चला...बाजार उठवूया...

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
24 Mar 2018 - 10:54 pm

mb
हॅलो, नमस्कारम, सतश्री अकाल, सलामालैकुम, नमस्ते.
भाईयो, बहनो और बडे बच्चो जो खुदको इन्सान समझते.

अ‍ॅमेझॉनसे लेकर फ्लिपकार्टतक, स्नॅपडिलसे लेकर इबेतक.
हर कोई चीज मौजूद है अपने पास आसमान लेकर खाकतक.

मेरे प्यारे मिपावासीयो, जरा देखा भी करो इस नये बिझनेसको.
हर चीज यहांपे लाजवाब और बेहतरीन, जैसी चाहिये जिसको.

.....
चलो भैय्या आपकी पेशे खिदमत आहे नवनवीन प्रॉडक्ट. फक्त तुमच्यासाठीच.

हि बेहतरीन चीज आहे स्वआरतीमशीन

am
स्वआरतीमशीन

आपल्यापैकी काही जण असतात त्यांना सतत स्वतःचे कोडकौतुक व्हावेसे वाटते, किंबहुना आपण त्यासाठीच जन्मास आलोय असे वाटते, त्यासाठी किती कष्ट करता आपण. कौतुक करणेबल काहीतरी करायचे, भाटांची फौज गोळा करायची, त्यांचे लाड पुरवायचे, आपले कौतुक करतील म्हनून त्यांचेही कौतुक करत राहायचे, एक ना दोन.. बस्स्स, गेला तो जमाना. आता हि क्रांतीकारी मशीन आणा, सारे कष्ट विसरुन जा. फक्त ह्याचा सेल्फरेड मोड ऑन करा आणि गळ्यात अडकवा. लगेच एक आरतीचे ताट, दोन सुरेख चायनाएलीडीवाल्या निरांजनासहित तुम्हाला ओवाळायला सुरु करेल. अधून मधून स्वस्तुतीपर गाण्याची धून कानी पडायचीही सोय. आपण टेकसॅव्ही असाल तर गोप्रो कॅमेर्‍यासहीतही हे मशीन उपलब्ध आहे. तुमची ही साग्रसंगीत आरती व्हिडिओमार्फतही शेअर करु शकता. जुन्या नोकीया बीएलफाईव्हसी बॅटरीवरही चालणारी हि मशीन लाईफटाईम वॉरंटीसह उपलब्ध आहे. आरतीचे विषय बदलण्याचेही मोडस उपलब्ध.

किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
...................................................................................
तुमच्या लाईफमध्ये क्रांती घडवेल एक नवीन शोध, आस्तिकनास्तिकमीटर.

meter
आस्तिकनास्तिकमीटर
सांगा तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक? दररोज सकाळी उठले की हाच प्रश्न उभा राहतो ना समोर? हैराण झाला आहात ना ह्या यक्षप्रश्नाने? रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत आणि मिपा लॉगॉफ करेपर्यंत छळणार्‍या ह्या प्रश्नांना आता सामोरे जा खंबीरपणे. फक्त हे मशीन ऑन करा आणि आपला हात त्यावर ठेवा. मशीनच्या डायलवर त्वरीत पर्सेंटेज यायला सुरु होईल. अजो पासून यना पर्यंत सर्व पर्सेंटेजसहीत हे मशीन तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक हे दाखवेल. आस्तिकतेकडे काटा फारच वळत असेल तर मशीनचे प्राडॉ सेटिंग ऑन करा. काटा त्वरीत सेंटरला येईल. अल्फा, बिटा, क्रिप्टा, मार्वा सारखे इंडिकेटर लागत राहतील. ते सतत तुमची सिम्युलेशन प्रोसीजर चालू ठेवतील पण ह्या मशीनची रेडीएशन्स लवकरच तुम्हाला स्थिर करतील. एकदा तुम्ही बॅलन्सड झालात की आत्मविश्वासाने जगाशी चार हात करायला बाहेर पडाल. दिवसातून एकदा फक्त ५ मिनिटे ह्यासाठी द्या आणि स्थिरबुध्दीसह अवर्णनीय मानसिक शांतीचा अनुभव घ्या.

खुषखबर! खुषखबर!! खुषखबर!!!
ajo
अजोकीबोर्ड
ह्या मशीनसोबत मिळवा एक अ जोकी बोर्ड. बिल्कुल मोफत मोफत मोफत. ह्या किबोर्डाने आपला टायपिंगचा स्पीड तर वाढेलच शिवाय बोटात आलेली ताकद स्वतःला जाणवायला लागेल. नेहमीच्या टायपिंगपेक्षा चारपट वेगाने करा कामे आणि त्या मजबूत बोटांना लावा दुसर्‍या कोणत्यातरी कामाला. हैना कमालकी बात.
आजच बुक करा आस्तिनास्तिकमीटर आणि अ जोकी बोर्ड.

किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
........................................................................................

देखिये अब अलग नजरीयेसे. बदलो अंदाज बदलेगा नजारा, यही है नमोचष्मेका नारा.
mc
नमोचष्मा
पेट्रोल भरताना हळहळतंय तुमचं मन? टॅक्सचे रिटर्न भरताना कळवळतंय तुमचं मन? गॅस न विजेची बिले भरताना जळजळतंय तुमचं मन?
भय्या अब अच्छे दिन है तो मूड बना लो अच्छा. आंखोपर चढा लो नमोचष्मा.
खिलखिलाते कमलकी आकारका ये चष्मा मचा रहा है पूरी दुनियामे धूम.
हा स्मार्टचष्मा घाला, डाव्या कानावरील लाल बटण ऑन करा. सारी दुनिया कशी सुरळीत चालू असेल. कामगार, कंपन्या, उत्पाद्न आणि ग्राहक. सारे कसे खुशहाल. गिअरच्या सिंहाची बघा कशी आहे चाल. ना आंदोलने ना भाववाढ, सगळे कसे छान छान. उंचावेल तुमचीच मान.
उजव्या कानावरील हिरवे बटण दाबा. नैसर्गिक शांतीचा आयुर्वेदिक मोड कानाशी हळूहळू स्वदेशी स्वदेशी असा मंत्र चालू करेल. डोळ्यासमोर नयनरम्य हिरवळीवर चरणार्‍या लाखो गोमाता आणी त्यांची करोडो वासरे दिसत राहतील. नुसत्या एका दर्शनाने तेहतीस कोटीचा लाभ पहा कसा अगणित होऊन जाईल. लाखातले हिशोब विसरा आता, देशप्रेमाच्या अ‍ॅपमध्ये अब्जावधी पुण्यकॅश जोडा. ह्या खास चष्म्याच्या काचा पुसण्यासाठी आम्ही देत आहोत अगदी फ्री फ्री फ्री मिनरांजलि वॉटरच्या दोन बाटल्या.
किंमत : ००००.०० रु. फक्त (१५ लाखाच्या स्कीमअंतर्गत)
........................................
हे प्रॉडक्ट आता तुम्ही घरबसल्या मागवू शकता. बस एक बटन दबानेकी देर है.
एक मिसकॉल करा कुठल्याही नंबरला (त्याचा परत आला तर बोलत बसा, नाही आल्यास तुमची वस्तू घरी पोहचणार ह्याची ग्यारंटी.)
पंधरा लाखातून ह्या वस्तूंची किंमत अदा करायची खास सोय.
तुमचे सारे लिंक्ड अकाउंट आम्हाला लिंक करा आणि आम्ही ते सारे पाहून तुम्हाला कशाची गरज जास्त आहे ते पाठवून देऊ.
........................................
ह्या आठवड्याच्या बिगडील नंतर लवकरच घेऊन येत आहोत काही नवनवीन प्रॉडक्ट, जे बनवले आहेत फक्त तुमचाच विचार करुन. आणि उपलब्ध असतील फक्त मिपाबाजारातच..
तर चला मंडळी...त्वरा करा...मर्यादित साठा असल्याने आपली मागणी आजच नोंदवा... तुम्हास उत्पादन भलेही न का मिळेना....कुणाचा तरी बाजार तर उठेल.....
.........................................
(ह्या वस्तूंच्या उत्पादनासाठी काही तज्ञांचे विचार कारणीभूत असले तरी त्यांना ह्याची रॉयल्टी मिळणार नसलेने फारसे मनावर घेऊ नये. बाजार उठवण्याकडे लक्ष केंद्रीत करावे हि नम्र विनंती.. पक्षी चुकभूल देणेघेणे ;) )

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

24 Mar 2018 - 11:41 pm | मार्मिक गोडसे

प्रोडक्ट जबरदस्त.
मास्तरांनी त्यावर अगोदरच धोतर टाकल्याने आम्हाला मिळण्याची शक्यता शून्य.

manguu@mail.com's picture

24 Mar 2018 - 11:55 pm | manguu@mail.com

छान

कपिलमुनी's picture

25 Mar 2018 - 1:38 am | कपिलमुनी

धू धू धुतलायस !!
बाजार उठवलायस !!

प्रसिद्धीकडे नेणारे चार मार्ग मिळवा.

