मुलांना आहे तसंच खरं ते सांगाव.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
26 Oct 2008 - 10:42 pm

रमाकांत परूळेकर आणि त्यांच कुटूंब रत्नागिरीतल्या एका लहानशा परूळे नावाच्या गावात राहातात.रमाकांतचं बरंचस आयुष्य मुलं आणि त्यांच शिक्षण ह्यावर केंद्रित आहे.
ते गावातल्या शाळेत शिक्षक होते.अगदी पहिली पासून ते आठवी पर्यंत प्रत्येक वर्गात त्यांनी शिक्षक म्हणून आपला अनुभव घेतला होता.आता गावात आणखी दोन तीन शाळा झाल्या आहेत आणि ते सध्या शाळेच्या स्कूल बोर्डाचे सभासद आहेत.
परूळ्याला आमच्या घराचं दैवत आदिनायण,त्या दैवताचं पुरातन मंदीर परूळ्यात आहे.ते पहाण्यासाठी मी अलीकडे गेलो होतो.

मंदिरातल्या पुजार्‍याने मला रमाकांत परूळेकरांची ओळख करून दिली.आणि त्यांच्याच घरी मी दोन दिवस राहयला होतो.ह्या मुक्कामात माझी त्यांची चांगलीच ओळख झाली. अनेक विषयावर आमची त्या वेळात चर्चा झाली.हे गृहस्थ परूळ्यात शाळा चालवत होते.त्या संदर्भाने मुलांबद्दल विषय निघाला.

त्यावर ते म्हणाले,
"मला वाटतं जिथे वयस्कर लोक पण आपल्या क्षमतेची हतबलता दाखवतात,तिथे लहान मुलं तोंड द्दायची आणि अर्थ समजायची स्पृहणीय क्षमता दाखवतात.
ही मुलं अस्विकारणीय गोष्ट स्विकार करू शकतात हे पाहून मी चकितच होतो.

त्या दिवशी मला एका मित्राचा फोन आला की त्याच्या बायकोला कॅन्सर झाला आहे असं डॉक्टर म्हणतात.
"मुलांच्या कानावर ही गोष्ट घालू कां?"
असं त्याने मला विचारलं.
"बेलाशक सांग "
असं मी त्याला सागितलं.आणि म्हणालो,
"होय,मला वाटतं तूं सांगावस.त्यांना सत्य कळायला हवं.किती ही मर्मभेदी ते सत्य असे ना का?"
बरेच वयस्कर लोक मुलानी प्रामाणिक असावं असा आग्रह करतात.पण आपल्यापैकी कितीजण आपल्या मुलांबरोबर प्रामाणिक असतो.विषेश करून कठिण विषय असतो तेव्हा,मृत्यु,कामवासना,लाचखोरी,आपली स्वतःची कमजोरी वगैरे वगैरे असताना.

मला वाटतं मुलाना सत्य सांगणं हे त्यांच्या जीवनात त्यांच्या ज्ञानासाठी अत्यावश्यक असतं,त्यांच्या दृढविश्वासाठी,आणि त्यांच्या आचरणासाठी आणि मान्यतेसाठी पण. ह्याचा अर्थ मुलाना नाहक भयभयीत करण्याची जरूरी आहे असं नाही.
बर्‍याच लोकाना वाटतं की मुलाना सत्य न सांगणं हे त्याना सुरक्षीत ठेवण्यासाठी केलं जातं.
आपण जेव्हा मुलांनबरोबर प्रामाणिक असतो तेव्हा त्यांच्या अंतर्बोधाला मान्यता देत असतो.आपण असं मान्य केलं -होय,लोक मतलबी असतात,आजोबांना पिण्याचे प्रॉबलेम आहेत,नवरा बायकोत भांडणं होऊन त्यानी वेगळं होणं हे दुःखदायी आहे,वगैरे वगैर-तर मुलाना आपण त्यांच्या सद्स्द्वेक बुद्धिवर भरंवसा ठेवायला उद्दुक्त करतो.ती मुलं आपला आतला आवाज स्विकार करून त्यावर विसंबून राहतील.आणि तो आतला आवाज त्याना आयुष्यभर साथ देईल.

