
शोधत चंद्र येई क्षितिजावर

कलकल कलरव पक्षी बोलती
लक्ष धुमारे फुटले पूर्वेला
दशदिशाही करतील पुकारे
हलकेच रवी येई समेवर

पानोपानी, मृदु गवतावर
थेंब दंवाचा तोल सावरी
अनवट अनघड पाऊलवाटा
नाजुक पाउले, घट डोईवर

हळुवार उजळे पुर्वा नभभर
आरक्त लाली क्षितीजावर
आसमंताला उजळीत येईल
घट तेजाचे घेवून दिनकर

© विशाल कुलकर्णी

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

27 May 2018 - 6:47 pm | चांदणे संदीप

हे जरासं बंबाळकाव्य झालं आहे.

पु.का.शु.

Sandy