संजय पाटिल's picture

25 Mar 2018 - 6:25 am | संजय पाटिल

Bhaareech aahe he.....

सस्नेह's picture

25 Mar 2018 - 9:56 am | सस्नेह

फुल्टू दंगा-ए-धागा !

चांदणे संदीप's picture

25 Mar 2018 - 10:14 am | चांदणे संदीप

मिपाबाजारातल्या कोनाड्यात उभ्या असलेल्या हिंदमातेच्या बाजूलाच काही कविता पाडणारे आपलं ते लिहिणारे कवीही आहेत, ते तुम्ही दुर्लक्षिले! :(

Sandy

ती शॅाक द्यायची मशिन नाही दिसली कुठे?? देव दाखवायचा होता एक जनाला,

गणामास्तर's picture

25 Mar 2018 - 10:19 am | गणामास्तर

संभाव्य ग्राहकांची (कि आयडींची?) यादी नाव आणि पत्त्यासकट व्यनि करत आहे.

चौकटराजा's picture

25 Mar 2018 - 10:20 am | चौकटराजा

तो की बोर्ड " अजोड " की बोर्ड आहे. त्याचा नाद करायचा नाय ! तो जगात मास प्रोडक्शन ज्या अन्डर येऊच शकत नाय !! बाकी तीन कुठे मिळतील ? सिद्धेश्वर देवळाच्या पाठीमागं ?

सतिश गावडे's picture

25 Mar 2018 - 11:20 am | सतिश गावडे

स्वआरतीमशीन सायकलवर/बुलेटवर/कारवर/ट्रॅक्टरवर/क्युबिकलमध्ये बसवता येतो का? त्यात आरतीसाठी "मी ***** होतो तेव्हा" अशा वाक्याने सुरु होणार्‍या आरत्या भरता येतात का?

आस्तिकनास्तिकमीटर मधला प्राडॉमोड मस्त आहे. मात्र हे मशीन पकाकाकांसाठी चालेल असं वाटत नाही. ;)

जेम्स वांड's picture

25 Mar 2018 - 3:44 pm | जेम्स वांड

त्यात आरतीसाठी "मी ***** होतो तेव्हा" अशा वाक्याने सुरु होणार्‍या आरत्या भरता येतात का?

आरतीचे विषय बदलण्याचेही मोडस उपलब्ध.

असं लिहिलं आहे खरं प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन मध्ये

पगला गजोधर's picture

25 Mar 2018 - 11:33 am | पगला गजोधर

स्वआरतीमशीन , विमानात किंवा पाणबुडी/विमानवाहूजहाज
यावर सुरक्षितपणे वापरता येते का ?

धर्मराजमुटके's picture

25 Mar 2018 - 12:03 pm | धर्मराजमुटके

देवाधर्मावर तर आता लोकांचा विश्वास राहिला नाहि, उरला सुरल्या विश्वासाला तडाखे लावायचे काम यनावालांनी आरंभले आहे. त्यामुळे अजोकिबोर्डातून सांडलेले मौक्तिक मोती समजुन घेण्यासाठी देवा गजाननाकडे बुद्धी मागण्याची सोय उरली नाहि. त्यामुळे त्या शब्दरत्नांचा अन्वयार्थ लावण्यासाठी एखादे यंत्र विकसीत केले तर आमच्या सारखे मुढमती आपणास दुवा देतील.

आदूबाळ's picture

25 Mar 2018 - 12:08 pm | आदूबाळ

लोल! मस्त आहे. अजोकीबोर्डबरोबर फक्त बोटांना मजबूत करणारे प्रोटीन सप्लिमेंट्सही पाहिजेत.

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2018 - 6:27 pm | चौथा कोनाडा

:-)))

बगा, तुमच्या प्रोटीन सप्लिमेंट्स झैरात करता येइल !

आस्तिक नास्तिक मीटरमधे प्राडॉमोड बनवलाय ते उत्तम पण घाटपांडेकाका मोड नसल्याबद्दल निषेध.

यशोधरा's picture

25 Mar 2018 - 12:27 pm | यशोधरा

प्राडॉमोड =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2018 - 12:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी ! =)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Mar 2018 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे हो ! हे राहिलेच...

आस्तिकनास्तिकमीटरला "अज्ञेयवादी" बटण नसल्याने ते प्रॉडक्ट एकदम बोगस आहे हे जाहीर करून वर अभ्या तीन टिंबेचा टीव्र णिश्येद्ध ! :)

चहाची किटली फेकणारा अवलक्षणी हात

असं काही प्रोडक्ट आहे का? म्हणजे कसं सर्वसमावेशक, तुम्हाला काय हवे ते घ्या

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2018 - 1:30 pm | चौथा कोनाडा

ळोळ ....... प्राडॉमोड ....

