काय लिहावे तुझ्याचसाठी, मी घेऊन कागद तयार आहे
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
असेच होते हरेक वेळी, लिहायचे तर बरेच असते
चंद्र, तारे, नदी, कालवे सामावयाचे सारेच असते!
पण जशी लेखणी येते हाती, कुणास ठाऊक कोठे जाती
कागद राहतो तसाच कोरा अन शब्दही मजला सोडून जाती
मग राहतो मीच एकटा, पण सोबत करते तुझी आठवण
आठवणींच्या राज्यामधुनी तुझ्याच प्रेमाची साठवण
मग मिठीत घेईन म्हणतो तुजला, पण अंतर मधले फार आहे
हृदयापर्यंत पोहोचायासाठी, सध्या शब्दांचाच आधार आहे
दडी मारुनी बसले कोठे, मी इथे लाचार आहे
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
प्रतिक्रिया
1 Nov 2017 - 5:18 pm | विशुमित
<<<असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!>>>
==>> असे म्हणून आक्खी कविता लिहून मोकळे झालात की
1 Nov 2017 - 11:47 pm | शब्दबम्बाळ
हाहा! धन्यवाद विशुमित जी! :)
1 Nov 2017 - 8:01 pm | पगला गजोधर
मस्त कविता ...
पण लगेच विडंबन करण्याचा मोह टाळता आला नाही...
क्षमस्व
--------------------------------------------
काय टायपावे तुझ्याचसाठी, मोबाईल तयार हाती राहे
असे टायपावे , तसे टायपावे , की सरळ फॉरवडावे... विचार आहे!
असेच होते हरेक वेळी, टायपावे तर बरेच वाटते
बदाम किस दिल साऱ्याच ईमोजी सामावयाचे वाटते !
पण जसा मोबाईल येतो हाती, टॉवर कमी होऊन जाती
सर्च रिजल्ट येतो कोरा जेव्हा सिग्नल सोडून जाती
नेटपॅक लवकर संपे, मी इथे लाचार आहे
गुगल नसता कसे लिहावे हा चिरंतर विचार आहे!
1 Nov 2017 - 8:37 pm | एमी
=))
आवडल्या दोन्ही कविता!
1 Nov 2017 - 11:48 pm | शब्दबम्बाळ
भारी विडंबन! :D
2 Nov 2017 - 6:02 am | अविनाशकुलकर्णी
भन्नाट
2 Nov 2017 - 6:03 am | अविनाशकुलकर्णी
भन्नाट
4 Nov 2017 - 1:29 pm | समाधान राऊत
पण जसा मोबाईल येतो हाती, टॉवर कमी होऊन जाती
सर्च रिजल्ट येतो कोरा जेव्हा सिग्नल सोडून जाती..
1 Nov 2017 - 10:58 pm | प्राची अश्विनी
आवडली.
2 Nov 2017 - 5:35 am | एस
मूळ कविता आणि विडंबन, दोन्ही झकास आहेत!
3 Nov 2017 - 11:37 am | शब्दबम्बाळ
धन्यवाद अॅमी जी, प्राची अश्विनी जी, एस जी! :)
3 Nov 2017 - 12:25 pm | जागु
छान आहे.
3 Nov 2017 - 1:01 pm | सस्नेह
मजेदार कविता !
3 Nov 2017 - 3:11 pm | sayali
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे
विचार कसला करता हो...
शब्द बोलूनी, भाव सांगूनी मन मोकळे करा हो...
अटीतटीचा सामना एकदाच रंगून जाऊ द्या हो....
उत्तर काहीही असले तरीही मन शुध्ह होऊन जाईल हो...
6 Nov 2017 - 9:05 am | शब्दबम्बाळ
वो सामने था फिर भी कहाँ सामना हुआ
रहता है अपने नूर में सूरज छुपा हुआ...
-शकेब जलाली
6 Nov 2017 - 9:06 am | शब्दबम्बाळ
धन्यवाद जागु जी, स्नेहांकिता जी!