एखादी विशेष घटना व्हायची असल्यास त्या घटने बद्दल मुलांमधे काही तरी विचित्र समझ येते.आपलं अप्रामाणिक हंसू पाहून सुद्धा त्याना समज येते,आपण बेचैन झालो असलो तरी त्यांच्या लक्षात येतं,आपण असत्य केव्हा बोलतो तेही त्यांना कळतं.

एक दिवशी मी माझ्या थोरल्या दोन मुलींबरोबर तळ्यावर फिरायला गेलो होतो.वातावरण अगदी शांत आणि सुखद होतं-अगदी आंतरीक बातचीत करायला परफेक्ट-ध्यानी मनी नसता एका मुलीने मला विचारलं,
"बाबा पूर्वी तुम्ही कधी दारू प्यायचा का?"
मी एकदम अचंबीत झालो.पण मुलीनी हेका सोडला नाही.त्यानी मला पकडलं होत.आणि त्याना ते अवगत पण होतं.तेव्हा मी सत्य ते सांगितलं.यद्दपी काहीसं संक्षीप्तात.त्या व्यसानाबाबत परिणाम- प्रवर्तक आणि स्पष्ट सांगताना प्रलोभनाचं आणि संकटाचं पण बोलणं झालं.मला वाटतं माझा प्रामाणिकपणाच व्यसानाच्या धोक्यापेक्षा जास्त परिणामकारक झाला.

काळ पुढे चालला आहे आणि तशीच मुलं पण.ह्या मुली आता कॉलेज मधे आहेत.मी जरी आयुष्यात पालक म्हणून भरपूर चूका केल्या तरी माझ्या मुलांबरोबर शुद्ध आणि मोकळं नातं ठेवलं आहे.मला वाटतं माझं त्याच्यांशी सत्यवादी असणं मला फायद्याचं झालं आहे.कारण माझी खात्री आहे की ती मुलंपण माझ्याशी तेव्हडीच प्रामाणिक आहेत."

हे परूळेकरांचे विचार ऐकून क्षणभर मला असं वाटलं की देवळात येण्याच्या निमित्ताने ह्यांचा अनुभव आणि विचार ऐकण्याचा हा योगायोग होता.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

अवलिया's picture

3 Dec 2010 - 11:44 am | अवलिया

मस्त लेख ! आवडला !

विलासराव's picture

3 Dec 2010 - 12:07 pm | विलासराव

असंच वाट्ते की पालकांनीही प्रामाणीक असायलाच हवं.

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 12:16 pm | शिल्पा ब

१००% सहमत.

गांधीवादी's picture

3 Dec 2010 - 12:22 pm | गांधीवादी

लेख आवडला,
पण परिस्थिती काही वेगळी आहे आज. प्रामाणिक राहून दोन घटका सुद्धा राहू शकत नाही माणूस.

परमपूज्य रिमोटचे खेळणे देशाशी प्रामाणिक नाही. बाकी त्याची पिल्लावळ बद्दल बोलायलाच नको.

आज,
जगातून जवळ जवळ हद्दपार होत असेलेला गुण,
ज्याच्या अंगी असेल त्याचाच नाश करणारा गुण,
आजच्या युगातील सर्वात मोठा दुर्गुण : प्रामाणिकपणा.

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 12:25 pm | शिल्पा ब

इतरांशी नाही तर स्वतःच्याच मुलांना खरं काय ते सांगावं असं सांगणारा लेख आहे.

गांधीवादी's picture

3 Dec 2010 - 12:35 pm | गांधीवादी

धन्यवाद,
भारत माझा देश आहे, हि सर्व भारत मातेची मुले आहेत, म्हणून सर्व माझे बंधू भगिनी आहेत अशी निदान मी तरी शप्पथ घेतलेली मला आठवते.

