असेहि एकदा व्हावे

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
9 Apr 2018 - 4:58 pm

नष्ट केलेल्या डोंगराचेही स्मारक व्हावे

तत्कालीन पक्षाचे नाव त्यावर असावे

उदघाटन सोहळ्याची गाथा लिहावे

डोंगर दर्या खोरे फक्त पुस्तकातच उरावे

असेही एकदा व्हावे

नदीजोड प्रकल्पात मस्त हात धुवून घ्यावे

नवीन काहीतरी समोर आणून जुन्यावाणीच हादडावे

स्वतःच्या कर्तृत्वाचेच फक्त ढोल बडवावे

लोकांना परत नव्याने चुना लावावे

असेही एकदा व्हावे

रस्ते पुन्हा नव्याने उखडावे

त्याच जोमाने परत बांधावे

काळ्या कंत्राटदारांना दुसऱ्या नगरात वसवावे

त्या नगरातही जोमाने हादडावे

होतच होते आधीही ,, असेही पुन्हा एकदा व्हावे

कधी हात व्हावे , कधी कमळ व्हावे

कुठे शिवधनुष्य तर कुठे आप व्हावे

एकूण काय कसेही बघा

खाणाऱ्याचे नेहेमी बाप व्हावे

सिद्धेश्वर विलास पाटणकर

कविता माझीधोरण

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

9 Apr 2018 - 5:00 pm | अभिजीत अवलिया

जमलयं की.

खिलजि's picture

9 Apr 2018 - 5:02 pm | खिलजि

धन्यवाद मित्रा

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 5:03 pm | पगला गजोधर

अगे आयोव, ऍट अ टाइम , एवढे पक्षी एका फटक्यात ??
:)

खिलजि's picture

9 Apr 2018 - 5:05 pm | खिलजि

अगे आयोव, म्हनजे काय प ग भौ

पगला गजोधर's picture

9 Apr 2018 - 5:31 pm | पगला गजोधर

अग आई ग !
Mama Mia

खिलजि's picture

9 Apr 2018 - 5:33 pm | खिलजि

धन्यवाद

दुर्गविहारी's picture

10 Apr 2018 - 6:23 pm | दुर्गविहारी

अशा कविता जरा जपुनच ! ;-)

सस्नेह's picture

10 Apr 2018 - 7:29 pm | सस्नेह

हॉट कविता !!

कसेही करून खा हीच संस्कृती झाली आहे प्रत्येकाची. बाकी कोण कुठल्या पक्षात आहे ह्याने आता तर काहीच फरक पडत नाही. इकडचा वाल्या तिकडं गेला की वाल्मिकी होतोय. चांगलंय. बाकी कविता आवडली. खून माणुसकीचा असो वा पर्यावरणाचा; तोही सेलिब्रेट करावा, झालं.

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार .... अजूनहि डोंगर फोडले जात आहेत ... डोळ्यादेखत खारफुटीच्या नाश केला जात आहे .... हे सर्व थांबू शकते जर सरकारने मनात आणले तर .... पण नाही .. आता काय तर मिठागरांवर डोळा आहे ... गिधाडं आहेत सारे ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर

पगला गजोधर's picture

11 Apr 2018 - 7:26 pm | पगला गजोधर

तुम्ही निवडणूक लढून व जिंकून, यामधे बदल घडवा...

टवाळ कार्टा's picture

11 Apr 2018 - 8:48 pm | टवाळ कार्टा

हा प्रतिसाद जपून ठेउन बर्याच ठिकाणी चोप्य चोप्य-पस्ते केला जाईल :)

खिलजि's picture

12 Apr 2018 - 1:40 pm | खिलजि

प ग भाऊ .. अहो निवडणूक लढवायला काय त्यात ? लढवू कि ... पण पक्षाचं नाव मात्र तुम्ही ठरवा.. हि एक नम्र विनंती ... मला कि नाही हि कविता टाकल्यावर एक प्रश्न पडलाय ... तो हा कि आपण ( अर्थात सरकार ?) ... असा एखादा उपग्रह पाठवू शकतो का .. कि ज्यात क्लोरोफिल डिटेक्टर असेल .. नाही म्हणजे होईल काय कि खरंच किती हिरवीगार झाड अस्तित्वात आहेत आणि त्याअनुषंगाने प्रदूषणाची पातळी किंवा त्याची गुणवत्ता याचे निकष तरी निदान समोर येतील ... इथे वृक्षारोपणाचे भरगोस कार्यक्रम होतात पण त्यामधील किती झाडे जगतात हा वादाचा प्रश्न आहे ... अजून एक मागे फक्त एकदाच पेपरमध्ये बातमी वाचली होती .. कि खारफुटीच्या जंगलात आफ्रिकन ग्रासचा भयानक विळखा ... ह्या अश्या बातम्या फक्त एकदाच वाचायला मिळतात .. परत नाही ... हे असं चाललंय सगळं ....

सिद्धेश्वर विलास पाटणकर