LOL

खतरनाक प्रॉडक्टस ... !

उपेक्षित's picture

25 Mar 2018 - 2:31 pm | उपेक्षित

पार बाजारच उठीवलाय लगा तू :) :) :)

पद्मावति's picture

25 Mar 2018 - 3:10 pm | पद्मावति

=)) मस्तं धागा.

तेजस आठवले's picture

25 Mar 2018 - 3:38 pm | तेजस आठवले

कहर आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला नमन.
___/\___

तुषार काळभोर's picture

25 Mar 2018 - 4:28 pm | तुषार काळभोर

चि. अभ्या... काय डेरिंग है!!

अति-अति-अति-अति अवांतर : या चित्रातली कार्टातली बाई बघून यदाकदाचितचं पोष्टर आठवलं.

प्रभू-प्रसाद's picture

25 Mar 2018 - 10:45 pm | प्रभू-प्रसाद

चि. अभ्या चे श्रीयुत अभिजीत झाल्यामुळे हे डेअरिंग आलंय हो.☺☺☺

नाखु's picture

25 Mar 2018 - 6:41 pm | नाखु

चावडी सारखा एका अंगाला झुकला आहे,आणि झुकल्याने समतोलपणा हरवला आणि मज्जा उतरली

वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

किसन शिंदे's picture

25 Mar 2018 - 9:13 pm | किसन शिंदे

पहिलं प्राॅडक्टच आवडलं. तुझ्या सोलापूरच्या हापिसात तत्सम मशिन पाह्यल्यासारखं वाटलं मला. ;) त्यावरून प्रेरणा घेऊन हे नवं बनवलंय का? =))

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2018 - 9:39 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

विशुमित's picture

25 Mar 2018 - 9:52 pm | विशुमित

बाजारच उठवलाय राव...
Competitor कोणी फिरकले नाही धाग्यावर. पण ते गप्प बसणार नाहीत. त्यांचं नवं प्रोडक्ट लान्च करतीलच लवकर.

प्रभू-प्रसाद's picture

25 Mar 2018 - 10:57 pm | प्रभू-प्रसाद

अभ्या भाऊ .... लगे राहो!!!!

ह्यो पेशल सोलापुरी मोड इज ऑन ..(मंगळवार बाजार)

चिनार's picture

26 Mar 2018 - 1:22 pm | चिनार

एक नम्बर रे..

खिलजि's picture

26 Mar 2018 - 1:31 pm | खिलजि

दाणादाण उडवतील हे प्रॉडक्ट जर खरेच आले मार्केटमध्ये तर ... स्वप्नाळू नेत्यांना आणि त्याच्या भक्तांना फुकटचे जोडे घातले आहेस मित्रा .... एक पायतानाचे उत्पादनही टाकायला हवे होतेस ... पाच वर्षांच्या टर्मनंतर, जे जे कुणी काही बोलले आहे ते नाही झालं तर निदान पायताण प्रॉडक्ट तरी निर्विकारपणे आपले काम करेल .... मस्त मजा आली वाचून आणि थोडावेळ अनुभवून ...

सिद्धेश्वर विलास पाटणकर

सूड's picture

26 Mar 2018 - 1:45 pm | सूड

कहर!!

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2018 - 4:54 pm | टवाळ कार्टा

हाण्ण तेजायला =))
बाकी ३३% आरक्शणवाल्यांसाठी शेप्रेट कैच नै?

टवाळ कार्टा's picture

26 Mar 2018 - 4:57 pm | टवाळ कार्टा

हे असे काहीतरी ;)

megaphone

स्वधर्म's picture

26 Mar 2018 - 5:01 pm | स्वधर्म

अाणि मार्मिकही. लय भारी.

कंजूस's picture

26 Mar 2018 - 7:36 pm | कंजूस

भारतात आहे तसंच पुरातन/विस्कळीत/एथ्निक/ओथेंटिक चौकाचौकात आहे म्हणूनच परदेशी प्रवासी येतात. इथले/मिपावरचे बाजारांचे कौतुक करायचे सोडून उठवल्याबद्दल णिषेध.

प्रसाद गोडबोले's picture

27 Mar 2018 - 12:01 am | प्रसाद गोडबोले

ख्या ख्या ख्या

जेम्स वांड's picture

27 Mar 2018 - 12:38 pm | जेम्स वांड

काही नवे प्रॉडक्ट ऍड करता आले तर पहा लिस्टिंग मध्ये

मजा आली!