(कृपया वैयक्तिक घेऊ नये हि नम्र विनंती)
आणि काय हो, कुटुंब म्हणजे काय आपली बायका पोरेच का ? प्रामाणिक राहायचंच असेल तर संपूर्ण जगाशीच राहू ना. काय हरकत आहे का ? मूळ लेख मला आवडलाच, पण त्याच्या मधील भावना केवळ आपली मुले आणि आपल्या बायका इतपतच का मर्यादित ठेवायच्या ?
असो, हे माझे वियाक्तिक विचार आहेत. इतरांनी असे वागलेच पाहिजे असा हट्ट नाही.

राजेश घासकडवी's picture

3 Dec 2010 - 12:50 pm | राजेश घासकडवी

आणि काय हो, कुटुंब म्हणजे काय आपली बायका पोरेच का ? प्रामाणिक राहायचंच असेल तर संपूर्ण जगाशीच राहू ना. काय हरकत आहे का ?

आपली बायकापोरं, आपली भावंडं, एकंदरीत आपलं कुटुंब यांच्याशी इतर सामान्य समाजापेक्षा अधिक जवळिकीने वागण्याची, त्यांच्यासाठी प्राणार्पणालाही तयार असण्याची प्रवृत्ती सजीवामंध्ये दिसते. हे उत्क्रांतीच्या प्रक्रियेने आपल्यात घोटवलेलं आहे. इथे वाचा.

शिल्पा ब's picture

3 Dec 2010 - 1:30 pm | शिल्पा ब

<<<सर्व माझे बंधू भगिनी आहेत .....इतरांनी असे वागलेच पाहिजे असा हट्ट नाही.

तुम्ही खरंच असं वागता हे वाचून मन भरून आलं...
(तुम्हीपण वैयक्तिक घेऊ नका..)

स्वानन्द's picture

3 Dec 2010 - 1:21 pm | स्वानन्द

सहमत

परुळेकरांच्या विचारांशी सहमत आहे. मुलांना प्रामाणिक पणे सांगणं चांगलं. अर्थात लेखामध्ये दिलेल्या उदाहराणांवरून ही मुले १३ -१४ वर्षांपेक्षा मोठी असावी असा अंदाज. त्याप्रमाणे त्यांना बर्‍यापैकी समज आलेली असते हे पटतं. त्यांच्यात होणार्‍या/होऊ लागलेल्या / झालेल्या बदलांमुळे आपण मोठे होत आहोत अशी भावना हळुहळु मनात येऊ लागलेली असते.

या काळात पालकांचे आजार, किंवा इतर, आजवर न सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्याने त्यांना परिस्थिती ची जाणीव चांगल्या प्रकारे होऊ शकते असं वाटतं. उलट अशा गोष्टी लपवल्या तरी कधी ना कधी सत्य समोरे येतेच, पण मग त्यावेळी ते पचवणे नक्कीच अवघड जाऊ शकते.

संपूर्णतः मान्य.

सर्वच विषय सहजपणे सांगता येतील असं नाही. पण गोष्टी सांगायला हव्यात जमतील तशा. शक्यतो तशाच्या तशा.

मग बाहेर जाऊन त्यांनी ते ज्ञान चार लोकांत दाखवलं (दाखवणारच..!!) आणि आपली सो कॉल्ड छी थू झाली (हे भलतं ज्ञान खुद्द बापाने शिकवलं असल्या लहान वयात? काय आचरट आहेत पालक..) तर ते कणखरपणाने घ्यावं. ही मनाची तयारी आधीपासूनच हवी. तिथे उदास होऊ नये.

मी कसा आलो? विचारलं तर काय सांगावं ? जसंच्या तसं शक्यतो?

"पोटातून.."

मग पोटात कसा गेलो.. ? वगैरे "कॉन्सीक्वेन्शियल डॅमेजेस :-) " उत्तरात कव्हर करता येतील का?

सर्वांनाच विचारतो.