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Mar 2018 - 2:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

लै म्हणजे लैच क्रिएटिव
बाकी त्या टि शर्टच्या आरडरीचे काय झाले?
पैजारबुवा,

लै म्हणजे लैच क्रिएटिव!!+१

पुंबा's picture

27 Mar 2018 - 5:23 pm | पुंबा

ख्या ख्या ख्या..
जब्रीअभ्यादादा

सुखीमाणूस's picture

27 Mar 2018 - 7:19 pm | सुखीमाणूस

खूप मस्त!!
आता आमची पण ऑर्डर घ्या. अ‍ॅकदम मेड इन चायना पायजे
एक पुरोगामी बुरखा पाहिजे.स्वस्त आणि सेक्युलर
टराटरा फाटला तरी लगेच दुसरा घालायची सोय.
बुरख्यातुन फक्त हिन्दु त्यातुन उच्च जातीवर नेम धरता आला पाहिजे. आणि ईतर धर्मात होणारे अन्याय अजिबात दिसले नाही पाहिजे

ही ऑर्डर एकदम आयुष्यभर पुरणार बर का. कारण ऑर्डर देणारा आख्या जगाला बुरख्यात टाकल्याशिवाय शांत होणार नाही.....

आत्ता धंदा वाढणार आणि मग बाजाराची कायमचीच सोय

आशा ही अशी चमत्कारिक साखळी आहे... जो तिला बांधलेला असतो तो धावत असतो, आणि मोकळा असतो तो स्तब्ध बसून राहतो.

सुबोध खरे's picture

4 Apr 2018 - 10:23 am | सुबोध खरे

अन्याय दर्शक यंत्र पण डिझाईन करायला पायजेलाय.
म्हणजे जातीमुळे (उच्च -यामुळे प्रवेश हुकला) किंवा (मागास म्हणजे जन्मापासूनच झालेला अन्याय - त्यातही क्रिमी लेयर मुळे झालेला अन्याय)
धर्मामुळे (भगवा हिरवा निळा पांढरा)
रंगामुळे ( गोरे निमगोरे गव्हाळ इ -विशेषतः लग्नाच्या बाजारात)
लिंगामुळे (स्त्री असल्याने पीडित, पुरुष असल्याने स्त्रियांनी केलेला अन्याय, किंवा मध्येच असल्याने समाजाकडून)
व्यवसायामुळे (शेतकरी, आयटी हमाल, डॉक्टर, इंजिनियर, कलाकार इ इ)
काहीच नाही तर सुख दुखतंय म्हणून (उदा मला बोटीवर, पाणबुडीवर, विमानात ऑनसाईट जायला मिळालं नाही, जेमतेम १०००-१२०० फूटाचंच घर आहे, मिपावर टी आर पी मिळत नाही, नवीन नवीन ड्यू आयडी घेतली कि आयडी ब्लॉक होते इ इ
झालेला अन्याय लोकांना जाहीरपणे दिसला पाहिजे.
कुठेही गेले कि लोकांना हा अन्यायग्रस्त माणूस आहे हे लगेच समजले पाहिजे.
त्यासाठी टाहो फोडायला मोर्चे काढायला नकोत.

इरसाल कार्टं's picture

6 Apr 2018 - 4:19 pm | इरसाल कार्टं

काहीच नाही तर सुख दुखतंय म्हणून (उदा मला बोटीवर, पाणबुडीवर, विमानात ऑनसाईट जायला मिळालं नाही, जेमतेम १०००-१२०० फूटाचंच घर आहे, मिपावर टी आर पी मिळत नाही, नवीन नवीन ड्यू आयडी घेतली कि आयडी ब्लॉक होते इ इ

ह्ये लै आवडलं बगा. :)

नाखु's picture

4 Apr 2018 - 8:31 pm | नाखु

नावाचं यंत्र विकसित करून पाहिजे चालू की?
माझी कलाकारी सुमार असल्याने साधारणपणे आराखडा असा

टोपी साधारणपणे बांधकाम कामगारांना असते तशी, दोन मोठ्ठे बल्ब लावून आणि एक नामजप यंत्र सारखी जोडणी.

कार्य हेच किं मित्रमंडळी बरोबर असताना खाता पिता कचकावून विरोध आवाज करणारा /दिसणारा लालभडक बल्ब
विरोधकांना भेटताना हिरवा बल्बचा प्रकाश आणि फारच कुणी छेडलं तर बघा हं सोडुन जाईन तुम्हाला असं तुतारीच्या पार्श्वसंगीतावर चालू पाहीजे म्हणजे पाहीजेच

भैजा फ्राय नाखु बिनसुपारीवाला